नव्या संपादकांचे अभिनंदन

क्रेमर's picture
क्रेमर in जनातलं, मनातलं
5 Oct 2011 - 7:18 pm

मालकांनी संपादनमंडळात केलेल्या बदलांबद्दलची घोषणा वाचनात आली. त्यात काही नव्या संपादकांची नावे दिसली. गणपा आणि पैसा हे मला निश्चितपणे माहीत असलेले नवे संपादक आहेत. घोषणेचा धागा वाचनमात्र असल्याने नव्या संपादकांचे अभिनंदन करता येत नाही. गणपा हे मला सदस्य म्हणून त्यांच्या अप्रतिम पाककृतींबद्दल माहीत आहेत. पैसा यांच्या लेखनाशी फारसा परिचय नसला तरी त्यांच्या प्रतिसादांतून त्यांची संयत भुमिका वेळोवेळी दिसलेली आहे. या दोन्ही सदस्यांवर संपादनाची नव्या जबाबदारीचे ओझे पडले असले तरी त्यांच्या मिपावरील आदर्श वावराचाही याद्वारे सन्मान केला गेला आहे. दोन्ही सदस्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या संपादकिय कारकिर्दीसाठी हार्दीक शुभेच्छा. नवे तांत्रिक सल्लागार प्रशांत यांचेही अभिनंदन व शुभेच्छा. धन्यवाद.

धोरणवावरइतिहाससद्भावनाशुभेच्छाअभिनंदनबातमी

प्रतिक्रिया

क्रेमर's picture

5 Oct 2011 - 7:24 pm | क्रेमर

त्यात काही नव्या संपादकांची नावे दिसली.

'काही' हे ''दोन' असे वाचावे.

गणपा हे मला सदस्य म्हणून त्यांच्या अप्रतिम पाककृतींबद्दल माहीत आहेत.

'पाककृतींबद्दल' हे 'पाककृतींमुळे' असे वाचावे.

या दोन्ही सदस्यांवर संपादनाची नव्या जबाबदारीचे ओझे ...

'संपादनाची' हे 'संपादनाच्या' असे वाचावे.

सात पैकी दोघांचेच अभिनंदन का?
खरंतर सगळ्यांचेच अभिनंदन करायला हवे. नवे संपादक असोत किंवा जुने असोत, स्वतःचे व्याप सांभाळून इथे जातीने लक्ष घालणे आणि कचरा साफ करणे जबाबदारीचेच काम आहे. तेव्हा ह्या कामासाठी सगळ्यांना शुभेच्छा!

क्रेमर's picture

5 Oct 2011 - 7:41 pm | क्रेमर

सात पैकी दोघांचेच अभिनंदन का?

इतरांचे आधी झालेले आहे म्हणून पुन्हा करत बसलो नाही.

नवे संपादक असोत किंवा जुने असोत, स्वतःचे व्याप सांभाळून इथे जातीने लक्ष घालणे आणि कचरा साफ करणे जबाबदारीचेच काम आहे. तेव्हा ह्या कामासाठी सगळ्यांना शुभेच्छा!

सहमत आहे. सगळे व्याप सांभाळून, विनामोबदला प्रसंगी नोकरी-धंद्याची कामे धाब्यावर बसवून संपादक काम करतात याचे मी आधीही कौतुक केलेले आहे. तुमच्यासारख्या सदस्यांच्या सद्भावना हाच त्यांचा परतावा आहे.

आण्णा चिंबोरी's picture

5 Oct 2011 - 9:03 pm | आण्णा चिंबोरी

सहमत आहे. सगळे व्याप सांभाळून, विनामोबदला प्रसंगी नोकरी-धंद्याची कामे धाब्यावर बसवून संपादक काम करतात याचे मी आधीही कौतुक केलेले आहे. तुमच्यासारख्या सदस्यांच्या सद्भावना हाच त्यांचा परतावा आहे.

+१
_________
|| संपादकांची कृपा ||

चिरोटा's picture

5 Oct 2011 - 7:28 pm | चिरोटा

नव्या संपादकांचे अभिनंदन. हा धागा आणि वरील एराटा टाकल्याबद्दल क्रेमर ह्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.

क्रेमर's picture

5 Oct 2011 - 7:58 pm | क्रेमर

धन्यवाद!

