जी.ए. कुलकर्णी - अज्ञात आढावा

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
8 Dec 2011 - 8:27 pm

अंतर्जालावर उचकपाचक करीत असताना जी.ए. कुलकर्णीच्या साहित्याचा आढावा घेणारे हे लिखाण एका शिवण उसवलेल्या वेबपेजवर दिसले. चांगल्या गोष्टींचा आस्वाद जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा केवळ यासाठी ते इथे जसेच्या तसे टाकत आहे. या लेखनाचा मूळ कर्ता कोण त्याची नोंद त्या पानावर नाही; कदाचित इथल्या व्यासंगी वाचकांपैकी कुणीतरी हे कुणाचे लिखाण ते सांगेल अशी आशा.
----------------------------------------------------------------------------
एकूण पाने :- 8
एंक अन्वयार्थ
पान नं 60 यात्रिक
ग्रेस आणि जी. एं. कुलकर्णी ही मराठी साहित्यातली दोन महागूढे. एंक कवि. दुसरा
कथाकार. पण दोघांचा साहित्याचा फर्मा एंक आहे. ग्रेसच्या कवितेचा मोह पडतो. मन तीत
चिंब डुंबून उल्हासते. पण बुद्धीला ती कळत नाही. न कळता भावणे हा त्या कवितेचा गुण.
जी गत ग्रेसच्या कवितेची, तीच जी.एं. कुलकर्ण्याच्या कथेची. त्यांची कथा आवडते.
ह्दयाला दावे लावून आपल्याबरोबर फरपटत नेते. क्षणभर त्याला सुन्न करते. वाचून संपली
की रसिक, साक्षेपी वाचकाला गावल्यासारखी वाटते. पण तसे वाटत असतानाच त्याच्या
हातून निसटते. मागे ठेवून जाते ती फक्त एंक अंतर्मुख विषण्णता, अनेक अनुत्तरित प्रश्न,
असंख्य गूढ उपप्रश्र, अस्वस्थ विचारमाला, आणि अज्ञेय भावानुभावाचां एंक गुंता. त्यांच्या
कथेची ही शक्ती अजब आहे. अलिकडच्या कथा सोडा. त्या तर काहींच्या मते शेवाळलेल्या
आहेत. पण त्यांच्या जुन्या कथांचा पोतही हाच आहे. असाच आहे. पु.भा.भावे, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर ही मराठी
कथाप्रांतातील मातबर श्रेयनामे. पण त्यांचा बाज आणि जी. एं. कुलकर्णी यांची कथा यांचे
घराणे कधीही एंक नव्हते आणि आजही एंक नाही. कथाकार मातबर असो किंवा मामुली
असो, प्रत्येकाला समूहात बुडूत गेलेला माणूस कळून घ्यायची इच्छा असते. प्रत्येक व्यक्ती
त्याच्या मते एंक विश्व असते. म्हणून ते त्या व्यक्तीच्या मनाचे पदर उलगडून त्यांचे वेगवेगळे
पोत दाखवतात. त्याचे पापुद्रे दूर करून त्याचा नाभा नागवा करतात. जी. एंं. चे तसे नाही.
त्यांच्या लेखनीकळेची प्रक्रिया थेट उलट आहे. त्यांना व्यक्तीत समष्टी दिसते. `दिसते' हा
शब्दप्रयोग चुकला. ते `व्यक्तीत समष्टी ' पाहतात. त्यामुळे त्यांच्या पात्रांची व्यक्तीगत दुःखे
अखिल मानव समाजाची दुःखे होऊन बसतात. व्यक्तीच्या प्रश्नांचा मानवाच्या प्रश्नांची
गूढगंभीर उदात्तता प्राप्त होते. तिचे जयपराजय मानवाचे जयपराजय ठरतात. सर्वसाधारणपणे सिंधूतून बिंदू वेगळा करून दाखवणे ही कथाकाराची कमाल मानली
जाते. जी. एं. विंदुत सिंधूचे दर्शन घडवतात. त्यामुळे जी.एं. ची कथा म्हणजे प्रतीक-कथा
असा अनेकांचा गैरसमज आहे. वास्तवात ती प्रतीकाच्या पलीकडे जाते. बिंदुत सिंधूचे दर्शन
होणे म्हणजे काय ? बिंदू म्हणजे एंचटूओ. सिंधु म्हणजे एंचटूओचा भला मोठा साठा.म्हणूनपान नं 61जे नियम बिंदुला, तेच सिंधूला - याला प्रतीक म्हणतात. जी. एं. चा बिंदु-सिंधु-संबंध असा
नाही. बिंदुंचा साठा म्हणजे सिंधु नाही. याचे भान जी.एं. ना आहे. म्हणून बिंदुचे गुणधर्म
वेगळे, सिंधुचे वेगळे, हे ते कधीही विसरत नाहीत. सिंधुला खळाळी असते. बिंदुला असतेच
असे नाही. बिंदु विध्वंसगर्भ असू शकतो, पण त्याची विध्वंसशक्ती परिमित असते. सिंधु
अफाट विद्धंसशक्ती बाळगूनदेखील अनेकांचे पोषण करू शकतो. नव्हे, करतो. इतकेच नव्हे,
तर जी.एं.चा बिंदू सिंधू सोडू शकतो, पण त्याची विध्वंसशक्ती परिमित असते. सिंधू
