जालरंग प्रकाशनाच्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा !!!

सुहास झेले's picture
सुहास झेले in जनातलं, मनातलं
15 Sep 2011 - 11:13 am

मंडळी आता आपल्याला वेध लागलेत दिवाळी अंकाचे. जालरंग प्रकाशनातर्फे आपणही दिवाळीचे स्वागत साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांनी करूया. आपण नवोदित असाल किंवा अनुभवी, आम्ही सगळ्यांना सामावून घेतो. तेव्हा चला,उठा आणि सज्ज व्हा आता.

आपल्या दिवाळी अंकासाठी कोणताही एक विशिष्ट असा विषय नाहीये. लेख,कविता,निबंध,कथा(लघुकथा,दीर्घकथा),विनोद,विडंबन, प्रवासवर्णन,व्यक्तीचित्र,आत्मकथन-अनुभव इत्यादि लेखनप्रकार आणि छायाचित्रण,व्यंगचित्र,ध्वनीमुद्रण,ध्वनीचित्रमुद्रण वगैरे पद्धतींचा अवलंब करूनही आपण साहित्य पाठवू शकता.

साहित्य कोणते हवे?

१)दिवाळी अंकासाठी ताजे आणि आत्तापर्यंत अप्रकाशित साहित्यच हवे.
२) आपला दिवाळी अंक प्रकाशित होईपर्यंत आपण इथे पाठवलेले साहित्य कोणत्याही परिस्थितीत कुठेही...अगदी आपल्या जालनिशी/ब्लॉगवरही प्रकाशित करायचे नाही.
३) वरील अटीत न बसणारे साहित्य विनम्रपणे नाकारले जाईल.

साहित्य कसे पाठवावे?

१) लेखी साहित्य एचटीएमएल अथवा डॉक्युमेंट सदरात पाठवावे...पीडीएफ स्वरूपात नको.
२) आपल्या साहित्यासोबत जर काही छायाचित्रं असतील तर ती वेगळी जोडावीत(अटॅचमेंट).
३)ध्वनीमुद्रणं...एम्पी३ प्रकारात, ध्वनीचित्रमुद्रणं .flv किंवा .avi स्वरूपात पाठवावीत.
४)छायाचित्र jpeg, png, gif, tiff ह्या प्रकारात असावीत.

साहित्य पाठवण्याचा पत्ता... jaalarangaprakaashana@gmail.com असा आहे.

साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख आहे १६ ऑक्टोबर २०११.

ह्या अंकाच्या संपादक आहेत सिद्धहस्त कवयित्री क्रांती साडेकर

दिवाळी अंक प्रकाशनाची तारीख योग्य वेळी जाहीर केली जाईल. ह्या आधी प्रकाशीत झालेले अंक, ह्या दुव्यावर टिचकी मारून बघता येतील.

कलाकथाकवितागझलवाङ्मयमुक्तकविडंबनसाहित्यिकमाहिती

प्रतिक्रिया

पियुशा's picture

15 Sep 2011 - 1:19 pm | पियुशा

मला जर काही द्यायचे असेल( कविता,कथा.लेख) तर मी वरच्या ईमेल jaalarangaprakaashana@gmail.com
सेन्ड करु का डायरेक्ट :)

नगरीनिरंजन's picture

15 Sep 2011 - 1:21 pm | नगरीनिरंजन

रामाची सीता कोण?

सुहास झेले's picture

15 Sep 2011 - 7:05 pm | सुहास झेले

हो, बरोब्बर :)

चेतन सुभाष गुगळे's picture

15 Sep 2011 - 1:40 pm | चेतन सुभाष गुगळे

<< ३) वरील अटीत न बसणारे साहित्य विनम्रपणे स्वीकारले जाणार नाही. >>

हे असे हवे -

३) वरील अटीत न बसणारे साहित्य विनम्रपणे नाकारले जाईल.

सुहास झेले's picture

15 Sep 2011 - 7:03 pm | सुहास झेले

चेतन, योग्य तो बदल केला आहे, धन्यवाद !! :)

प्रभाकर पेठकर's picture

15 Sep 2011 - 1:52 pm | प्रभाकर पेठकर

लेख,कविता,निबंध,कथा(लघुकथा,दीर्घकथा),विनोद,विडंबन, प्रवासवर्णन,व्यक्तीचित्र,आत्मकथन-अनुभव इत्यादि लेखनप्रकार आणि छायाचित्रण,व्यंगचित्र,ध्वनीमुद्रण,ध्वनीचित्रमुद्रण वगैरे पद्धतींचा अवलंब करूनही आपण साहित्य पाठवू शकता.

मला वाटतं पाककृतीही स्विकारार्ह असतील. कृपया भूमिका स्पष्ट करावी ही विनंती.

दिवाळी अंक असल्यामुळे फक्त दिवाळीच्या फराळाच्याच पाककृती असाव्यात की इतर शाकाहारी, मांसाहारी पाककृतीही स्विकारल्या जातील हेही स्पष्ट असावे.

प्रास's picture

15 Sep 2011 - 3:05 pm | प्रास

तुम्ही टाकलेली एखादी पा.कृ. मिपावर वाचून किती युगं लोटली असतील हो?

होऊ घातलेला बल्लव ;-)

मी ही असेच म्हणते!!!!!

केव्हा पाठवू????

सुहास झेले's picture

15 Sep 2011 - 7:00 pm | सुहास झेले

निवेदिता ताई,

यप्प, पाककृती स्वीकारल्या जातात. जितक्या लवकर शक्य असेल, तितक्या लवकर पाठवून दे :) :)

व्हीडीओ शूटिंग करून पाठवल्यास अतिउत्तम.. ;)

- पिंगू

सुहास झेले's picture

15 Sep 2011 - 6:58 pm | सुहास झेले

पाककृतीही चालतील..नव्हे धावतील...सचित्र आणि पायरी-पायरीने असल्यास अधिक उत्तम.. :) :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Sep 2011 - 9:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जालरंग प्रकाशनाच्या दिवाळी अंकासाठी शुभेच्छा.

आमचे एक मित्र महेंद्र कुलकर्णी यांनी 'दिवाळी अंकाची सांस्कृतिक रडकथा' या प्रहार दैनिकातील लेखाची लिंक दिली आहे. लेख वाचायला हरकत नाही.

-दिलीप बिरुटे