Skip to main content

बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा

लेखक विदेश यांनी बुधवार, 23/11/2011 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा दूर गेली फूल पाने एकटा मी हा असा जन्मता मी खूष झाले का बरे गणगोतही जीव होता पुरुष माझा नवस जन्माचा तसा देवही ना जाणतो तो मुकुटचोरी जाहली मी सदा डोकावतो झोळीत माझ्या का असा मॉलमध्ये जात असता खूप असतो खूष मी लांब असताना भिकारी मीच बघतो का खिसा श्वानही वर मान करुनी आज भुंकेना मला राव असता मान होता आदबीचा या बसा
लेखनविषय:

वाचने 1508
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

विदेशराव झ्याक जमलय बर का...प्रत्येक शेरागणीक भाऊसाहेबांची अठवण येत ह्रायली हो राव... @-मॉलमध्ये जात असता खूप असतो खूष मी लांब असताना भिकारी मीच बघतो का खिसा.... फिदा झालो राव...येकदम मस्त मस्त मस्त...

मस्त, आवडली.खुप आवडली.