झपुर्झाच.......दुसरं काय ?

इरसाल's picture
इरसाल in जनातलं, मनातलं
4 Feb 2012 - 11:10 pm

जर का लता मंगेशकरांनी तुमच्यासाठी गाणे म्हटले, सचिनने शंभर तुम्हाला अर्पण केले, ए आर रहमानने तुम्ही गायलेल्या गाण्याला चाल आणि संगीत दिले तर तुमची अवस्था काय होईल.:D
असाच काहीसा ढिंच्याक अनुभव मला आला.;)
मला खात्री आहे काही ओळीनंतरच मिपाकर ओळखतील कि कोणाबद्दल बोलतोय ते.पण तरीही मी सांगणार नाही फक्त शेवटी एक संकेत (मराठीत-हिंट) देणार. ;)
नवीन कंपनीत लागून २/३ च महिने झाले होते.सुरुवातीला कॉर्पोरेट ऑफिस सुप्रसिद्ध रॅडिसन हॉटेल मध्ये होते.पण कारखान्याचे बांधकाम चालू झाल्याने मुख्यप्रबंधकाने (मराठीत- एमडी) सगळ्या विभागप्रमुखांना कारखान्यावर पिटाळले( थोडक्यात हाकलले ४५ कि.मी. दूर):(. एक प्रकारे आम्ही काही मोजकेच लोक हिरवळीतून वाळवंटात विस्थापित झालो.
सुरुवातीला आमचे मुख्य काम काहीच नव्हते फक्त मुकादमगिरी,नवनवीन यंत्रांच्या दरसूची मागवणे, निवड करणे आणि आपापल्या विभागाचे बांधकाम नकाशाबरहुकूम चालले कि नाही ह्याचे लक्ष ठेवणे हेच होते.
अश्यात सोबतीला फक्त अंकधरसंगणक होता.अश्याच एका रिकामटेकड्या दिवशी आंजावर मिसळपाव कसा बनवायचा तोही कोल्हापुरी हे शोधत होतो अचानक “मिसळपाव.कॉम” खाली " अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं.... " अशी अर्धवट ओळ असणाऱ्या संकेतस्थळाचा शोध लागला आणि अचानक तोंडातून शब्द बाहेर पडले "ओ त्तेरी णू के होण लाग ऱ्या घणी सुरती लाग ऱ्ही" :love: मग काय अलिबाबाची गुहाच माझ्यासाठी उघडली गेली.
वाचनाची भयानक 8) आवड आधीपासूनच होती. त्यातल्या त्यात मी पहिल्यापासूनच "शुद्ध मांसाहारी" सुद्धा आहे. म्हणूनच मिपावर वाचनाबरोबर पाककृती हा विभाग पाहून "दिल बाग बाग झाला". आणि दुधात साखर पडली.
वाचनाबरोबर दिवसेंदिवस माझा अभ्यास वाढवत होतो. आधी व्य. नि., खफ, बाडीस, पुलेशु,:~ वगैरे काय हे सगळे अवांतर चेंडू होते. काही म्हणजे काही समजायचे नाही. बाकीचे इथे "जाणकार", "प्रस्थापित" वगैरे होते त्यामुळे थोडे दबून असायचो.
आताचे नवीन सदस्य जरा पुढारलेले आहेत आता जे सदस्य येतात ते मुख्यत्वे तीन गोष्टी बरोबर घेवून येतात "जिलेबीचे थाळ, शाल-श्रीफळ (महावस्त्र- नारळ) आणि फसफसता उत्साह (यात काही इमरतीहि असतात हा भाग वेगळा)(कोल्हापुरी चपला, डायरी वगैरे तत्सम वस्तू मिपावर पुरवल्या जातात.))
इतका गुऱ्हाळ लावायचं कारण हे कि मला पाककृती मध्ये चिकनची एक अफलातून पाककृती मिळाली.
अहाहा काय वर्णू त्या पाकृचा महिमा, पदार्थांची मागणी, कच्चा माल सुबकतेने हाताळायची कला, पायरी पायरीने बनणाऱ्या चविष्ट पदार्थाचे सादरीकरण आणि सगळ्यात शेवटी म्हणजे पूर्ण तयार असलेल्या पदार्थाला नव-वधू प्रमाणे नखशिखांत सजवून खादाडांपुढे प्रस्तुत करणे हे कोणी त्यातून शिकावे.
आयला "कोण" आहे इतके सफाईदारपणे सगळे काही मंत्रमुग्धपणे साकार करणार.
ह्या "कोण" शी मनापासून ओळख वाढवावी असे वाटू लागले पण हिम्मत काही होईना.मिपाच्या भाषेत "कोण" प्रस्थापितांमध्ये सामील, त्यामुळे जरा भीड चेपत नव्हती. बरं हि व्यक्ती मिपावर लाडकी आणि प्रसिद्ध हि होती/आहे/राहील. पण अचानक काही लेख वाचताना जाणवले कि "कोण" ची आणि आपली वारंवारता जुळतेय. मग अहो जाहो सुरु होवून ग-पत्राची देवाणघेवाण झाली.
मग काय विचारता एक दिवस चक्क गबोल्यावर भेटलो.शालेय जीवनातला दुरावलेला मित्र सापडल्याचा आनंद झाला.गबोल्यावर बात करताना कधी घट्ट मैत्री जुळली हे आणि अहो जाहो वरून कधी अरे तुरे वर आलो कळलेच नाही.
आज पर्यंत कधी न भेटलेली व्यक्ती कशी इतकी जवळची बनते ना कधी कधी हे कोडे उलगडत नाही.
अश्याच बातांमध्ये मग "कोण" कडून माझ्या अपेक्षा वाढल्या.मधेच मी काही मागणी करायला लागलो.अहो आश्चर्य मागणी पूर्ण झाली, एकदा नाही बऱ्याचदा.
आता हेच घ्याना कालच एक अफलातून भेट मला मिळाली काय असेल बरे.........फक्त आणि फक्त माझ्याच साठी.........तुम्हीच पाहाना आणि सांगा.................” कोण” कोण आहे ते?

