(भा SSSSS सं भा SSSSS सं)

स्पा's picture
स्पा in जनातलं, मनातलं
13 Jan 2012 - 9:33 am

प्रेरणा: सो...हम....सो...हम!!

उपाकर मित्रमंडळींनो,
`खाईन मांडे ` नावाने उसळपाव वर वावरणारा त्रस्त समंध गेले काही दिवस, काही महिने कुठे गायब झाला, असा प्रश्न आपणांस पडला असणे साहजिक आहे. अर्थात, हा आपला माझा समज. `तुझ्यावाचून उपा ओस पडलंय रे बाबा, कधी परततोयंस` अशी आर्त साद मला कुणी खव किंवा टपाल हापिसातून घातलेली नाही. उपावर एकाहून एक सरस आणि सुरस संपादक असताना अस्मादिकांची विशेष दखल घ्यावी असे नाही. तरीही अस्मादिक कुठे होते, आणि सध्या काय करतायंत, हे सांगण्याचा हा आगाऊ प्रयत्न.
गेले काही दिवस खाजवायला फुरसत नाहीये. खरड वहीत तर फिरकलो नव्हतोच, पण व्यानिलाही गंज चढलाय. गुंतलोय एका वेगळ्या माध्यमात. एका नवीन संस्थळाच्या निर्मितीसाठी काही महिने स्क्रीपटिंग साहाय्य करत होतो, आता माझ्या नावे एक स्वतंत्र संस्थळ प्रसिद्ध होऊ घातले आहे ." ऐसी लक्तरे लोळवीन" .निर्मात्या आहेत जिल्बुषा नगरकर आणि भावी संपादक (भा सं )मीच आहे .
गेले काही महिने, वर्षं " घीसन मिंधे" नावाच्या माझ्या नावबंधूने माझं जिणं हराम केलंय. लोक किती मूर्ख, नादान आणि अकलेचे खंदक असतात, हे या नावबंधूमुळेच मला कळलं. `तुमचा मुलगा उसळपाव वर आहे का हो?, सर्व कट्टे तो भरवतो कहो ? ते तुम्हीच का,` अशा उथळ, बिनबुडाच्या आणि बाष्कळ प्रश्नांनी हैराण झालो होतो. अरे डोळेफुटक्यांनो, तुम्हाला देवानं जी पंचेंद्रियं, ज्ञानेंद्रियं दिल्येत, त्यांच्यावरची धूळ झटकून कधीतरी ती वापरात आणा ना, असं कळवळून सांगावंसं वाटायचं. उसळपाव .कॉम , असं ढळढळीत अक्षरात लिहिलेलं तुम्हाला वाचता येत नाही का रे नतद्रष्टांनो, असं विचारायचं तोंडावर यायचं. पण कमावलेल्या सभ्यतेशी प्रामाणिक राहून मी गप्प राहायचो.
आता मात्र कुणी विचारलं, की `ऐसी लक्तरे लोळवीन `चा भावी संपादक तूच का रे बाबा, तर मी छाती पुढे काढून सांगू शकतो...हो, तो मात्र मीच!!

आपलाच (भा .सं)
खाईन मांडे

मौजमजा

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

13 Jan 2012 - 9:38 am | मराठी_माणूस

जबरदस्त. मस्त.
हे गरजेचे होते, धरणीवर आणायला.

मराठमोळा's picture

13 Jan 2012 - 9:43 am | मराठमोळा

तितकंस नाय जमलं गड्या..

पण "ऐसी लक्तरे लोळवीन" वाचून ठ्यॉ करून फुटलो.. :)

(लोळवीन ऐवजी वाळवीन असेही चालले असते.)

पियुशा's picture

13 Jan 2012 - 10:14 am | पियुशा

च्यायला ,स्पावडी बाजार उठ्वनार का आता माझा ;)
---/\----

बाकी तु पण तय्यार रहा ;)
लवकरच एक विड्म्बन तुझ्यावरपण ;)

( जिल्बुशा नगरकर );)

स्पा's picture

13 Jan 2012 - 10:18 am | स्पा

जिल्बुषा नगरकर तुम्ही हात असे तुम्हाला वाटते?
ऐकाव ते नवलच ;)

५० फक्त's picture

13 Jan 2012 - 10:22 am | ५० फक्त

मा. पियुषातै, सदर विडंबन मा. स्पा यांचेपेक्षा वजनदार व एका शिट्टीत शिजलेले असावे ही नम्र अपेक्षा.