अखंड धडपड चालू असते. म्हणूनच तो प्रश्न विचारतो. त्याला शंका येतात. त्याच्यापुढे
उपप्रश्न उभे राहतात. तो त्यांची उत्तरे कधी शोधतो, कधी शोधत नाही. काही झाले तरी
त्यांची उत्तरे मिळत नाहीत. मिळाली तरी उपप्रश्नांपुढे ती टिकत नाहीत. हे प्रश्न एंका बिंदूचे
नसतात. एंक बिंदू मुखर असतो हे खरे. पण त्याच्या वाणीतून प्रश्न येतात ते सर्व बिंदूंना
ग्रासून उरणारे प्रश्न असतात. सर्वानाच या प्रश्नांची जाणीव असते, असे नाही. नेणिवेच्या
आनंदात त्याचे आयुष्यमान अखंड अवरित चालू असते पण ते त्या प्रश्नांपासून मुक्त
नसतात. त्यांच्या उत्तरांपासून मुक्त नसतात. आणि सर्वात अखेरचे म्हणजे त्यात अंतर्निहित
असलेल्या परिणामापासून तर कधीच मुक्त नसतात. या अर्थाने जी.एं. च्या एंका बिंदूचे प्रश्न
सर्व बिंदूचे प्रश्न असतात, आणि कधी कधी खुद्द सिंधूचेही असतात. या प्रश्नांचा पोत मात्र
वेगळा असतो.जी.एं आपल्याला तत्त्वज्ञानाच्या प्रांतात नेतात. मानवाचा अतीत काय ? अनागत कसा
असेल ? दोघांच्या मर्यादा कोणत्या ? असले प्रश्न त्यांना भंडावतात. यांची उत्तरे शोधायची,
तर त्या शोधात साहाय्य बुद्धीचे. ही बुद्धी तरी खरी आहे का ? तिला कळणारे सत्य अंतिम
सत्य असते का ? मग अतिंम सत्य म्हणजे काय ? असत्य कशाला म्हणायचे ? या
सत्यासत्यविचारातून सद्सद््विवेक स्फुरतो. आणि मग समोर उभी ठाकते ती पापणुण्यद्वयी.
पुन्हा प्रश्न: पाप काय ? पुण्य कोणते? या साऱ्या तत्त्वज्ञानाचे गाठोडे लटकावण्याचा खुंट्या
म्हणजे जी. एं. च्या कथा. प्रत्येक कथेत अशा प्रश्नावली आहेत. काही तर जी.एं.नी
स्पष्टपणेच मांडल्या आहेत. अनेक क्यांत अध्याह्दयत आहेत. त्यांची साधी गोष्ट : `राधी'
`साधी' म्हणजे सर्वाना कळेल अशी. पण तीही राधीबद्दल बोलता बोलता स्वतः वाचकाबद्दलही
बरेचसे सांगून जाते. आणि जेवढे सांगते त्यापेक्षा अधिक सुचवते. राधीचे भोक्तव्य हे तिचे
एकटीचे भोक्तव्य नाही- ते आपणां सर्वाचे भोक्तव्य आहे. जी. एं. वाचा न वाचा, त्यातून
आपली सुटका नाही याचा प्रत्य आपल्याला येतो. आणि मग आपल्यापुढे प्रश्नावलीच्या
प्रश्नावली उभ्या राहतात. म्हणूनच जी. एं.च्या कथांना प्रश्नोपनिषदांची दीप्ती चढते.
इतरांचे कथासंग्रह एंका बैठकित वाचून पुरे करता येतात. जी. एं. च्या कथासंग्रहांचे तसे होत
नाही. ते यामुळेच हा. जी. एं. चा गुणही आहे, दोषही आहे. प्रतेयक कथा एंक नवी डोकेदुखी
घेऊन येते. ज्याला ती पेलते, तो एंकेक करीत त्यांच्या कथा वाचतो. ज्याला पेलत नाही, तो
जी.एं.च्या वाटेला जात नाही. `गुणः दोषायन्ते' हेच जी.एं.चे भागधेय होय. म्हणूनच
जी. एं. तारीफ अनेक करतात. पण समजून जी. ए. वाचणारा क्वचित कधी
आढळलाच तर आढळतो.वर तत्त्वज्ञानावर उल्लेख आला. जी. ए. कुलकर्णी यांच्या तत्त्वज्ञानाचे अनेक
पैलू आहेत. खुद्द जी. ए. वैष्णव संप्रदायात वाढले असावेत. वैष्वण म्हणजे वीर-वैष्णव,पान नं. 62
तप्तमुद्रा, इंग्रीजमुळे ख्रिस्ती तत्त्वज्ञानाशी त्यांचा परिचय असावा. ग्रीक डायलेक्टिक्स त्यांना
अज्ञात नाही. अस्सित्ववादाचे त्यांना वावडे नसावे. म्हणूनच त्यांच्या गोष्टींतील तत्त्वचर्चा
काही वेळा अनेकविध संवादी-विसंवादी वळणे घेते. आणि त्यामुळेच अनेकांना ती एक
`स्यूडो-फिलॉसॉफी' असावी असे वाटते. कथेच्या संदर्भात ही फिलसॉफी खरी आहे का स्यूडो
(आभास निर्माण करणारी) हा प्रश्न नाही. प्रश्न आहे, तिच्याबरहुकून त्यांनी उभारलेले प्रश्न
कसे आहेत. ते खरे आहेत का खोटे आहेत ? हा विचार येताच त्यांच्या प्रशअनांचे महत्तव
आपल्या ध्यानात येते. आणि आपण त्या ओझ्याखाली गुदमरून वाकतो. असो.जी. ए. कुलकर्णी यांची ही प्रश्नोपनिषदे रूक्ष नाहीत. कुठे कथासरित्सागराची घडण,
