नायज्जा जेलोफ राईस विथ मॅश्ड पोटॅटो, बेक्ड वेज अ‍ॅण्ड रोज वाइन

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
13 Jan 2012 - 12:06 pm

पल्या गणपाने नुकतीच नायज्जा जेलोफ राईस / पेप्पे चिकन नावाची एक पाककृती प्रकाशित केली होती. त्यातल्या पेप्पे चिकनला फाटा देउन त्या रेसिपीला थोडा ट्वीस्ट देउन एक 'ईंप्रोवाइज्ड' डीश मागच्या रविवारी ट्राय केली. ती डीश एकदम हीट झाली होती म्हणून शेयर करतो आहे. ही सर्व मेहनत माझ्या बायकोने केली आहे मी फक्त डोके लावले होते ते शेयर करतो आहे ;)

आम्ही केलेली डीश होती 'नायज्जा जेलोफ राईस विथ मॅश्ड पोटॅटो अ‍ॅण्ड बेक्ड वेज' अर्थातच 'विथ रोज वाइन' :)

सर्वात आधि फुल कोबी (Coliflower),फ्रेँच बीन्स, गाजर आणि मटार ब्लांच करून घेतली.

मग मॅश्ड पोटॅटो बनवले. हे बनवणे फार सोप्पे आहे. हा एवढा पदार्थ मी केला.
1. बटाटे उकडून घ्यायचे
2. त्यात कंन्डेंस्ड मिल्क, थोडी साखर आणि काळीमिरी पूड घालून मिक्सर मधून पेस्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे.

आता बेक्ड वेज पार्ट तयार झाला आहे

त्यानंतर नायज्जा जेलोफ राईस गणपाच्या रेसिपीमध्ये दाखविल्याप्रमाणे बनवून घेतला आणि 'नायज्जा जेलोफ राईस विथ मॅश्ड पोटॅटो अ‍ॅण्ड बेक्ड वेज' तयार झाला.

आता राहिली वाइन. पुणे वाइन फेस्टिव्हलमधून यॉर्क वाइनरीची झिनफॅन्डल रोज वाइन आणली होती. ती बाटली उपयोगी आणली.

तर ही होती माझी 'नायज्जा जेलोफ राईस विथ मॅश्ड पोटॅटो, बेक्ड वेज अ‍ॅण्ड रोज वाइन' :)

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

13 Jan 2012 - 12:19 pm | प्यारे१

>>> 'ईंप्रोवाइज्ड' डीश
गणपाच्या 'परफेक्शन' ला चॅलेन्ज...????
-काड्याटाकू प्यारे. ;)
>>>मी फक्त डोके लावले होते ते शेयर करतो आहे
-चांगलं लावलंय डोकं. चवीला कसं असेल कुणास ठाऊक. (डो कं म्हणतोय मी.)
-शुद्ध शाकाहारी प्यारे :)

शाकाहारी मंडळींसाठी पर्याय उपलब्ध करून दिल्याबद्दल सौ. सोत्रि यांना धन्यवाद. :)
बाकी शेवटच्या फोटोत सोका पेश्शल टच जाणवतोय. ;)

त्यात कंन्डेंस्ड मिल्क, थोडी साखर

ये बात कुछ हजम नही हुई.
(कंन्डेंस्ड मिल्क, थोडी साखर ऐवजी चीज / बटर असा बदल करणेत येईल.)
(गोडांच जास्त न आवडणारा) गणा

सोत्रि's picture

13 Jan 2012 - 1:31 pm | सोत्रि

नो चॅलेंज टू गणपाभौ!
चीजचं चांगलं असेल. :)

पण मला मॅशची चव जरा गोडसर असेल तर आवडते, मजा येते. चीज टाकल्यास चव जरा वेगळी लागते.

- (गोडाचं आवडणारा) सोकाजी

सानिकास्वप्निल's picture

13 Jan 2012 - 2:37 pm | सानिकास्वप्निल

मॅश्ड पोटॅटोमध्ये चीज / बटर चांगले लागते
बाकी पाकृ एकदम झाक आहे :)

कवितानागेश's picture

13 Jan 2012 - 12:30 pm | कवितानागेश

मॅश्ड पोटॅटो उपासाला पण चालतील नै? :)

तुझ्या उपवासात पोटॅटो कसे चालणार?

