बंदुक

अभिजीत राजवाडे's picture
अभिजीत राजवाडे in जे न देखे रवी...
13 Sep 2011 - 5:25 pm

मी ही हसलो त्यांना
ज्यांनी मला वाचवले
प्रेताशिवाय सर्वांना
स्मशानात पोहचवले

एकटा जसा तो उठला
मुर्ख म्हणोनी हिणविले
संख्येच्या या निकषाने
विद्वान किती बसविले

प्रेतासम हे जगणे
जगतो मी तिरडीवर
नियतीचा कैसा घोट
पडतो जसा नरडीवर

मैत्री मी निभावुन
मैत्र जमवले पक्के
अपयशावरही माझ्या
मित्रांचे होते शिक्के

देताना निरोप तुजला
तु अंधुन अंधुक होते
वक्षात देऊनी गोळी
ती आठवण बंदुक होते

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Sep 2011 - 4:37 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मैत्री मी निभावुन
मैत्र जमवले पक्के
अपयशावरही माझ्या
मित्रांचे होते शिक्के

अतिशय सुंदर गजल!!

जाई.'s picture

14 Sep 2011 - 5:06 pm | जाई.

उत्तम

परिकथेतील राजकुमार's picture

14 Sep 2011 - 5:11 pm | परिकथेतील राजकुमार

कवितेच्या खाली 'मिपावरील दोन आयडींना समर्पित' असे लिहून टाका म्हणजे कविता सुप्पर डूप्पर हिट ;)

अभिजीत राजवाडे's picture

16 Sep 2011 - 8:13 am | अभिजीत राजवाडे

सर्वांचे खुप खुप आभार!!!

परा, अरे कुठल्या दोन आय डी बद्द्ल म्हणतोय!!!