कोठे अरेबियन नाईट्रसचा बाज, कुठे अँपोक्रिकल स्टोरीचा साचा, असा त्याचां वेगवेगळा
घाट आहे. कधी कधी असंभवाला संभाव्याचे रूप देऊन ते आपल्याला अद्भुताच्या प्रदेशात
घेऊन जातात. शब्दकळा त्यांच्या लेखणीला बोथीवर कसलेल्या नटारांगी नर्तकीसारखी
नाचते. प्रतिमा आणि प्रतीके त्यांच्यासमोर हात जोडून उभी आहेत. म्हणून जी. एं. ची कथा
कधी कंटाळवाणी होत नाही. वाचक कथासूत्राचा मागोवा घेत तिच्याबरोबर स्वचेछेने वाटचाल
करीत जातो. या वाटचालीत त्याची दमछाक होते. पण ती थआंबली रे थांबली की तो पुन्हा आपला
जिथून निघाला होता तिथेच. चक्राकार घुमवणाऱ्या गाडीतून प्रवास करणाऱ्या माणसाची गत.
गाडी धावते आहे तोपर्यंत जग आहे, त्याचे सौदर्य आहे, भीषणता आहे, भव्यता आहे, आणि
त्याबरोबरच त्या जगाची उदात्त विषण्णताही आहे. पण ती थांबली रे थांबली की पुन्हा तो
जिथून निगाला होता तिथेच. पुन्हा तेच त्याच्या घरकुलाचे सपाट, अरंद अंगण आणि
त्याच्यावर अखंड सळसळणारी उदात्त सावली करून उभा राहिलेला भव्योदात्त अश्वत्थ.
एकूण काय ? तर गतिहीन वेग. म्हणजेच व्ही--0. गतिहीन वेग हेच जी.ए.कुलकर्णी यांच्या
कथेचे रूप आहे. त्या वेगाचा झपराटा मात्र अफाट दिसतो. त्यामुळे विश्वरूदर्शन होते. जे
प्रश्न कधई आपल्याला सुचले नसते, ते आपल्यापुढे येतात. त्यामुळे कल्पनातीत उत्तरे स्फुरतात.
ती स्फुरतानात स्वतःचा फोलपणा सूचित करतात. आणि शेवटी विषण्ण जाणीव उरते ती
एक : आपली उतत्रे फोल आहेत हे खरे; पण आपले प्रश्न तरी ठोस होते का ? मग जी.एं.च्या
कथाविश्वातील या वाटचीलीचे प्राप्तव्य काय ? बुद्धी घासून तिला आकार देणाऱ्या
विचारमालिका, मनाला उभारी देणारा श्रम, त्या श्रमांची ह्दयाला आलेली एक अलौकिक तकाकी
आणि आत्बलाला उभारी देणारा एक शांत तकवा. हेच तिचे प्राप्तव्य. हे प्राप्तव्यदेखील
येरागबाळ्याच्या नशिबी नसते. ते भागधेय एखाद्याच जाणत्या साक्षेपी मनाचे. ज्याला हा
तकवा लाधला तो भाग्यवान.अशाच दुर्मिळ अवघड कसाची कथा म्हणजे `यात्रिक'. तिची जात
अँपोक्रिफल स्टोरीची. सर्वान्टिजच्या डॉन क्विक्झोट (खरा उच्चार `किओट') चे हे उत्तरकांड
चुकले, उत्तरकांडाचे एक नवे संस्करण. वर `अँपोक्रिफल' शब्द आला आहे, म्हणून आता
अँपोक्रिफल स्टोरी म्हणजे काय हा प्रपंच.अँपोक्रिफल स्टोरी लिहिण्याची पद्धत कोणी सुरू केली ? केव्हा सुरू झाली ? हा विषय
संशोधनाचा. त्या आडरानात शिरण्याचे येथे कारण नाही. पण या कथाप्रकाराचा दादा म्हणजे
कारेल कापेक. त्याचा `अँपोक्रिफल स्टोरीज' म्हणून एक कथासंग्रहच प्रसिद्ध आहे.
`अँपोक्रिफल' या शब्दाचा अर्थ `खोटा, कल्पित,शाबीत न झालेला.' मूळ शब्द `अँपोक्रिफा.'पान नं. 63ज्यांचा धर्मग्रथांत मागून घुसडलेला आणि खुद्द ज्यूंना अमान्य असलेला भाग. या अर्थाने
`यात्रिक' हा `डॉन क्विक्झोट' चा अँपोक्रिफा आहे. अशा कथेची कल्पना स्पष्ट व्हावी म्हणूनच
कापेकचा खालील अँपोक्रिफिक विष्कंभक.कापेकच्या कथेत एक इंग्रज प्रवासी शेक्सपिअयनंतर तीस-पत्सीसेक वर्षानी व्हेरोना या
गावी गेला. त्याचा उद्देश काय ? तर रोमिओ आणि जूलिएट यांच्या समाधींचे दर्शन घेणे.
गावात गेल्यावर त्याने चौकशी केली. `शेक्सपिअरने अमर केलेल्या त्या दोन प्रेमी जिवांच्या
समाधी कोठे आहेत ' प्रशअन ऐकणारा स्तिमितच झाला. त्याने विचारले, `जिवंत माणसांची
समाधी केव्हापासून बांधायला लागले ? अहो, ज्यूलिएट आजही ठणठणीत दिसते. ती तीन
नातवांच्या आजीचे सुखी जीवन जगत आहे.' प्रवासी अवाक होऊन विचारता झाला, `मग
तिचे आणि रोमिओचे लग्न झाले काय ?' उत्तर मिळाले, `नाही हो. दोघांचा पोरवयातील
मूर्खपणा तो. दोघे थोडी मोठी झाली आणि तो संपला. तिला एका सरदाराने मागणी घातली.
