सुपर जंबो ए ३८० , जणू इंद्राचा ऐरावत.,

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture
निनाद मुक्काम प... in जनातलं, मनातलं
8 Nov 2011 - 7:45 pm

अमेरिकन बोईंग च्या एकतर्फी साम्राज्याला शह द्यायला सुरवात म्हनुन युरोपियन युनियन च्या एरबस ने केली. ह्याचा एक भाग म्हणून बोईंग च्या ७४७ चा टक्कर देण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या विमान निर्मितीची योजना केली. नकटी च्या लग्नाला विघ्ने का काय म्हणतात तसे ह्यांचा उड्डाणाला विलंब झाला.( काही प्रसारमाध्यमांनी हा पांढरा हत्ती उडणार कधी अशी त्याची कुचेष्टा सुरु केली.)

पण ह्या ऐरावताचे पहिले उड्डाण पेरीस वरून लंडन च्या हिथ्रो वर आगमनाची तारीख पक्की ठरली.

ते वर्ष २००६ चे होते.. हित्रो लगत मोठ्या इमारती नसल्याने फक्त चार आणी पंचतारांकीत हॉटेलातील उंच इमारतीमधून हा लेंडिंग सोहळा प्रत्यक्ष पहाणे नशिबी होते.

टेलीविजन मिनिटा मिनिटाची खबरबात देत होते.. विमान चार्ल्स दे गौले वरून यशस्वी रीत्या अवकाशात झेपावले. तेव्हा तेथील जनतेचा, विमान निर्मिती करणाऱ्या. सदस्यांचा आनंद अवर्णनीय होता. हा युरोपच्या इभ्रतीचा, अभिमानाचा प्रश्न होता. एकेकाळी जगाला नवीन नवीन सर्वोत्तम गोष्टी देणारा युरोप मधल्या काळात अमेरिका व जपान च्या उत्तुंग यशाने झाकळून गेला होता. आज हवाई प्रवासाला कलाटणी देणारा शतकामधील सर्वोत्तम क्षण होता. सर्व श्रेणी मध्ये ५५५ आसन शमता असलेले हे विमान इंधन बचत व कमी आवाज करणारे पर्यावरणाच्या अनकूल होते. हवाई प्रवास आता १६ तासाचा तोही सलग सुरु झाला त्यामुळे त्यात नुसता प्रवासापेक्षा प्रवाश्यांना इतर सुविधा देणे क्रमप्राप्त झाले. जगात करोडपतींची संख्या वाढत असल्याने त्यांना व्यापारी श्रेणीत जास्त सुविधा देणे ओघाने आले. ह्या सर्व मागण्या हे विमान पूर्ण करणारे होते.. एमिरात ने आता ह्या विमानात स्पा निर्माण केला आहे. ओर्गेनिक खाद्य पदार्थ , जगातील उंची मद्ये असलेले बार आणी अनेक सोयी येत्या काळात ह्या विमानात येणार आहेत. ह्या बाबतीत जगातील सर्वोत्तम विमान कंपन्यामध्ये चढाओढ निर्माण झाली आहे.

आम्ही हॉटेलचा सर्व कर्मचारी वर्ग हिल्टन च्या गच्चीवर गेलो. दुसर्या महायुद्धातील कट्टर वैरी जर्मनी व फ्रांस व एरवी अमेरिकेचा कच्छपी असलेला व युरोपियन असून युरो न स्वीकारलेला ब्रिटन व स्पेन ह्या देशांनी एकत्र येऊन ही विमान निर्मिती केली होती. हे विमान जेव्हा अवकाशातून हित्रोवर आले तेव्हा एकच जल्लोष झाला.

गरुडा सारखे त्यांचे आगमन झाले. ह्या संबधी घरी बाबांशी बोललो तेव्हा त्यांनी रामदास काका म्हणतात तसे त्यांनी जंबो दर्शनची गोष्ट सांगितली होती.

जंबो ते सुपर जंबो हे दोन पिढीतील अंतर ,मानवी प्रगतीचा चढता आलेख दर्शवितो.

ह्या विमानात इतर विमानांचा तुलनेत ५०% जास्त फ्लोवर शमता असली तरी केवळ ३५ % जास्त प्रवासी प्रवास करू शकणार होते. विमानात सर्व श्रेणीच्या सीट्स मोठ्या आहेत. ह्या विमानाचा उड्डाण मार्ग जगातील सर्वात जास्त रहदारी असणार्या हवाई मार्गावर असल्याने निकोप स्पर्धा निर्माण होऊन विमान प्रवासाचे दर कमी होतील ही आशा आहे. दुर्दैवाने मंदीमुळे विमान कंपन्या व जगातील सरकार हवालदिल झाले आहेत. व प्रवास महागला.
( भारतात ह्या विमानाचे नियमित उड्डाण अमेरिका व युरोपियन खंडात सुरु झाले तर हवाई प्रवास नक्कीच स्वस्त होईल.) मात्र नुकतेच लुफ्तांजा ने म्युनिच आणी फ्रांक फ्रुट ते दिल्ली ह्या वाढत्या हवाई प्रवासाठी ह्या सुपर जंबो विमानाची निवड केली. पण दुर्दैवाने आपल्या कडून ही मागणी साफ नाकारल्या गेली ( आणी ह्या विमानाचे भारतातील आगमन बोंबलले ) ह्यामागील कारण देतांना आपले मंत्रालय मत...

बोईंग चा विमानापेक्षा १४९ आसन शमता असलेले हे सुपर जंबो भारतात आले तर भारतीय कंपन्या ज्या ७०% बोईंग वापरतात त्यांचावर विपरीत परिणाम होईन. किंग फिशर ने ह्या विमानाची २००८ मधेच ओर्डेर दिली होती मात्र आता त्यांचा निर्णयावर पुनर्विचार करायला त्यांना भाग पाडले जात आहे.( अजून एक कारण आपले विमानतळ ह्या विमानाच्या लायकीचे नाही हे कारण दिले जाते )

मात्र एरबस खुद हे आरोप नाकारते. दिल्ली विमानतळ हे ह्या सुपर जंबो साठी सर्वथा योग्य आहे. तर बाकीच्या प्रमुख विमातळावर काही तांत्रिक बदल केले तर ते सुद्धा कार्यरत होतील ( आता मुंबई विमानतळ जर स्वतःचा हक्काच्या जमिनीवरील बांगलादेशी व इतर उपर्या लोकांचे निवासस्थान मानवी हक्काचा उदार दृष्टीकोनातून ( काही दुष्ट लोक त्याला मताचे राजकारण म्हणतात ) हटवू शकत नाही.

