फुलांची बाग - मी काढलेली काही फुलांची छायाचित्रे

मित्रांनो,

मी काढलेल्या छायाचित्रांचा एक स्लाईड शो टाकत आहे. लोड व्हायला थोडा वेळ लागेल पण खात्री आहे बघितल्यास निराशा होणार नाही. पहिल्य चित्रावर क्लिक केल्यास दोन त्रिकोण दिसतील. त्याच्यावर क्लिक केल्यास पुढचा फोटो दिसेल. अर्थात तुम्हाला हे माहिती असेलच.
:-)

निसर्गाचे उपकार ! दुसरे काय !

पुढच्या वेळेस पक्षांचे फोटो टाकण्याचा विचार आहे.

जयंत कुलकर्णी.

लेखनविषय:: 

प्रतिक्रिया

काहीच दिसत नाही

थोडा वेळ द्या त्याला !

तरीही दिसत नाही

प्रत्येक फोटो सुंदर आहे!
स्लाईड शोची आयडिया आवडली.

मला दिसले :)
हे हे भारिये
आवडेश :)

मला पण दिसले :)

मस्त आहेत..

सुरेख !

छान आहेत सगळे फोटो

अप्रतीम!!! छान आहेत फोटो !!!

मस्तच...

झेंडुची फुले खुपच टुमटूमीत दिसतात.

वाईट्ट्ट्ट, अतिब्येक्क्क्कार आलेत फटु... ;)

जेके क्लास्स्स्स्स्........!

उत्तम चित्रण. फुलांची नावे कळाली तर बरे होईल.मला फक्त झेंडू आणि गुलाब कळाले. :(

बाय द वे , क्यामेर्‍याबद्द्ल आणि इतर तांत्रिक माहिती द्यावी ही विनंती.

वाट पाहून पाहून पुतळा झाला पार पण फटू दिसेनात की हो :(

किती वेळ झाला एकच फूल आणि त्याच्या पाकळ्या ढिनच्याक ढिनच्याक करत आहेत.

आली .... आली.... चित्रे* आली....

खुबसुरतच आहेत एकदम. भन्नाट आवडली.

अवांतर :-

पुढच्या वेळेस पक्षांचे फोटो टाकण्याचा विचार आहे.

ह्यावरुन 'नाव-गाव-फळ-फुल-प्राणी-सिनेमा...' हे आठवले.

*चित्रे वरुन एकदम 'शाळा' आठवली, आणि शाळेवरुन केतकी माटेगावकर.

असो...

मला ही बराच वेळ थांबुन, तस काही दिसत नाहिये, प रा म्हणतो तसं होतय,पाकळ्या पडायला खुप वेळ जातोय :-) ,,,हे थोडस ग्रहणासारखं होतय,अमुक ठीकाणी दिसणार :-) तमुक ठिकाणी दिसणार नाही :-(

असो,,,अता रातच्याला आल्यावर बघू...

मला दिसले. बदामी आकाराचे फिके गुलाबी फुल (१७ वे) फार आवडले.

बदामी आकाराचे फिके गुलाबी फुल (१७ वे) फार आवडले.

शुचितै, तुम्ही फुले पाहत होतात की फुले मोजत होतात? आणि एव्हढी सारी फुले असताना त्यातले बदामी आकाराचे फुलच बरे नेमके आवडले ;)

मस्त आहेत !! आवडेश :)

ज्यांना चित्रे दिसली नाहीत त्यांनी डाव्या कोपर्‍यातील खालचे प्ले बटन दाबावे.

फोटो चांगले आले आहेत. काही फोटोत मात्र फोकस नीटसा जमला नाही असे दिसते. (डेप्थ ऑफ फिल्ड फारच नॅरो होती का?, की मॅन्युअल फोकस केला आहे). काही फोटोत मॅक्रो पेक्षा लांबून घेतलेले फोटो वाटत होतो, त्यापेक्षा मॅक्रोमोडमध्ये असते तर चांगले आले असते असे वाटते. तुमच्या कॅमेरामध्ये "ऑटम मोड" असल्यास तो वापरून फुलांचे फोटो काढून पहावेत, रंग जास्त चांगले येतात असा माझा अनुभव आहे.