idlixaguti

रेखाटनसद्भावनाअनुभव

प्रतिक्रिया

तो गंपा आहे की काय?
हिंट काही कळली नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Feb 2012 - 12:01 am | अत्रुप्त आत्मा

दुसरं कोण हो...? तो अमचा गंपती-बाप्पाच.. :-)

तुषार काळभोर's picture

5 Feb 2012 - 7:14 am | तुषार काळभोर

इरसाल म्हणाले, "आता हेच घ्याना कालच एक अफलातून भेट मला मिळाली "

'काल' एक 'तशी' गोष्ट अवतरली होती इथे..सोत्रिंच्या कॄपेने...त्याबद्दल बोलत असतील...

ओ पैलवान.....नाय वो तसा काय नाय...का उगा धुळीत उताणे पाडु र्हायले.

तुषार काळभोर's picture

5 Feb 2012 - 12:46 pm | तुषार काळभोर

सकाळी ते चित्र दिसलं नव्हतं म्हणून वाटलं तसं..ही वशाट इडली 'कोणाची' आहे..?

नक्की झालं काय ? जल्लां आमाना समजल आसा लिवा .

अन्नू's picture

5 Feb 2012 - 12:15 pm | अन्नू

मग अहो जाहो सुरु होवून ग-पत्राची देवाणघेवाण झाली.

यातील "कोण" हे "ती" तर नाही ना?
शंका तशीच येतेय! Smiley

गबोल्यावर बात करताना कधी घट्ट मैत्री जुळली हे आणि अहो जाहो वरून कधी अरे तुरे वर आलो कळलेच नाही.

कही कुछ तो गडबड है दया, कुछ तो हुआ है।

चिंतामणी's picture

5 Feb 2012 - 12:20 pm | चिंतामणी

खायला घालणार आहात का एकादी डिश???

