दोन नवीन चित्रे ... भारतीय स्त्रियांची...

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in कलादालन
4 Jan 2012 - 7:34 pm

अलिकडे केलेली दोन चित्रे:

चित्रकलेविषयी यापूर्वीचे लिखाण
http://www.misalpav.com/node/18741
http://misalpav.com/node/18587

कलासंस्कृतीरेखाटन

प्रतिक्रिया

वरच्या ( पहिल्या) चित्रातील खालच्या डावीकडच्या कोपर्‍यातील स्त्रीचा चेहेरा आणि तिचे शरीर यांची फारकत झाल्यासारखी वाटते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jan 2012 - 8:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन्हीही चित्र अगदी सुंदरच जमली आहेत. अजून अशीच रेखाटने येऊ द्या.

विजूभौ म्हणतात तेही बरोबर वाटतंय. पहिल्या चित्रातली वरच्या डाव्या बाजूच्या स्त्रीच्या हाताचे एकवेळ समजून घेता येईल. पण तिच्या खालील बाजूस असलेल्या स्त्रीचा खांदा मात्र जरा गंडला आहे. एक तर तिच्या लांबसडक केसांच्या बाजूला खांदा जोडलेला पाहिजे होता किवा ती पाठमोरी आहे तर तिचा चेहरा करडूंकडे अधिक झूकलेला म्हणजे चेहरा कमी दिसायला पाहिजे होता, असं वाटतंय.

सारांश : खांद्याने गडबड केली आहे राव.

दुसरं चित्र खूपच सुंदर आहे. मला आवडलं ते लहान लेकरु आणि त्याची कानटोपी. :)

-दिलीप बिरुटे

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Jan 2012 - 11:18 am | विश्वनाथ मेहेंदळे

सारांश : खांद्याने गडबड केली आहे राव.

खांदे खूपच गडबड करतात राव कधीकधी. ;-)

प्रास's picture

4 Jan 2012 - 9:12 pm | प्रास

दोन्ही चित्रं मस्त आहेत.

भडक रंगसंगतीमुळे, ठसठशीत रेखांकनामुळे आणि बारीक कलाकुसरीमुळे तुमची चित्रशैली आवडतेय.

अविनाशकुलकर्णी's picture

4 Jan 2012 - 11:38 pm | अविनाशकुलकर्णी

दोन्ही चित्रं मस्त आहेत.

भडक रंगसंगतीमुळे, ठसठशीत रेखांकनामुळे आणि बारीक कलाकुसरीमुळे तुमची चित्रशैली आवडतेय.

जे मला म्हणायचे ते म्हणाला...

आवडेश चित्रे

पाषाणभेद's picture

4 Jan 2012 - 11:52 pm | पाषाणभेद

अगदी असेच मत माझेही आहे. प्रत्येक चित्रकाराची त्याची शैली असते.
मोठे डोळे, नाक, चेहेर्‍याची ठेवण मस्त आहे. उगाचच अमुर्त शैली नाही ते बरे.

५० फक्त's picture

5 Jan 2012 - 12:06 am | ५० फक्त

मस्त आहेत चित्रं, आवडली.

दीपा माने's picture

5 Jan 2012 - 9:28 am | दीपा माने

फारच सुंदर चित्रे आहेत.
जुनी आठवण आली. साठाव्या दशकात एअर इंडियाच्या आणि इतर मोठ्या कंपन्यांच्या कॅलेंडर्सवर कधी अशी भव्य चित्रे असायची.

डावखुरा's picture

5 Jan 2012 - 8:21 pm | डावखुरा

खरंच मस्तंय राव...चालु द्या अजुन पाह्यला आवडतील..येऊद्या..

अभिजीत राजवाडे's picture

7 Jan 2012 - 8:30 pm | अभिजीत राजवाडे

रंगसंगती आवडली. तुमच्या चित्रातील डोळ्याच्या रेखाटनावरुन मधुबाणी चित्रकलेची आठवण झाली.

पैसा's picture

9 Jan 2012 - 3:23 pm | पैसा

तुमची शैली आवडते आहे. फ्रेश रंग वापरल्यामुळे तुमची चित्रं आनंद देतात. यातल्या स्त्रियांचे वर्ण इतके वेगवेगळे दाखवण्यामागे काही खास विचार आहे का?