Fast Five

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
5 Sep 2011 - 3:40 pm

आज सकाळी नेहमीप्रमाणेच मोकळा असल्याने शनिवारी अर्धवट राहिलेला Fast Five हा चित्रपट पाहून संपवला. The Fast and the Furious सिरीज मधला हा पाचवा चित्रपट. पहिल्या दोन भागांनंतर बाहेर गेलेले विन डिझेल आणि पॉल वॉकर ह्या भागाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत, आणि त्यांना साथ मिळाली आहे WWF स्टार 'द रॉक' ची. येवढी तगडी स्टारकास्ट आणि जोडीला The Fast and the Furious ची भन्नाट कार ड्रायव्हिंग, जबरदस्त संवाद आणि तोंडावर कमी आणि बंदुकांवर जास्त विश्वास ठेवणारे खलनायक अशी सर्व वैशिष्ट्ये घेऊन हा चित्रपट हजर झाला आहे.

विन डीजलला (डॉमनिक) पूर्वाश्रमीच्या गुन्ह्यांसाठी २५ वर्षाची शिक्षा दिली जाते, अर्थात शिक्षेमध्ये पॅरोलची संभावना देखील नसतेच. कायद्याचा रक्षक डॉमचा मित्र आणि डॉमच्या बहिणीचा मियाचा प्रियकर पॉल वॉकर ( ब्रायन ओ कॉनर) आता आपली बाजू बदलून डॉमला वाचवायचे ठरवतो आणि इथे चित्रपटाला सुरुवात होते. अर्थात नेहमीप्रमाणेच अचाट कार ड्रायव्हिंग स्किल्स आणि अचूक टायमिंगच्या जोरावर ब्रायन आणि मिया मिळून डॉमला आणि इतर कैद्यांना घेऊन जाणारी बस उलटवण्यात यशस्वी होतात आणि डॉम पळून जाण्यात.

आता तिघांचे लक्ष असते ते रिओ गाठणे. डॉमनिकची वाट बघत ब्रायन व मिया तात्पुरते त्यांच्या जुन्या मित्राच्या विन्सी च्या आश्रयाला येतात. इथेच मियाला आपण आई होणार असल्याचे कळते. डॉमच्या आगमनाच्या मधल्या काळात विन्सीकडे नेहमीप्रमाणे एक जॉब चालून येतो आणि ब्रायन आणि मिया त्याला जॉईन होतात. जॉब असतो नेहमीप्रमाणेच चोरीचा. ह्यावेळी धावत्या ट्रेनमधून काही कार्स पळवण्याचा जॉब आलेला असतो. जॉब पूर्ण करत असतानाच ज्या गाड्यांच्या चोरीचा हा जॉब आहे त्या गाड्या 'सिझ' केलेल्या आहेत आणि गाड्यांबरोबरच फेडरल एजंटस देखील ट्रेनमध्ये असल्याचे मिया आणि ब्रायनच्या लक्षात येते. त्याचवेळी इतर ग्रुप बरोबर डॉम देखील जॉब पूर्ण करायला हजेरी लावतो. ज्या ग्रुपसाठी ते हा जॉब पूर्ण करात असतात, त्या ग्रुपला इतर कार्स सोडून फक्त आणि फक्त एकाच कार मध्ये (Ford GT4() इंटरेस्ट असल्याचे आता ह्या तिघांच्या लक्षात येते. त्यामुळे नेमकी तिच कार घेऊन डॉम मियाला पळवून लावतो. इकडे चिडलेल्या ग्रुपमध्ये आणि डॉम, ब्रायन मध्ये झालेल्या मारामारीत ग्रुपमधील झिझी नावाच्या माणसाच्या हातून काही फेडरल एजंटस मारले जातात. ब्रायन आणि डॉम पळून जाण्याच्या प्रयत्नात ह्या सगळ्या जॉब मागे असलेल्या एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बिझनेसमनच्या रे च्या हातात सापडतात. अर्थात त्याच्या गुंडांच्या तावडीतून देखील ते पळून जाण्यात यशस्वी होतात.

आता शोध सुरू होतो की ह्या कारमध्ये नक्की असे काय आहे की ज्यासाठी हा पूर्णं प्लॅन रचला गेला होता. इकडे परत येऊन मिळालेला विन्सी त्या कारमधून एक कॉम्प्युटर चीप चोरताना त्यांच्या ताब्यात सापडतो. विन्सीला हाकलल्यावर आता त्या चीप मध्ये नक्की काय आहे ह्याची माहिती घ्यायला सुरुवात होते. त्या चीप मध्ये रे च्या संपूर्ण काळ्या साम्राज्याची माहिती आणि त्याने ठिकठिकाणी लपवलेल्या एकूण १०० मिलियन डॉलर्सची माहिती देखील असते.

