काही रेखाचित्रे

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in कलादालन
20 Sep 2011 - 3:54 pm

मिपावर दुसर्‍याचे लेखन प्रकाशित करायचा प्रघात नाही हे माहिती आहे. परंतु माझ्या भावानेच काढलेली असल्यामुळे त्याची काही स्केचेस इथे डकवतो आहे. यातले एकही स्केच माझे (म्हणजे मी काढलेले ;) ) नाही. सगळी चित्रे माझ्या भावाने काढलेली आहेत. बाकी फारसे काही लिहिण्यासारखे नाही आहे. त्यामुळे चित्रेच डकवतो. दे आर सेल्फ एक्स्प्लॅनेटरी :) :

असेच दोन जीवाभावाचे छोटुकले मित्र

काही इमारती

चार्ली

जॅकी चॅन

स्टॅलोन

चिमणराव (सिरीयल मधले)

अशीच एक उदास मुलगी

कलारेखाटन

प्रतिक्रिया

पियुशा's picture

20 Sep 2011 - 4:11 pm | पियुशा

मस्त आहेत रेखाट्न
:)

श्रावण मोडक's picture

20 Sep 2011 - 4:15 pm | श्रावण मोडक

छोटुकले आणि चार्ली आवडला.

मस्तच आलीयेत स्केचेस
चार्ली ,स्टॅलोन भन्नाट जमलीयेत

परिकथेतील राजकुमार's picture

20 Sep 2011 - 4:41 pm | परिकथेतील राजकुमार

सर्व चित्रे बघताक्षणीच आवडली.

दिडशहाणे आता अकलेचे तारे तोडतीलच; तोवर प्रतिसाद देऊन घेतला ;)

मृत्युन्जय's picture

20 Sep 2011 - 4:46 pm | मृत्युन्जय

तुला नक्की काय धोका दिसला बाबा? आता सगळ्या चित्रातल्या बाया बाप्यांनी कपडे घातले आहेत म्हणुन आक्षेप असेल तर गोष्ट वेगळी. त्याला मी काही करु शकत नाही. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

20 Sep 2011 - 5:08 pm | परिकथेतील राजकुमार

तुला नक्की काय धोका दिसला बाबा?

अमक्या चेहर्‍यावरील तमके भाव निट आले नाहीत, किंवा अमक्या चित्रातलील तमक्याचा चेहरा दुसर्‍याच कोणासारखा दिसतो, भावाचे वय काय आहे ?, चित्रे ऐकाच बैठकीत काढली आहेत का हो ?

असल्या प्रतिसादांची मला फार्फार धास्ती वाटते :P

आता सगळ्या चित्रातल्या बाया बाप्यांनी कपडे घातले आहेत म्हणुन आक्षेप असेल तर गोष्ट वेगळी.

+१
कपड्यांमुळे ही सर्व चित्रे कोणा मागास संस्कृतीच्या देवभोळ्या पुरस्कर्त्याने काढल्याचे स्पष्ट जाणवत आहे.

मृत्युन्जय's picture

20 Sep 2011 - 5:55 pm | मृत्युन्जय

मागास संस्कृतीच्या देवभोळ्या पुरस्कर्त्याने

अगदी अगदी. शिवाय कलेची जाण नसणारा असेही म्हणु शकतोस वाटल्यास ;)

श्यामल's picture

20 Sep 2011 - 4:59 pm | श्यामल

वाव्व ! प्रत्येक स्केच अवर्णनीय !! सर्व स्केचेस खूप आवडली !!!!!!!!! :smile:

मृत्युन्जय, मला चित्रकलेतलेच काय कुठल्याच कलेतले काहीही कळत नाही. तांत्रिक दृष्ट्या काय बरोबर काय चूक यातले ओ का ठो कळत नाही. पण ज्या कलेचा अविष्कार मनाला भावतो, काळजाचा ठाव घेतो त्या आनंददायी अविष्काराचे कौतुक करायला मला मनापासून आवडते.

वरील सुंदर स्केचेसबद्दल तुमच्या भावाचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा ! :smile:

प्रचेतस's picture

20 Sep 2011 - 5:01 pm | प्रचेतस

अतिशय सुंदर रेखाचित्रे.