आज ती सुखात आहे.' प्रवाशाने विचारले, `आणि रोमिओ? ' व्हेरोनाच्या लोकांनी त्याला
सांगितले, `त्यानेही एक चांगली मुलगी पाहून लग्न केले. त्याचीही मुलेबाळे आहेत. दोन
वर्षापूर्वी तो आजारी होता.' हे ऐकून त्या बिचाऱ्याने मान खाली घातली. दुसऱ्याच दिवशी
त्याने व्हेरोनाला रामराम ठोकला. - कपेकची गोष्ट इथेच संपते. गोष्ट भाष्य अपेक्षीत नाही.
ज्यांनी रोमिओ-जूलिएट वाचले आहे, त्यांना कापेकची कथा अधिक कळेल. शेक्सपिअरच्या
नाटकांकले स्वप्निल पौंगड प्रेम आणि कापेकच्या अँपोक्रिफातील वास्वव या दोहोंतील विदारक
विरोधस जाणवेल. ज्यांना रोमिओ-जुलिएट माहीत नाही. कतापेकची कथा त्यांच्याकरता नाही.
अँपोक्रिफातील ही तेजाबी दाहकता साहतसाहतच जी. एं. ची `यात्रिक' वाचायला हवी. तशी
ती कुणी वाचली तरच डॉन क्विक्झोट व सँको पांझा यांची नवी परिमाणे त्याला मापता येतील.`यात्रिक' हा `डॉन क्विक्झोट'चा अँपोक्रिफा. म्हणून आता डॉन क्विक्झोटचा प्रपंच.
सर्वसाधारण सुशिक्षिताला हे नाव माहीत असते. पण त्याचे महत्तव कळत नाही. डॉन हे
सर्वाटीझच्या प्रतिभेचे अपत्य. त्याच्या काळात लोकांना `नाइंट एरंट्स' च्या कथा व त्यांच्या
शौर्यगाथा यांचे वेड होते. त्यांची टवाळी उडवण्यासाठी म्हणून सर्वाटीझने हा ग्रंथ लिहिला.
उद्देश साधाच. टवाळीची आणि मनोरंजनाचा. पण सर्वाटीझच्या लेखणीतून बाहेर पडला तो
एक एलौकिक ग्रंथ. वर वर दिसायला तो संपूर्णपणे निरूपद्रवी दिसतो. ब्रिटिशांच्या
कारकिर्दीत जेलमध्ये देशभक्तांना, विशेषतः क्रांतिकारकांना, वाचनासाठी देण्यात येणाऱ्या
ग्रंथांत `डॉन क्विक्झोट 'ला अग्रमान असे. आजही लोक त्याच्याकडे एक काळाकाढू मनोरंजन
म्हणूनच पाहतात. पण ते खरे नाही. विचार केला तर ग्रंथात मनोरंजनाच्या पलिकडचे
बरचसे दिसेल. म्हणूनच तर डॉन क्विक्झोट व सँको पांझा ही जोडी अमर होईन बसली आहे.
किंहबहुना तिने देशोदेशीच्या अनेक भाषांत अवतार घेतलेले दिसतात. इंग्रजीतला सॅम्युएल
पिक््विक आणि त्याचा व्हॅले सॅम वेलर हे इंग्रजीतले पहिले डॉन आणि सँको वुडहाउसचा
बर्टी वूस्टर आणि जीव्ह््ज ही तशीच दुसरी जोडीगोळी. मराठीतले चिमणराव आणि
गुंड्याभाऊ हेही पगडी-उपरण्यातले डॉन आणि सँकोच.प्रत्येक माणूस म्हणजे अनेक व्यक्तित्वांचे एक संयुग (केमिकल कंपाउंड) असतचे. या
संयुगातील सगळ्यांनाच जाणवणारे आणि म्हणून महत्तावचे घटक दोन. एक मूर्ख, दुसरा धूर्त.
पहिला भाबडा, दुसरी कपी. एक स्वप्नाळू, दुसरा व्यवहारी. स्वतःला नकळत सर्वाटीझनेपान नं. 64माणसाचे हे घटक वेगवेगळे केले आमि पहिल्याला नाव दिले `डॉन' आणि दुसऱ्याला `सँको'
प्रत्येक माणसात सँको तर असतोच असतो. तो नसेल तर या जगात त्याचा पाडच लागायचा
नाही. पण त्याचबरोबर त्याच्यात डॉनही असतो. माणसाचे रक्षण-पोषण होते ते त्याच्यातील
सँकोमुळे, पण माणूस सुमद्ध होतो त्याचे श्रेय मात्र त्याच्यातील डॉनलाच असते. एक माकड
अंजनीच्या पोटी जन्माला आहे. एका सकाळी पाळण्यातल्या त्या बाळाला आकाशात एक
तांबडे पिकलेले फळ आहे असा भास झाला. झाले, त्याच्यातील डॉनने आभाळात उसळी
घेतली. डॉनच तो. शेवटी वज्राचा मार खाऊन धरणीवर आपटला. आणि आपटला म्हणूनच
रामायणात हनुमान म्हणून गाजला. समजा, त्या माकडातला डॉन जागा न होता तर !
लंका न जळती. जे या माकडाचे, तेच आपल्यातील अनेक महापुरूषांचे आणि आपणा
सर्वांचेही. प्रत्येकाने आपल्या मनात डोकावून पाहावे. त्याला स्वतःच्या अंतरीच्या गूढ गर्भात
दडून बसलेला डॉन दिसेल. सँको हा शोधत बसण्याची गरज नसते. तो नियमाने सकाळी
आठ-सदतीसच्या लोकल गाठतो. दीड वाजता आपल्या मित्राच्या खिशातला चहा पितो.
खोटया सिक-नोट्स पाठवून परस्त्रीबरोबर चोरून सिनेमाला जातो. आणि शेवटी एके दिवशी