प्रचेतस's picture

13 Jan 2012 - 9:43 am | प्रचेतस

हॅहॅहॅ. वाक्यावाक्यागणिक हसतोय जाम. चांगलीच लक्तरे लोळवळीस की. जिल्बुषा नगरकर हे नाव वाचून तर खपायचाच बाकी राहलोय.

--शिवेल पिंडे

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jan 2012 - 9:48 am | अत्रुप्त आत्मा

@वर्षं " घीसन मिंधे" नावाच्या माझ्या नावबंधूने >>>
धागा पेटविण्याचा १ दुष्ट प्रयत्न... ;-)

@गुंतलोय एका वेगळ्या माध्यमात. >>> नविन माहिती ;-)

@एका नवीन संस्थळाच्या निर्मितीसाठी काही महिने स्क्रीपटिंग साहाय्य करत होतो, >>>यामुळे ''अवघे धरू...'' नावाचे अजुन १ सं-स्थळ काढावे,असे आंम्हाला वाटू लागले आहे.. ;-)

@आता माझ्या नावे एक स्वतंत्र संस्थळ प्रसिद्ध होऊ घातले आहे .">>>आजकाल आपल्या कुठल्याही वाक्यात स्थळ हा शब्द आला,की आंम्हाला अंमळ शंका येते... ;-)

किसन शिंदे's picture

13 Jan 2012 - 9:50 am | किसन शिंदे

ह्यॅह्यॅह्यॅ...

१० पैकी ५

लीलाधर's picture

13 Jan 2012 - 9:51 am | लीलाधर

जबरदस्त आणि धमाल आली स्पावडू

वाभाडं काढलय पार.................

किसन शिंदे's picture

13 Jan 2012 - 9:56 am | किसन शिंदे

वाभाडं काढलय पार

कोणाचं रे???

स्पा's picture

13 Jan 2012 - 9:57 am | स्पा

कोणाचं रे???

हेच म्हणतो ;)

प्रचेतस's picture

13 Jan 2012 - 11:28 am | प्रचेतस

+२

सांगा हो चचा, कुणाचं वाभाडं काढलन्?

लीलाधर's picture

13 Jan 2012 - 11:32 am | लीलाधर

अहो जाणकार मिपाकरहो एवढे विडंबन करायला जमले, साद प्रतिसाद दिलेत आणि वर कोणाचे वाभाडे काढले म्हणून काय विचारता हो? :-P

मालोजीराव's picture

13 Jan 2012 - 3:44 pm | मालोजीराव

प्र का टा आ

अरे कोणीतरी एक धागा काय काढला मिपावर विडंबनं होत नाहीत म्हणुन आणि हे सुरु झालं, मस्त रे स्पावड्या मजा आली,

अन्या दातार's picture

13 Jan 2012 - 9:57 am | अन्या दातार

लगे रहो स्पाभौ!!

प्यारे१'s picture

13 Jan 2012 - 10:03 am | प्यारे१

जिओ मेरे लाल...

बाकी जाहिराती करणं बंद करा.
कुठलं ते फुटकळ संस्थळ आणि त्याचा तू भावी संपादक... अरे हॅत लेका.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jan 2012 - 10:52 am | अत्रुप्त आत्मा

@कुठलं ते फुटकळ संस्थळ आणि त्याचा तू भावी संपादक... अरे हॅत लेका ..>>> अत्यंत अस्सल प्रतिक्रीया... ;-)

मोदक's picture

13 Jan 2012 - 10:10 am | मोदक

:-D

कवितानागेश's picture

13 Jan 2012 - 11:07 am | कवितानागेश

*()&*(&^%^*)%^%$&^*^!
:D

गवि's picture

13 Jan 2012 - 12:53 pm | गवि

चालू संस्थळे पाहता त्यातील एकाचे आपण संपादक आहोत हे चारचौघांत कबूल करणं मोठं धाडसाचं काम आहे.
त्याबद्दल कौतुक.

ही फक्त सुरुवात आहे. बहुतेकवेळा नाईलाजाने जिलब्यांचा रतीब घालण्याने करियर सुरु करावी आणि चालू ठेवावी लागते.

पण पुढे प्रस्थापित झाल्यावर काहीतरी विलक्षण वेगळं पक्वान्न आमच्यासमोर आणाल अशी आशा ठेवून आहे.