जाई.'s picture

20 Sep 2011 - 5:41 pm | जाई.

उत्तम स्केचेस
पहिले व चाँर्ली चँप्लीनचे स्केचेस विशेष आवडले

सुहास झेले's picture

20 Sep 2011 - 6:07 pm | सुहास झेले

मस्त.... सगळी स्केचेस आवडली !!!

मदनबाण's picture

20 Sep 2011 - 7:53 pm | मदनबाण

सुंदर... :)

(कला प्रेमी) :)

स्मिता.'s picture

20 Sep 2011 - 8:11 pm | स्मिता.

सर्व रेखाचित्रे खूप आवडली. चार्ली आणि शेवटची मुलगी तर अफाटाच!

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2011 - 8:26 pm | प्रभाकर पेठकर

चित्रकलेतील माझे प्राविण्य लक्षात घेता वरील सर्व रेखाचित्रे मला तरी फार-फार उच्च दर्जाची वाटली. अभिनंदन.

तुमच्या भावाला (सागर ना त्याचं नाव?) माझ्याकडून खूप शुभेच्छा! मला चित्रकलेतला स्केचेस हाच प्रकार सगळ्यात आवडतो. चित्रातलं वैविध्य पाहून खूप छान वाटलं. तो छंद म्हणून काढतोय, की चित्रकला शिकतोय माहिती नाही, पण त्याला सांगा, हातातली कला सोडून देऊ नको.

मृत्युन्जय's picture

20 Sep 2011 - 9:43 pm | मृत्युन्जय

हो सागरच. इंजिनियर आहे एरवी पण चित्रे खुपच चांगली काढतो. बर्‍याच आधीपासुन. चित्रकलेचे शास्त्रोक्त शिक्षणा असे नाही घेतलेले त्याने पण हातात कला आहे (आमच्या अंगात कळा आहेत ;) )

राघव's picture

20 Sep 2011 - 9:23 pm | राघव

खूप सुंदर रेखाटने! आवडेश..
पण मला शेवटची २ व जॅकी चेन चे रेखाटन दिसत नाहीये.. :(

राघव

आशु जोग's picture

20 Sep 2011 - 9:50 pm | आशु जोग

आवडली चित्रे सर्वात पहिले अधिकच

>> सगळी चित्रे माझ्या भावाने काढलेली आहेत

त्यांनाही सदश्य व्हायला सांगा

राजेश घासकडवी's picture

20 Sep 2011 - 9:53 pm | राजेश घासकडवी

क्र. २ आणि चार्लीची विशेष आवडली.

पिवळा डांबिस's picture

20 Sep 2011 - 10:25 pm | पिवळा डांबिस

इन जनरल, चित्रे आवडली.
पहिलं चित्रं, जीवाभावाचे छोटुकले मित्र, हे सगळ्यात आवडलं....
जॅकी चॅन हे सगळ्यात नावडलं. चित्रातली व्यक्ती जॅकी चॅनपेक्षा (मला) निराळी दिसली....
एक सूचना: चि. वि. जोशींचं म्हणून जे चित्र आहे त्याचं कॅप्शन बदलता आलं तर बघा. ते चित्रं चिं वि जोशींचं नाहीये. ते त्यांच्या प्रभावळकरांनी सिरियलमध्ये रेखित केलेल्या "चिमणराव" या कॅरेक्टरचं आहे. मी चिं वि जोशीचा फोटो पाहिलेला आहे. ते प्रत्यक्षात दिसायला वेगळे होते. चूभूद्याघ्या...
तुमच्या भावाला हार्दिक शुभेच्छा!!

पाषाणभेद's picture

21 Sep 2011 - 12:19 am | पाषाणभेद

पिडाकाका, चित्रं आवडली असं म्हणायचं का?

चित्रे काकू आता गुप्ते काकू झाल्यात म्हणून म्हटलं.

अन चित्रं फार मस्त आहेत.

मृत्युन्जय's picture

21 Sep 2011 - 10:01 am | मृत्युन्जय

बदल केल्या गेलेल्या आहे.

