(जीव गुंतला)

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
19 Jan 2012 - 9:04 pm

मुळ गीत : खेळ मांडला (नटरंग)

प्रिय पाचोळ्या

तुझ्या आठवांची मनी पानं उभी र्‍हाई
साद सुन्या आभाळाची तुझे गीत गाई
तरी मेघ दाटला हा पाचोळ्याच्या ठायी
हरवल देह भान मावळल्या नभी
झाकोळुनी हरवतो श्वास वेडापिसा
वनवा ह्यो उरी पेटला... जीव गुंतला

जीव गुंतला ....जीव गुंतला ...जीव गुंतला...जीव गुंतला

सोडली रे फ़ुलपान घेतला वसा तुझा
तूच प्रीत दाखीव गा जीव गुंतला
ओली दवा थंडगार, झोंबती रे ही हवा
ह्यो तुझ्याच काळजात जीव गुंतला

ओघळली प्राणज्योत दुर, डोंगर , दु:खाची खायी
झडलेल्या झाडापरी जीनं, अंगार, जीवाला जाळी

आस घेयी भिडायाला पीरतीची ओढ दे
बोलवीती प्रीतगान वादळात झेप घे
उसवला श्वास राजा संपला प्रवास
तरी न्हाई प्राण सोडला ... जीव गुंतला
जीव गुंतला ....जीव गुंतला ...जीव गुंतला...जीव गुंतला

--- तुझा मेघ

(कविता पुन:प्रकाशीत)

करुणरेखाटन

प्रतिक्रिया

पैसा's picture

19 Jan 2012 - 9:36 pm | पैसा

आता गणेशाची कविता वाचली असं वाटलं!

प्रचेतस's picture

19 Jan 2012 - 10:32 pm | प्रचेतस

व्वा.
सुंदर कविता.
आदर्श विडंबन (की सुडंबन?) कसे असावे याचा वस्तुपाठच कवि गणेशा यांनी घालून दिला आहे. विडंबन मदिरा, मदिराक्षी किंवा रम, रमा,रमी शिवाय कसे करता येऊ शकते हेच त्यांनी येथे दाखवून दिले आहे.

ह्या सुंदर कवितेबद्दल गणेशा यांचे अत्यंत आभार.

पाषाणभेद's picture

20 Jan 2012 - 1:17 am | पाषाणभेद

सुंदर रचना

५० फक्त's picture

20 Jan 2012 - 7:33 am | ५० फक्त

कविता छान आहे पण ते शिर्षक कंसात का लिहिलंय समजलं नाही .

मराठमोळा's picture

20 Jan 2012 - 8:15 am | मराठमोळा

मस्तच गणेशा,
जमलय फक्कड. :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

20 Jan 2012 - 11:14 am | मिसळलेला काव्यप्रेमी

वाचनखुण साठवली आहे.

आमचा एक मित्र ''चिंतनगृहात'' बसून या विडंबनाचं वरीजनल गाणं म्हणायचा ;-)
तुझ्‍या पायरीशी कुणी सानथोर न्हाई ऽऽऽ
त्याची आठौन झाली.

‍हे विडंबन नसून नवीन गाणंच वाटतंय

‍हे विडंबन नसून नवीन गाणंच वाटतंय

+१