तरी नवीन मुंबईत नवीन विमानतळ उभारतांना ह्या सोयी नक्कीच देऊ शकतात.( जगातील सर्वोत्तम असा फोर्मुला १ चा ट्रेक आपण बनवू शकतो त्याचा शेजारी भविष्यात जेपी ग्रुप क्रीडा नगरी ज्यात १ लाख आसन क्षमतेचे क्रिकेट स्टेडीयम बनवण्याची योजना राबवत आहे ) उभारली जात आहे तेथे अद्यावत विमानतळ बांधणे काहीच अवघड नाही.

मात्र जर भारतीय कंपन्या जर एरबस कडून अ३८० विकत घेऊ लागले तर बोईंग च्या भारतातील बाजार पेठीला प्रचंड धक्का बसेल.

भारतीय प्रवाशांचे काय
त्यांना हवाई प्रवासाची खाज असेल तर तर चार दिडक्या जास्त देतील.) जगातील सर्व प्रमुख हवाई कंपन्या आता ए ३८० ला पंसती देत आहेत. २००३ पासून एरबस ला बोईंग पेक्षा जास्त ओर्डेर संपूर्ण जगातून येत आहेत. आम्ही मात्र अजूनही..

बोईंग कशाला ३८० च्या तोडीस तोड विमान बनवेल. आपल्या सारख्या देशातील एकनिष्ठ बाजारपेठ त्यांचा दिमतीला आहेतच.

आज एमिरात व लुफ्तांजा ह्यांना भारतात हे विमान आणायचे आहे. मात्र एमिरात ने हे विमान आणले तर किंग फिशर व जेट ला सुद्धा हे विमान घ्यावे लागेल नी मग एर इंडिया ह्या पांढर्या हत्तीला सुद्धा ..पण त्याने भारत ते आखात प्रवास केवढा स्वस्त होईन व्यापार नी पर्यटन किती पटीने वाढेन. ह्याचा विचार कोण करेन.

त्या दुबई ची एमिरात किंवा अबुधाबी ची etihad किंवा साउथ कोरियन ह्या अमेरिकन धार्जिण्या देशांनी सुद्धा ए ३८० ला पसंती दिली. मात्र आम्ही अजूनही स्वतःची लायकी असून जगाच्या मागे राहत आहोत.

आज खरे तर देशा अंतर्गत हवाई प्रवासात युओपियान कंपन्यापेक्षा आपली किंग फिशर किंवा जेट अनेक पटीने उत्तम आहे.( आमचे कुटुंब लुफ्तांजा पेक्षा किंग फिशर ला पसंती देते. )

डिसेंबर ला भारतात येतांना आणी भारतातून दिल्ली व राजस्थान फिरण्यासाठी किंग फिशर ह्या पंच तारांकित हवाई कंपनीला पर्याय नाही. त्यांच्या भात्यात २०१४ ला सुपर जंबो येणार अशी बातमी आहे. देव करो आणी ह्या जंबो चे भारतात आगमन होवो.

साहित्यिकविचार

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

8 Nov 2011 - 8:17 pm | चिरोटा

वाचनिय लेख. वर म्हंटल्याप्रमाणे किंगफिशरने A380 बूक केले होते पण नंतर ऑर्डर रद्द केली असे वाचले होते.

बोईंग कशाला ३८० च्या तोडीस तोड विमान बनवेल. आपल्या सारख्या देशातील एकनिष्ठ बाजारपेठ त्यांचा दिमतीला आहेतच.

बोईंगचे ७८७ ड्रीम लायनर नेणार आहे ना? त्याची आसन क्षमता सु.जं.पेक्षा कमी आहे पण इंधन बचत त्यांची चांगली आहे असे म्हणतात.

भारतात ह्या विमानाचे नियमित उड्डाण अमेरिका व युरोपियन खंडात सुरु झाले तर हवाई प्रवास नक्कीच स्वस्त होईल

शक्यता कमी वाटते. निदान भारतात तरी भाडे स्वस्त होईल असे वाटत नाही. हे होण्यासाठी इंधन स्वस्त झाले पाहिजे. आणि इंधन स्वस्त झाले तर सरकार नविन कर शोधून काढेल. सुपर जंबो कर वगैरे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Nov 2011 - 8:38 pm | निनाद मुक्काम प...

चिरोटे साहेब भारतातील भाडेवाढ बाबतीत सहमत आहे.

मात्र परकीय कंपन्यांना देशात हवाई सेवा देण्यास अनुमती दिली तर आशेचा छोटा किरण दिसतो.

केग ने मध्यंतरी हवाई खात्याचा काही निर्णयावर आक्षेप घेतला होता...

लेख आवडला.
१६ तास सलग प्रवास करणारी सगळे विमाने सुपर जंबो असतात काय?
तुमच्याकडे लुफ्तांसापेक्षा किंगफिशर एयरलाईन आवडण्याचे कारण काय आहे?
मला तर आजपर्यंत लुफ्तांसा सगळ्यात आवडली. नेहमी अगदी चांगली सेवा मिळाली.
त्यामानाने एयर इंडियावाले आणि के एल एम वाले चिडचिड करताना दिसले.

स्मिता.'s picture

8 Nov 2011 - 9:01 pm | स्मिता.

दुर्दैवाने म्हणा पण एयर इंडियाची लुफ्तांसा किंवा किंगफिशरसोबत तुलनाच शक्य नाही.
किमान त्यांनी केबिन क्रू/ सर्विसबाबत तर अजिबात नाही. त्यांचा संपूर्ण क्रू वय वर्षे ५०+ असा असतो आणि त्या विमानात आपण तिकिटाचे पैसे भरून जरी बसलो असलो तरी त्यांची वागणूक अशी असते की जणू काही वर्षानुवर्षे ते आपल्यावर उपकार करत आहेत. त्यात भर म्हणून आपल्या संस्कारांमुळे अश्या काका-काकवांना पाणी, ज्युस वगैरे करता बोलावणं अगदीच जिवावर येतं.

एयर इंडियाने ग्राहकांच्या अधिक चांगल्या सेवेकरता केबिन क्रू बदलणे गरजेचे आहे.

रेवती's picture

8 Nov 2011 - 9:25 pm | रेवती

हो, सगळ्या आज्ज्याच असतात.
त्यांना काही मागायचं म्हणजे मारक्या म्हशीसारखं बघतात.
त्यातून फ्लाईट डिलेड असेल तर त्यांच्या अंगातच येतं.
फार राग येतो. त्यातून आपल्याकडे लहान मुलं असतील तर विचारायलाच नको.