खराच सिक् पडतो आणि सरणावर चढून आपल्या बायकोचे कुंकू पुसतो.रामायणातल्या मारूतीला सूर्य म्हणजे एक पिकलेले फळ हा भास झाला होता. सर्वाटीझच्या
डॉनच्या खाक्या उस्से जादा. त्याला पवनचक्क्या म्हणजे राक्षस वाटले. पखालीत शिपायांचा
आभास झाला. खानावळीतल्या मोलकरणीत त्याच्या डोळ्यांनी राजकन्या पाहिली. शेवटी जे
मारूतीचे झाले तेच डॉनचे झाले ! मारूती फुटक्या हनुवटीनिशी जमिनीवर दाणकन् आदळला
होता. डॉन क्विक्झोट प्रत्येक ठिकाणी मार खात खात विपन्नावस्थेत आपल्या खेडयातील
घरकुलाकडे परतला. मारूतीने एकटयानेच उड्डाण केले होते. डॉनच्या बरोबर होता त्याचा
सँको. त्याच्या मांडीखाली होते त्याचे घोडे- रोजीनांते. आणखी एक पात्र त्याच्याबरोबर
होते. ते म्हणजे सँकोचा भार वाहणारे डॅपल नावाचे गाढव. डॉन आणि सँको या दोघांची
वाहने त्यांना साजेशीच आहेत. डॉनचे घोडे- रोजीनांते -शरीराने मरतुकडे. आपणा
प्रत्येकातील डॉनचे वाहन मरतुकडेच असायचे. ते तसे नसते तर आपणा प्रत्येकातील
अंतःसुप्त डॉनने लांबलांब पल्ले गाठले असते. हे घोडे मरतुकडे असते, म्हणूनच आपल्यातील
डॉन पराधीन जिणे जगत जगत शेवटी केविलवाणे मरण मरतो. उरला आपल्यातला सँको.
त्याला गाढवापेक्षा योग्य वाहन कोणते असू शकते ? संक्रांतीच्या वाहनावरून वर्षाची भविष्य
ओळकतात. सँकोच्या वाहनावरून सँकोचे भवितव्य कळते. गाढव गाजराला राजी असते.
सँको डॉनच्या बरोबर जन्मभर राहूनही त्याची स्वप्ने पाहू शकला नाही. मुलुखगिरीवरून परत
येताना तो आपल्याबरोबर थोडीबहुत माया घेऊन परतला. त्या मायेच्या गाजरावर तोही खूष
होता, त्यीची बोयकोही खूष होती आणि त्याच्या पोरीच्या हर्षाला तर पारावार उरला नव्हता.सर्वाटीझचा डॉन घरी परतला, अकंड भ्रमंतीमुळे तो खंगला होता. घरी आला तो तो
आजारी पडला. आणि त्या आजारात त्याला पहिल्यांदा महाज्ञान स्फुरले. महाज्ञान काय ? तर
आजपर्यंत आपण वेडे होतो. नाइट एरंट्री खोटी. राजकन्या खोटया. दबा धरून बसलेले
शिपाई खोटे. त्याबरोबर आपल्याला भेटलेले राक्षसही खोटे. इतकेच नव्हे, तर आपण घेतलेले
`डॉन क्विक्झोट डी ला मांचा' हे नावही खोटे. आपले खरे नाव `अलोन्सो क्विट्झानो' आहे
आपण वाचलेले अमादिस व त्याच्या सहकाऱ्यांचे इतिहास या सैतानाच्या कल्पित कथापान नं. 65होत्या - हे ते महाज्ञान. या (महा) ज्ञानवायूत त्याला आपल्या येऊ घातलेल्या मरणाची चाहूल
लागली. म्हणून त्याने पाद््याला अंतिम क्षमापनविधीसाठी (लास्ट कन्फेशन आणि एक्स्ट्रीम
अंक्शन ) बोलावले. आणि त्याच्यासमोर आपल्या सर्व चुकांचा आणि पापांचा पाढा वाचला.
त्या पाद््याला ते कन्फेश खरेच वाटेना. तो आ वासून म्हणाला, `अरे देवा ! हे काय आणखी
नवे खूळ ?' मोठ्या कष्टाने शेवटी त्याची समजूत पटली. त्याने डॉनला `अँब्सोल्यूशन इन
आर्टिक्युलो मॉर्तिस' दिले. आणि डॉनने आपला देह ठेवला. त्याच्या थडग्यावर कोणीतरी एक
ओळ कोरून ठेवली होती. `ही हॅड द लक टु लिव्ह ए फुल अँड यट डाय
वाईज'- सर्वाटीझटा डॉन इथेच संपला.जी.ए. कुलकर्णी यांची `यात्रिक' डॉनच्या परतीचा प्रवासात तो आपल्या खेड्याच्या
शिवेवर आला तेव्हा सुरू होते. इथे जी. ए. डॉन आणि सर्वाटीझचा डॉन या दोघांचे
परस्परनाते तपासून पाहिलेले बरे. या दोघांचे नाते पित्रापुत्रांचे आहे. सर्वाटीझचा डॉन आहे
म्हणून जी. एं. चा डॉन असू शकतो. पहिला जरल लोपला तर दुसऱ्याचा जन्मच होणार नाही.
या अर्थाने जी. ए. या कथेत सर्वाटीझच्या डॉनचे बंदी आहेत. ती बेडी तुटला तर ही कथा
टिकतच नाही. डॉन आणि सँको यांच्या जागी `बंकाजी बोधले' आणि `मऱ्या भोईर' ही नावे
टाकून पाहा. कथेची सारी खुमारी अळणी पडले. मग या दोहांत काही फरक नाही का ? तसे
