फेस बुक लावणी

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
7 Oct 2011 - 5:32 pm

फेस बुक मधे मी खात काढलय,बघा ना राया
माझी मैत्रीची रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट ना राया..
रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ..

तुमच्या खात्यावर पोरिंची गर्दी लई भारी
माधुरी,प्रिति,प्रियंकाची त~हा लई नारी
मला बी तुमच्या मंदी घ्या ना राया
रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ..

अल्बम मधे म्या छान छान फोट बी लावलय.
नथ घालुन, नऊवारी नेसुन छानशी सजलेय
तुमची माधुरी,प्रिति,प्रियंका जळेल राया
रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ..

रोज रोज स्टेटस मी अप डेट करीन
छान सुंदर फोटु मी अप लोड करीन
बघुन सार ,पारण फिटेल हो राया
रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ..

तुमा संग रातच्याला चॅटींग करायचय
पहाट पत्तुर लॉग आऊट नाहि व्ह्यायचय
विचारनच माझी झोप उडाली हो राया
रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ..

मिळुन दोघ आपण एक कम्युनिटी काढु
प्रेमाच्या छान छान कविता बी लिहु.
फेसबुक गुलाबी करु यात ना राया
रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ..

अविनाश

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

चेतन सुभाष गुगळे's picture

7 Oct 2011 - 11:12 pm | चेतन सुभाष गुगळे

आधी http://facebook.com/CHETANGUGALE इथे request टाका तर खरं, लगेच accept करून टाकतो.

प्रकाश१११'s picture

7 Oct 2011 - 11:18 pm | प्रकाश१११

झकास ..!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Oct 2011 - 11:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मालक, लावणीत मला कै मजा नै आली पण तुम्ही आपलं लिहित राहा.

अवांतर : अविनाशसेठ, आमच्याकडे यावेळेस नवरात्र उत्सवात विश्व अप्सरा हा लावण्यांचा बहारदार कार्यक्रम झाला. शिवानी जाधव काही लावण्यांवर अशा बहारदार नृत्य करतात की विचारु नका. सोडा सोडा राया हा नाद खुळा या लावणीवर तर आम्ही फक्त फेटे उड्वले नाहीत. :)

आपण ऐकली आहे ना ही लावणी.

-दिलीप बिरुटे

तुम्ही दुवा दिलेली लावणी आम्ही ऐकली. एकदम नादखुळा झालो. बीट्स मस्त वाजतात. पण व्हीडीओमध्ये काही चेहरे पाहून हसू आवरणं अवघड झालं.

असो, प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या वेगळी असते. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Oct 2011 - 5:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>तुम्ही दुवा दिलेली लावणी आम्ही ऐकली. एकदम नादखुळा झालो. बीट्स मस्त वाजतात.
धन्स.

>>>> पण व्हीडीओमध्ये काही चेहरे पाहून हसू आवरणं अवघड झालं.
अस्सचं :)

नाद खुळा ची लिंक सापडेना तेव्हा ऐकायला म्हणून दुवा दिला. व्हिडियोतले चित्र बघा असे मी कुठे म्हणालो....!!!

ABCD0001
[शिवानी] शिवानी एमपीएससीची परीक्षा दोनदा पास झाली म्हणतात.

धन्या's picture

8 Oct 2011 - 9:22 am | धन्या

खरंच छान प्रयत्न. परंतू तितकीशी मजा नाही आली.

आमच्या सातपूर यमाडीशीकर कवी पाषाणभेद उर्फ दगडफोडया (वा, काय नाव आहे कवीचे) यांच्याकडून टीप्स घेणे.

(भांडूप पश्चिम टेंभीपाडा येथे गटारावर उभा राहून या रावजी, बसा भावजी लावणी पाहून घायाळ झालेला)
धनाजीराव वाकडे

अविनाशकुलकर्णी's picture

8 Oct 2011 - 5:06 pm | अविनाशकुलकर्णी

खरंच छान प्रयत्न. परंतू तितकीशी मजा नाही आली.

मान्य..परत वाचल्यावर मला हि जाणवल...
सुधारु..