प्रचेतस's picture

5 Oct 2011 - 7:34 pm | प्रचेतस

सर्व संपादक व सल्लागार मंडळाचे अभिनंदन.

पैसा's picture

5 Oct 2011 - 7:48 pm | पैसा

क्रेमर, धन्यवाद! आणि इतर सर्वांनाही धन्यवाद!

धन्यवाद मंडळी.
सर्वांकडुन सहकार्याची अपेक्षा करतोय. :)

आत्मशून्य's picture

5 Oct 2011 - 8:02 pm | आत्मशून्य

सर्वांच्चच, आणि माझ्या खोड्या संभाळून घ्या ही विनंती सूध्दा... ;)

मदनबाण's picture

5 Oct 2011 - 8:02 pm | मदनबाण

संपादक मंडाळातील सर्व सदस्यांचे अभिनंदन ! :)
गणपाशेठ आणि पैसा ताईचे विशेष अभिनंदन ! :)

राजेश घासकडवी's picture

5 Oct 2011 - 8:12 pm | राजेश घासकडवी

संपादक मंडाळातील सर्व सदस्यांचे अभिनंदन !
गणपाशेठ आणि पैसा ताईचे विशेष अभिनंदन !

सहमत.

Nile's picture

5 Oct 2011 - 8:03 pm | Nile

सवयीने नीलकांतचा धागा म्हणजे माझ्यावरच कारवाई की काय या भितीने तो धागा आधी उघडला आणि प्रतिसाद देऊन बसलो!

तरी पुनश्चः, नविन संपादक आणि सल्लागार मंडळाचे अभिनंदन. गाठीभेटी होतच राहतील.. हॅ हॅ हॅ. ;-)

आणि हो, निवृत्त झालेल्या अन माणसात आलेल्या माजी संपादकांचेपण अभिनंदन. ;-)

क्रेमर यांनी अभिनंदन कराव्यास पीठ दिल्याने त्यांचे आभार. ;-)

नविन संपादकांचे मनापासुन अभिनंदन...

सभासद आणि संपादक अशी दुहिरी भुमिका येथे संभाळण्यासाठी मनापासुन शुभेच्छा ..

जाता जाता.. जुन्या संपादकांचे ही आभार

अरे वा!! आजच कळलं.

गणपा भाऊ व पैसा या दोघांचेही अभिनंदन!!
योग्य निवड.

अवांतरः गणपा भाऊ संपादनाच्या नादात पाकृ बंद पडू नयेत हीच इच्छा! ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2011 - 8:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पैसाताईनेही गोवा मालिकेसारखे सुंदर लिखाण करत रहावे अशी सदिच्छा.

गुड लक फ्रेंड्स.

शिल्पा ब's picture

5 Oct 2011 - 8:22 pm | शिल्पा ब

सगळ्या नविन संपादकांचे अभिनंदन. दोन नावं समजली बाकीचे कोण आहेत तेसुद्धा (शोधुन)इथेच लिहा.

रेवती's picture

5 Oct 2011 - 8:31 pm | रेवती

तै, घोषणा केलिये.

शिल्पा ब's picture

5 Oct 2011 - 8:51 pm | शिल्पा ब

हो, बघितली आत्ताच. दुसर्‍या धाग्यावर अनामिकांनी पण लिंकावलं होतं.

मुक्तसुनीत's picture

5 Oct 2011 - 8:49 pm | मुक्तसुनीत

मिसळपाववरील सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा.

आण्णा चिंबोरी's picture

5 Oct 2011 - 9:02 pm | आण्णा चिंबोरी

सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा

|| संपादकांची कृपा ||

आतातरी जबाबदारीतून मुक्त झालेल्या संपादकांनी उत्तमोत्तम लेख लिहायला परत सुरु करावे.

विशाखा राऊत's picture

5 Oct 2011 - 9:48 pm | विशाखा राऊत

नवीन संपादकांचे अभिनंदन

प्रीत-मोहर's picture

5 Oct 2011 - 10:07 pm | प्रीत-मोहर

अभिनंदन गणपा आणी पैसाताय :)

अविनाशकुलकर्णी's picture

5 Oct 2011 - 11:12 pm | अविनाशकुलकर्णी

सर्व संपादक व सल्लागार मंडळाचे अभिनंदन.

