--------------------------------------------------------------
मित्रांनो आमची कंपनी ग्रामीण भागात सीएसाअर अंतर्गत पाचवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यासाठी संगणक व तांत्रिक प्रशिक्षण देते. सीएसआर अंतर्गत ह्या महिन्यात दि. ३/१/२०१२ रोजी एका गावातील शाळेत दहावीच्या विद्यार्थांना कलचाचणी व करियर मार्गदर्शन आयोजन केले होते. दहावीनंतर्चे करिअर मार्गदर्शनासाठी मला आमंत्रण होते.
दहावीच्या विद्यार्थ्यासाठी कल चाचणी करिता पुण्याहून एका संस्थेतील तज्ञ शिक्षक आले होते. त्यांनी दि २/१/२०१२ रोजी चाचनी घेतली होती. ३ ता.ला कलचाचणीचा निकाल वाटप झाले. त्या निकालप्त्रात शेवटी एक वाक्य होते. कलचाचणीचा निकाल हा तुम्ही दिलेल्या प्रामाणिक उत्तरांवर अवलंबून आहे त्यामुळे जर तुम्ही प्रामाणिकपणे उत्तरे दिली नसतील तर हया निकालाला महत्व देवू नये.
कलचाचणी मधे बुध्यांक, आवड, विश्लेषणक्षमता, भाषाप्रभूत्व, कल्पकता, मनोविश्व इ. अनेक गोष्टींचा विचार केलेला आढळला. तसेच ह्यानुसार कोण सर्टीफिकेट्/डिप्लोमा/डिग्री साठी योग्य आहे तेही सांगितले.
या चाचणीचे मला विशेष अप्रूप वाटले कारण आजही शहरातील शाळांतही कलचाचणीची सोय नसल्याचे ऐकीवात आहे. मला दहावीला असताना अशी काही चाचणी असते हे माहीत नव्हते. म्हणून एका खेड्यातील मुलांना मोफत कलचाचणी करुन मिळते नि त्यात आपला खारीचा वाटा आहे याचा आनंद झाला.
दुसर्या बाजूला यात अनेक मुलांना जसे शब्द संग्रह नाही म्हणून उत्तम संभाषणकौशल्य नसल्याने त्याला आवड असणार्या क्षेत्रात न जाण्यास सांगण्यात आले. ही गोष्ट मला खटकली. ज्या प्रांतात आपण अभ्यास वाढवून कौशल्य मिळवू शकतो त्यात आज जरी काही न्यूनता असली तरी उद्या त्यात निश्चित प्रगती करु शकतो. इतक्या लौकर कलचाचणी घेणे योग्य आहे का?
कारण जिवनाचा मोठा टप्पा अजून पार करायचा आहे.
वाचने
5806
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
शहरी पालकांनी आधीच ठरवून
कारण आजही शहरातील शाळांतही
In reply to शहरी पालकांनी आधीच ठरवून by कवितानागेश
"या चाचणीचे मला विशेष अप्रूप
मलाही हा प्रकार मी शाळेत
बदलता कल...
पेठकरकाका, तुमच्या या
In reply to बदलता कल... by प्रभाकर पेठकर
आत्मचरित्र.
In reply to पेठकरकाका, तुमच्या या by रेवती
खरंच, कलचाचणीचा उपयोग व्यवसाय
In reply to बदलता कल... by प्रभाकर पेठकर
काका
धन्यवाद.
In reply to काका by सविता००१
वयाने काहीश्या मोठ्या लोकांची
उडण्याची कला...
In reply to वयाने काहीश्या मोठ्या लोकांची by गवि
घ्या हो गवि....तुम्ही कुठल्या
In reply to उडण्याची कला... by प्रभाकर पेठकर
मलादेखील माझी अशी कल चाचणी