Some Beautiful Sketches Drawn By My Son Mandar..........

anirudh's picture
anirudh in कलादालन
28 Jan 2012 - 11:42 am

ऐश्वर्या राय (Using Soft Color Pastels):-

100_3807
-------------------------------------------------///////////////////////////----------------------------------------------------

Manga Face (Using Soft Color Pastels);-

100_3781
-------------------------------------------------///////////////////////////----------------------------------------------------

Netaji Subhash Chandra Bose (Using Graphite Pencils);-

100_3825

-------------------------------------------------///////////////////////////----------------------------------------------------

Amitabh Bachhan (Using Charcoal Pencils & Graphite Pencils);-

100_3838

-------------------------------------------------///////////////////////////----------------------------------------------------

Model (Using Charcoal Pencils & Graphite Pencils);-

100_3818
-------------------------------------------------///////////////////////////----------------------------------------------------

Car (Using Charcoal Pencils & Graphite Pencils);-

100_3722

-------------------------------------------------///////////////////////////----------------------------------------------------

Sai Baba(Using Soft Pastels);-

100_3765

Hi friends.
Hope u'll most like this.

रेखाटन

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jan 2012 - 12:21 pm | परिकथेतील राजकुमार

माफ करा, पण अधे मधे इतरांची ब्युटीफुल स्केचेस आणि फोटोग्राफी पाहायला आणि लेखन वाचायला तुम्ही आणि तुमचे चिरंजीव देखील येत चला. :)

कॉमन मॅन's picture

28 Jan 2012 - 1:59 pm | कॉमन मॅन

सहमत आहे. इतरांच्याही कलेचा आस्वाद घ्यायला आणि तिला दाद देण्यास शिकले पाहिजे. त्यातून मंदारचीच कला अधिक समृद्ध होत जाईल असे वाटते. अनिरुद्धरावांनी अवश्य आत्मपरिक्षण करावे असे वाटते.

स्पा's picture

28 Jan 2012 - 2:08 pm | स्पा

पराशी बाडीस

नुसत्याच जिलब्या टाकण्यापेक्षा कधी कधी दुसर्यांच्या जिलब्यांचा आस्वादही घेत चला ;)

गणपा's picture

28 Jan 2012 - 2:13 pm | गणपा

+१ परा.

मंदारच कौतुक आहेच.
पण आज तुम्हाला मिपावर जवळ जवळ २ वर्षे होत आलीत. पण या दरम्यान तुम्ही कधीही दुसर्‍याच्या धाग्याला प्रतिसाद दिलेला पाहिला नाही.
( ही काही मिपावर सदस्यत्व घेतानाची अट नाही की प्रतिसाद दिलेच पाहिजेत. पण ) मिपाचा केवळ आपली/आपल्या नातेवाईकांची कला/लेखन दाखवण्यासाठी वापर होतोय. हे म्हणजे माझं/माझ्यांच कौतुक करा अश्या टाईपचे धागे होतायत.

ईथे ही एक से बढकर एक कलाकार आहेत. जसं ते तुमच्या लेकराचं कौतुक करतात तसंच त्यांच्या कलेवर कौतुक/टिका-टिप्पण्या करा.

-(एक सामान्य मिपाकर) गण्या

VINODBANKHELE's picture

28 Jan 2012 - 1:13 pm | VINODBANKHELE

आपुन ने एक हि मारा लेकिन सॉलीड मारा.................

बाकी स्केचेस उत्तम आहेतच...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2012 - 1:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा.....वा. स्केचेस छान आले आहेत.
अजून येऊ द्या.

शीर्षक मराठी भाषेत लिहिले असते तरी चालले असते. :)

-दिलीप बिरुटे

कॉमन मॅन's picture

28 Jan 2012 - 1:53 pm | कॉमन मॅन

चांगला प्रयत्न..