धन्यवाद !
माझ्या कॅमेर्‍यात ऑटम मोड नाही. यातील काही फोटो मॅक्रो आहेत तर काही क्रॉप केलेले आहेत. मॅक्रो हे एक्स्टेंशन ट्यूब वापरून काढलेले आहेत. त्यामुळे काही मॅन्युअल फोकस केलेले आहेत. हे खूपच कॉम्प्रेस केलेले आहेत.

शेवटचे म्हणजे मी अजून शिकतोय त्यामुळे चूका असणारच. पण सुधारतोय हळू हळू....

तुम्ही चुकलात असे मी म्हणालो नाही, पण तसे वाटले असल्यास सॉरी. फोटो काढताना, काढल्यावर आपल्या डोळ्यांना एक सवय होते आण फोटो आपण इतर काढलेल्या फोटोंच्या तुलनेत पाहतो असे मला स्वानुभवावरून जाणवले म्हणून तिसर्‍याचे मत घेणे बरे वाटते. चूका काढायचा उद्देश नव्हता.

अरेच्या, मला तसे काहीच वाटले नाही उलट अशा चर्चांतूनच शिकता येते, यावर माझा दृढ विश्वास आहे. आणि मी खरंच वेगवेगळे प्रयोग करून शिकत आहे. त्यातील काही प्रयोगामधील हे फोटो आहेत. आता मी पुढचे जे फोटो टाकीन त्यात तुम्हाला सुधारणा दिसेल.

सर्वच फोटो सुंदरच.

बात फुलो की ही निकली है तो हमारे तरफ से भी थोडे :) :

मस्तच !

फिर छीडी रात बात फूलोंकी,रात है या बरात फूलोंकी...

दिल खुषी से झुम उठे,इतने फुल मिले है आज....
नही तो हमारी कहाँ ऐसी जिंदगी,के बगैर माँगे मिले ताज.....

दिल खुषी से झुम उठे,इतने फुल मिले है आज....
नही तो हमारी कहाँ ऐसी जिंदगी,के बगैर माँगे मिले ताज.....

व्वा... झक्कास. तबियत खुश झाली.
कुणाच्या ओळी आहेत या? कुणी गायली आहे ही गझल?

मिपाचे नवे गटणे चेसुगु यांना बोलता जरा भाषेकडे लक्ष द्या हो श्री ध. वा!!

नशिब आमचं नाव धनाजीराव वाकडे आहे. जर आमचं नाव धुनाजीराव वाकडे असतं तर? ;)

@-कुणी गायली आहे ही गझल?--अजुन कुणीही गायलेली नाही,,,पण गायला द्यायच्या विचारात आहे ;-)

हम ही लिखते है ऐसा कुछ,जब दिल खुषी सि झुमता है...
वरना हमारी इतनी कंहाँ मजाल,के हमारा लिख्खा कोइ समझता है?.....

खुषीयाँ एक चमन है,दिल एक पतंग है
अगर हवा अच्छी हो..तो उडे..नही तो कट जाती है....

शायरी तो बस्स शायरी है,जिंदगी की तरहा आसान नही
बुलाए तो ना आए,,,ना बुलाए तो जरुर आ जाती है...

उसका एहसास ही नही होता,सदीयों से वो साथ रहती है
आप कहेंगे..वो शायरी है,मै कहुंगा जी नही---वो तो मेरी बीवी है... :-D

बाराव्या फोटतल्या फुलांच्या (पा)कळ्या नर्तिकेच्या बोटांसारख्या वाटल्या. मॅक्रोमोडबद्दल निळ्याशी सहमती.

