!!...'मानवी भूकंप'...!!

सन्दीप१२३३०'s picture
सन्दीप१२३३० in जे न देखे रवी...
2 Feb 2012 - 11:20 pm

!!...'मानवी भूकंप'...!!

गोष्ट आहे ही एक ग्रासलेल्या मुलीची
दरड कोसळली एके दिवशी तिच्यावर कृत्रिम आपत्तीची...

असा काही झाला होता तिच्या मनावर आघात
'मानवी भूकंपा'चा घडला होता कृत्रिम अपघात...

भूकंपाचे केंद्र होते जवळचेच एक घर
राहात होता तिथेच तिचा तो 'प्रियकर'...

प्रेमात असा काही दिला होता त्याने धोका
एकाच फोन कॉल ने बसला होता तिला मोठा धक्का..

त्याच्या दूर जाण्याने तिच्या पायाखालची जमीनच हादरली होती
मनाच्या भूकंपाची ती तीव्रता रिश्टर स्केलवर देखील मोजण्याजोगी नव्हती..

मनाचे तुकडे दिसत होते सर्वत्र विखुरलेले..
अन, आठवत होते जुने दिवस जेव्हा गीत नवे स्फुरलेले..

मानवी भूकंपामुळे जरी झाली होती तिच्या मनाची काहिली
संघर्ष करत मनाच्या नव्या उमेदीने ती जीवनात पुन्हा उभी राहिली..

स्वत:च मनाचे करुनी पुनर्वसन, घेतला पुन:श्च एकदा जीवनाने वेग
तरीही अजून ठळकपणे दिसते सावरलेल्या मनावरची ती प्रत्येक भेग ....!!!

- संदीप सरदेसाई...

भयानककरुणरौद्ररसकवितारेखाटन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

2 Feb 2012 - 11:23 pm | प्रचेतस

काय लिहू, शब्दच खुंटले.

'एच' आणि 'कॅप्स' चुकीच्या ठिकाणी पडले का ?

प्रचेतस's picture

2 Feb 2012 - 11:43 pm | प्रचेतस

तुम्हास 'खुंटले' च्या जागी 'कुंथले' हा शब्द अभिप्रेत आहे की काय? :P

अत्रुप्त आत्मा's picture

3 Feb 2012 - 12:16 am | अत्रुप्त आत्मा

नवकवी धरणी-कंप संघ--ऊर्फ-धरणी-कंपू

गोष्ट आहे काही वसवसलेल्या कविंची
एक-दम कोसळली एके दिवशी मिपावर दरड यांची..

असा काय झाला हो यांच्या मनावर आ-घात
यांच्या सार्‍या कविता म्हणजे नियोजित कृत्रिम अप-घात

धरणी-कंपूंचे तंत्र म्हणजे दिसेल तो विषय धर
जिथे जिथे जागा दिसेल तिथे तिथे शब्द भर.. :-p किंवा-कैलास जिवन लावायच्या जागी झंडूबाम भर ;-)

काव्याच्या प्रांतात हे असा काही देतात धक्का
गव्हाचा दाणा पेरला तरी बाहेर येतो मक्का ;-)

यांच्या धूर काढण्याने अमच्या पायाखालची जमिनच हदरत होती
धरणी-कंपूंची ही नाहक आतुरता किती प्रतिसादात मोजायची होती.

शब्दांचे तुकडे हसत होते इतस्ततः विखुरलेले
आणी अठवत होते ते दिवस मनात बाळसे धरलेले

धरणी-कंपू मुळे जरी जाहली अमुच्या मनाची काहीली
हर्ष...!... हर्ष-वायू करत ती अमच्याच मनात राहीली

स्वतःच्या कानांचे करुन ऑपरेशन,ओढली एकदा(ची) डोळ्यांवर रेघ
येऊ देत पुढची क-विता,,,तो पर्यंत वल्ली--भरा एक-एक पेग :-p

प्रचेतस's picture

3 Feb 2012 - 8:32 am | प्रचेतस

अगागागागागागा....
पार ट्यांपोतच बशिवलान की.

मनराव's picture

3 Feb 2012 - 10:41 am | मनराव

+११११

:D :D

स्पा's picture

3 Feb 2012 - 11:10 am | स्पा

=))
=))

मी-सौरभ's picture

3 Feb 2012 - 12:12 pm | मी-सौरभ

_/\_

मोहनराव's picture

3 Feb 2012 - 3:20 pm | मोहनराव

मेलो!!

किंवा-कैलास जिवन लावायच्या जागी झंडूबाम भर

अबाबाबा !! अरे काय हे ..? पार आग आग केली ......

हाहाहा.. अत्रुप्त भटजी.. जबरी विडंबन..

- पिंगू

मूकवाचक's picture

7 Feb 2012 - 10:43 am | मूकवाचक

=))

कविता आवडेश संदीप..

- पिंगू

सन्दीप१२३३०'s picture

4 Feb 2012 - 9:00 pm | सन्दीप१२३३०

धन्यवाद पिंगू जी .......

पियुशा's picture

6 Feb 2012 - 10:34 am | पियुशा

छान कविता :)

ए क्काय चालल रे तिकडे ?
ए नवकविना पिडु नका रे तुम्ही सगळे ;)

प्रोत्साहन द्या ,
सध्या त्याच्यावरच विडम्बनकार तग धरुन आहेत

अत्रुप्त आत्मा's picture

6 Feb 2012 - 4:22 pm | अत्रुप्त आत्मा

ए नवकविना पिडु नका रे तुम्ही सगळे>>> पिडत नैय्ये...घडवतोय...! ;-)

सन्दीप१२३३०'s picture

6 Feb 2012 - 9:10 pm | सन्दीप१२३३०

धन्यवाद पियुशा जी ... तुमच्या प्रोत्साहनाने खरच चेव आला..!! :)
आता नुसत्या कविताच नव्हे तर विडंबन कविता मध्ये पी. एच. डी. करावी म्हणतो..!!

मालोजीराव's picture

6 Feb 2012 - 5:35 pm | मालोजीराव

जबरदस्त कविता !!!

सन्दीप१२३३०'s picture

6 Feb 2012 - 9:11 pm | सन्दीप१२३३०

धन्यवाद मालोजीराव!!