All the best..

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jan 2012 - 11:18 am | परिकथेतील राजकुमार

जे लोक तुम्हाला उत्सुकतेनी , कौतुकानी विचारत होते.. "ते तुम्हीच का??" तेव्हा तुम्हाला लोक उथळ, बिनबुडाच्या आणि बाष्कळ प्रश्नांनी हैराण करणारे आणि डोळेफुटके वाटत होते...
अता तुम्ही काही तरी उपटताय तर तेच लोक जेव्हा हाच प्रश्न विचारतील तेव्हा ते खुप हुशार, पंचेंद्रियं, ज्ञानेंद्रियं यावरची धुळ नित्य नियमाने झटकणारे वाटतील ना??

थोड नीट सांगितलं असतं ना तर आम्हाला पण तुमचं कौतुक वाट्लं असतं, की तुम्ही सं पादक आहात...

असो....

मंगोलियन स्पायडर

'मंगोलियन स्पायडर' यान्च्याशी अजिबात नाय जमत!!

"थोड नीट सांगितलं असतं ना तर आम्हाला पण तुमचं कौतुक वाट्लं असतं, की तुम्ही संपादक आहात.." हे नाय पटलं...... संपादकांच काय कौतुक वाटतं काय कुणाला कधी?

लोकान्ना काय माहित की ते कात्री लावणारे 'घीसन मिन्धे' तुम्ही नाहीत!!... तुम्ही चिडियावाले... आणि "ते" घीसनदेखील ग्लॅमरक्षेत्राशी सम्बन्धित....त्यामुळे नॉर्मली लोकांचा गैरसमज होणे साहजिकच आहे.. पण त्यासाठी त्यांना तुम्ही सभ्यतेच्या मर्यादा पाळून "डोळेफुटक्या" वगैरे....दिलेली येवढी दूषणं "इथे" मान्डणं.... योग्य वाटत नाही....

आणि उलट आता तुमच्या सम्पादनामुळे या गोन्धळात भरही पडू शकते.....
सम्पादन करायचात तुम्ही.. आणि चुकुन लोकान्ना वाटायचं.. की "त्या"घीसनने केलंय....

असो.. जोक्स अपार्ट... गुड लक फॉर युअर एडिटोरियल!!!

॥ श्लोकाचं विडंबन नाय करनार जा.॥

असुर's picture

13 Jan 2012 - 3:40 pm | असुर

गवि - परा - मेवे,
स्पायलू आपला विडंबनाच्या जिल्ब्या पाडतोय, त्याला तुमच्या प्रतिसाद-विडंबनाच्या पाकाचा आहेर पाहून जॉइंट-वेंचर असल्याचा भाSSSसं झाला ना रौ!!! ;-)

स्पायलू,
मित्रा, म .स्तविडंब न! काही संद
.र्भ कळले ना
हीत &पण दो(ष आ
मच्या अल्पकाळच्या अज्ञा
तवासाचा ध*रु
न चालतो(.
:-)

--असुर

पाषाणभेद's picture

14 Jan 2012 - 12:04 am | पाषाणभेद

विडंबन अन प्रतिसादाचेही विडंबन वाचून खुपच हसू आले.

मृगनयनी's picture

13 Jan 2012 - 5:02 pm | मृगनयनी

काय रे आगाऊ मेवड्या..... ;) ;) .... छान विडम्बन कर्तोस्स !!!!

आणि हो... "श्लोकांच विडम्बन" न केल्याबद्दल मन्डळ आभारी आहे! :)

मूकवाचक's picture

13 Jan 2012 - 11:21 am | मूकवाचक

मस्त!

- लखोबा लोखंडे

मन१'s picture

13 Jan 2012 - 11:26 am | मन१

:)

स्पांडू..
तु गपच राहिलेला बरा.
अरे एकाच दगडात किती पक्षी मारशील?

=)) =)) =))

गणेशा's picture

13 Jan 2012 - 11:52 am | गणेशा

स्पा .. मस्त लिखान रे ..

आता मात्र कुणी विचारलं, की `ऐसी लक्तरे लोळवीन `चा भावी संपादक तूच का रे बाबा, तर मी छाती पुढे काढून सांगू शकतो...हो, तो मात्र मीच!!

छाती पुढे काढताना त्रास तर नाहि होउन राहिलाय ना ?