धनंजय's picture

5 Oct 2011 - 11:19 pm | धनंजय

दुव्यावरील यादी ही संपूर्ण संपादकमंडळाची आहे काय?
(म्हणजे जुनी यादी रद्द आणि दुव्यावरील यादी ही पूर्ण मानायची, की जुन्या यादीला ही नवीन यादी पुरवणी म्हणून मानायची?)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2011 - 11:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> दुव्यावरील यादी ही संपूर्ण संपादकमंडळाची आहे काय?
होय.

>>> म्हणजे जुनी यादी रद्द
होय.

-दिलीप बिरुटे

नवीन स्थापन मंडळाचे हार्दिक अभिनंदन.
पण अजून बरेच प्रश्न आहेत मनात.(किस्को पुछे)
तूर्तास पुन्हा एकदा अभिनंदन.

क्रेमर's picture

5 Oct 2011 - 11:35 pm | क्रेमर

माहीत नाही. मालकच अधिक आधिकारीक प्रकाश टाकू शकतील.

विकास's picture

5 Oct 2011 - 11:40 pm | विकास

मिसळपावच्या नवीन संपादक मंडळाची घोषणा करण्यात येत आहे.

या वाक्यात नवीन संपादक मंडळाची घोषणा केली आहे, नवीन संपादकांची नाही. त्यामुळे बहुदा नवीन यादीत नाव नसलेले आधीचे संपादक माजी झाले असावेत. ;)

धनंजय's picture

6 Oct 2011 - 1:57 am | धनंजय

आजी-माजींचे अभिनंदन!

क्रेमर's picture

6 Oct 2011 - 2:06 am | क्रेमर

'बाकी जाऊ द्या. पहिल्यांदा अभिनंदन करा.' असे लिहिणार तेवढ्यात तुमचा प्रतिसाद आला.

मुक्तसुनीत's picture

6 Oct 2011 - 2:09 am | मुक्तसुनीत

आजी-माजी या शब्दांशी अनुप्रास जुळणारे आणखी एक विशेषण आठवून गेले ;-)

विकास's picture

6 Oct 2011 - 3:03 am | विकास

आजी-माजी या शब्दांशी अनुप्रास जुळणारे आणखी एक विशेषण आठवून गेले

ते इतर. ;) (आता पळ काढतो!)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2011 - 3:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

होय होय. ;-)

सन्जोप राव's picture

6 Oct 2011 - 5:39 am | सन्जोप राव

मलाही आठवले, दाजी!

चतुरंग's picture

6 Oct 2011 - 6:35 pm | चतुरंग

'आहा पाजी, कितीतरी पाजी ज्ञानामृत सगळ्यांला!' हे चिंविंचं वाक्य आठवलं! ;)

(चिमणरावांचा फ्यान) रंगापाजी

चला बरं झालं आता आपल्या वह्या तपासणारे नविन मॉनिटर आले, बरं झालं . सगळ्यांचं अभिनंदन.

माझीही शॅम्पेन's picture

5 Oct 2011 - 11:42 pm | माझीही शॅम्पेन

गणपा शेठ आणि पैसा ताई तुम्हा दोघांच हार्दिक अभिनंदन !!!

नंदन's picture

5 Oct 2011 - 11:43 pm | नंदन

नूतन संपादकांचे आणि सल्लागार मंडळाचे हार्दिक अभिनंदन!

मोहनराव's picture

5 Oct 2011 - 11:51 pm | मोहनराव

संपादक मंडळीं व सल्लागार लोकांचे अभिनंदन!!

इंटरनेटस्नेही's picture

5 Oct 2011 - 11:56 pm | इंटरनेटस्नेही

नूतन संपादकांचे आणि सल्लागार मंडळाचे हार्दिक अभिनंदन!

सुहास झेले's picture

6 Oct 2011 - 3:14 am | सुहास झेले

नवीन संपादकांचे अभिनंदन !!