- पिंगू

कवितानागेश's picture

14 Jan 2012 - 10:45 pm | कवितानागेश

'जन्तेचे प्रश्न' मांडले मी!
माझा आणि उपवासाचा काय संबंध ? ;)

काँबो झकास असेल असं वाटतंय, फोटोवरुन.

पण दुसरी कोणती वाईन असती तर..

..ही झिन्फांडेल बेचव, अगोड, कडसर असते तीच ना?

की ती शिराझ ?

सोत्रि's picture

13 Jan 2012 - 1:23 pm | सोत्रि

की ती शिराझ ?

ती शिराझ!

झिनफॅन्डल एकदम झक्कास आणि त्यात ही रोज होती :)

- (वाइनप्रेमी) सोकाजी

गवि's picture

13 Jan 2012 - 1:39 pm | गवि

धन्यवाद...

नरेश_'s picture

13 Jan 2012 - 12:44 pm | नरेश_

आता सोत्रिला किडनॅप करणं आलं ;)
|
|
|
| आर्र्रर.. ही डिश तर वहिनींनी केली होती तर....
सोत्रिला किडनॅप करुन काय फायदा नाय :(
|
|
|

सोत्रिला किडनॅप करुन काय फायदा नाय

असं कस?? कराच त्याला किडनॅप. चार वेळच्या तीर्थाची सोय होईल तुमच्या. ;)

आवांतर : तुमची स्वाक्षरी आवडली.

नरेश_'s picture

13 Jan 2012 - 12:52 pm | नरेश_

:)
धन्स गणपादा .. ;)
|
|
|
|

सुहास झेले's picture

13 Jan 2012 - 1:15 pm | सुहास झेले

लई भारी...... जबरदस्त झालीय रेसीपी.

गणपा म्हणतोय तसं मॅश्ड पोटॅटोमध्ये साखर न घालता, चीज टाकल्यास चव नक्कीच वेगळी लागेल... :)

निवेदिता-ताई's picture

13 Jan 2012 - 6:01 pm | निवेदिता-ताई

आवडली

फोटू छान आलेत.
मॅश्ड पोट्याटो अशा प्रकाराने पहिल्यांदाच पाहिले.
गणपा खाद्याविषयी सल्ले देतो आणि तुम्ही पेयाविषयी.
त्याचे कॉम्बीनेशन चांगले जमले आहे.

जाई.'s picture

13 Jan 2012 - 9:00 pm | जाई.

भारी

कौशी's picture

13 Jan 2012 - 9:43 pm | कौशी

आवडला...करून बघणार!!

इंद्रवदन१'s picture

14 Jan 2012 - 12:15 am | इंद्रवदन१

झिन्फांडेल तिखट असते ....(pungent).

सोकाजिराव : प्रकाश टाकावा

सोत्रि's picture

14 Jan 2012 - 10:35 am | सोत्रि

तिखट?

अजिबात नाही ! किंचीत तीव्र मात्र असते!

झिन्फॅन्डल ला हे असे फ्लेवर्स असतात, त्यामुळे चव जराsss तीव्र असते.
raspberry
dark berry
spicy
black pepper
licorice

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Jan 2012 - 12:46 pm | बिपिन कार्यकर्ते

या सोत्र्याला धरा रे कोणी तरी!

मनिमौ's picture

14 Jan 2012 - 2:11 pm | मनिमौ

सादरीकरन अगदी झकास.

चीज कोणते वापरावे ?

चीज कुठलही चालेल.
पण कृपा करा आणि ती स्वाक्षरी बदला आता तरी. (अगदी खालून कॉपी करुन पेस्ट केलीत तरी चालेल.)
त्या श्लोकाचा बलात्कार पहावत नाही.

'जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|| '

सुहास झेले's picture

15 Jan 2012 - 12:16 am | सुहास झेले

अगदी अगदी....