अशोक पतिल's picture

28 Jan 2012 - 10:29 pm | अशोक पतिल

सुन्दर ! चि . मंदारचे सर्व स्केचेस खुप छान आले आहेत . तो जे . जे . ला आहे का ? चित्रे रेखाटनात खुप सफाइ दिसत आहे . छान !

छान चित्रे.
ऐश्वर्याचे केस आणि भांग लक्षपूर्वकपणे काढून झाल्यानंतरचा भाग काढताना चित्रकाराचे चित्रातले लक्ष उडून गेले असावे.
बाकी आपण मिपावर इतरही ठिकाणी सहभाग वाढवायला हवा याच्याशी सहमत.

चौकटराजा's picture

4 Feb 2012 - 7:09 pm | चौकटराजा

माझे आजोबा गणपती तयार करून विकत .गणपती करताना, तुंदिल तनू, सोंड ई असले की फारशी
ओळख शिल्पामधे निर्माण करावी लागत नाही. पण जेंव्हा आजोबा लो. टिळकांचा ( त्यांचे दैवत) ( या आजोबानी सरदार गृहात १९२० साली जाऊन टिळकांच्या पार्थिवाला स्पर्श केला होता. ) पुतळा करीत तेंव्हा एखादा जाताना येतानाचा अभिप्रायार्थ म्हणे " हे कोण तुमचे वडील ? " असे झाले की आजोबांच्या चेहर् याचा " अण्णू गोगट्या " होत असे.( पडेल चेहरा ) हा किस्सा आजोबाच मला सांगत.

मंदार ची चित्रकला पाहून ऐश्वर्याच्या फोटोवर : ही कोण .... हेलन वाटतं? अशी प्रतिक्रिया दिसली
नाही हे त्याचे यश आहे ब्वा !

परंतू बच्चन चा म्हणून जो चेहरा दाखवला आहे त्यावर " हा कोण विनोद खन्ना वाटते ? अशी माझी
प्रामाणिक प्रतिक्रिया आहे .

चिगो's picture

6 Feb 2012 - 5:15 pm | चिगो

मंदार ची चित्रकला पाहून ऐश्वर्याच्या फोटोवर : ही कोण .... हेलन वाटतं? अशी प्रतिक्रिया दिसली
नाही हे त्याचे यश आहे ब्वा !

परंतू बच्चन चा म्हणून जो चेहरा दाखवला आहे त्यावर " हा कोण विनोद खन्ना वाटते ? अशी माझी
प्रामाणिक प्रतिक्रिया आहे .

अगदी चपखल बोललात..

मंदारचं ह्याआधी कौतुकही केलं आहे.. पण ह्या वेळी मात्र मी चौकटराजा, परा आणि पन्नासरावांशी पुरता सहमत आहे. च्यायला, वेठीला धरुन-बिरुन चित्रं काढायला लावलीत का काय?

च्यायला, वेठीला धरुन-बिरुन चित्रं काढायला लावलीत का काय?

इफ इट्स द केस !! त्या दोहोंतला संवाद खालील प्रमाणे
अ: चित्र काढ ना रे म.
म: नै बाबा, आजकाल मन नै लागत.
अ: अरे प्लीज रे.
म: बाबा, मागच्या वेळी अमिताभ अन अमरीश गंडले होते ना.
अ: अरे मग काय झालं. तिकडे बघ जरा नवकविंच्या जिल्ब्या, नकोनको त्यांच्या पाकृ, एकोळी-एकशब्दी धागे यांचा पाउस पडतोय अगदी. अन कैक दिवसांत आपला (पक्षी : माझा) एकही धागा नाही.
म: मला उद्या गृहपाठ करुन दाखवायचाय.
अ: तु काढणार आहेस की नै. का --------

नगरीनिरंजन's picture

4 Feb 2012 - 7:12 pm | नगरीनिरंजन

स्केचेस छान आहेत.
आणि शीर्षकातच "Beautiful" असे जाहीर केलेले असल्याने सुंदर आहेत असे म्हणत नाही.

