महाराष्ट्र धर्म :- महोत्सव मराठी साहित्याचा

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
1 Dec 2011 - 3:53 pm

नमस्कार,

सर्व मिपाकरांना सस्नेह निमंत्रण.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या
'ही राजभाषा आहे' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी ठाण्यात शिवशाहीर बाबासाहेब
पुरंदरे यांच्या हस्ते होत आहे. पानिपतकार विश्वास पाटीलही या सोहळ्याला
उपस्थित राहणार आहेत.

नवता प्रकाशनाने ह्या सोहळ्यात विशेष सहभाग घेतलेला आहे. पुण्यात ह्या पुस्तकांच्या प्रतींसाठी माझ्याशी संपर्क साधता येईल.

प्रसाद ताम्हनकर
११२८ ब लक्ष्मी प्रासाद अपार्टमेंट, निंबाळकर तालमी शेजारी,
सुजाता मस्तानी चौक, सदाशिव पेठ
पुणे -४११०३०

मोबाईल :- ९७३०९५६३५६

Email :- prasad.tamhankar@gmail.com, navataa.prakashan@gmail.com

मुंबईहून कोणाला इतरही काही पुस्तकांची आवश्यकता असल्यास जरूर संपर्क साधावा.

धन्यवाद.

(वरिल व्यवहाराचा व मिसळपाव संस्थळाचा कोणताही संबंध नसून, केवळ सदस्यांच्या मदतीसाठी ही माहिती दिलेली आहे.)

कलासंस्कृतीसाहित्यिकबातमीशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

1 Dec 2011 - 4:11 pm | किसन शिंदे

धन्यवाद पराशेठ!!

रामदास काकांनी सांगितल्यापासून वाटच पाहत होतो या कार्यक्रमाची, हजेरी नक्की लावणार. :)

स्पा's picture

1 Dec 2011 - 4:20 pm | स्पा

नक्कीच हजेरी लावल्या जाईल

मन१'s picture

1 Dec 2011 - 4:27 pm | मन१

ही राजभाषा लवकरच ज्ञानभाषाही(मागच्या दोन-तीन दशकात चायनीज्/मँडरिन बनली तशीच) बनावी व भूमीपुत्रांना ज्ञान मिलवण्यसाठी परक्या भाषेच्या कुबड्या लागू नयेत ह्या आमच्या सदिच्छा.

अमोल केळकर's picture

1 Dec 2011 - 4:30 pm | अमोल केळकर

माहिती बद्दल धन्यवाद !!

अमोल केळकर

दादा कोंडके's picture

1 Dec 2011 - 5:44 pm | दादा कोंडके

असेच म्हणतो.
शक्य तेव्ह्ड्या लोकांना कळवण्याचा प्रयत्न करेन.

मोहनराव's picture

1 Dec 2011 - 4:48 pm | मोहनराव

धन्यवाद पराशेठ!!

प्रभाकर पेठकर's picture

1 Dec 2011 - 6:10 pm | प्रभाकर पेठकर

व्वा... आता मिपाचे व्यासपीठ राजकिय संम्मेलनांच्या जाहिरातींसाठीही उपलब्ध आहे तर. अभिनंदन.

विकास's picture

1 Dec 2011 - 11:32 pm | विकास

हा कार्यक्रम जरी एका राजकीय पक्षाने आयोजीत केला असला तरी रुपरेषेवरून तसेच पाहुणे वक्ते-कवी आदींच्या यादीवरून खूपच चांगले आयोजन आहे हे समजते. असे जर कुठल्याही राजकीय पक्षाने कार्यक्रम केले तरी ते केवळ राजकीय पक्षाने केले अथवा त्यात राजकीय व्यक्ती आहे म्हणून नाकारले जाऊ नयेत असे वाटते. किंबहून असे चांगले कार्यक्रम इतर राजकारण आणि सत्ताकारणाशिवाय देण्याची इच्छा सर्वच राजकीय पक्षांना होवोत असे वाटते.

त्यामुळे या कार्यक्रमास तसेच त्याला कुठलेही राजकीय गालबोट लागू नये असे वागण्याची बुद्धी आयोजक आणि प्रेक्षकांना लाभोत ही मनःपूर्वक शुभेच्छा!

कधीकाळी मुळचे ठाण्याचे असलो तरी आता आम्ही पडलो दूरदेशीचे :( पण ह्या कार्यक्रमाचा वृत्तांत तरी आमच्याकडे पोचवण्यासाठी मिपावर टाकावात तसेच त्याच्या चित्रफिती तूनळीद्वारे टाकाव्यात ही आग्रहाची विनंती.

आशु जोग's picture

1 Dec 2011 - 11:56 pm | आशु जोग

एक छोटीशी शंका

६ डिसेम्बर - शाहीर उमप

उमप आता नाहीत ना !

किसन शिंदे's picture

2 Dec 2011 - 10:04 am | किसन शिंदे

अहो जोग, वाक्य पुर्ण तरी वाचत जा.

६ डिसेंबर ला माझी भिमाई हा कार्यक्रम आहे लोकशाहीर विठ्ठल उमप थियेटरचा.

कला प्रेमी लोकांना खेचण्यासाठी आयोजकाने ठळक अक्षरात दाखवून शाहीरांच्या मोठ्या नावाचा फक्त उपयोग केला आहे.

अरे बाबा नीट वाचले मनून तर शंका आली

आशु जोग's picture

1 Dec 2011 - 11:57 pm | आशु जोग

विश्वास पाटील यांचे भाषण रेकॉर्ड करून आम्हाला पाठवा

अशोक पतिल's picture

2 Dec 2011 - 7:16 am | अशोक पतिल

आपल्या मराठी भाषेसाठी एक चागला उपक्रम ! या कार्यक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा!

मनीषा's picture

2 Dec 2011 - 4:00 pm | मनीषा

मनःपूर्वक शुभेच्छा !!!

कार्यक्रम यशस्वी करण्यास श्री समर्थ आहेतच .