मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
9 Oct 2011 - 2:22 pm

मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या

काळजी घ्या काळजी घ्या मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या
काळजी घ्या काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या
चौकीदार नाही त्या रेल्वेफाटकावर काळजी घ्या ||धृ||

नका भानात वाहन चालवू
नका जरा तेथे कधी थांबू
दिसली नाही आगगाडी जरी
जरा वेगात चलावं रुळावरी
सांगतो तुम्हा काळजीनं पुन्हा
दोन्ही बाजूला डोळे उघडून पहा ||१||

लाल सिग्नल तुम्हा नाही दिसला
जरी हिरवा दिवा लागलेला नसला
नका घालू तुम्ही तेथे तुमची गाडी
घातली तर होतील बारा भानगडी
अपघात होईल जीव तुमचा जाईल
कशाला मध्यरेल्वेला धडकता? ||२||

दोन्ही बाजूला तुम्ही पहा
आजूबाजूचा कानोसा घ्या
रेल्वेगाडीची शिट्टी ऐका
त्याशिवाय पुढे जावू नका
सुरक्षेचा हा मंत्र ध्यानी ठेवूनी
मध्यरेल्वेचा नियम तुम्ही पाळा ||३||

काळजी घ्या काळजी घ्या मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या
काळजी घ्या काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या
चौकीदार नाही त्या रेल्वेफाटकावर काळजी घ्या ||धृ||

मध्यरेल्वेसाठी जनहितार्थ प्रकाशीत

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०९/१०/२०११

प्रवासकविताजीवनमानतंत्र

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

9 Oct 2011 - 3:42 pm | अविनाशकुलकर्णी

मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या

वाहीदा's picture

9 Oct 2011 - 8:52 pm | वाहीदा

त्यात बसलेल्या ड्रायव्हर ला तरी पुढचे रुळ दिसत आहेत का ?

पैसा's picture

10 Oct 2011 - 10:29 am | पैसा

ही मुंबईतली मध्य रेल्वे वाटत नाही. फेव्हिकोलची जाहिरात नाही ना?

किसन शिंदे's picture

10 Oct 2011 - 10:42 am | किसन शिंदे

हि मध्य रेल्वे मुळीच नाहीये, एवढा जास्त आगाऊपणा मध्य रेल्वेचे प्रवासी कधीच करत नाहीत.

काय हो कुलकर्णी, मध्य रेल्वेच्या नावावर कोणत्याही ऐर्‍यागैर्‍या आगगाडीचे फोटो खपवताय का?

जरी वरील फोटो मध्यरेल्वेचा नसला तरी तो भारतीय रेल्वेचा निश्चितच वाटतो आहे कारण बांग्लादेश रेल्वेपेक्षा थोडी गर्दी कमी दिसते आहे!

पुषठ्यर्थ हे पहा:

A crowded train in Bangladesh on Dual Gauge track

Passengers crowd atop a train at a railway station in the Bangladeshi capital Dhaka on September 20, 2009.
Passengers crowd atop a train at a railway station in the Bangladeshi capital Dhaka on September 20, 2009.

अवांतरः तरीही वरील सर्व फोटो या कवितेच्या दृष्टीने अनाठायी वाटत आहेत. खालील फोटो समर्पक आहेत.



फोटोसौजन्यः आंतरजाळं

अत्रुप्त आत्मा's picture

9 Oct 2011 - 4:38 pm | अत्रुप्त आत्मा

पा. भे. हे गाणं दुरदर्शनकडे पाठवलं की नाही...? :-)

@अविनाश कुलकर्णी> चित्र ''भारी''च जड टाकलत बाकी ... ;-)

पप्पु अंकल's picture

10 Oct 2011 - 10:17 am | पप्पु अंकल

आणी शेवटच जनहितार्थ जाम भारी

मितभाषी's picture

10 Oct 2011 - 2:43 pm | मितभाषी

लाल सिग्नल तुम्हा नाही दिसला
जरी हिरवा दिवा लागलेला नसला
नका घालू तुम्ही तेथे तुमची गाडी
घातली तर होतील बारा भानगडी
अपघात होईल जीव तुमचा जाईल
कशाला मध्यरेल्वेला धडकता? ||२||

हाहाहा =)) =))

आयला दादाने अभंग म्हणला तरी हसु आल्याशिवाय रहाणार नाही.
पाभे वंदन तुमच्या प्रतिभेला........

आयला दादाने अभंग म्हणला तरी हसु आल्याशिवाय रहाणार नाही.

अगदी अगदी! पाभे, गाणं मस्त लिहिलंय..

प.रे. च्या "क्रॉसिंगसाठी पूल वापरा" हा संदेश देणार्‍या गाण्या*ची आठवण झाली. नक्कीच पाठवून द्या मध्य रेल्वेकडेच.. कुणी पंडित सिद्धेस्वरकुमार दुबे वगैरे एक सुंदर चाल लावेल आणि तुमचंही गाणं स्टेशनांवर वाजू लागेल!

* प. रे. चं गाणं -

"घर पर कोई अपना है जो आपसे करता बेहद प्यार
रोज शाम को करता है जो आपका घरपर इंतजार
रेल की पटरी .. <टडंगंडंग टडंग> पार ना करे, पुलों का करे इस्तमाल
आप रहेंगे सदा सुरक्षित और हमेशा ही खुशहाल"

व्हिडिओ मिळाल्यास मागाहून अपलोड करणेत येईल! ;)