डॉ.श्रीराम दिवटे's picture

5 Feb 2012 - 1:12 pm | डॉ.श्रीराम दिवटे

काहीतरी भानगड घडून गडबड उडालेली दिसतेय.
बाकी लेख छान रंगलाय!

रेवती's picture

5 Feb 2012 - 9:08 pm | रेवती

मग कोण? मराठमोळे की काय?

किचेन's picture

5 Feb 2012 - 10:56 pm | किचेन

गणपाच असणार.खात्रिने सांगते.

(सुरुवातीला वाटल हे माझ्या चिकन बद्दल बोलतायत.मी एकदम हवेत गेले होते.पुढच वाचून धपकन आपटले. ;) )

इरसाल,

ओळखलयं की ती व्यक्ती गणपाच आहे म्हणून..

- पिंगू

इरसाल भाव तुझाकडे चाखलेल्या रश्श्याची चव पण भन्नाटच होती..........
तेवढ्यासाठी पुन्हा एकदा दिल्ली वारी करायला लागली तरी हरकत नाही.

प्राजु's picture

7 Feb 2012 - 2:48 am | प्राजु

गणपाच तो!!

प्रीत-मोहर's picture

7 Feb 2012 - 12:42 pm | प्रीत-मोहर

गंपाच तो

गणेशा's picture

7 Feb 2012 - 2:16 pm | गणेशा

भारी लिहिले आहे ..

लग्न ठरल्याबद्दल शुभेच्छा ! असा रिप्लाय द्यावा लागणार असे समजुनच अर्ध्याच्या पुढे वाचु लागलो ..

पण शेवट वेगळाच होता.. आणि सगळे रिप्लाय मधुन गणपा म्हणत आहेत त्यामुळे आमच्या विचारांना तडा गेलाच..
त्यात तुमचे वय माहित नाहि ...

त्यामुळे लेख चांगला आहे येव्हडाच गुळमुळीत रिप्लाय द्यावा म्हणतोय...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 Feb 2012 - 3:29 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मला एक बेसिक प्रश्न पडला आहे.
झपुर्झा म्हणजे नक्की काय ??

सुहास झेले's picture

8 Feb 2012 - 7:45 am | सुहास झेले

यप्प अगदी ह्येच म्हणतो........ झपुर्झा म्हणजे नक्की काय ??

गवि's picture

8 Feb 2012 - 8:10 am | गवि

बहुधा..

जा पोरी जा.. जापोरीजा..

किंवा विठ्ठ्ल विठ्ठल ... ठ्ठलवि ठ्ठ्लवि..

असा रिपीटेड शब्दांचा एक बेभान निव्वळ रिदम शिल्लक राहतो त्या अर्थाने
झपाटलेपणाला हा शब्दववापरत असावेत.

चूभूदेघे.

चिंतामणी's picture

8 Feb 2012 - 8:53 am | चिंतामणी

केशवसुतांची कवीता आहे.

तसेच

साहित्य सहवास (जेथे सचीन रहायचा) वाद्रे-पूर्व ४०००५१ येथील एक झपुर्झा नावाची इमारत आहे.

चिंतामणी's picture

8 Feb 2012 - 9:01 am | चिंतामणी

झपूर्झा

हर्षखेद ते मावळते,
हास्य निवालें
अश्रु पळाले;
कण्टकशल्यें बोंथटलीं,
मखमालीची लव वठली;
कांही न दिसे दृष्टीला,
प्रकाश गेला,
तिमिर हरपला;
काय म्हणावें या स्थितिला ?-
झपूर्झा ! गडे झपूर्झा ! १

हर्षशोक हे ज्यां सगळें,
त्यां काय कळे ?
त्यां काय वळे ?
हंसतिल जरि ते आम्हांला,
भय न धरुं हें वदण्याला :-
व्यर्थीं अधिकची अर्थ वसे,
तो त्यांस दिसे,
ज्यां म्हणति पिसे,
त्या अर्थाचे बोल कसे?-
झपूर्झा ! गडे झपूर्झा ! २

