केल्याने देशाटन.......|

dr sanjay honkalse's picture
dr sanjay honkalse in जनातलं, मनातलं
1 Sep 2011 - 12:47 am

केल्याने देशाटन.......|
प्रोफ. डॉ.संजय होनकळसे M.A. M.Com.M.Phil,M.D.(A.M.),LL.B.
"प्रवास म्हणजे विश्वम्भरनिर्मित विश्वाचा चमत्कृतीपूर्ण ग्रंथ वाचण्याची महान संधी". निर्गुण निराकार,सर्व शक्तिमान ,सर्व व्यापक, विश्वंभर विश्व रूपाने अनंत रूपे अनंत वेषें सर्वत्र ,सगुण,साकार,व व्यक्त होतो. अश्या या निर्गुण निराकार,चैत्यन्य रूप विश्वेश्वराचे प्रकट रूप विश्व ग्रंथातील नैसर्गिक, ऐतिहासिक, मानवनिर्मित( पर्वत-डोंगर, ,पाऊस=-पाणी, नद्या -सरोवरे,धरणे- तलाव , वृक्ष- वने ,वनचर-जलचर प्राणी,पशु --पक्षी, कोट-किल्ले इ.)स्थाने अनुभवण्याचे प्रवास हे एक अनमोल साधन आहे.
प्रवासाची ओढ ही मानवास खरें तर निसर्गताच बाळ कडूच्या स्वरूपातच लाभलेले असतें.बाल्यावस्थे पासून भूर जायला आपले मन आसुसलेले असतें. अगदी तान्ह्या बाळाला पण आपण भूर जाऊया म्हणून शांत करत असतो. तर प्रवासाची ओढ व प्रवृत्ती मानवास उपजतच असतें व ती "छंद" रूप घेते तो छंद पद्धतशीरपणे व जाणीवपूर्वक जोपासणे आवश्यक असतें. ज्याला प्रवासाची आवड नाही असं मनुष्य विरळाच पण जो उपलब्धी असूनही प्रवासाच्या अथांगतेचा थांग घेण्याचा प्रयत्न करीत नाही तो नुसता विरळाच नाहीं पण "एक मूर्ख "असे समर्थ रामदासी भाषेत बोलणे उचित ठरेल. कारण असं मनुष्य आपले जीवन समृध्द ,खऱ्या अर्थाने सार्थक करत नाही म्हणूनच प्रवासास जीवनातील तीन महागुरूंमध्ये प्रथम स्थान आहे."तीर्थाटन, शिक्षण ,व निरीक्षण हे तीन महागुर होत. ("Travel.Education, and observation are the three great MASTER PHYSICIANS.")
प्रवासास शिक्षणा पेक्षाही उच्य स्थान आहे कारण जे शंभर व्याखाने करणार नाही ते एक प्रवास शिकवून जातो. खरेतर प्रवासाच्या आमच्या अनुभवांवर आधारीत आमच्या एका विद्यार्थी मित्राने श्री नारायण शेटकर(M.Com,C.A.,C.F.A.जे आज Delloite या प्रसिद्ध संस्थे मध्ये मोठया हुद्द्यावर प्रवासाच्या अनुभवा आधारे यशस्वी रीत्या सेवा रुजू करीत आहेत) M.B.T.-Management By Tour Approach नावाचा लेख लिहला आहे त्यात ते म्हणतात "प्रवास हा नेहमी अंतर्मुख करून स्वत्वाची जाणीव व ओळख करून देणारा असतो.त्यांनी प्रवासामुळे व्यवस्थापनाचे अकरा व्यवस्थापनेचे तत्व सांगितली आहेत. त्यांच्या मते स्व व्यास्थापन ,वेळेचे व्यवस्थापन ,खाद्य व्यवस्थापन,,पैशाचे व्यवस्थापन,जबाबदारी आणि संवाद परस्पर संवाद यांचे व्यवस्थापन,करमणूक ,प्रेम माया,काळजी,तथा परस्पर संबंधाचे व्यवस्थापन,hurt management ,risk management व team बिल्डींग,व team व्यवस्थापन शिकवते प्रवास मुळे एकत्र येणे (जी सुरुवात असतें )एकत्र काम करणे (जे यश असतें )व एकत्र राहणे शिकवतो "एकत्र येणे ही सुरुवात ,तर एकता काम करणे हे यश आणि एकत्र राहणे हाच विकास ही शिकवण प्रवास देतो."
