२०१३ बॉस्टन अधिवेशनाचे घोषवाक्य आणि प्रतीकचिन्हाची स्पर्धा

अभिजीत राजवाडे's picture
अभिजीत राजवाडे in काथ्याकूट
16 Dec 2011 - 4:56 am
गाभा: 

२०१३च्या बॉस्टन येथे होणार्‍या BMM अधिवेशनाच्या संयोजक समितीने घोषवाक्य आणि प्रतीकचिन्हाची स्पर्धा आयोजित केलेली आहे. विजेत्या स्पर्धकाला २०१३ च्या अधिवेशनात विनामूल्य प्रवेश दिला जाईल. तसेच अधिवेशन स्मरणिकेत विजेत्या स्पर्धकाचे छायाचित्र प्रकाशित केले जाईल. ही स्पर्धा उत्तर अमेरिकेतल्या सर्व मराठी/ अमराठी व्यक्तींसाठी खुली आहे. ह्या स्पर्धेत भाग घेण्यास उत्सुक आणि इच्छुक असलेल्यांनी आपले घोषवाक्य आणि/ अथवा प्रतीकचिन्ह, ३१ डिसेंबर २०११ पर्यंत श्रीनिवास साने यांना shriniwas.sane@bmm2013boston.com या इमेलवर पाठवावे. फेब्रुवारी २९, २०१२ ला विजेत्या स्पर्धकाचे नाव जाहीर केले जाईल.

या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. एका व्यक्तीला दोन्हीतही भाग घेता येईल.

या स्पर्धेचे नियम असे आहेत:

१. सुचविलेले घोषवाक्य/ प्रतीकचिन्ह connections\नाते\ऋणानुबंध या विषयाशी संबंधित असावे.

२. विजेत्या घोषवाक्यास व प्रतीकचिन्हास प्रत्येकी एक BMM2013 च्या अधिवेशनाचे तिकीट विनामूल्य दिले जाईल.

३. एकाच प्रकारच्या, एक सारख्या २ अथवा अधिक आलेल्या सुचनांचा "lottery" स्वरूपाने निर्णय होईल.

४. अंतिम निर्णय BMM २०१३ अधिवेशनाची कार्यकारी समिती घेईल.

५. सादर केलेली प्रवेशिका ही पूर्णपणे स्वतःची असावी व कुठल्याही व्यक्तिगत अथवा उद्योगाच्या प्रताधिकाराचे उल्लंघन केलेले नसावे.

६. एका स्पर्धकाला, एका स्पर्धेसाठी जास्तीत जास्त ३ प्रवेशिका पाठवता येतील.

७. एकदा प्रवेशिका पाठवल्यावर, निकाल जाहीर होईपर्यंत स्पर्धकाने आपली प्रवेशिका कुठल्याही माध्यमात प्रसिद्ध करू नये.

८. विजेत्या घोषवाक्याचे आणि प्रतीकचिन्हाचे सर्व मालकीहक्क BMM 2013 अधिवेशनाच्या कार्यकारी समितीकडे राहतील.

काही कारणास्तव या तारखेत बदल झाल्यास website वर नमूद केले जाईल.
--------------------------------------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी येथे पाहावे - http://bmm2013boston.com/sloganlogo

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

16 Dec 2011 - 6:25 pm | कपिलमुनी

प्रत्येकी एक BMM2013 च्या अधिवेशनाचे तिकीट विनामूल्य दिले जाईल.

ही स्पर्धा उत्तर अमेरिकेतल्या सर्व मराठी/ अमराठी व्यक्तींसाठी खुली आहे.

हे वाचलतं का?

दादा कोंडके's picture

16 Dec 2011 - 7:08 pm | दादा कोंडके

हे एक वाक्य वाचूनच प्रचंड हिरमोड झाला.
विमानाचं तिकिट देण्यात येणार नाही. त्यामुळे ती व्यक्ती उत्तर अमेरिकेतलीच असली पाहिजे. मग भलेही ती अमराठी का असेना! :)

नाहितरी अमेरिकेत स्थायिक झालेल्यांची पुढची पिढी अमराठीच असणार आहे म्हणा.

चित्रा's picture

18 Dec 2011 - 12:04 am | चित्रा

अभिजित राजवाडे यांचे आभार. ही स्पर्धा आधी जाहीर केली होती. (पुन्हा आल्याने काही बिघडले नाही, म्हणा. उलट उत्तमच झाले. तेव्हा धन्यवाद!)

आधीच्या लेखाचा दुवा. तेथे काही प्रश्नांची उत्तरे मिळावीत: http://www.misalpav.com/node/19818

मराठी-अमराठीविषयी:
आमचे इथे अमराठी (कोकणीभाषिक, मारवाडी हिंदीभाषिक, आणि असेच अनेक विविध भाषिक) मित्र-मैत्रिणी आहेत, असे अनेक लोक तुम्हालाही माहिती असतील. अशा अनेकांची भाषा मराठी नसूनही त्यांना मराठी उत्तम येते, काहींनी मराठी व्यक्तींशी लग्न केले आहे, उ. अमेरिकेतील मराठी कार्यक्रमांनाही ते जमेल तशी हजेरी लावतात. काहीजण आपण महाराष्ट्राचे असे प्रेमाने सांगतात. अशांनाही भाग घेता यावा, नाही का?

कपिलमुनी's picture

17 Dec 2011 - 2:09 pm | कपिलमुनी

आम्ही शेजारच्या गावात सुद्धा विमानानेच जातो .. ;)

नर्मदेतला गोटा's picture

11 Feb 2013 - 11:30 pm | नर्मदेतला गोटा

काय लागला निकाल

रेवती's picture

11 Feb 2013 - 11:50 pm | रेवती

तूनळीवर चित्रफित आहे.