इकडे ट्रेनमध्ये झालेल्या खुनांचा आळ डॉम आणि ब्रायन वरती येतो आणि ते मोस्ट वाँटेडच्या यादीत अग्रभागी विराजमान होतात. आपल्या एजंट्सच्या हत्येने पिसाळून उठलेला ल्यूक हॉब्ज (द रॉक) आता ह्या दुक्कलीला पकडण्यासाठी ब्राझील मध्ये दाखल होतो. डॉमच्या ठिकाणाचा पत्ता लागल्याने रे चे गुंड त्यांच्यावरती हल्ला करतात. पोलिस आणि रे अशा कचाट्यात सापडलेला डॉम आपण वेगळे होऊ आणि लवकरात लवकर रिओ सोडू असे सुचवतो. मात्र तेव्हाच मिया आपण प्रेग्नंट असल्याचे सांगते आणि परिस्थिती बदलते. शेवटचा जॉब म्हणून रे चे १०० मिलियन्स चोरायचे आणि ह्या सगळ्याला कायमचा राम राम ठोकून नवे आयुष्य सुरू करायची कल्पना डॉम सुचवतो. आणि मग सुरू होतो शोध ह्या शेवटच्या जॉबसाठी मदतनिसांचा. विन्सी देखील पुन्हा येऊन मिळतो.

मदतनीस मिळतात, जॉबची आखणी देखील होते मात्र पहिली टीम जॉबसाठी बाहेर पडते आणि इकडे डॉम आणि साथीदारांना ल्यूक अटक करतो. आता अटक केलेल्या सर्वांची अमेरिकेला रवानगी करण्यासाठी ल्यूक त्यांना गाडीतून घेऊन निघतो आणि त्या गाडीवरच रे च्या माणसांकडून हल्ला होतो. जवळ जवळ सर्वच साथीदार मारले गेल्यावरती डॉम व मंडळी कशीतरी ल्यूकची सुटका करतात आणि त्याला आपल्या ठिकाण्यावर घेऊन येतात. आता बदललेला ल्यूक देखील ह्या जॉब मध्ये सामील होतो आणि एकच भन्नाट वेग कथेला मिळतो.

शेवटी चोरी होते का? चोरीच्या पैशाचे नक्की काय आणि कसे होते, रॉक नक्की जॉब मध्ये सामील होतो ? का त्याचा सतःचा काही वेगळा अजेंडा असतो ? ह्या प्रश्नांची उत्तरे चित्रपटाकडूनच मिळवण्यात मजा आहे.

विन डिजेलची थंड नजर, द रॉकचे सुसाट संवाद, पॉल वॉकरची गजब बुद्धिमत्ता आणि धुमशान मारामार्‍या, जबरदस्त कार स्टंटस, चोरीसाठी वापरलेल्या युक्त्या एकूणच धमाल ही धमाल. ह्या सर्व फटाक्यांची आतषबाजी एकत्र पाहण्याची मजा खरंच काही और आहे.

हे ठिकाणमौजमजाचित्रपटप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

चित्रपट बघितल्या होताच...
आता परीक्षण वाचायला पण मजा आली...

सुहास झेले's picture

5 Sep 2011 - 3:53 pm | सुहास झेले

बघितला आणि आवडला देखील... :)
कार्सचे स्टंट जबरा आहेत... !!

सुहास झेले's picture

5 Sep 2011 - 3:55 pm | सुहास झेले

प्र का टा आ !!

जातीवंत भटका's picture

5 Sep 2011 - 4:41 pm | जातीवंत भटका

हा चित्रपट पाहीला आणि आवडला पण, अपवाद होता तो शेवटच्या जॉबच्या प्लॅनचा तो काही तितकासा पटला नाही.
बाकी धुमशान हाणामार्‍या मस्त !

अन्या दातार's picture

5 Sep 2011 - 4:58 pm | अन्या दातार

कार्स वगैरे म्हनले की फक्त आणि फक्त द ट्रान्सपोर्टर सीरिज डोळ्यापुढे येते. जेसन स्टॅथमसमोर बाकी कुणी कार चालवूच नये
बाकी पिक्चर बघितला जाईलच हे नक्की (फक्त हाच नाही, फास्ट अँड फ्युरिअसचे सगळे भाग बघेन :) )

त्याचाच 'डेथ रेस' विसरलात?

राजेश घासकडवी's picture

5 Sep 2011 - 5:35 pm | राजेश घासकडवी

असावा असं वाटतं आहे.