लंबूटांग's picture

8 Nov 2011 - 11:51 pm | लंबूटांग

नाही. किंबहुना A380 पहिलेच जंबो विमान असावे जे इतका लांबचा पल्ला न थांबता पार करू शकते. (जंबो जेट म्हणजे Boeing 747 असे मानून.)

अमेरिका ते भारत ये जा करणार्‍या बहुतेक सर्व Direct Flights ह्या Boeing चे 777 200LR/ER हे विमान वापरतात. Airbus A340 हे Airbus चे तसेच लांब पल्ल्याचे विमान आहे. पण ही दोन्ही जंबो जेट ह्या प्रकारात मोडत नाहीत.

चू भू द्या घ्या.

रेवती's picture

9 Nov 2011 - 1:23 am | रेवती

धन्यवाद लंबू.

जम्बो नाही तर नाही...पण ड्रीमलायनर दिल्लीपर्यंत येऊन गेलं!
त्याची चाचणी झाली नाही म्हणे.

योगी९००'s picture

8 Nov 2011 - 9:04 pm | योगी९००

मस्त लेख..आवडला...

लेख वाचून A380 मधून प्रवास करायला मिळावा अशी इच्छा झालीय. :)

स्पा's picture

9 Nov 2011 - 1:54 pm | स्पा

मस्त लेख..आवडला...

लेख वाचून A380 मधून प्रवास करायला मिळावा अशी इच्छा झालीय.

झकास रे निन्या

कुंदन's picture

9 Nov 2011 - 5:26 pm | कुंदन

आधी पारपत्र मिळवा मालक.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Nov 2011 - 6:03 pm | निनाद मुक्काम प...

म्हणजे काय बुआ ?

प्रचेतस's picture

9 Nov 2011 - 8:20 pm | प्रचेतस

पारपत्र म्हणजे पासपोर्ट

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Nov 2011 - 3:23 am | निनाद मुक्काम प...

भारतात जाणार होतो तेव्हा केट ला एर इंडिया ने प्रवास करू नको असा सल्ला अनेक भारतीय व अभारतीय लोकांनी दिला. तेव्हा भारतीय विमान कंपनी म्हणजे क दर्ज अशी तिची समजूत झाली होती. ते मत किंग फिशर ने प्रवास केला तेव्हा बदलले. आपल्याकडे सरकारी व खाजगी शेत्रे व त्यांच्या सुविधा ह्यात जमीन आस्मानचा फरक असतो ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे किंग फिशर

ह्या विमान कंपनी मध्ये खास विजय माल्या टच जाणवतो. जगातील एकमेव पंचतारांकीत सुविधा अशी जाहिरात असलेली किंग लौकिकाला जागते.

त्यांचा हवाई सुंदर्या आंतराष्ट्रीय प्रशिक्षण प्राप्त असतात. त्यांना मोड्लिंग मधील दिगज्ज प्रशिक्षण देतात.

माझी हवाई सुंदरी असलेली एक मैत्रीण जेट मध्ये आहे. तिचे दोन किलो वजन वाढले म्हणून दोन महिने तिला जमिनीवर कामाला ठेवले ( वजन कमी कर अशी तंबी मिळाली )

दोन महिन्यानंतर तिचे वजन चेक केले आणी मग तिला विमानात घेतले.

जे र डी टाटा ह्यांचा काळात एर इंडिया चा दर्जा व हवाई सुंदर्या ह्यांचा दर्जा उत्कृष्ट होता. आता च्या एर इंडिया च्या सुंदर्या नसून चीचुन्द्र्या आहेत.

योगी९००'s picture

9 Nov 2011 - 5:15 pm | योगी९००

एर इंडिया च्या सुंदर्या नसून चीचुन्द्र्या आहेत.
चीचुन्द्र्या ..?? तुम्हाला घुस म्हणायचे आहे का?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Nov 2011 - 5:22 pm | निनाद मुक्काम प...

चिचुंद्री हा उंदरांच्या महिला गटातील प्राण्याचे नाव आहे. ते चीची असा सतत कर्कश आवाज करतात.म्हणून बहुदा त्यांना हे नाव पडले असावे.
चु भु द्या ध्या

प्रकाश१११'s picture

9 Nov 2011 - 7:33 am | प्रकाश१११

निनाद - खूप छान नि माहितीपूर्ण लिखाण.
आवडले. मुख्य म्हणजे उत्तम भाषा .
डिसेंबर ला भारतात येतांना आणी भारतातून दिल्ली व राजस्थान फिरण्यासाठी किंग फिशर ह्या पंच तारांकित हवाई कंपनीला पर्याय नाही. त्यांच्या भात्यात २०१४ ला सुपर जंबो येणार अशी बातमी आहे. देव करो आणी ह्या जंबो चे भारतात आगमन होवो.

ह्या बातमीचे स्वप्न पुरे होवो. पु.ले.शु.मनापासून

प्रकाश१११'s picture

9 Nov 2011 - 7:33 am | प्रकाश१११

निनाद - खूप छान नि माहितीपूर्ण लिखाण.
आवडले. मुख्य म्हणजे उत्तम भाषा .
डिसेंबर ला भारतात येतांना आणी भारतातून दिल्ली व राजस्थान फिरण्यासाठी किंग फिशर ह्या पंच तारांकित हवाई कंपनीला पर्याय नाही. त्यांच्या भात्यात २०१४ ला सुपर जंबो येणार अशी बातमी आहे. देव करो आणी ह्या जंबो चे भारतात आगमन होवो.

ह्या बातमीचे स्वप्न पुरे होवो. पु.ले.शु.मनापासून

मराठी_माणूस's picture

9 Nov 2011 - 10:00 am | मराठी_माणूस

हॉटेल मधे सेवा देणारे कोणत्याही वयाचे चालतात मग विमानतले सेवा देणारे, तरुण , सुंदर वगैरे ... असलेच पाहीजेत असे का . एअर इंडिआतल्या क्रुचा काका, काकु असा हेटाळणिपुर्वक उल्लेख का ?

एअर इंडिआतल्या क्रुचा काका, काकु असा हेटाळणिपुर्वक उल्लेख का ?
मला याचे कारण असे वाटते की, "सौजन्य" नामक गोष्टीशी त्यांचा कधी संपर्क झालेला नसतो ! ;)

मला याचे कारण असे वाटते की, "सौजन्य" नामक गोष्टीशी त्यांचा कधी संपर्क झालेला नसतो !

हे बरोबर.. पण तेवढंच नाही..