नाही. सर्वाटीझंचा डॉन स्वप्ने दिसली पे दिसली की एकदम कृती करायला उद्युक्त होतो. या
अर्थाने तो कृतिवीर आहे. जी. एं. नी त्याला जिज्ञासू बनवले आहे. त्याची ही जिज्ञासा जागृत
का झाली, कशी झाली हे सांगत नाहीत. शिवेशी आल्याबरोबर तो एकदम
हस्तामलकासारखे प्रश्न विचारू लागतो. त्याच्या या पिरवर्तनाची कारणसंगती लावून लागत
नाही. हा या कथेतील एक दोष म्हटला तरी चालेल. जिज्ञासा जागृत झाल्यानंतर त्याने उभे
केलेले प्रश्न मूलभूत आहेत. डॉनला असे प्रश्न सुचू शकतात का ? ही दुसरी शंका. ती मात्र
निराधार आहे. जगात कोणताही मूर्ख कधीकधी महापंडिकांना गप बसवणारे प्रश्न विचारू
शकतो. या अर्थाने डॉनचे प्रश्न अस्थानी वाटत नाहीत. त्याला मिळालेली उत्तरे ! त्यांचा प्रपंच
यथास्थान होईलच.अशा हा जी. एं. चा डॉन तो थकलेला आहे. त्याचा चेहरा `बराच वेळ मातीत पुरून
ठेवल्यासारखा' दिसतो. त्याचे घोडे म्हणजे घोडयाचा सांगाडा. अशा परिस्थितीत डॉन
गावाच्या शिवेवर आला. त्याची साथई सँको. त्याच्या चेहऱ्यावर मात्र हसरी लाल हाव
रानफळासारखी लकाकत होती. त्याचे गाढव डॅपल ! तेही सँकोसारखे संतुष्ट दिसत होते.
अशा या दग्धाद पार्श्वभूमीवर जी. एं.च्या डॉन-सँको-उपनिषदाची सुरूवात होते. डॉन
त्याला विचारतो, `माझे कुठे चुकले ?मी स्वप्नांच्या पाठीमागे धावलो, ते माझ्या मनाच्या
आधारावर. पण आज माझ्या मनानेच फितूर केला. ते खचले आहे. मला एक राजकन्या
शोधायची होती. तिचे बिरूद मिरवायचे होते. तिचे नाव चिरंतन करायचे होते. पण सगळे
सगळे फसले. आज सगळीकडे माझी कुचेष्टा होते. दिवसाअजेडी गावात शिरण्याची माझी
छाती नाही. म्हणून मी अंधाराची वाट पाहत इथे बसलो आहे. हा अपमान माझ्या नशिबी
का ?माझे काय चुकले ? माझे कुठे चुकले ?'सँकोच तो. त्याची अक्कल त्याच्या स्वतःच्या वाहनाइतकीच. डॅपलचे खूर जमिनीवर, तर
सँकोचे बूड त्याच्या पाठीवर, बरे, गाढवाची उंची गाढवाच्या इतकीच. म्हणून सँकोच्यापान नं. 66पावलाखाली जमीन क्वचितच सुटली होती. त्याने अगदी शुद्ध खरवाहन तत्र्वज्ञान्यासारखे
उत्तर दिले, `तुम्ही खऱ्या तोंडाने काल्पनिक भाकरी खायची धडपड केली. दे कधी नव्हतेच
त्याच्या पाठीमागे तुम्ही धावलात. आणि नुसते धावलातच नाहीत, तर त्याला खरे मानून
त्याच्याशी तसा व्यवहार करायला गेलात. यामुळे तुम्ही तर आपले हसे करून घेतलेतच. पण
तुमच्या खुळचट शब्दांवर भाळून मी माझे हसे करून घेतले. तुम्हांला ढगात भाला घेतलेला
सैनिक दिसतो. थोड्या वेळाने आणखी काही दिसेल. डोके एकदा चुलासारखे पेटले, की
हिरवा सूर्यास्त दिसतो. जांभळी गाढवे दिसतात. पण एखाद्या पोरालाही माहीत आहे की झाड
म्हणजे झाड. नुसती शीळ वाजवली तरी शेकडो माणसे पुढे येऊन """"""""झाड म्हणजे झाड, नुसते
झाडा """"""""' ही साक्ष देतील.डॉनला प्रश्न पडतो. निव्वळ संस्खेवर सत्य ठरू शकते का ? मताधिक्याने सत्य सिद्ध होऊ
शकते का ? तसे असेल तर रूपकांचा अर्थ काय ? अर्थात जग रूपकावर जगत नाही. त्याला
जगायला गाजरे लागतात. सँकोने गाजरे शोधली. ती त्याला मिळाली. त्यांवर सँको जगला.
मीही जगलो. पण त्याबरोबरच त्याच गाजरांवर सँकोचे गाढव पण जगले. आमि माझ्या
रूपंकावर मात्र मलाही जगता आले नाही. मग माझी रूपके निरर्थक होती का ? तसे असले
तर जगात कशालाच अस्तित्व नाही. कारण `जिच्यामुळे एकही रूपक सुचत नाही ती वस्तू
नव्हे. आणि ज्याला एकही रूपक सुचत नाही तो माणूस नसतो !' पण जगाच्या मते मात्र सँको
यशस्वी आहे. तो गाजरामागे धावला आणि त्याने गाजर मिळवले. म्हणून गाजर सत्य आहे.
मी रूपकांमागे मारखाऊ धावपळ केली. तीत मी अपेशी ठरलो. अपेशी ठरलो, म्हणजे माझी
रूपके असत्य ठरली. मग यश म्हणजे सत्य, अपेश म्हणजे असत्य. ही जगाची समीकरणे. ही
