कोंबडी घालणार धुमाकुळ हिंदीत

मराठीत गेली काहीवर्षे धुमाकुळ घालणा-या "कोंबडी पळाली" या गाण्याची भुरळ हिंदी चित्रपटसृष्टीलासुद्धा पडली आहे.

मुन्नी बदनाम झाली, शिला की जवानी जनतेने बघीतली, जलेबीबाईची गोडी चाखून झाल्यावर अजून काहीतरी झणझणित पाहीजे असल्यामुळे "चिकणी चमेली" येउ घातली आहे.

हा बघा चमेलीचा धमाका.

कॅट बनली आहे चमेली. याशिवाय रितीक आणि संजुबाबाची उपस्थिती आहे. आता ही चमेली कोंबडीच्या चालीवर आणि तालावर अख्या भारतात धुमाकुळ घालते की नाही हे लौकरच कळेल.

प्रतिक्रिया

कोंबडी प.....ण !!!! घालेल........ घालेल्............आक्शि छान धुमाकूळ घालेल............

दे न खोत

मराठी रॉक्स

अजय अतुल रॉक्स....

एक तर चिकनी चमेली,त्यात पावशेर घेणार्,मग ति घोंधळ्,राडा,कल्ला ,धुमाकुळ हे प्रकार नाहि करणार तर काय वट पौर्णिमा साजरी करणार......

धमाकेदार बाँबगोळा मारलाय ना बे ...बाकी गान धुमाकुळ घालनार,पन काय बी असो या गान्याचं,ही पोट्टी कुन्या बी गान्यात येकदम बिनधास्त नाचती बे,येकदम बिनधास्त...नो भिडभाड ऑनली तोड-ताड.

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे. http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example//16.gif

पन काय बी असो या गान्याचं,ही पोट्टी कुन्या बी गान्यात येकदम बिनधास्त नाचती बे,येकदम बिनधास्त...नो भिडभाड ऑनली तोड-ताड.

तिजं हिट्टं काका मामा दादा आसं कुनीबी नाय. म्हनून तं हे सगळं करतीया. हॉस्टेलला र्‍हाणार्‍या पोरी करतात तसं. smiley

आम्हाला मात्र गाण्याच्या सुरुवातीचे हावभाव अतिशय बिभत्स वाटले. कोरीओग्राफरने हा नाच बसवण्याआधी आमच्या सोनाली बेंद्रेचा "चम चम करता हैं ये नशिला बदन" या गाण्यावरचा नाच पाच पाहीला असता तर चिकन्या चमेलीचं सोनं झालं असतं.

असो. पब्लिक हे कमरेला हिसडे देणंही वेंजॉय करेल. smiley

हॅ हॅ हॅ...अवो वाकडे तुम्चा श्टडी उलसाक कमी पडतुया जनु!! तिजा भाव सईफ आली खान अन आय शर्मिला टागोर हाये...उगा आपलं क्याम्पुटरवर लिवता येतंय म्हनुन लागले का कायबी लिवाया? आँ?

***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/

'उगा आपलं क्याम्पुटरवर लिवता येतंय म्हनुन लागले का कायबी लिवाया? आँ?''

एग झॅक टली हे चवि चार तोतुम्हा लाशिल्पातैबैआक्का,

अवो सम बंद काय साइफ आली खन आणि शरमी ल्ला टागुर आणि क्ट रि ना कैपच चा, का उगा कैलासवासी पतौडींच्या पतरिका छापाया टाकल्या त >

विसेश शुच ना - मला कांपुटर वर लियाला येत नाय, उगा आमच्या अज्ञा नाचीला जका ढुन ये.

अवांतर - अतिशय भंगार झालेले आहे हे गाणे, अजय अतुलचा अतिशय हास्यास्पद प्रयत्न, अगदी मराठीतल्या लक्ष्मिकांत अन त्याच्या बायकोनं हिंदित जाउन घरगडी अन भांडेवालीची भुमिका करावी तसं वाट्लं,

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

आमीबी हेच म्हंतोय...आपलं मत एक्दम बराब्बर जुळता बगा.
लोकं कायबी लिहुन र्‍हायले तं आपन तेंची चुक सुदारलीच पैजे.
आन तुमचं आवांतर काय जमलं न्हाय बॉ. गानं लय बेष्ट झाल्यालं हाय. म्या तर कवा धरुन त्येच आयकुन र्‍हायले ना देवा!! आता मराटीतुन कोन हींदीत गेला तर काय तेला भांडेवालाच म्हनाव व्हयं? का खेकड्यावानी करताय राव!!