किंगफिशर आणि अन्य खाजगी एअरलाईन्समधे एअरहोस्टेस मॉडेल्ससारख्या निवडल्या जातात आणि "जवानी आहे तोवर भाव आहे" तत्वावर (बॉलीवूड हिरॉईन्सप्रमाणे) त्यांच्याबाबतीत धोरण असते. सरकारी एअरलाईनींमधे जॉब सिक्युरिटी म्हणून वयाच्या उशीरापर्यंत इनफ्लाईट ड्यूटी दिल्या जातात. वयानुसार त्या तितक्या ताज्यातवान्या आणि देखण्या दिसत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे केवळ सौजन्य नसल्याने काकूबाई म्हणतात हे खरे नव्हे. त्यात सरळसरळ दिसण्याचा भाग असतो.

एरवी सरकारी अशा कोणत्याही कर्मचार्‍यात खाजगी नोकरीवाल्यापेक्षा सौजन्य आणि नम्रता कमीच असते (अ‍ॅव्हरेज म्हणून.. अपवाद वेगळे) कारण ग्राहकाच्या मताने मला काडीचा फरक पडत नाही, मला सौजन्याविषयी विचारणारे आणि नोकरीवरुन काढणारे कोणी नाही याचा एक वास वागण्यात येतोच..

बाकी खाजगी एअरलाईन्समधे या मुलींचे व्यावसायिक आयुष्य (शेल्फ लाईफ म्हटलं तर नसते आरोप व्हायचे.. ) कमी असते.. आणि एक्स्प्लॉयटेशन जबरदस्त.. केवळ कोणाकडूनतरी केले जाणारे नव्हे तर स्वतः वाहवत गेल्याने झालेले सुद्धा..

असो..

प्रभाकर पेठकर's picture

9 Nov 2011 - 11:55 am | प्रभाकर पेठकर

विमानप्रवासात सुरक्षितता सर्वोच्च मानली पाहिजे. त्यात अजून तरी एअर इंडिया कसोटीस पात्र ठरली आहे असे दिसते.

पण, बाकी सर्व बाबतीत एअर इंडिया जगाच्या कितीतरी मागे आहे ह्यात शंका नाही. ग्राऊंड सर्व्हिस, लाऊंज सर्व्हीस, गेट ते विमान सर्व्हीस, पॅसेंजर बोर्ड होतानाच्या सुस्वागतम हास्यामागील उदासिनता, इन फ्लाईट सर्व्हीस, खाद्य पदार्थांचा दर्जा (पण काही इतर विमानकंपन्यांच्या खाद्यपदार्थांचा दर्जा बघता, एअर इंडियाचा दर्जा टॉप क्वालीटीचा वाटतो) अनेक क्षेत्रात सुधारणेस बराच वाव आहे.

मात्र, आखाती प्रदेशातून भारतात ये जा करण्यासाठी एअर इंडीया अगदी इकॉनॉमिकल आहे.

खाद्यपदार्थाच्या दर्जात सुधारणा होताना दिसते आहे. येणारा काळ चांगला असेल अशी अपेक्षा.

गवि's picture

9 Nov 2011 - 12:11 pm | गवि

एअर इंडिया कसोटीस पात्र ठरली आहे असे दिसते

-१

एअर इंडिया अत्यंत अ‍ॅक्सिडेंट प्रोन एअरलाईन आहे. ती जागतिक एअरलाईन्सच्या सरासरीपेक्षा ७७% जास्त अ‍ॅक्सिडेंट रेट असलेली एअरलाईन आहे.

याउलट एकही बळी न घेतलेल्या स्पॉटलेस एअरलाईन्सची लिस्ट इथे पाहता येईल..

(वेबसाईटच्या रंगांवर जाऊ नये कोण्या एका विमान अपघात प्रेमीने बनवलेली फार जेन्युईन आणि कष्टपूर्वक बनवलेली वेबसाईट आहे.)

काही एअरलाईन्स एअर इंडियाइतक्या जुन्या नसल्या तरी रेकॉर्ड क्लीन असल्याचं सिद्ध होईल इतक्या आहेतच.

जेट एअरवेज १९९२ पासून आहे आणि इंटरनॅशनल एअरलाईन बनूनही आता बरीच वर्षं झाली आहेत. क्वांटास अगदी आत्ताआत्तापर्यंत स्पॉटलेस होती..

एअर इंडियाचा आणि फॉर दॅट मॅटर पूर्वीच्या इंडियन एअरलाईन्सचा भूतकाळ आणि वर्तमानकाळही अक्षरशः डागाळलेला आहे. नुसती सुरक्षितताच नव्हे तर पायलटची मनमानी, संप, वेठीस धरणे आणि आर्थिक गलथानपणातही ते खालीच आहेत.

प्रभाकर पेठकर's picture

9 Nov 2011 - 2:34 pm | प्रभाकर पेठकर

एअर इंडिया अत्यंत अ‍ॅक्सिडेंट प्रोन एअरलाईन आहे. ती जागतिक एअरलाईन्सच्या सरासरीपेक्षा ७७% जास्त अ‍ॅक्सिडेंट रेट असलेली एअरलाईन आहे.

माझा विमानप्रवासाशी संबंध आल्यापासून माझ्या वाचनात एअर इंडियाचे नांव अपघातग्रस्त म्हणून कमीवेळा वाचनात आले आहे. परंतू आपण म्हणता आहात ते खरेही असू शकेल पण 'सरासरीपेक्षा ७७% जास्त अपघात प्रमाण' हे बिरुद कसे प्राप्त झाले? हि माहिती कुठे मिळू शकेल? हे प्रश्न, एक उत्सुकता म्हणून विचारत आहे.

एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सची माहिती आंजावर सर्च केली की आकडेवारी मिळेल.

एअरडिझास्टर डॉट कॉम वर खालील पानावर इंडियन एअरलाईन्सचे रेकॉर्ड मिळेल संपूर्ण फॅटॅलिटीसहः

http://www.airdisaster.com/cgi-bin/airline_detail.cgi?airline=Indian+Air...

एअर इंडिया

http://www.airdisaster.com/cgi-bin/airline_detail.cgi?airline=Air+India

इथे १९९० पर्यंतचेच आहेत पण त्यानंतरही झाले आहेत..

हे अ‍ॅक्सिडेंट्स आणि त्यांच्या फ्लाईटचे रेशो इतर बहुसंख्य एअरलाईन्स पेक्षा खूप खूप वाईट आहेत. ही एअरलाईन बॉटम ट्वेंटीमधेही असू शकेल. संशोधन करुन सांगतो.

