क्रोशे - टेबल रनर

हे आधी असे चौकोनी तुकडे करुन घेतले.

DSC00419" width="480" height="360" alt="" />

मग ते जोडायला सुरवात केली.

DSC00421" width="480" height="360" alt="" />

आणि हे तयार झालेलं टेबल रनर Smile

DSC00438" width="480" height="360" alt="" />

DSC00441" width="480" height="360" alt="" />

DSC00442" width="480" height="360" alt="" />

DSC00443" width="480" height="360" alt="" />

लेखनविषय:: 

प्रतिक्रिया

रंगसंगती सुंदर आहे. निळा रंग रॉयल वाटतोय.
मलाही क्रोशेकाम बघायला आवडते.
याचे शर्टस किती सुंदर दिसतात.
तुला अजून कोणते प्रकार करता येतात?

रेवती, धन्यवाद Smile
ह्यात बरेच प्रकार करता येतात माझ्या आईमुळे ......... ती अतिशय उत्कॄष्ठ करायची.

अगं जयुताई मग ऑनलाईन लेसन्स तुझ्याकडूनच घेते आता.
मला शर्ट बनयचाय. पूर्वी दुकानात एक पाहिला होता.
३/४ बाह्या आणी जीन्सवर घालता येईल असा होता.

जयवीजी, ह्यासंदर्भात एखादा व्हिडो करुन तो तुनळीवर अपलोडवला तर आण्खी चांगल्या प्रकारे ही कृती सर्वांपर्यंत पोचेल असे वाटते.

याचे शर्टस किती सुंदर दिसतात.

असे, शर्टस विणता येणारी पोरगी शोध हो आजे...

= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो =

अरे........ असे भरपूर व्हिडियोज आहेत रे तुनळीवर....... त्यात अजून एक भर पडणार इतकंच.
बाकी........ अशी पोरगी शोधायला सुरवात केलीये बर्का Wink

@ व.प्या
असे, शर्टस विणता येणारी पोरगी शोध हो आजे...
अशी मुलगी शोधण्यापेक्षा तुच का नाही शिकत "विणकाम" Wink

बाकी क्रोशे टेबल रनर आवडेश Smile

पियुशा......

http://lovelypiyu.blogspot.com

अशी मुलगी शोधण्यापेक्षा तुच का नाही शिकत "विणकाम"!!

हे तर शिकतोच अन माझ्या घरात एक मोठ्ठा झोपाळाही घेतो त्यासोबत बांधुन...

= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो =

मला क्रोशेकाम दुसर्‍याने केलेलं बघायला प्रचंड आवडतं. पण कधी करायचा प्रयत्न केला नाही. एवढी मोठी आणि सुंदर वस्तू तुम्ही विणून तयार केली, ग्रेट!

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(सूचना: कोणत्याही धाग्यावर मी जे प्रतिसाद देते ती सदस्य म्हणून माझी वैयक्तिक मते असतात. )
||मर्यादेयं विराजते||

शुक्रिया Smile

मस्त विणलं आहे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"एक क्षण मनाचा..."
http://pravindreams.wordpress.com/

अन्नू....... टाळ्यांसाठी धन्यु Smile

खुप आवडले...असे एखादे आम्हाला विणून द्या

धन्यवाद Smile
असं विणून देईन की...... लोकर तेवढी पाठव Wink

मस्त आहे. मी सद्ध्या फुलं अन फुलपाखरं बनवायला शिकतेय. एखादा व्हीडीओ तयार करुन यु ट्युबवर टाक अन कळव.

***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/

अरे वा.......... मस्तच. झाल्यावर फोटो नक्की टाक.
अगं असे इतके व्हिडियोज आहेत ना..... त्यामुळे कंटाळा करतेय.

चेपुवरुन साथ इथेपण पसरली वाटतं...हाहाहा.

क्रोशेकाम भरगच्च केलेलं आहे आणि आवडले गेलेलं आहे..