- मी उषा, मगर.

वपाडाव's picture

19 Jan 2012 - 1:46 am | वपाडाव

छाती पुढे काढताना त्रास तर नाहि होउन राहिलाय ना ?

स्पावड्या, तु १६ चा झाला काय रे?

सूड's picture

19 Jan 2012 - 7:43 am | सूड

खल्लास !! :D :D

दादा कोंडकेंच्या पिक्चरातलं गाणं आठवलं . :D

मस्त रवि's picture

13 Jan 2012 - 11:52 am | मस्त रवि

मस्त रे

कुंदन's picture

13 Jan 2012 - 12:01 pm | कुंदन

मस्त रे स्पा !

नरेश_'s picture

13 Jan 2012 - 12:30 pm | नरेश_

:)
फक्त एक 'हसरी*' पुरेशी...
/
/
/
*स्मायली.
|
|
|

सुहास झेले's picture

13 Jan 2012 - 1:49 pm | सुहास झेले

हा हा हा ... सही !!

श्यामल's picture

13 Jan 2012 - 2:29 pm | श्यामल

स्पावड्या, आवड्या रे !

सूड's picture

13 Jan 2012 - 7:02 pm | सूड

सर्वच प्रतिसाद जबराट

मिपाकरांच्या "ट्येम्प्युत" बसवण्याच्या कलेचा साला आपण फ्यान हौत

अवांतर: हल्ली सर्वच झ , ट दर्जाची संस्थळे पहायचे घरातल्या सर्वानीच बंद केले असल्याने "णो comments !! "

ztztztztztztztztztztztztztztztztztztztztztztztztztztzt
गोभीप्लेट १/२ च्या प्रतिक्षेत

तुषार काळभोर's picture

13 Jan 2012 - 8:17 pm | तुषार काळभोर

झैरात!! झैरात!!!
नवीन संस्थळाची झैरात हितं करू नै!

सोम्यागोम्या's picture

13 Jan 2012 - 8:57 pm | सोम्यागोम्या

ऐसी लक्तरे लोळवीन खो खो खो ! जबरी.

विशाखा राऊत's picture

13 Jan 2012 - 10:45 pm | विशाखा राऊत

एकदम धम्माल :)

सूर्यपुत्र's picture

14 Jan 2012 - 10:50 am | सूर्यपुत्र

"मी एका संस्थळ निर्मितीचे प्रयत्न करतो रे बाबांनो" (`माझं कुठेतरी संस्थळ सुरू झालंय` या चालीवर वाचावे.) एवढा गहन संदेश देण्यासाठी हा धागा टाकला होता. त्यावर तब्बल ४३ हाकारे (प्रतिसाद) आलेले पाहून अक्षरशः भडभडून आलं. आत्ता नाक पुसत ही प्रतिक्रिया देतोय. असो.

साधी गोष्ट असली, तरी साधेपणानं का सांगावी, या मूळच्या खवचट संस्थळी प्रवृत्तीला जागून थोडंसं शैलीदार (डोंबल!) लिहिण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून ब-याच जणांच्या भावना दुखावलेल्या दिसतात. बाकी भावनांचा खेळ असलेल्या एखाद्या संस्थळाच्या निर्मितीत संधी मिळाल्याची माहिती देतानाच लोकांच्या भावना दुखाव्यात, हा समसमा संयोग!!

असो. माझा धागा नीट वाचला असेल, तर हे सहज लक्षात येईल, की मी दुस-यांना दूषणं देण्याआधी स्वतःलाच त्रस्त समंध वगैरे म्हणून घेतलंय. एकदा स्वतःला शिव्या दिल्या, की मग जगाची अक्कल काढायला आपण मोकळे, हा आपला माझा एक (गैर)मसज. तर (तेही) असो. आक्षेप दुस-या कुणी घिसन मिंधेनी त्रास देण्याला, कट्ट्यांच्या माध्यमात असण्याला नव्हता, तर लोकांच्या बालबुद्धीला होता. असं कुणी विचारलं नसतानांही, खुलासे करायला माझी काहीच हरकत नव्हती, नाहीये. पण ढळढळीत अक्षरांत लिहिलेलं असताना ते न वाचताच तू अमक्या संस्थळावर लिहितोस का, तमक्या ब्लॉगवर लिहितोस का, असं विचारणा-या लोकांच्या डोळे झाकून काम करण्याला आक्षेप होता आणि असेल.