शिवाय नमुन्यादाखल नुसती एइं आणि इंए ची विकीपाने पाहिली तरी कळेल. आता दोन्ही एकत्र झालेत. पूर्वीही टेक्नॉलॉजिकली एकत्र होते.. तेव्हा आता दोन महाडळमळीत विमानकंपन्यांचा संयोग झाला आहे. सावध रहावे.. :)

शिवाय http://www.planecrashinfo.com/ या वेबसाईटवर अनेक स्टॅटिस्टिक्स आहेत.

प्रभाकर पेठकर's picture

9 Nov 2011 - 7:12 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद गवि साहेब,

हि माहिती मला नविन आहे. आपण दिलेल्या लिंक्स तपासतो. तेवढीच ज्ञानात भर पडेल.

मेले! मेले!
माझं एयर इंडियाचं बुकींग झालय.
देव आमचं रक्षण करो.
माझं धैर्य पार खलास झालय.
निनादने हा धागा महिना दोन महिन्यांपूर्वी काढला असता तर काय बिघडलं असतं?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Nov 2011 - 4:41 pm | निनाद मुक्काम प...

गवी ह्यांच्या एअर इंडिया बद्दल मतांशी मी सहमत आहे.
युनियनच्या अवाजवी हस्तक्षेप व सरकारी ढिसाळ कारभार ह्यामुळे कर्मचारी स्वतःला दीड शहाणे समजतात. जेष्ठतेचा निकष लाऊन जमिनीवर काम करणे हे हवाई सुंदर्यांच्या बाबतीत सर्वच जगात घडते. पण ही लोक उगाच बाऊ करतात. एकाच गोष्टींचे सुख म्हणजे सामान जास्त किलोचे नेता येते व त्याबाबतीत उगाच काटेकोर पणा दाखवत नाहीत. परदेशी किंवा खाजगी कंपन्या एखाद दुसरे किलो जास्त सामान असले तर लगेच जादा पैसे आकारतात.
ही कंपनी सरकारी असल्याने भाव वाढ एका मर्यादेबाहेर करत नाही व खाजगी कंपन्यांचा नफा मिळवण्याच्या वृत्तीवर रोख बसतो

भारतीय सरकारने जर सर्व भारतीय कंपन्यांना ५ वर्षांचा कालावधी दिला की ह्या कालावधीत सर्वानीच ए ३८० विकत घेऊ शकतात. मग ह्या सुपर जंबो ला भारतात उड्डाणाची परवांगी दिली तर आमचे भाडे मारले असा गळा कोणी काढणार नाही.

भाडे वाढीचा मुद्दा ती जरी किमान कमी होणार नसेन तरी ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा तर मिळेल. पण आंतराष्ट्रीय रूट वर म्हणजे मुंबई ते अमेरिका ह्या प्रवासात सध्या एक थांबा युरोपात असतो तेव्हा युरोपातून अमेरिकेने जाणारे आंतराष्ट्रीय ग्राहक सुद्धा भारतीय विमान कंपन्याना मिळतील
बोईंग ने ७४७ हे त्यांचा मोठ्या जंबो पेक्षा अजून मोठे आणी सरस विमान बनवायला काहीच हरकत नाही. मोबाईल कंपन्यांमध्ये निकोप स्पर्ध्धा आहेतच.

ह्या संधर्भात असे वाटते की आता जमाना दोन देशातील भिन्न कंपन्या एकत्र येऊन एखादे प्रोडक्ट विकसित करतात, सुपर जंबो हे त्यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. बोईंग ने भारतीय ,चीनी , जपान सारख्या देशाशी करार करून एखादे प्रोडक्ट नक्कीच विकसीत करू शकतील.
.
ह्या बाबतीत एक उदाहरण द्यावेसे वाटते. ५ व्या पिढीतील लढाऊ विमान फक्त अमेरिकेने विकसित केले होते. पण ते जरी सर्वात विकसित असले तरी त्यांची देखभाल करणे म्हणजे पांढरा हत्ती पाळणे होते साहजिकच मंदीच्या लाटेत सर्वात पहिले ते अमेरिकेने तत्कालीन सेवेतून काढून टाकले. आता चीन ह्या पद्धतीत विमान विकसित करत आहे. तर भारत व रशिया संयुक्त रीत्या ह्या विमानाची निर्मिती करून २०१७ पर्यत ते उडण्यास सज्ज करत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकन विमानापेक्षा ते खर्चाचा व गुणवत्तेच्या बाबतीत सरस ठरणार आहे.( त्यांच्या दाव्यावर विश्वास ठेवावासा वाटतो.कारण ब्रामोस ह्या जगातील एकमेव सुपेर्सोनिक शेपानास्त्राच्या बाबतीत त्यांचे सर्व दावे कसोटीस खरे ठरले होते.)

अजून एक मुद्दा असा आजतागायत जगभरातील विमान कंपन्यांना बोईंग आणी एअरबस ह्या दोनच प्रमख कंपन्या पर्याय आहेत.

रशियन चीनी कंपन्या प्रयत्न करत आहेत. पण त्यांना यश मिळत नाही.
भारत व आशियातील काही प्रमुख राष्ट्रे सिंगापूर ,इंडोनेशिया ,जपान जमल्यास चीन व रशिया ह्यांनी एकत्र येऊन विमान उत्पादन केले तर ते नक्कीच सरस ठरेल कारण तिसर्या देशातील स्वस्त व कुशल मजदूर आणी बरेच फायदे त्यांना मिळतील.

लंबूटांग's picture

9 Nov 2011 - 7:08 pm | लंबूटांग

>>बोईंग ने ७४७ हे त्यांचा मोठ्या जंबो पेक्षा अजून मोठे आणी सरस विमान बनवायला काहीच हरकत नाही

१९९३ मध्ये Boeing आणि इतर काही कंपन्यांनी मिळून अश्या project च्या शक्याशक्यता पडताळण्यासाठी एक अभ्यास केला होता (feasibility study). २ वर्षांनी तो थांबवला कारण त्यांना असे वाटले होते की ह्या project साठी लागणारे १५ billion $ चा परतावा मिळणार नाही. दुसरे कारण म्हणजे विमानप्रवासी hub and spoke pattern ऐवजी point-to-point/ non-stop pattern ला जास्ती पसंती देऊ लागतील असा होरा होता. त्यामुळे 747 पेक्षा मोठे विमान बनवण्यापेक्षा आहेत त्या 777 सारखीच पण लांबचा पल्ला गाठू शकणारे विमान बनवण्यास Boeing ने सुरुवात केली. वर म्हटल्याप्रमाणे 777 200LR हे एक उदाहरण.

त्यांचे 787 Dreamliner हे एक अतिशय fuel efficient आणि प्रथमच composite materials वापरून बनवलेले विमान नुकतेच वापरात येऊ लागले आहे. त्याबाबर सविस्तर माहिती हापिसात जाऊन टन्कतो. कृपया बुच मारू नये :).