दोन्ही समीकरणे तरी बोरबर आहेत का ? आणि यश म्हणजे जर सत्य असेल, तर यश म्हणजे
तरी काय ? सिकंदर चार माणसे घेऊन घराबाहेर पडला. त्याला यश मिळाले. आज तो
इतिहासावर पाय फाकून उभा आहे. आम्हीही चौघेच बाहेर पडलो होतो. मी अपेशी ठरलो.
म्हणून आजा हास्यास्पद आहे. पण मूलतः मी आणि सिकंदर या दोघांत फरक काय ? त्याला
जगाच्या साम्राज्याची स्वप्ने पडत होती. मला राज्यकन्येची पडली. सिकंदर मरू द्या. येशूचे
काय ?तो बारा शिष्य घेऊन बाहेर पडला. आपल्या स्वप्नाकरता अवजड क्रूस खांद्यावर घेऊन
कॅल्व्हरीची टेकडी चढला. त्याच्यावरही लोकांनी दगड भिरकावले होते. त्याला आपल्या
मुखरसाने न्हाऊ घातले होते. मीही आपल्या स्वप्नांसाठी मार खाल्ला. विटंबना सहन केली.
मग त्याच्या स्वप्नात आणि माझ्या स्वप्नांत फरक काय ?सँकोचे उत्तर परखड होते : `येशूचे स्वप्न खरे होते म्हणून त्याचा धर्म सगळीकडे पसरला.
आणि त्याची शिकवण सत्य होती म्हणून त्याला इतके अनुयायी मिळाले.'एकूण अर्थ काय ?
धर्म सत्य होता म्हणून अनुयायी मिळाले. आणि अनुयायी मिळाले म्हणून धर्म सत्य होता.
सँकोचा हा तर्कदुष्ट कार्यकारणसंबंध डॉनला पटला नाही. येशूचा प्रेमशांतीचा संदेश
तरवारीच्या जोरावर पसरला होता. त्याचा भर होता निरिच्छितेवर. आज मात्र संपत्ती त्यांच्या
धर्मकाठांचटा म्हणजेच धर्माचा आधार आहे. उरले त्याचे जगभर पसरलेले अनुयायी ! त्यांतले
खरे अनुयायी मूठभर असतील-नसतील. तसे पाहायला गेले तर आजपर्यंत जगात एकच
ख्रिस्ती होता. पॉटियस पायलेटने त्याला क्रुसावर बळी दिले होते. मग येशू खरा कसा ?
कशाच्या जोरावर ? आणि त्याची स्वप्ने जर खरी असतील तर मग माझी का नाहीत ?पान नं. 67- डॉनच्या या पाखंडाने सँको वैतागला असावा. त्याने ठणकावून उत्तर दिले: `आता
तुम्ही पवित्र येशूचीच स्वतःची तुलना करीत आहात म्हणून सांगतो. जगात एकच महासत्य
असते. आणि ते म्हणजे पोट आणि पोट भरायला लागणारी भाकरी' डॉनला वाटले सँकोचे
गाढवदेखील सँकोचेचे तत्त्वज्ञान माते. मग सँकोत आणि त्याच्यात काय फरक आहे ? जर
फरक नसेल तर प्रश्नच मिटला. पण जर असेल तर सँको शहाणा की मूर्ख ?इथे डॉनला ग्लानी आली असावी. त्या ग्लीनीत त्याला तपकिरी वस्त्रातला एक यती
दिसला. त्या यतीने त्याला आपले तत्त्वज्ञान सांगितले. `एके काळी मी तुझ्यासारखा होतो.
मी मोठे वैभव पाहिले आहे. विलास केले आहेत. सुख हसत हसत भोगले आहे. दुःख रडून
मागे टाकले आहे. व्यसनांत डुंबलो होतो.गुन्हे केले होते. त्यानंतर सगळे गेले. घरदार,
कनक-कांत, परिवार-पुत्र सारे निमाले. त्यामुळे एक उपरतीचा क्षण आला. त्यानंतर मात्र
थोडा परोपकार केला. थोडी तपश्चर्या केली. थोडे दान-पुण्य केले. आणि मग मला जाणवले
की, देवाने मला अत्यंत सौम्य शिक्षा केली. आणि त्याच वेळी तो क्षण आला. आणि
माझ्यातला सारा अंधार स्वच्छ धुवून निघाला. तिथे अस्तहीन सूर्याचा प्रकाश पसरला. मी मुक्त
झालो. मला अंतिम ज्ञान झाले.डॉनला प्रश्न पडला : अंतिम म्हणजे काय ? अंत कुणाचा ? व्यक्तीचा ? का जगाचा ?
व्यक्तीचा असेल तर त्या व्यक्तीचा अंत होईपर्यंत कोणतेच ज्ञान अंतिम ठरू शकत नाही. कारण
जगणे म्हणजेच नवे नवे अनुभव घेणे. आणि प्रत्येक नवा अनुभव म्हणजे नवे ज्ञान. एकदा
माणसाला महाज्ञान झाले म्हणजे त्यात पुन्हा भर पडणार नाही असे थोडेच आहे ? असे असेल
तर आजचे अंतिम ज्ञान उद्याचे उपान्त्य ज्ञान ठरले. आमि अंतिम ज्ञान म्हणजे जर अंतिम
सत्य, तर उपान्त्य ज्ञान म्हणजे उपान्त्य सत्य. याही पलीकडचा एक प्रश्न उरतो. भवभूतीच्या
मालतीमाधवात माधवाने मालतीला पाहिले. ती दिसताच त्याच्या काळजावर मोरपीस फिरले.
पण त्या दर्शनाने त्याला काय झाले हे त्याला सांगता येईना.