हे म्हणजे `सोम्या गोम्या कापसे` असं नाव सांगितल्यानंतर `आम्ही लहान असताना आमच्या गावात गोम्या कापसे नावाचा एक बेवडा होता. तू त्याचाच मुलगा का रे,` असं विचारण्यापैकी आहे. अजूनही मी संस्थळासाठी लिहितो, असं म्हटल्यावर अच्छा अच्छा...अरे हो की. (माझा दुरान्वयेही संबंध नसलेल्या आणि कदाचित माझ्या नावबंधूने लिहिलेल्या) तमक्या ब्लॉगवर तुझं नाव वाचलंय, असं सांगणारे महाभागही थोडे नाहीत. त्यांच्यापुढे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही...तर हेही असोच.

बाकी, मी माजलोय, गर्व चढलाय, मस्ती आलेय, वगैरेसुद्धा काहींनी इथे आडून आडून किंवा थेट सुचवलंय. तर मी हवेत गेलेलो आहे, असं नम्रपणे सांगू इच्छितो रे बाबांनो. बाकी अधिक माहिती ज्यांना हवी असेल, त्यांनी वैयक्तिक संपर्क साधावा, ही (पुन्हा एकदा!) नम्र विनंती!!

आपलाच (भा .सं)
खाईन जोडे

;) ;)

-सूर्यपुत्र.

किती तो सारवासारव करण्याचा प्रयत्न , जो छुंदे से गयी वो अचार से नही आती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2012 - 9:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

" ऐसी लक्तरे लोळवीन" या नव्या संकेतस्थळाची ओळख करुन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. ;)

तीळगुळ घ्या गोड गोड बोला. :)

-दिलीप बिरुटे
(लंबर एकचा खोडसाळ सदस्य )

स्पा's picture

16 Jan 2012 - 9:15 am | स्पा

आईचा.. भेंडी..... =))
बिरुटे साहेब

अगदी कोपरापासून हो.............

__/\__

पैसा's picture

16 Jan 2012 - 12:14 am | पैसा

एका संस्थळाचं संपादनाचं काम करताय त्यासाठी अभिनंदन. पण दुसरा कोणी संपादक आहे म्हणून तुम्हाला वैषम्य वाटतंय का? स्पष्ट विचारते म्हणून रागवू नका. तुम्हाला जर काही करून दाखवायचं असेल तर कोणाला शिव्या देण्यापेक्षा "स्थळसंशोधनावर" लक्ष केन्द्रित करा.

५० फक्त's picture

16 Jan 2012 - 10:01 am | ५० फक्त

पैसाताई, स्थळसंशोधनासाठी त्यांनी गावकुस पण ओलांडलं आहे आता, पार अटकेपार संशोधन चालु आहे.

सूड's picture

16 Jan 2012 - 10:09 am | सूड

आम्हाला संस्थळं बघण्याची वेळ सुदैवाने येत नाही.
सुदैवानेच म्हणावे लागेल अशी स्थळे दाखवली जातात असे ऐकिवात आहे.
तुम्ही संपादक आहात हे समजल्याने स्थळसंशोधनाच्या पायर्‍या सांगू शकाल काय.
विचार झाल्यापासून ते अस्तित्त्वात येईपर्यंत काय काय सोसावे लागते?
नंतरचे सोसणे नको जीव करतात असे ऐकून आहे.
दर्जा असा का झाला? आपले मत जाणून घेण्याची इच्छा आहे.
तुम्ही केलेल्या स्थळसंशोधनात अस्तित्त्वात येईपर्यंत बदल होत गेले काय?
तसे असेल तर उगीच स्थळाला प्रेक्षकांनी नावे का ठेवावीत?
एकंदरीतच तुमची प्रगती वाचून भारी वाटलं.

(नातू)

देवरुखकर, असं दुसर्‍यांना विचारुन काही फायदा नसतो. आपले भोग आपल्यालाच भोगावे लागतात. शेक्स्पियर म्हणून गेला आहे की "घर पाहावे बांधून आणि स्थळ पाहावे शोधून".

शेक्स्पियर म्हणून गेला आहे की "घर पाहावे बांधून आणि स्थळ पाहावे शोधून".