अन्या दातार's picture

4 Feb 2012 - 9:50 pm | अन्या दातार

माफ करा. मला ही स्केचेस तितकीशी ब्युटीफुल नाही वाटली. यशवंत म्हणतो त्याच्याशी सहमत आहे. अमिताभचे चित्रसुद्धा जाम गंडलेय. अमिताभ तुम्ही म्हणता म्हणून मानतोय, नाहीतर मला विनोद खन्ना वाटला होता-वाटतोय.

अविनाशकुलकर्णी's picture

5 Feb 2012 - 10:24 pm | अविनाशकुलकर्णी

खर तर चित्रे सुमार दर्ज्याची आहेत..
पुर्वि उस्ताद आपल्या शिश्यास पुर्ण तयारी झाल्या शिवाय स्भेत गाण्यात परवानगी देत नसत..
Some Beautiful Sketches हे रसास्वाद घेणा~याला म्हणु द्यार
असे लादु नका..मिपा सभासदावर.
अद्रक के पंजे नावचे एक छपरी ईनोदी नाटक होते..
त्याची पण आप हस हस के लोट्पोट अशी जाहिरातीअसायची..
मुलाला शिकु द्या त्याच्या प्रतिभेस आकार आला कि आहेच सारे जग मोकळे आहेच...
आमच्या शुभेछ्या..
[मागे पण पेठे काकांची गाठ घ्यावी असे सुचवले होते..पेठे बाप माणुस आहे..
मुलांना मोफत चित्रकला शिकवणे हा त्यांचा छंद आहे..बाकि आपली मर्जी]

इथे बघा.....
https://www.facebook.com/groups/288875074490257/?notif_t=group_activity#...

नमस्कार, सर्वप्रथम चित्रांवर नावे लिहिल्याबद्दल अतिशय धन्यवाद. अन्यथा माझ्यासारख्या इतर काही मिपाकरांनी मिळुन या चित्रांवरुन ओळखा पाहु कोण असे खेळ सुरु केले असते, आणि मग मा. संपादकांचे काम वाढले असते.

हल्ली काही काळात, इथले काही अ.ह. पि, बल्लव व सुगिरणी, जसे हट्टाने मिपावर पाकृ टाकण्यासाठीच स्वयंपाक करतात व फोटो काढतात, तसा काहीसा प्रकार या सिरिज मधल्या एक दोन धाग्यास मिळालेल्या प्रतिसादावरुन आपण आपल्या मुलासोबत करत आहात की काय अशी शंका येते आहे.

असो, बाकी या सिरिज मधली चित्रं फार चांगली नाहीत हे नम्रपणे नमुद करु इच्छितो.

प्रचेतस's picture

6 Feb 2012 - 8:40 am | प्रचेतस

नका हो असा हिरमोड करू एखाद्याचा.

माझं मत इतकं आत्यंतिक नाही झालेलं.

मुलाचं वय लक्षात घेता चित्रं सुंदरच आहेत यात वाद नाही.. आणि ब्युटिफुल असं वर्णन स्वतः चित्रकाराने केलं असतं तर त्याला अहंपणाचा वास आला असता..

पण इथे बाबांनी आपल्या मुलाच्या स्वाभाविकच वाटणार्‍या कौतुकाने मनापासून तो शब्द वापरला आहे त्यात मला बापाची मायाच दिसते..

मी काढलेलं एखादं निखालस कुरुप नसलेलं चित्र आपल्या मित्रांना दाखवताना माझ्या बाबांनीही "हे बघा माझ्या मुलाने काय सुरेख चित्र काढलंय" असंच म्हटलं असतं.

यकु's picture

6 Feb 2012 - 6:17 pm | यकु

छ्या: !
गवि काही पितृपक्ष सोडणार नाहीत. ;-)

जयवी's picture

12 Feb 2012 - 12:24 pm | जयवी

चित्रं छान आहेत.