कॅरॅमल कस्टर्ड

साहित्यः

अंडी - २
दुध - २ कप
साखर - दिड कप
व्हॅनिला इसेन्स - १-२ थेंब

कृती:

१. एका पातेल्यात दुध गरम करुन घ्यावे व थंड होउ द्यावे.
२. भांड्यामधे २ अंडी फोडुन, त्यात १ कप साखर टाकुन egg beater ने फेटावे.
३. पातेल्यात १/२ कप साखर व ३ चमचे पाणी टाकुन, एकत्र करुन गॅसवर ठेवावे. ह्याचा brown रंगाचा पाक (कॅरॅमल) होई पर्यंत मिश्रण हलवत राहावे.
४. फेटलेल्या अंड्यामधे गार झालेले दुध निट मिक्स करावे.
५. ज्या वाटीमधे कस्टर्ड करायचे आहे त्यात आधी तळाला २ चमचे पाक टाकावा. हा पाक संपुर्ण तळाला नीट लागला पाहिजे. वाटीत पाक टाकल्यावर २ मिनिटात तो कडक होतो.
६. त्यानंतर त्यात अंडे व दुधाचे मिश्रण गाळुन ओतावे.
७. कुकर मधे थोडे पाणी टाकावे. त्यात ही वाटी ठेवुन २०-२५ मिनिटे शिजवुन घ्यावे. हे करताना कुकरची शिट्टी काढुन घ्यावी.
८. कस्टर्ड तुम्ही ओव्हन मधे सुद्धा करु शकता. त्या साठी ओव्हनच्या टिन मधे खाली कॅरॅमल लावुन, त्यावर मिश्रण ओतावे.
९. मोठया ट्रे मधे पाणी घेउन त्यात हा टिन ठेवावा. हा मोठा ट्रे ओव्हन मधे २०-२५ मिनिटे १५० degree celcius वर शिजवुन घ्यावा.
१०. कस्टर्ड शिजल्यावर बाहेर काढावे. थोडे गार होउ द्यावे.
११. गार झाल्यावर आधी सुरीने त्याच्या कडा मोकळ्या करुन घ्याव्यात. त्यावर एक प्लेट ठेवुन, टिन सोबत प्लेट उलटी करावी.
१२. अलगद हाताने टिन उचलावा. कस्टर्ड निट निघुन येते.
१३. मी उरलेल्या पाकाने काही design बनवली होती, त्याने सजवुन कस्टर्ड serve केले.

dsf

custard

प्रतिक्रिया

पाककृती बघून अमंळ हळवा झालो... माझी सर्वात आवडती स्वीट डिश smiley

हटके सादरीकरणाने कस्टर्डची अजून लज्जत वाढलीय .... smileysmiley

____________________________________________________

I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

सादरीकरण आवडलं.

...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे! smiley

सादरीकरण पुन्हा मुळ पदाला आलं, बरं वाटलं. अपेक्षा वाढल्या.

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

करीना कपूरला पाहून मन हळवे झाले.

३. पातेल्यात १/२ कप साखर व ३ चमचे पाणी टाकुन, एकत्र करुन गॅसवर ठेवावे. ह्याचा brown रंगाचा पाक (कॅरॅमल) होई पर्यंत मिश्रण हलवत राहावे.

या चमच्याचा एकतरी फोटो असायला हवा होता. नेमका अंदाज आला असता. पाकृ नेहमीप्रमाणेच भारी. smiley

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"A government is the most dangerous threat to man’s rights: it holds a legal monopoly on the use of physical force against legally disarmed victims."
Capitalism: The Unknown Ideal- Ayn Rand

आपला साधा नेहमीचा चमचाच वापरला आहे. पाणी हे फक्त पाक करताना सोपे जावे म्हणुन टाकले आहे. पाणी न टाकता नुसत्या साखरेचा पाक केला तरी चालेल.

आपण जगण्यासाठी खात नसुन खाण्यासाठी जगतो.
http://fooddreamers.blogspot.com

मस्त! दरवेळी खाताना 'गिल्टी फीलिंग" त्रास देतं, पण खाल्लं नाही तर भूत होईन अशी भीती वाटते, तीच ही डिश. मस्त जमलीय. पण मला आत्ता पाहिजे, आयतं कोण देणार करून?

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आधीं होती दासी । पट्टराणी केलें तिसी ॥
तिचें हिंडणें राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥

अवघड आहे.... smiley

__________________________________________________________________
येर्‍हवी सर्वांच्या हृदयदेशी| मी अमुका आहे ऐसी | जी वृत्ती स्फुरे अहर्निशी| ती वस्तु गा मी||

!!!!!!!!!

-- या आमच्या शिळोप्याच्या ओसरीवर.. बसा घटकाभर..!

मस्त

पुरी जाईचिया फुल फाकणे| त्याचि नाम जैसे सुकणे|
तैसे कर्मनिषे न करणे| केले जिद्दी|

मृणालीनी तुम ग्रेट हो.

कसला भारी दिसतोय.. पाकापासून काड्यांचं प्रेझेंटेशन तर जबरा..

- पिंगू

- पिंगू

ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ | क्योंकि वक्त नहीं लगता, वक्त बदलने में |

सगळ्यांचे धन्यवाद smiley

आपण जगण्यासाठी खात नसुन खाण्यासाठी जगतो.
http://fooddreamers.blogspot.com

लई झाक पाकृ smiley
शुगर स्पंज मस्तचं

***************************************************************
People Who Love To Eat Are Always The Best People - Julia Child
***************************************************************
http://delectable-delicious.blogspot.com/

तुफ्फ्फ्फ्फान!!!
ती जाळी कशी केलीस??

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

लिंक

अशाप्रकारे मी ही जाळी बनवली... smiley

आपण जगण्यासाठी खात नसुन खाण्यासाठी जगतो.
http://fooddreamers.blogspot.com

लै भारी दिसतय..पहाता क्षणीच खाण्याची विच्छा झाली

०===०===०===०===०===०===०===०===०===०
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||

उत्कृष्ट पदार्थ आणि प्रेझेन्टेशन.

खुपच छान!! tempting!!

छान दिसतंय कस्टर्ड! smiley

सगळ्यां'चे' धन्यवाद नाही हो, सगळ्यां'ना' धन्यवाद smiley

सोपी पाकृ आहे.. मस्त उद्या करुन बघीन नक्कि...
धन्नु Mrunalini ताई!! smiley

मी रूपाली

सुपर डुपर पाकृ

***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

सही झालयं . मस्तच.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.