पाषाणभेद's picture

6 Oct 2011 - 9:14 am | पाषाणभेद

हॅ हॅ हॅ मला कोणी 'संपादक होणार का?' म्हणून विचारले तर आपण तर नकार देणार बाबा. संपादक झालो तर लिखाण कोण करणार? उगाच त्या तेंडल्यासारखे व्हायचे- कॅप्टन झाल्यावर प्रेशर अन परफॉरमन्स डाऊन.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

पैसा's picture

6 Oct 2011 - 9:30 am | पैसा

इथे कोण विजेते नाहीत पाभे! पायजे तर बळीचे बकरे म्हणा हवं तर! ;) सीरीयसली, सगळ्यानी जर समजुतीने घेतलं तर संपादकसुद्धा काही लेखन करू शकतील.

श्री गावसेना प्रमुख's picture

6 Oct 2011 - 9:34 am | श्री गावसेना प्रमुख

घराणेशाही झिदांबाद(आता मजकुरापेक्षा संपादकीयच जास्त(यव्हढे कह्याले लागते हो संपादक)आमचे नीळकंठ सगल्याहींले पुरुन उरले अन नीलकांत थकले

क्रेमर's picture

6 Oct 2011 - 8:45 pm | क्रेमर

(यव्हढे कह्याले लागते हो संपादक)

येथे जुनी यादी पहा. सोळा-सतरा होते. संपादक फक्त संपादनासाठी असतात असा तुमचा गैरसमज होऊ देऊ नका.

श्यामल's picture

6 Oct 2011 - 6:32 pm | श्यामल

नूतन संपादक मंडळाचे आणि सल्लागार मंडळाचे हार्दिक अभिनंदन !

जल्ला मना जुन्या मंडलात कोन मंडली हुती आनि ह्या नव्या मंडलात कोन मंडली हायत, आनी ती कशी हायत ह्ये कायव
म्हाईत नाय ! मी कोनालाच वलखत नाय. .............. कोनाच्या बाजुन कोन लिवित हुतं न कोन कोनाच्या ईरुध लिवित हुतं मना काय बी कललं नाय. कोन कुटच्या गुरुपात हाय ते मना कधीच कललं नाय. आनि मना कदी ते समजुन घ्याव आस पन वाटलं नाय. जे वाचावंसं वाटलं (मंग ते कोनीपन लिवलेलं आसुंदे) ते मी वाचलं न ते माज्या भेजात शिरलं, मना आवाडलं तेच्यावर मी पर्तिसाद लिवला. जे नाय आवाडलं तेला "जल्ला ह्याचा म्होरां, करपाटलां कालीज !" असा मनातल्या मनात बोलुन पर्तिसाद न देता पुढंच्या वाटंला लागले......हाय काय नाय काय ?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Oct 2011 - 7:16 pm | विश्वनाथ मेहेंदळे

सर्व नवे जुने आणि निवृत्त संपादक, नवीन सल्लागार मंडळ आणि तांत्रिक मंडळ यांचे अभिनंदन, शुभेच्छा आणि आभार :-)

नविन संपादक मंडळाचे मनापासून अभिनंदन! सल्लागार मंडळाचेही अभिनंदन.
आणि सर्व संपादक आणि सल्लागार यांना शुभेच्छा!
मिपा सदस्य म्हणून नेहमीच सहकार्य करत राहीन.
:)

गणपा शेठ आणि पैसा ताई तुम्हा दोघांच हार्दिक अभिनंदन !!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Oct 2011 - 7:34 pm | निनाद मुक्काम प...

व्यक्ती महत्वाचा नाही ,पद महत्वाचे
पदाचा मान हा राखल्या गेला पाहिजे हे माझे पूर्वीपासून मत होते .
नवीन संपादक मंडळाचे अभिनंदन .
एक मिपाकर म्हणून माझ्याकडून तुम्हाला नेहमीच सहकार्य मिळेल.

संपादक हा आपल्यासारखाच एक मिपाकर असून त्याच्या दैनंदिन जीवनातील ताणताणाव व नेहमीच्या रहाटगाड्यातून तो ही विनामूल्य सेवा मराठीच्या आणी मराठी माणसाच्या प्रेमाखातर करत आहे ह्याची मला पूर्ण पणे जाणीव आहे

.म्हणूनच आजी व माजी संपादक मंडळाचे निर्णय पाळण्यात मी कोणतीही कसूर कधी ठेवली नाही व भविष्यात ठेवणार नाही .