स्वानन्द's picture

20 Sep 2011 - 10:53 pm | स्वानन्द

सग्गळी चित्रे एकदम खासंखास!!

अत्रुप्त आत्मा's picture

21 Sep 2011 - 12:12 am | अत्रुप्त आत्मा

आह्हा: पहिल चित्र एकदम गो..गोड्ड आहे ,,बाकीची पण छान आहेत

मिसळपाव's picture

21 Sep 2011 - 12:20 am | मिसळपाव

चित्रकलेचं शास्त्रोक्त शिक्षण वगैरे न घेता? देव या कला वाटत होता तेव्हा कुठे लक्ष होतं माझं देवच जाणे!

उदास मुलीच्या चित्रात, डावीकडे (तिच्या डोळ्यांच्या रेषेत) एक लहान मुलगी कमरेवर हात ठेउन उभी आहे का? वार्‍याने केस उजवीकडे झेपावताहेत. का हे माझ्या कल्पनेचे खेळ??

मृत्युन्जय's picture

21 Sep 2011 - 9:53 am | मृत्युन्जय

उदास मुलीच्या चित्रात, डावीकडे (तिच्या डोळ्यांच्या रेषेत) एक लहान मुलगी कमरेवर हात ठेउन उभी आहे का? वार्‍याने केस उजवीकडे झेपावताहेत. का हे माझ्या कल्पनेचे खेळ??

नाही ते तसेच आहे. ती मुलगी तिथे खरोखरीच आहे :)

५० फक्त's picture

21 Sep 2011 - 5:58 am | ५० फक्त

चित्रे मस्त आहेत, दुस-या चित्राने घोस्ट रिटर्नस्चा एक एपिसोड आठवला, शेवटचे दोन सैनिक सोडले तर जाम सोपा, पण शेवटचा स्नायपर वाला वेड लावतो,

प्रभो's picture

21 Sep 2011 - 6:33 am | प्रभो

मस्त!!

शिल्पा ब's picture

21 Sep 2011 - 9:09 am | शिल्पा ब

मस्त आहेत. खास करुन छोटे मित्र, चार्ली, चि.वि.. स्टॅलोन आणि जॅकी चॅन ओळखु येत नाहीत (मलातरी.) बाकी इतर सगळीच चित्रं मस्त.

इंटरनेटस्नेही's picture

22 Sep 2011 - 12:23 am | इंटरनेटस्नेही

मस्त चित्रे. आवडली.

आत्मशून्य's picture

22 Sep 2011 - 12:37 am | आत्मशून्य

जॅकी चॅन व स्टॅलोन बालपणीचे आयडॉल्स आहेत त्यामूळे त्यांची स्केचेस विषेश भावली... तसच "काही इमारती" खरचं सूरेख रेखाटलं आहे, चित्र म्हणून ते माझ्या नजरेत सर्वोत्तम वाटत आहे.

चित्रकलेतील पुढल्या प्रवासासाठी शिदोरी तयार आहे तुमच्या भावाकडे, आता जरा दिशा बदलून मार्गक्रमण केल्यास उत्तम.

त्रिमिती जगातील वस्तु, त्यांची द्विमित चित्रे वा फोटो बघून चित्रे रेखाटणे हा पहिला टप्पा उत्तम रीत्या अवगत झालेला आहे, आता समोरील प्रत्यक्ष वस्तू, व्यक्ती इ. बघून रेखाटन करणे, तसेच अगदी काल्पनिक विषय घेऊन ते रेखाटणे, असे करावे. त्यातही खूप आनंद येइल, आणि पर्स्पेक्टिव्ह वगैरे शिकण्याची गरज निर्माण होईल, त्यामुळे नवीन काही शिकण्यातील मौजही अनुभवायला मिळेल.
बाकी आणखी काही माहिती हवी असल्यास कळवा.
हे धागे सागर ने बघितले असतील असे समजतो:
http://misalpav.com/node/18741
http://misalpav.com/node/18587

मीनल's picture

22 Sep 2011 - 5:37 am | मीनल

खूप खूप छान !