- पिंगू

- पिंगू

ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ | क्योंकि वक्त नहीं लगता, वक्त बदलने में |

पिंगू........ स्वतःचं कौतुक करुन घ्यायला फेसबुक सारखं दुसरं प्रभावी माध्यम नाही हे मान्य करावंच लागेल Smile

अश्या कलाकृतीमधे मला नेहमी हव्या असणार्‍या २गोष्टी यात १००% आहेत..
१)रंगसंगती...
२)प्रमाणबद्धता...
त्यामुळे आपल्या कडुन या कलाकृतीला आणी...सलाम...सलाम...सलाम Smile

०===०===०===०===०
स्मायली..जीवन माझे माझे
स्मायली..जीवन माझे Biggrin
आत्मू'बाबा स्मायलीवाले! I-m so happy

तहे दिल से शुक्रिया Smile
तुझ्या अभिप्रायामुळे माझाही आत्मा तॄप्त झाला Smile

मस्त गं ताई.... रंगसंगती अफाट आहे. क्रोशेकाम प्रचंड आवडलं, अजून येऊ देत Smile :)

____________________________________________________

I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

धन्यवाद सुहास Smile
अशा प्रतिक्रिया वाचल्या की आपोआप हुरुप येतो नवं काहीतरी करायला ....... !!
नवीन काही केलं की नक्की फोटो अपलोड करेन.

वा वा!! मला पण क्रोशाचे विणकाम करायला खुप आवडते!! पण चौकोन करायला गेले की वाट्या बनतात काही वेळा !! मग नंतर कंटाळा येतो !! तुम्ही खुपच छान केले आहे रनर!! खुपच patience लागतो हे एव्हडं मोठं काम करायला!!!!!!keep it up!!

महाराणी...... तुझ्या चौकोनाच्या वाट्या का बनतात सांगू ? तू सुरवातीला सैल विणतेस आणि नंतर घट्ट.... त्यामुळे असं होतं. एकसारखा हात ठेव मग बघ.....तुझेही सुरेख चौकोन होतील Smile

धन्यवाद जयवी! मी पुढच्या वेळेला नक्की लक्षात ठेवीन!

सुरेख झालय टेबल रनर

पुरी जाईचिया फुल फाकणे| त्याचि नाम जैसे सुकणे|
तैसे कर्मनिषे न करणे| केले जिद्दी|

छान झालंय टेबल रनर.. माझ्या सौ.ला क्रोशेकाम करायला आवडतं.. तिने टेबल मॅट्स, बुक मार्कर आणि आमच्या पुतणीसाठी स्कर्ट असं काय काय बनवलंय..

आणखी येऊ द्यात, ताई..

चिगो..

|| कौन कहता है, के आसमां में सुराख नही होता?
इक पत्थर तो तबियत से उछालों , यारों ||

रंगसंगती पण सुरेख जमलीय..
आवडले विणकाम..

कौशी

क्रोशे काम आवडल
शिकायला आवडेल. आपण खूप मेहनत घेतलेली दिसत आहे.
पुढील कामाला shubhecha
अनिल आपटे

मस्त ग तै. भारी दिसते आहे एकदम.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

तुझा आयडी हॅक तर नै न झाला ...

= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो =

जाई, चिगो, कौशी, अनिल, परा........ कौतुकाने सुखावलेय Smile

सुरेख ! Smile
टेलिफोन बंद होता तेव्हा बराच वेळा मिळालेला दिसतोय ! Wink

(कला प्रेमी) Smile

मदनबाण.....

YAKKA NIN MAGALU :- {Victory-:- kannada Movie }

हे हे हे....... मदनबाणा...... टोमणा कळला बरं........... Smile बोलून घे तू पण !!

रनर आवडले.
क्रोशे काम , विणकाम माझ्या अत्यंत आवडीचे. प्रत्येक वर्षात १६ ते ३० वेगवेगळ्या वस्तु करून होतात माझ्या... दर वेळी नवे रंग, नवे धागे किंवा लोकर. The thrill of creation.... !!!

अरे वा ....... मग तू केलेल्या वस्तूंचे फोटो पण टाक ना !! आम्हाला पण नवीन काही शिकायला मिळेल Smile

जयुतैशी सहमत.
तुम्ही केलेल्या क्रोशेकामाची छायाचित्रे पहायला आवडतील.

'स्त्रीविश्व' आणि/अथवा 'विणकाम्/भरतकाम' असा एक विभाग येऊ द्या मिसळपाव वर... Wink

स्वगतः कुणाचा आयडी कल्पावा बरं इथं?हल्कट प्रतिक्रियाचे पेटंटधारक सरळ प्रतिक्रिया देतात मग सरळ प्रतिक्रिया देणाराने हलकट प्रतिक्रिया दिल्या तर बोंब हो ऊ नये.

मस्त बनवले आहे टेबल रनर.रन्गसन्गतीही अतिशय उत्तम.

"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

मनापासून धन्यवाद Smile

बाकी "मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे. हे एकदम आवडेश Smile