सुहास..'s picture

9 Nov 2011 - 7:13 pm | सुहास..

माहितीपर लिखाण आवडले .

प्रदीप's picture

9 Nov 2011 - 7:38 pm | प्रदीप

लेखात A380 व बोईंगच्या ड्रीमलायनरची ( 787) कुठल्याही चोख निकषांवर तुलना केलेली नाही. नुसतीच काही उडती विधाने आहेत. इथे मी थोडक्यात काही मुद्द्यांच्या संदर्भात लिहीतो.

* दिल्लीचे विमानतळ ('हवाईअडडा' !!) अशा मोठ्या विमानांना हाताळावयास सक्षम आहे, ह्याविषयी तुम्हास नक्की काही माहिती आहे का? तसे लेखात दिसून येत नाही.

* A380 (अथवा बोईंगचे ड्रीमलायनर, 787-- जे ह्याच महिन्यात ANA ने वापरात आणले) वापरल्याने प्रवास स्वस्तात होतील, ही विमाने बनवणार्‍या कंपन्यांची कॅचलाईन असावी कदाचित, पण प्रत्यक्षात विमानकंपन्या (एयरलाईन्स) त्यातून होणारा फायदा कितपत ग्राहकांपर्यंत पोहोचवतात, ते पहायचे.

* आणी युरोपातील नव्या (कार्बनसंबंधित) नियमाच्या अंमलबजावणीमुळे युरोपात जाणार्‍या सर्वच प्रवासांची भाडी बरीच महागणार आहेत. सर्व देशांच्या विमान-वाहतून कंपन्यांनी त्याविरूद्ध निषेध नोंदवला आहे, काहींनी (एकट्याने अथवा संघटनांनी) कोर्ट केसेसही दाखल केल्या आहेत. चीनसारखे काही देश तर ह्या कायद्यामुळे सार्वभौमत्वावरच घाला येतो असे मानतात.

* एकाद्या विमानातील उपलब्ध असलेली जागा (वापरात येऊ शकणारे क्षेत्रफळ) कसे वापरायचे ह्याचा निर्णय ते विमान चालवणारी/वापरणारी विमान कंपनी घेते. एकच जातीचे विमान, परंतु आतील जागेचा वापर (cattle class च्या संदर्भात सांगायचे तर सीट्समधील 'पिच') वेगवेगळ्या विमान कंपन्यांच्या विमानात अनेकदा वेगवेगळा दिसून येतो.

* भारत सरकार भारतातील खाजगी विमानकंपन्यांना एका विशीष्ट विमाने बनवणार्‍या कंपनीचे विमान घेण्ञास प्रवृत्त करत असेल ह्याविषयी साशंक आहे. असे काही उघडपणे सरकारने केल्यास अनेक राजकीय व WTO शी संबंधित कायद्याच्या बाबी आड येऊ शकतात. (सध्या-- म्हणजे २००७ सालपासून-- सुरू झालेल्या भारतीय हवाईसेनेच्या फायटर जेटच्या मोठ्ठ्या खरेदीच्या प्रक्रियेचे कार्य आता तिसर्‍या, म्हणजे निविदांच्या प्रार्थमिक छाननीच्या टप्प्यावर आलेले आहे, ह्यापूर्वी जी शॉर्टलिस्ट तयार करण्यात आली त्यात बोईंग, लॉकहीड ह्यांची विमाने बाद केली गेली आहेत, मुख्य शर्यत फ्रेंच व इतर काही युरोपिय कंपन्यांच्या विमानांत आहे. ही ऑर्डर २० बिलीयन डॉलर्सची आहे!)

* A380 ची तुलना बोईंगच्या 747 शी न करता 787 शी करणे जास्त उचित ठरावे. ह्याविषयी बरीच तांत्रिक माहिती जालावर उपलब्ध आहे. मी वर म्हटल्याप्रमाणे हे विमान ह्याच महिन्यात 'बाजारात' आले आहे. (बरोबर एका वर्षापूर्वी A380 चा पहिला अपघात होऊन गेला आहे. लंडन ते सिडनी मार्गावरील क्वांटासच्या विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याने ते मध्येच चांगी येथे उतरवावे लागले).

* विमानांसारख्या खरेद्या अर्थात विमानकंपन्या नुसत्या तांत्रिक बाबींवरून करत नाहीत, इतर अनेक अवधाने पहावी लागतात.

* एयर इंडिया व इतर भारतीय विमानकंपन्या ह्यांतील तुलना वगैरे हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा व्हावा. थोडक्या सांगायचे तर ग्राहकसेवेमधे ए. इं. इतर भारतीय विमानकंपन्यांच्या पासंगासही पुरत नाही, ह्याविष्यी दुमत होऊ नये, पण त्याचबरोबर सरकारी विमान'सेवा' ह्या नात्याने त्या कंपनीस अनेक अजागळ कामे करावी लागतात असे ऐकून आहे व ज्यांची फारशी माहिती सर्वसाधारण जनतेस नसते. इतर कंपन्यांनी A380 घेतल्यास एयर इंडियासही ते घ्यावे लागेल असेच काही नाही. विकीवरील माहितीनुसार 787-8 साठी एयर इंडियाने २७ विमानांच्या खरेदीची तयारी दर्शवली आहे.

युरोपातील विमान छान-छान, व अमेरिकेतील वाईट-वाईट असा एकांगी लेख तुमच्यासारख्या माहितगाराकडून अपेक्षित नव्हता.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Nov 2011 - 8:47 pm | निनाद मुक्काम प...

@दिल्लीचे विमानतळ ('हवाईअडडा' !!) अशा मोठ्या विमानांना हाताळावयास सक्षम आहे, ह्याविषयी तुम्हास नक्की काही माहिती आहे का? तसे लेखात दिसून येत नाही.
येथे आणी येथे
येथे

येथे भारताने लुफ्तांजाला प्रवेश नाकारण्याचे एक अजून कारण दिसून येईन ( तसा शंकेस वाव आहे)

एकाद्या विमानातील उपलब्ध असलेली जागा (वापरात येऊ शकणारे क्षेत्रफळ) कसे वापरायचे ह्याचा निर्णय ते विमान चालवणारी/वापरणारी विमान कंपनी घेते. एकच जातीचे विमान, परंतु आतील जागेचा वापर (cattle class च्या संदर्भात सांगायचे तर सीट्समधील 'पिच') वेगवेगळ्या विमान कंपन्यांच्या विमानात अनेकदा वेगवेगळा दिसून येतो.