आयला, शेक्स्पिअरचं माहित नाय पण वरच्या वाक्याचा उत्तरार्ध धनाजीराव वाकड्यांच्या तोंडून ऐकल्यासारखं वाटतंय... ;-)

बाकी, खूपदा विचारेन विचारेन असं म्हणत विचार केलेला होता की हे

मर्यादा एकशे अठ्ठावीस अक्षरांची. (हे ढाई अक्षर प्रेम के च्या चालीत वाचावे.)

अधोरेखित वाक्याच्या चालीत धनाजीरावांचं स्वाक्षरीवाक्य नेमकं कसं वाचावं?

धनाजीरावांचा (होऊ घातलेला स्वयंघोषित) शिष्य,

आयला, शेक्स्पिअरचं माहित नाय पण वरच्या वाक्याचा उत्तरार्ध धनाजीराव वाकड्यांच्या तोंडून ऐकल्यासारखं वाटतंय...

आता तुम्ही पुणे गेटचं नांव घ्याल. पण आम्ही अगदी सर्वसामान्य नागरीक आहोत हो. अमेरिकन आध्यक्षांच्या वॉटर गेटसारखे पुणे गेट करायला आम्ही नेते तर सोडाच अगदी साधे शुभेच्छावाले कार्यकर्तेसुद्धा नाही. ;)

ढाई अक्षर प्रेम के
मर्यादा एकशे अठ्ठावीस अक्षरांची

असं वाचायचं ते. हा. का. ना. का. ;)

बाकी स्पांडुरंग डोंबिवलीकर संस्थळ वगैरेच्या गोष्टी करत असताना यच्चयावत जनता त्यांस स्थळबद्ध करु जात आहे हे वाचून अं. ह. झालो. :)

''बाकी स्पांडुरंग डोंबिवलीकर संस्थळ वगैरेच्या गोष्टी करत असताना यच्चयावत जनता त्यांस स्थळबद्ध करु जात आहे हे वाचून अं. ह. झालो''

अहो, ती टायपिंग मिस्टेक आहे ओ, ते संस्थळाच्या नाही सुंस्थळाच्या गोष्टी करत आहेत हल्ली. सुंदर स्थळाच्या.

परवा आला असता कट्ट्याला तर तुम्हाला डिटेल रिक्वायरमेंट कळाल्या असत्या...असो.

ढाई अक्षर प्रेम के
मर्यादा एकशे अठ्ठावीस अक्षरांची

असं वाचायचं ते. हा. का. ना. का.

धनाजीराव, अहो, तुमच्या ताज्या ताज्या प्रेमाच्या अडीच अक्षरी कृतीला (एकशे अठ्ठावीस अक्षरांची) मर्यादा घालताना आपल्या (पक्षी तुमच्या) प्रेमाच्या व्यक्तीसोबत तुम्ही अपेक्षाभंगाच्या 'मर्यादाभंगा'चा गुन्हा तर करत नाही आहात ना, याचा जरूर विचार करा ;-)

हे आपलं म्हणायला हो... तसं तर प्यारची कोई सरहद नसते.

विचारा हवं तर स्पावडयाला. तो संस्थळाच्या, चुकलं टायपो मिष्टेक झाली सुस्थळाच्या शोधात "ठाणे मुंब्रा कळव्याची ओलांडून खाडी" अगदी पार रत्नांग्रीपर्यंत गेला. :)

नंदन's picture

16 Jan 2012 - 1:59 pm | नंदन

बाकी स्पांडुरंग डोंबिवलीकर संस्थळ वगैरेच्या गोष्टी करत असताना यच्चयावत जनता त्यांस स्थळबद्ध करु जात आहे हे वाचून अं. ह. झालो.

अगागागा, उच्च! :)

स्पा's picture

16 Jan 2012 - 11:38 am | स्पा

बाकी स्पांडुरंग डोंबिवलीकर संस्थळ वगैरेच्या गोष्टी करत असताना यच्चयावत जनता त्यांस स्थळबद्ध करु जात आहे हे वाचून अं. ह. झालो.

तेजायला धन्या गप कि.... :D

तेजायला धन्या गप कि....

असं आहे काय. मग पन्नासराव म्हणत आहेत तेच खरं आहे. तुम्ही संस्थळाच्या नाही तर सुस्थळाच्या शोधात आहात. तुम्हाला मिचेनशी बोलायला हवं. त्यांच्या माजघरात चर्चा करा. काहीतरी मार्ग निघेल. घिसन मिंधेच्या नावाने खडे फोडून काही फायदा नाही. ;)

अच्छा भासं भासं म्हणजे भावी संसारी असं आहे होय मला काहितरी वेगळं वाटलं होतं.