***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/

???स्वर्गवासी नबाबांनी दुसर लग्न केल कि सैफ अली खानला काय राखी बांधली कैत्न? बिचारा सैफ ....
हो हि कथ्रीना आहे.पहिले कितीतरी चित्रपटात तिला हिंदीदेखील धड बोलता येत नव्हत.
सैफची बहिण आणि शर्मिलाबींची मुलगी सोहा!

-----------------------------------------------------------------------------------------------

सुखि संसाराची सोपी वाटचाल!

@-तिजं हिट्टं काका मामा दादा आसं कुनीबी नाय. म्हनून तं हे सगळं करतीया. हॉस्टेलला र्‍हाणार्‍या पोरी करतात तसं. >>>
तिकडच्या शीमा न कक्षा लै येगळ्या हायती...! त्ये म्हनत्यात न्हव का-''जसं खत तशी वाढ'' smiley

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे. http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example//16.gif

ह्यो धिंगाणा लै बेक्कार हाये ,पार रातीची झोप घालिवली बयेनं....ह्ये त्या हेलनबै च सेकंड व्हर्जन हाये....

पौवा नशा आणणारा दिसतोय ! smiley
नेहा पेंडसे ने तर सरळ शिलाच्या आयचा घो अन् मुन्नीच्या नानाची टांग म्हणुन नाच केला आहे. smiley

">" type="application/x-shockwave-flash" width="500" height="375" allowscriptaccess="always" allowfullscreen="true">

इतक्या टीनपाट गाण्याचे कसले कौतुक ? फक्त हींदीत गेले म्हणुन ?

बद्दल मत जाणून घ्यायला आवडेल.

ह्या गाण्यावर चमेलीन नाचाव, मग आम्हि आम्च मत मांडु...

मराठी_माणूस

>>इतक्या टीनपाट गाण्याचे कसले कौतुक ? फक्त हींदीत गेले म्हणुन ?

हो हिन्दीवाल्यान्ना इतक्या छपरी मराठी गाण्याचे कौतुक म्हणजे
हिन्दीचा दर्जा काय असेल

बरोबर , टीनपाटच, शीला, झंडु बाम, पप्पु, टल्ली, ढींक च्यॅक, वगैरे वगैरे

?????????? कॅट.......( चमेली) .... सईफ अलि खान तिचा भाऊ ?????????????????????? आणि शर्मिला टागोर तिची आई ??????????????? ये ... बात्....कु....छ हजम नहि हुई ..!!!!!!!!!!

दे न खोत

मराठीत हे गाण नाचायला भाग पाडत खर पण हिंदीत अतियाय बकवास आहे.२ ओळी ऐकल्या आणि चानेल बदलला

-----------------------------------------------------------------------------------------------

सुखि संसाराची सोपी वाटचाल!

+१

तुम्ही २ ओळी ऐकल्या नसून बघितल्या असतील आणि बघताना बाजूला तुमचे पत्नीवार्ता(!!!) पती बसले असतील. तुम्ही त्यांना डर्टी पिक्चर बघू देत नाही, चमेली कुठून बघू देणार !!! smiley

===========================
हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं
और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे
===========================

छान

********************

अजय-अतुलनीच केलंय का हे गाणं पण? मला वाटलं, प्रितमने नेहमीप्रमाणे "प्रेरण" घेऊन डल्ला मारला असेल.. त्याचं "जोर का झटका" हे पण एका अहोमिया प्रायव्हेट अल्बममधुन सही-सही उचललं होतं..

बाकी अजय-अतुलने हिंदीत धांगडधिंगा घातल्यापेक्षा मराठीत उत्तम दर्जाची गाणी दिलीत, ह्याचं कौतूक जास्त आहे..

चिगो..

|| कौन कहता है, के आसमां में सुराख नही होता?
इक पत्थर तो तबियत से उछालों , यारों ||

१२००० कोटींच्या बॉलीवुड ला
माय-मराठी ची कावड |
अन अग्नी-पथावर च्या चमेली ला
पळालेल्या कोंबडी ची आवड | smiley

सुहास
शंभर प्रतिसादात काड्या सारायच्या, अधून मधून सतत कण्हत राह्यचे आणि वर्षा दोन वर्षातून एखाद्या लेखात आव ऋषिमुनींचा आणायचा असले लोक आमच्या ही डोक्यात जातात. (सही-सौजन्य : बिरूटेसर )

कोंबडी पळत पळत
बॉलिवुडमधे गेली
तन-दूरी कतरिना :love: बघुन
कोंबडी च-मेली smiley

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे. http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example//16.gif

श्रेया घोसाल ने मस्तच गायलय... बरोबर आनंद शिंदेचा आवाज पाहिजे होता. smiley
अजय-अतुल एकदम भारी... ह्यातलच देवा श्री गणेशा गाणं ढिनच्यॅक आहे.

कतरीना आहे का चिकणी चमेली..?? वा वा छान.. उत्तम..

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..