नाटेकर!

गोगट्यांचा समीर's picture
गोगट्यांचा समीर in जनातलं, मनातलं
17 Jan 2012 - 12:19 am

नाटेकर , आम्ही सगळे त्यांना नाटेकर म्हणूनच ओळखायचो , त्यांचं नाव माहित
करायच्या भानगडीत बहुधा कोणीच कधी पडलं नाही. मी रत्नागिरीचा मूळचा, तिथे
आजुबाजूला जमीनीवर खटले हे चालुच असतात. नाटेकर ही तिथलेच . रत्नागिरी
च्या बाजुलाच केळ्ये गाव आहे , तिथले सर्वात मोठे खातेदार ,म्हणजे सर्वात
जास्त सारा भरणारे, पण तो आहे केवळ कागदावरचा हक्क , प्रत्यक्षात
त्यांच्याकडे एक गुंठाही नाही. लहानपणापासून जेव्हा बघत आलोय तेव्हा
तेव्हा त्यांच्याकडे अनेक पिशव्या दिसत.नंतर कळलं , की यात सर्व
खटल्यांची कागदपत्रं आहेत. स्वत:चे खटले चालवता चालवता ते यात इतके तरबेज
झाले की ते इतरांचेही कज्जे घेऊ लागले. ते स्वतः खटले चालवतात.
पण नाटेकरांची खरी ओळख मला यामुळे नाही झाली , तसंही कोर्टकचेरीतलं
अजुनही विशेष कळत नाही , त्यावेळी तर बिलकुलचं नाही. आमचही गाव केळ्ये ,
तिथे त्रिपूरी पौर्णिमेचा ऊत्सव मोठ्या जोरात साजरा होतो , दिवाळीच्या
दरम्यान जी काकडे आरत चालू होते ती त्रिपूरीला संपते, आणि मग त्यादिवशी
गावजेवण असे. असाच पहिल्या पंक्तीला बसला असताना, नाटेकर समोर बसले होते,
आणि जिलबीचं ताट वाढायला आलं , आग्रह वगेरेच्या भानगडीत न पडता , ते
पूर्ण ताट तिथे रिकामं झालं . नाटेकरांची ब-याच जणांना ओळख
ह्याचीच होती , खाण्याच्या बाबतीत केळ्ये पंचक्रोशीत त्यांची ख्याती
होती.
त्यांच पान नेहमी पंगतीच्या कडेला घेतलं जात असे , कारण एका पंक्तीला जो
साधारण वेळ लागतो , तो त्यांच्या 'सावकाश ' भोजनाला फार कमी होता , किमान
दोन पंगतीना ते सहज साथ देत असंत.

...To be Continued ...

साहित्यिकसमाजविरंगुळा

प्रतिक्रिया

निवेदिता-ताई's picture

17 Jan 2012 - 7:00 am | निवेदिता-ताई

येऊ देत पुढचे लवकर

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jan 2012 - 9:15 am | अत्रुप्त आत्मा

मज्जा वाटतीये वाचायला,,,टाका अता लवकर पुढचा भाग...

पंगत अपुर्ण राहिली असे वाटतेय..... भाग फार्र म्हणजे फारच छोटा झाला....

मृत्युन्जय's picture

18 Jan 2012 - 11:35 am | मृत्युन्जय

लिखाणाची शैली चांगली आहे तुमची. भाषा ओघवती आहे.

पण भाग थोडे मोठे टाका आणी दुसरे म्हणजे ते परिच्छेद पाडणे वगैरे जरा नीट बघा. बाकी पुढचे वाचायलाही मजा येइलच याची खात्री आहे. पुलेशु.

अवांतरः लेख तसा बरा आहे की छोटा असला तरी. मग मिपाकरांच्या प्रतिक्रिया का एवढ्या कमी?

नगरीनिरंजन's picture

19 Jan 2012 - 10:14 am | नगरीनिरंजन

सहमत.

मग मिपाकरांच्या प्रतिक्रिया का एवढ्या कमी?

टंकायचा कंटाळा संसर्गजन्य असावा. लेखकाकडून वाचकाकडे लागण होत असावी. :)

अन्या दातार's picture

19 Jan 2012 - 10:26 am | अन्या दातार

भरमसाठ प्रतिक्रिया देउनही क्रमशः वाले बरेच लेख पूर्ण व्हायच्या मार्गावर दिसत नसताना लोकांनी टंकायचा कंटाळा केला तर त्यात नवल वाटू नये.

पैसा's picture

18 Jan 2012 - 11:32 pm | पैसा

पण मृत्यूंजय सांगतायत तिकडे जरा लक्ष द्या. आणि व्यक्तिचित्र सगळं एकदम प्रकाशित केलं असतं तर जास्त परिणामकारक वाटलं असतं.

याच नावाचं एक व्यक्तिचित्र मी पूर्वी लिहायला सुरुवात केली होती.. व्यक्तिचित्र म्हणण्यापेक्षा, त्या व्यक्तीच्या निमित्ताने आठवलेल्या गोष्टी.

पण आमचा नाटेकर वेगळा.

रत्नांग्रीस आमच्या घरी नाटेकर म्हणून एक माणूस "जिन्नस घालायला" यायचा.

मारुति मंदिरला खामकरांच्या किराणा दुकानात तो कामाला होता.

नाटेकर म्हटल्यावर माझ्या नाकाडोळ्यात येतात त्या चिजा म्हणजे, कळकट्ट भलीथोरली पिशवी, त्यातल्या रद्दीच्या पुड्यांमधे बांधलेल्या पावा-अदपावाच्या असंख्य जिनसा.. गूळ, जिरे, धने, पोहे यांच्या मिश्र वासाचा दरवळ, आणि त्याचं जिनसा मोजून देणं.. माझी तिथे लागलेली मोजणी कारकून म्हणून स्वघोषित ड्यूटी.. असंख्य आठवणी त्याभोवती आहेत..

आणि इतिहासात गाडून झालेला हाच नाटेकर वीस वर्षांनी भलत्याच वेगळ्या ठिकाणी वेगळ्या शहरात आणि पूर्ण अनपेक्षितपणे माझ्यासमोर आला.. तस्साच अर्धी चड्डी घातलेला बाल्या..