मात्र माझ्या एक कधी लक्षात आलेलं नाही. हे व्हिलन लोक असल्या माहित्या कुठल्यातरी गाडीतल्या कुठल्यातरी चिपमध्ये वगैरे का एनकोड करून ठेवतात? त्यांना क्लाउड कॉंप्युटिंग वगैरे काही फंडे माहीत नाहीत का? डेटा ब्याकअप वगैरे तरी करावा. एन्क्रिपश्न, पासवर्ड प्रोटेक्शन वगैरेंवर त्यांचा विश्वासच नाही का? की हॅकर्सना हे सगळं हॅक करता येतं?

माझे जे शंभर दोनशे मिलियन आहेत ते मी सरळ स्विस बॅंकेत ठेवतो. ही असली झंझटच नाही.

गुर्जी त्ये एक आभासी जग आसतय. येवढे प्रश्न पाडुन जीवाला तरास नाय करले लेणे का?
तुम्ही आम्हाला अजुन हवे आहात. ;)

आत्मशून्य's picture

5 Sep 2011 - 6:26 pm | आत्मशून्य

त्यांना क्लाउड कॉंप्युटिंग वगैरे काही फंडे माहीत नाहीत का?

आता जर कोणी क्लाउड कॉंप्युटिंगचे फंडे जर विश्वबंधू गूप्ता सारख्या जेष्ठ व माजि IT commissioner अशा विचारवंत व भारतातील राजकीय व न्यायसंस्था विषयांवर परखड मत व्यक्त करणारे विचारवंत असे सेलीब्रेटी स्टेटस प्राप्त केलेल्या व्यक्तिने जर अशा प्रकरे एक्सप्लेन केले तर भरोसा उठणारच ना ?

कार रेसिंग म्हणजे जिव की प्राण अर्थातच फक्त कॉप्यूटरवरच, इथ खर्रीखूरी स्पोर्ट्सकार मेंटेन करायची ऐपत आहे कूठ :). पण एकूणच चित्रपट म्हणजे धमाल आहे अगदी पहील्या भागापासून न चूकता पहात आल्याने ही सीरीज (व टॉर्क चित्रपट) विषेश आवडतो. एकदम धमाल आयटम मुव्ही आहे, खरतर चित्रपटच असा की कथा/परीक्षण लिहणार काय आणि वाचणार काय ज्याला हे भावतं त्याला मस्त चित्रपट एव्हडच परिक्षण पूरेस आहे :) ज्याला नाही त्यानं..... ? विचार बदलावा :)

पहिल्या दोन भागांनंतर बाहेर गेलेले विन डिझेल आणि पॉल वॉकर ह्या भागाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत

ते याधीच २००९च्या Fast & Furious (४) मधे एकत्र आले होते. टोकिओ (३) ड्रिफ्ट मधेच ते न्हवते. (विन डिजल ने गेस्ट अ‍ॅप दिला आहे) तर २फास्ट २ फ्यूरीअस मधे फक्त पॉल होता आणि सूपर हॉट एव्हां मेंडीसही.

मिहिर's picture

5 Sep 2011 - 6:45 pm | मिहिर

आधीचे भाग पाहिलेले नसतानाही मित्र घेऊन गेला मला ह्या चित्रपटाला. थेटरात थोडा वेळ पेंगलो सुद्धा. स्टंट किती अतिशयोक्त दाखवायचे? हिंदी चित्रपटांची आठवण झाली.

अन्या दातार's picture

5 Sep 2011 - 7:52 pm | अन्या दातार

>>हिंदी चित्रपटांची आठवण झाली.

अतिशयोक्त स्टंट्स तुम्ही हिंदीत कुठे बरे बघितलेत?? आजवर याचे कॉपीराईट्स फक्त तेलुगु आणि तमीळ चित्रपटांकडे होते. सध्या हिंदीत त्याचेच सो कॉल्ड रिमेक्स बनतात.

बाकी, हे तुमचे अज्ञान कि अजुनही डोळ्यात राहिलेली पेंग??

प्रचेतस's picture

5 Sep 2011 - 10:08 pm | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच सुरेख परीक्षण. कालच स्टार मूव्हीजवर पहिला पार्ट पाहिला. आता बाकीचेही पाहिन म्हणतोय.

रामदास's picture

6 Sep 2011 - 8:45 am | रामदास

कार आणि रेसींग (कार रेसींग) या बद्दल एक माहीतीपूर्ण लेख लिहावा .येत्या वर्षी ग्रांप्री आहे अशी जाहीरात काल पेपरात होती.