पेपर प्लेट पासून बनवलेले वॉल हेन्गिंग!!

पूनम ब's picture
पूनम ब in कलादालन
16 Nov 2011 - 1:58 am

साहित्य:
२ चौरस आकाराच्या पेपर प्लेट
व्हाईट स्कूल ग्लू
रद्दी पेपर
टिश्यू पेपर
सेलो टेप
अक्रालिक कलर

कृती:
रद्दी पेपर घेऊन त्याचे बारीक रोल करून घ्यावे. ते सेलो टेप ने प्लेट च्या मागच्या बाजूला काठावर चिटकवून घ्यावे. पेपर रोल वापरून हवे तसे डिझाईन करून घ्यावे. व्हाईट स्कूल ग्लू पाण्यामध्ये घालून मिक्स करावे. टीश्यु पेपर चे छोटे छोटे तुकडे करून ते ग्लू च्या सहाय्याने प्लेट वर चिटकवून घ्यावे. सर्व डिझाईन कव्हर केल्या नंतर ८-९ तास ड्राय होऊ द्यावे. ड्राय झाल्या नंतर अक्रालिक रंगानी डिझाईन रंगवून घ्यावे. वोल हेन्गिंग आणखी उठावदार बनवण्यासाठी स्टोन आणि स्पार्कल चा वापर करू शकता..

कला

प्रतिक्रिया

रेवती's picture

16 Nov 2011 - 3:03 am | रेवती

शाळेतला हस्तकलेचा तास आठवला.
उठावदार रंगात रंगवल्यामुळे पाहताक्षणी ते भरतकाम वाटले.

निवेदिता-ताई's picture

16 Nov 2011 - 7:20 pm | निवेदिता-ताई

असेच म्हणते....:)

गणपा's picture

16 Nov 2011 - 8:55 pm | गणपा

मला 'पोगो'वरचा M.A.D.* रॉब आठवला. :)

* Music Art Dance.

शाळे मध्ये असताना अशा वस्तू बनवायला खरेच खूप मजा यायची..कार्ड बोर्ड पेपर चा वापर करून असे वॉल हेन्गिंग बनवले होते लहानपणी..आणि ग्ल्यू च्या ऐवजी गव्हाची खळ वापरली होती..:)

मदनबाण's picture

16 Nov 2011 - 11:57 am | मदनबाण

मस्त ! :)

अन्या दातार's picture

16 Nov 2011 - 12:11 pm | अन्या दातार

कहर आहे राव.

कशाला इंजिनीअर होऊन ४ वर्षे घालवलीत? मस्त फाईन आर्ट वगैरे करायचेत की. हे असलं काहीतरी बघितलं की स्वतःच वॉलला हँग का होउ नये असा प्रश्न पडतो.

कशाला इंजिनीअर होऊन ४ वर्षे घालवलीत? मस्त फाईन आर्ट वगैरे करायचेत की.

तंतोतंत सहमत.....

रेवती's picture

16 Nov 2011 - 7:24 pm | रेवती

आवड असते एकेकाला.

अन्या दातार's picture

16 Nov 2011 - 7:36 pm | अन्या दातार

आवड नक्की कशाची?
आयुष्याची ४ वर्षे फुकट घालवायची की वॉल हॅंगिंग्स बनवायची?

(तसं बघायला गेलं तर आम्ही आत्तापर्यंतचे आयुष्यच फुकट घालवलीत म्हणा)

हे असलं काहीतरी बघितलं की स्वतःच वॉलला हँग का होउ नये असा प्रश्न पडतो.

संपादकांनी इथे लवकरात लवकर एक स्पेशल 'हँगिंग वॉल' उपलब्ध करुन द्यावी अशी जोरदार विनंती करतो ;-)

पूनम ब's picture

16 Nov 2011 - 8:38 pm | पूनम ब

हि फक्त आवड आहे माझी..:) घर सजवण्यासाठी अशा वस्तू बनवत राहते..पण मला इंजिनिअर च व्हायचे होते..त्यात जास्त आवड होती..त्यामुळे मला ४ वर्षे फुकट गेली असे वाटत नाही हो..:)

रेवती's picture

16 Nov 2011 - 8:49 pm | रेवती

प्रतिसाद आवडला.

सुहास झेले's picture

16 Nov 2011 - 2:10 pm | सुहास झेले

व्वा व्वा .. मस्त !!