सर्वांना धीर धरून (लोड होताना ) हे फोटो पाहिल्याबद्दल धन्यवाद.

मूळ शक्ति बिंदू प्रदर्शन (पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन) व नंतर प्रतिसादात टाकण्यात आलेली फुलांची छायाचित्रे अतिशय सुंदर आहेत. इथे काहींनी म्हंटलेय तसा मला तरी चित्रे दिसायला अजिबात वेळ लागला नाही, लगेचच दिसली.

अर्थात आज सकाळीच भ्रमणध्वनीवर एक लघुसंदेश प्राप्त झाला. तो असा -

Anybody can love a rose but hardly anyone will love
a root & stem which gives it support,
a leaf which gives it food and
a thorn which gives it protection.

Don't love someone who is beautiful, but love the one who can make your life beautiful.

ही फुलं बघताना ही तो आठवत होताच. हे म्हणजे आपण चवीसाठी झणझणीत मिसळपाव खायला बसलो असताना "पण आरोग्यासाठी नाचणीची भाकर आणि पालेभाजीच चांगली" हा आहारतज्ज्ञाने दिलेला सल्ला आठवण्यासारखं आहे.

शक्ति बिंदू प्रदर्शन (पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन)

"पॉवर पॉईंट" हे विशेषनाम आहे. आणि व्याकरणाच्या नियमानूसार विशेषनामाचे भाषांतर होत नसते. याच न्यायाने "यु ट्युब" हे भाषांतर करताना "यु ट्युब" असेच राहायला हवे. त्याचे "तू नळी" करणे चुकीचे आहे.

बाकी चालू दया. :)

>

हे मला ठाऊक आहे.

>

तरीही कित्येक ठिकाणी हे केलेले असतेच. याशिवाय फेसबुक चे थोबाड पुस्तिका किंवा चेहरा पुस्तक असे भाषांतर अनेक मराठी संकेतस्थळांवर / कट्ट्यांवर केलेले दिसून येईल.

इतकेच काय आपल्या देशातल्या सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या कॉंग्रेस ह्या इंग्रजी नावाचा भारतीय भाषांतरात उल्लेख न करणारी मराठी वृत्तपत्रे देखील इंग्लंडच्या पक्षांचा हटकून मराठीत हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष असा उल्लेख करीत असतातच.

यावर कोणी टीका केलेली नाही.

असे काही मी केले म्हणजे च लोकांचे लक्ष वेधले जाते.

दोघांनी काढलेले फोटो छान आहेत.

मस्त प्रकाशचित्रे काढली आहेत.

वरील सर्व फोटू पाहून धन्य झालो आहे..
क्या बात हे

फुलांची प्रकाशचित्रे फारच अप्रतिम. तुमची पण आणि मृत्युंजयाची पण.

काका, सगळी छायाचित्रे सुंदरच आहेत. पण सगळ्याच फुलांची नावे द्या ना! खूप खूप सुंदर आहेत सगळी फुले.

+१,

जयंत कुलकर्णी आणि मृत्युन्जय, सगळी छायाचित्रे खूप सुंदर आहेत. पण खरंच सगळ्या फुलांची नावे दिलीत तर सोनेपे सुहागा !

सारीच प्रकाशचित्रं आवडली. पक्ष्यांचे फोटोही येऊद्यात.

फारच सुंदर फोटो.
मृत्युंजय यांनीही दिलेले फोटो सुरेख.

धन्यवाद.

अतिशय सुरेख !! स्लाईड शोची आयडिया आवडली.

अप्रतिम!!

वाह वाह!! खूप सुंदर आहेत फुले.
मृत्युंजय यांनीही टाकलेली फुले सुंदर आहेत.
खूप छान वाटले.

सुंदर फोटु आहेत

जांभळ्या रंगाच्या छटांची सर्व फुले अधिक आवडली.
नंतरची ही फुले सुरेख!!!