ज्ञाताच्या कुंपणावरुन,
धीरत्व धरुन
उड्डाण करुन,
चिद्घनचपला ही जाते,
नाचत तेथें झगझगते
अंधुक आकृति तिस दिसती,
त्या गाताती
निगूढ गीति;
त्या गीतीचे ध्वनि निघती –
झपूर्झा ! गडे झपूर्झा ! ३

नांगरल्याविण भूई बरी
असे कितितरी
पणे शेतकरी
सनदी तेथें कोण वदा?-
हजारांतुनी एकादा !
तरी न, तेथुनि वनमाला
आणायला,
अटक तुम्हांला;
मात्र गात हा मंत्र चला –
झपूर्झा ! गडे झपूर्झा ! ४

पुरुषाशीं त्या रम्य अति
नित्य प्रकृति
क्रीडा करती;
स्वरसंगम त्या क्रीडांचा
ओळखणें, हा ज्ञानाचा
हेतू; तयाची सुन्दरता
व्हाया चित्ता –
प्रत ती ज्ञाता
वाडें कोडें गा आतां –
झपूर्झा ! गडे झपूर्झा ! ५

सूर्य चन्द्र आणिक तारे
नाचत सारे
हे प्रेमभरें
खुडित खुपुष्पें फिरति जिथें;
आहे जर जाणें तेथें
धऱा जरा, नि:संगपणा,
मारा फिरके,
मारा गिरके,
नाचत गुंगत म्हणा म्हणता –
झपूर्झा ! गडे झपूर्झा ! ६

मुंबई, २ जुलै १८९३

धन्यवाद चिन्तामणीजी,
हेच टायपायला आलो होतो. हर्षवायूचा झटका येण्यापूर्वी जशी माणसाची अवस्था असते सर्वसाधारण तीच अवस्था, बेभान, बेधुन्द काहीशी.
प्रतिसादाबद्दल सगळ्यान्चे धन्यवाद.

धन्यवाद पोहोचले. आधी उत्तर सांगा इरसालसाहेब.

चिंतामणी's picture

8 Feb 2012 - 6:55 pm | चिंतामणी

म्हणजे

जपून जा ! गडे जपून जा !

चिंतुकाका, तुम्ही थांबा हो!
इथं 'तो' माणूस कोण? हे समजत नाहिये.
विषय भरकटवत नेलात की कश्याला मिळतय उत्तर?

चिंतामणी's picture

8 Feb 2012 - 10:46 pm | चिंतामणी

Facebook smileys

अन्नू's picture

8 Feb 2012 - 8:04 pm | अन्नू

आता किती शश्पेंश ठिवताय?

Smiley

गणपा's picture

9 Feb 2012 - 12:23 am | गणपा

कॉण रे तो/ती ज्येष्ठ मिपाकर?

अजून चालूच आहे का ? चालू द्या ,चालू द्या.

किसन शिंदे's picture

9 Feb 2012 - 12:38 pm | किसन शिंदे

उत्सुकता वाढलीय राव, 'त्या' व्यक्तीचे नाव जाणून घेण्याची. आता सांगुनच टाका.

इरसाल's picture

9 Feb 2012 - 1:11 pm | इरसाल

रेवती जी तुम्ही दिलेल्या पहिल्याच प्रतिसादातील उत्तर बरोबर आहे.
म्हणजेच बल्लवाचार्य गणपा.

अवान्तर : पोरगी बिरगी नाय :D

चिंतामणी's picture

9 Feb 2012 - 1:23 pm | चिंतामणी

Facebook smileys

गणपा's picture

9 Feb 2012 - 1:31 pm | गणपा

डॉले पाणावले मित्रा. :)

चिंतामणी's picture

9 Feb 2012 - 1:44 pm | चिंतामणी

Facebook smileys

अन्नू's picture

9 Feb 2012 - 1:29 pm | अन्नू

कोडं सुटलं म्हणायच. Smiley