वाङ्मयकथाव्युत्पत्तीशब्दक्रीडासाहित्यिकसमाजप्रकटनआस्वादसमीक्षामाहितीसंदर्भप्रतिभा

प्रतिक्रिया

यकु's picture

8 Dec 2011 - 8:34 pm | यकु

मूळ पेजची लिंकः
http://www.ciilcorpora.net/unicode/mar/mar2.xml

आत्ता पुन्हा एकदा त्या वेबपेजची शिवण नीट उसवून पाहिली तर हे दिसले.

जी.ए.च्या कथा धो. वि. देशपांडे - मौज प्रकाशन गृह1990

मन१'s picture

8 Dec 2011 - 9:01 pm | मन१

जी ए कधीच समजायचे नाहित, पण आवडायचे.
हा परिचयही तसाच वाटला.

(ग्रेस समजायचेही नाहित आणि आवडायचे तर अजिबात नाहित.)

इष्टुर फाकडा's picture

8 Dec 2011 - 9:33 pm | इष्टुर फाकडा

असेच म्हणतो.

.. छान लिहीले आहे.. डॉन आणि सँकोबद्दल माहिती नव्हती आधी..

..कथा आता पुन्हा एकदा वाचायला पाहिजे..

रमताराम's picture

9 Dec 2011 - 12:27 am | रमताराम

प्रकाटाआ

पिलीयन रायडर's picture

9 Dec 2011 - 3:16 pm | पिलीयन रायडर

ग्रेसच्या कवितेचा मोह पडतो. मन तीत
चिंब डुंबून उल्हासते. पण बुद्धीला ती कळत नाही. न कळता भावणे हा त्या कवितेचा गुण.

हे अगदी पटलं...
मी लहानपणी "साजणवेळा" ऐकलं होतं...
तेव्हा काही कळायचं नाही पण नाद लागला होता... गाणी तर काय सुरेख होती.. माधुरी पुरंदरे चा आवाज तर.. वाल्ला गजब..!! मुकंद फणसळकरांच्या आवाजातले "ही माझी प्रीत निराळी" आणि "गंगे गंगे.." अप्रतीम...!!
फक्त ह्या सगळ्याचा अर्थ मात्र अजुनही कळालेला नाही.... (तरी आवड कमी झालेली नाही..)

कपिलमुनी's picture

30 Sep 2013 - 2:17 pm | कपिलमुनी

जीए !! जितक्या वेळेस वाचत जाउ तितक्या वेळेस नवीन गवसत जाणारा लेखक

विटेकर's picture

30 Sep 2013 - 2:42 pm | विटेकर

थन्कु हा लेख वर काढल्याबद्दल !
यकु च्या आठवणीने पुन्हा एकदा कळ आली.
नियतीशरणता .. दुसरे काय ?

मुक्त विहारि's picture

30 Sep 2013 - 2:47 pm | मुक्त विहारि

"यकु च्या आठवणीने पुन्हा एकदा कळ आली."

आशु जोग's picture

30 Sep 2013 - 3:18 pm | आशु जोग

हो ना यकु नाहीत
श्र मो नाहीत

चित्रगुप्त's picture

30 Sep 2013 - 7:49 pm | चित्रगुप्त

जीएंच्या कथा: एक अन्वयार्थ (लेखकः धों. वि. देशपांडे, मौज प्रकाशन)
हे ते पुस्तक असावे.
http://www.rasik.com/cgi_bin/display_author.cgi?authorId=a67354&lang=mar...

चित्रगुप्त's picture

30 Sep 2013 - 9:24 pm | चित्रगुप्त

असामान्य प्रतिभेचा चित्रकार Gustave Doré (१८१२-८३) याची 'दॉन क्विखोते' या पुस्तकातील काही चित्रे:
(ही चित्रे असलेले पुस्तक जीएंनी बघितले असेल का?)
a.s

d.f

g.h

j

विटेकर's picture

1 Oct 2013 - 12:39 pm | विटेकर

पहिले चित्र - भृशुंड पक्षी !!
वरुन दुस्ररे - पिशव्या विठोबा

संदर्भ - माणसे अरभाट आणि चिल्लर

मारवा's picture

30 Sep 2013 - 9:51 pm | मारवा

सुन्दर

आनन्दा's picture

1 Oct 2013 - 1:56 pm | आनन्दा

म्हटलं साहेब वरुन पण लिहायला लागले की काय..

अप्रतिम लेख... जीएंचं लिखाण वाचणं म्हणजे वरवर शांत भासणार्‍या खोल डोहात उडी मारण्यासारखं आहे.
बखर बिम्मची हे त्यांचं असंच एक पुस्तक. लहान मुलाचं भावविश्व इतक्या गूढपणे अजून कोणी लिहिलं असेलसं वाटत नाही..

विटेकर's picture

1 Oct 2013 - 2:11 pm | विटेकर

बखर बिम्मची हे त्यांचं असंच एक पुस्तक

चोक्कस !

दादा कोंडके's picture

2 Oct 2013 - 1:57 pm | दादा कोंडके

हे त्यांचं पुस्तक फार उशीरा वाचलं. एकदा घरी गेल्यावर सहज सोफ्यावर पडलेलं एक पुस्तक (मुखपृष्ठ न बघताच) उघडून मधलं पान वाचायला सुरवात केली. एक परिच्छेद वाचल्यावर ते बालवांडमय असून देखील लगेच ओळखलं की असं जिएं शिवाय दुसरं कुणी लिहूच शकत नाही. :)

हा धागा वर वारंवार येणार .त्यांचा कथाविषय नेहमिच नवा राहणारा आहे .आणि मांडणी गूढ .अनुत्तरीत शेवट .शेवाळलेल्या कथा ? ठीक आहे .वाटेला जाऊ नका धपकन पडाल .

चित्रगुप्त's picture

18 Jul 2014 - 4:22 am | चित्रगुप्त

हा धागा वर वारंवार येणार

आला बघा वर.