सिंगापूर ,एमिरात ,क्वन्ताज ,एर फ्रांस ,लुफ्तांजा ,कोरियन ,साउथ चायना ह्या विमानकंपन्या जगातील अग्रगण्य आहेत. त्या विमांतील वाढीव जागांचा उपयोग प्रवाशांच्या सोयीसाठी करत आहेत हे तुम्ही

नेट वर पहिले तर दिसून येईन .

विमान अपघात हे सर्वच विमानांना कधी ना कधी ना कधी होत असतात.

लंबूटांग's picture

9 Nov 2011 - 8:49 pm | लंबूटांग

दिल्लीचा विमानतळ पूर्णपणे सक्षम आहे असे बऱ्याच ठिकाणी वाचनात आले होते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Nov 2011 - 9:18 pm | निनाद मुक्काम प...

विकीबाबा ए ३८० च्या संधर्भात हे सांगतो .( ह्यात सर्व अग्रगण्य विमान कंपनी मध्ये एर इंडिया चे नाव का नाही )

प्रदीप जी आपण म्हणता त्या ४थ्या पिढीतील विमानाच्चा सौद्यांची माहिती थोडक्यात देतो.

संरक्षण शेत्रात अजूनही रशिया ला आपण प्राधान्य देतो . हा सौदा जगाच्या हवाई इतिहासात सर्वात मोठा सौदा होता . व रशियन विमाने सुद्धा पर्तीस्पर्धी होती ( त्यांच्या सोबत आधीच ५व्वा पिढीची विमाने .....) पण ह्या दोघांना ही आपण बाद ठरवले .पण प्रवासी विमानांना बोईंग एरबस शिवाय तगडा पर्याय नाही. तरी जेथे दर्जा उत्तम आहे अश्या मालवाहू विमान आपण अमेरिकेकडून विकत घेतली आहेत. आता फ्रांस चे राफेल व इयु चे टायफून उरले आहे .( जर्मनी चा ह्याच्या निर्मितीत मोठा वाटा आहे )त्यामुळे जो भारताला बेटर डील देईन त्यांचे विमाने भारत घेईन .
ह्यावरील खरे कारण अमेरिकन प्रसारमाध्यमे सांगतील

प्रदीप's picture

10 Nov 2011 - 7:36 am | प्रदीप

चला, मानले की दिल्लीचा हवाईअड्डा मोट्।या विमानांना हाताळू शकतो. पण मग ही तुम्ही म्हणता ती 'बंदी' (तुमचा शब्द नव्हे, पण मतितार्थ तोच) बोईंगच्या 787 लाही लागू होईल ना.

येथे भारताने लुफ्तांजाला प्रवेश नाकारण्याचे एक अजून कारण दिसून येईन ( तसा शंकेस वाव आहे)

ह्यात दुवा सापडला नाही. पण देशाबाहेरच्या विमानकंपन्यांना रूट्स व क्षमता ह्या दोन्ही बाबींत मान्यता देतांना, माझ्या माहितीप्रमाणे, अनेक गोष्टींचा विचार केला जातो. तेव्हा लुफ्तांसाला तुम्ही म्हणता ती अधिक क्षमतेची मान्यता नाकारण्यामागे कमर्शियल, देवाणघेवाण अशा अनेक अंगांचा विचार केला गेला असावा. अर्थात हे मी अगदी सर्वसाधारणपणे सांगतोय, तुम्ही दर्शवता तशी लॉबी भारतात कार्यरत असेलही, कुणी सांगावे?

सिंगापूर ,एमिरात ,क्वन्ताज ,एर फ्रांस ,लुफ्तांजा ,कोरियन ,साउथ चायना ह्या विमानकंपन्या जगातील अग्रगण्य आहेत. त्या विमांतील वाढीव जागांचा उपयोग प्रवाशांच्या सोयीसाठी करत आहेत हे तुम्ही नेट वर पहिले तर दिसून येईन .

कबूल. पण त्यांच्या बिझीनेसच्या ट्रेंड्स्चा विचार करता, ते सगळेच (आणि इतरही विमानकंपन्या) ह्या जास्त सुविधा बिझीनेस क्लास, व त्याहीपेक्षा फर्स्ट क्लासच्या प्रवाशांसाठी तयार करतात,. अर्थात हा कमर्शियल डिसीजन आहे त्याविषयी तक्रार नाही. पण माझा मुद्द्दा आहे, की ज्याप्रकारे EAD ने A380 हे दीर्घ पल्ल्याचे, जास्त मोठ्ठे विमान करण्यास सुरूवात केली तशीच बोईंगनेही केलेली आहेच की. ह्याच महिन्यात जपानच्या ANA ने पहिल्या 787 चा वापर सुरू केला. विकीवर ह्या दोन्ही विमानांविषयी भरपूर माहिती आहे,. तेव्हा कुठल्याही निकषांवर तुलना ह्या दोन विमानांत व्हावी.

विमान अपघात हे सर्वच विमानांना कधी ना कधी ना कधी होत असतात.

होय. पण वापर सुरू झाल्यानंतर एका वर्षाच्याही आतच हे झाले. व ह्या केसमध्ये इंजिनाची टर्बाईन डिस्कच पडून गेली म्हणे!

लंबूटांग's picture

10 Nov 2011 - 7:59 am | लंबूटांग

787 हे पूर्णपणे वेगळ्या उद्दिष्टाने बनवलेले विमान आहे. त्याची आसनक्षमता ही कोणत्याही इतर मध्यम आकाराच्या विमाना इतकीच आहे. जास्तीत जास्त २९० प्रवासी. जर business आणि first class वगैरे असले तर काहीशी कमीच. त्याउलट A 380 ची कमीत कमी seating capacity आहे ५२५. जास्तीत जास्ती ८५३. त्यामुळे बहुधा 787 ला बंदी घालत नसावेत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Nov 2011 - 7:41 pm | निनाद मुक्काम प...

अरे कर्मा
असे असेल तर माझा तो प्रतिसाद उडवावा .
मी त्यातील मजकूर परत लिहितो .
@
लंबू टांग
तुमच्या प्रतिसादातून चांगली माहिती माहिती मिळत आहे.
लवकर टंका

निवळलेला निमुमोज

लंबूटांग's picture

9 Nov 2011 - 8:47 pm | लंबूटांग

तर वर म्हटल्याप्रमाणे Boeing ने १९९० च्या दशकातच नवीन विमानाबद्दल विचार करणे सुरु केले होते. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या 747-400 ज्याला आपण सर्व जम्बो जेट म्हणतो त्याची कमी झालेली विक्री.