अच्छा भासं भासं म्हणजे भावी संसारी असं आहे होय

ही हा हा हा हा हा! :-D

हाण् जोरदार.....!

सूड's picture

16 Jan 2012 - 2:50 pm | सूड

हा हा हा :D

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jan 2012 - 4:15 pm | अत्रुप्त आत्मा

@अच्छा भासं भासं म्हणजे भावी संसारी असं आहे होय मला काहितरी वेगळं वाटलं होतं. >>> :-D
स्पांडुरंग शास्त्री,,,तुमच्या धाग्यावर या कोणत्या निराळ्याच रोट्या-थापायला सुर्वात झाली हो..? ,,,

आरारारा.... ;-)

मोदक's picture

21 Sep 2012 - 12:31 am | मोदक

;-)

अत्रुप्त आत्मा's picture

21 Sep 2012 - 11:13 am | अत्रुप्त आत्मा

व्वा...व्वा...! मोदका,,,काय योग्य येळी पतंग वर उचललास रे ;-)

पण स्पा भाऊ, तुमच्याकडून आणि एकंदरीत मिपावरील कोणाही सूज्ञ सदस्याकडून अशा पातळीवरील विडंबनाची अपेक्षा नाही. कोणतेही संस्थळ हे काही एकदम प्रगल्भ झाले नाही, होऊ शकत नाही. अगदी मिपासुद्धा याला अपवाद नसावे. पण म्हणून अजून विकसनशील असलेल्या संस्थळाला नावे ठेवणे अन तेही अशा उपहासात्मक लिखाणाने, हे मला वाटते मिपावरील उदार धोरणालासुद्धा शोभण्यासारखे नाही.
मिपापेक्षासुद्धा वरचढ संस्थळे आहेत. त्यांनी मिपाबद्दल असेच लिहावे काय ?
राग न मानता सूज्ञपणे विचार करावा.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Sep 2012 - 1:34 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>राग न मानता सूज्ञपणे विचार करावा.
स्पा ने ??? हीहीही !!!

काय राव विमे... स्पा च्या बौध्दीक कुवती बद्दल शंका..?? छ्या..!!!!!

समज पाहिजे का तुला..? बोल बोल... समज द्यायला अपील करू...?? ;-)

गुर्जिच्या आग्रहास्त्व वर काडत हाय.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2014 - 11:41 am | अत्रुप्त आत्मा

ह्हे..ह्हे..ह्हे..http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing016.gif पां डुब्बाचा एक जबरी धागा!!! =))

@(भा SSSSS सं भा SSSSS सं) जिल्बुषा नगरकर http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing014.gifघिसन मिंधे http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing014.gif >>> तेंव्हाचा अर्थ तेंव्हा..पण आता याच पां डुब्बास मी (प्र.भा SSSSS सं http://www.freesmileys.org/smileys/smiley-stargate007.gif प्र.भा SSSSS सं) नावानी या धाग्याचा उपशमनी http://www.freesmileys.org/smileys/smiley-sw022.gif धागा काढावा..असे सुचवीत आहे. =))

बुवांनी हा धागा वर आणाण्याचे प्रयोजन कळले नाही.

- अडाणी धन्या

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2014 - 7:30 pm | अत्रुप्त आत्मा

@ प्रयोजन कळले नाही.>>> =)) अगदी बरं झालं!!! :p

सूड's picture

18 Apr 2014 - 4:58 pm | सूड

>>बुवांनी हा धागा वर आणाण्याचे प्रयोजन कळले नाही.

असेच म्हणतो.

-संशयी सूड

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2014 - 6:13 pm | अत्रुप्त आत्मा

:-/ दु...दु..खवट सुडूक!!! :-/

दु दु मी नाय, तो तुमचा अगोबा!!

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2014 - 6:53 pm | अत्रुप्त आत्मा

@दु दु मी नाय>>> :-/ तू पण..तू पण!!! :-/ मला अठवला हा (दंगाhttp://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif) धागा... पां डुब्बाचा!
हेच कारण पुरे सं नै का??? :-/ आणि नसलं तर नसू दे... :-/
ज्जा!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-050.gif

गुर्जी रहस्यभेद करा हो .
डब्बल सौंशयी -जेपी