दोन पर्यायांचा विचार सुरू होता:

  1. 747X जे 747 400 पेक्षा थोडे लांब पण थोडे जास्ती fuel efficient
  2. Sonic Cruiser जे आवाजाच्या वेगाच्या ९८% वेगाने जाऊ शकेल (Mach 0.98) परंतु 767 ह्या छोट्या विमानाइतकेच इंधन वापरेल.(Sonic Cruiser हे आपल्या नेहेमीच्या विमानपेक्षा वेगळ्या पद्धतीने design केले जाणार होते. नंतर Sonic Cruiser हे project cancel kele गेले. का ते खाली आहेच)

747 X मध्ये फारश्या कोणी उत्साह दाखवला नाही पण Sonic Cruiser मध्ये बऱ्याच मोठ्या airlines ने interest दाखवला.

अमेरिकेवर 2001 मध्ये झालेले हल्ल्यांमुळे अमेरिकेतील कंपन्यांना सर्वाधिक नुकसान झाले आणि ज्या कंपन्यांनी आधी Sonic Cruiser मध्ये रुची दाखवली होती त्यांनीही आता विचार बदलण्यास सुरुवात केली. त्यातच वाढत्या इंधनाच्या किंमतींमुळे विमान कंपन्या जास्ती वेगापेक्षा जास्तीत जास्त fuel efficient विमानांकडे आकर्षित होऊ लागल्या. ह्याच सर्वाची परिणीती म्हणून Boeing ने २० डिसेंबर २००२ मध्ये Sonic Cruiser project बंद केला आणि पारंपारिक पद्धतीचे विमान बनवण्याचा निर्णय घेतला. ज्याला त्यांनी 7E7 असे नाव दिले.

787 हे पहिले विमान ठरले ज्याचे fuselage (मधले नळकांडे ज्यात प्रवासी बसतात) हे aluminum च्या sheets एकत्र जोडून बनवण्याऐवजी एकसंध composite materials वापरून बनवले गेले. ह्या sheets जोडण्यासाठी जवळपास ५०,००० screws सारखे fasteners लागत असत. ह्यामुळे विमानाचे स्वत:चे वजन कमी होण्यास मदत झाली.

Boeing च्या म्हणण्याप्रमाणे हे विमान 767 पेक्षा २०% जास्ती fuel efficient आहे. ह्यापैकी फक्त ८% बचत ही नवीन प्रकारचे इंजिन वापरल्यामुळे आहे तर बाकीची composite materials वापरल्याने व काही aerodynamic design improvements मुळे झाली.

हे विमान बनवताना मात्र Boeing ने Airbus चाच मार्ग अवलंबला. सर्व काही एकाच ठिकाणी न बनवता विविध कंपन्यांना parts ची subcontracts देऊन फक्त जोडणी स्वत:च्या factory मध्ये केली. ज्यामुळे केवळ ३ दिवसात सर्व जोडणी करून विमान तयार करता येऊ लागले.

केवळ airlines साठीच नाही तर प्रवाशांसाठीपण ह्या विमानात बरेच बदल करण्यात आले आहेत. ह्या विमानाच्या आत त्याच्या श्रेणीमधील इतर सर्व विमानांपेक्षा जास्ती जागा आहे. खिडक्या मोठ्या व थोड्या अधिक उंचीवर आहेत तसेच smart आहेत. ज्यामुळे बाहेरील सूर्यप्रकाश डोळ्यावर येत असल्यास automatic dim होऊन तुम्हाला बाहेरचे बघता येते पण प्रकाशाचा त्रास होत नाही. नवीन engines बरीच कमी आवाज करणारी आहेत तसेच sound proofing मधील काही नवीन पद्धतींच्या वापरणे विमानाच्या आत engine noise खूप कमी येतो.

असो थोडासा धागा हायजॅक केलाच आहे. अधिक होण्याच्या भयाने इथेच थांबतो.

दोन्ही प्रतिसादांमधील बहुतांश माहिती विकीवरून साभार.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Nov 2011 - 5:46 pm | निनाद मुक्काम प...

लंबू टांग तांत्रिक माहिती देऊन मुद्दा स्पष्ट केल्याबद्दल आभार

तुम्ही दीलेली माहिती महत्वपूर्ण आहे. प्रदीप ह्यांचे शंका निरसन झालेच असेल. पण त्यांनी जी अपडेटेड माहिती दिली आहे. ७८७ संबंधी त्याबद्दल मला सुद्धा कल्पना नव्हती. मात्र येथील प्रसार माध्यमांनी त्याबाबत माहिती दिली नाही अथवा आपल्या पेपरात सुद्धा वाचले नव्हते. आपण दोघांनी ही लेखाला पूरक माहिती दिली आहे.

लेख जरी सुपर जंबो विमानाविषयी असला तरी त्या निमित्ताने अनेक विमान शेत्राशी निगडीत अनेक मुद्यांना स्पर्श झाला आहे. व त्यांने लेखाचा उद्देश सफल झाला असे मला वाटते.( धागा हाय जेक झाला असे मी ह्यापूर्वी ही कधी बोललो नव्हतो किंवा भविष्यात बोलणार नाही. ) त्यामुळे आपण बिनधास्त पणे माहिती द्यावी.

आणी ह्या विषयांवर अगर आंतरराष्ट्रीय मुद्यावर चर्चा अगर लेख लिहितांना विकी आणी कधीकाळी वाचलेल्या अनेक साईट मी परत एकदा वाचतो नी मगच लिहितो. कारण ह्यामागे उद्देश असा की एका साईट वर वाचलेला मुद्दा दोन तीन ठिकाणी क्रॉस रेफ्रेंस केलेला कधीही चांगला. एरबस चे अनेक वरिष्ठ अधिकारी आमच्या हॉटेलात वास्तव्याला असतात. त्यांचा बोलण्यातून सदर विमान बोईंग ला उत्तर व ७४७ ला प्रतिउत्तर म्हणून बनवल्याचे कळले होते. एकाच वेळी ५०० ते ८०० प्रवासी कवेत घेऊन आकाशात उडणे ही कल्पना रोमांचित करते. प्रदीप ह्यांनी भाववाढीचे अजून एक कारण दिले आहे .त्याची मला कल्पना होती.

म्हणून मी आधीच एका प्रतिसादात म्हटले होते की भाव वाढ कमी जरी नाही झाली तरी प्रवाशांना सोयी आणी दर्जात्मक प्रवास लाभेल.
येथे भारताने लुफ्तांजाला प्रवेश नाकारण्याचे एक अजून कारण दिसून येईन ( तसा शंकेस वाव आहे)