प्रवास करणाऱ्या व्यक्ती दोन प्रकारात विभागता येतील: १)"हौस म्हणून "प्रवास करणारे २)"प्रवासाची हौस" असणारे
१ ) हौस म्हणून प्रवास करणारे फक्त विरंगुळा व हौस म्हणूनच प्रवास करणे स्वीकारतात ते सहसा प्रवासी संस्था अथवा प्रवास व्यवस्थापक यांच्या माध्यमातूनच प्रवास करणे उचित समजतात. यांना आराम वा मजा म्हणून प्रवास करणे आवडते L .T .C वगैरे, वयस्कर,सेवा निवृत्त ,कटकट नको असणारे, अननुभवी व्यक्ती अशा प्रकारे प्रवास ,तीर्थयात्रा करणे पसंत करतात. पण या मंडळीना स्व शिक्षण व अनुभव मिळत नाहीं .एवढ्येच नाही तर यांनी जी सौदर्य स्थळे व ठिकाणे पाहिलेली असतात लक्षात येत नाहीत,रहात नाहीत अथवा त्यांचे वैशिष्ठ्य,पाहून सुद्धा लक्षात येत नाहीत अथवा ती स्थानेच पहाचीच राहिलेली असतात.ते अनेक छोटी पण महत्वाची स्थाने पाहण्याचे टाळतात..ते अज्ञानातच सुख मानतात व्त्यांच्या अज्ञानाला धक्का लावलेला त्यांना मुळीच आवडत नसते.यांना प्रवासापेक्षा राहण्याची व्यवस्था , जेवणाचे ,खाण्या पिण्याचे महत्व जास्त. राहण्याची रूम, बाथरूम जिथे आपण पांच मिनिटांच्या वर नसतो तेच महत्वाचे मग भले ते स्वतः मध्यम व दुय्यम मध्यमवर्गीय का असेनात.यामुळे जिथे अशी व्यवस्था नसते अश्या ठिकाणी ,म्हणजे अमरनाथ,गीरीपाद्भ्रमण, वाळवंट,जंगले, या प्रवासपासून वंचितच राहतात. हे आराम म्हणून प्रवासास जातात व आल्यावर पार थकून गेलेले, काळवंडलेले , असतात व मग त्यांना आणखीन काही दिवस घरीच राहून परत आराम करावा लागतो.ही मंडळी कदाचित पैशाने समृद्ध असतीलही पण प्रवासाने समृद्ध व निरोगी नसतात ही परावलंबी, व प्रवासाची खरी आवड असलेली मंडळी नसतात . यांचा प्रवास जीवन समृद्ध करणारा ,जाणिवा विशाल करणारा असा छंद नसतो.हौस म्हणून प्रवास करणारे अत्म्यला व आत्मोन्नतीला विसरून केवळ देह्सुखासाठीच प्रवास करतात ,ही सर्व मंडळी वर सांगितलेल्या MBT APPROACH मूळे मिळणाऱ्या लाभां पासून वंचितच राहतात.ही प्रवासी मंडळी परभृत व आयती असतात प्रवास ,त्यातूनही तीर्थाटन, साधारण पणे म्हातारपणीच करावा या मतांचे हे असतात .असा प्रवास करण्याऱ्या माझ्या बरोबर येणाऱ्या अनेक तरुणांन ही मंडळी नावे ठेवतात असा अनुभव आहे व नंतर प्रवासामुळे त्यांच्यातील(अगदी बाळू तरुणांतील ) आश्च्यर्य्कारक व्यक्तिमत्वातील फरक पाहून अचंभित झालेली आहेत.
२-)"प्रवासाची हौस" असलेले प्रवासी प्रवास स्व कष्टार्जित म्हणजे ज्याचे आयोजन स्वतः केलेले असतें असे असतात.ते चांगले पण व्यवहारी असतात. प्रवासाने त्यांचे अनुभव विश्व वाढलेले असतें पण सर्व प्रवास संपवून परत आल्यावर त्यांना असे वाटत नसते की ते दमून आलेले आहेत व येताना उदंड थकवा घेऊन आलोत ,बडा मजा आया अशा समाधानात
त्यांचा प्रवास संपतो. आमच सगळ बघून झालाय असे उद्गार सहसा ते काढत नाहीत, पाहून झालेल्या ठीकान्नन पेक्षा न पाहिलेल्या ठिकाणांची यादी ठेवतात.त्यांचा प्रवास समुद्रांच्या लाटांसारखा आपल्या आठवणींची साठवण फार काल मागे सोडून जात असतो.त्यांच्या कार्यशक्ती, विचारशक्ती, सहन शक्ती,स्व व्यवस्थापन कौशल्य यां मध्ये वाढ झालेली असतें.कारण राहणे , बाथरूम ,जेवण खावण यामध्ये ते उगीचच अडकत बसत नाहीत.जस जुडो कराटेमध्ये शरीर तावून सुलाखून तयार केले ज्याते तसंच ही मंडळी शरीराला तयार करतात.ते शरीराचे चोचले पुरवत नाहीत.याचा अर्थ मानवी देहाची आणि देह सुखाची ते निंदा करतात असे नाहीं .देह हा पुरुष आहे व त्याच्या माध्यमातूनच आत्म्याचा, आत्म ज्ञानाचा मार्ग मुक्तीचा मार्ग सुकर होत असतो याची पूर्ण जाणीव ठेऊन असतात हौस म्हणून प्रवास करणारे अत्म्यला व आत्मोन्नतीला विसरून केवळ देह्सुखासाठीच प्रवास करतात (म्हणून निंद्य असतात),तर प्रवासाची हौस असलेले आत्म ज्ञानासाठी देहाचा वापर करून प्रवास करतात त्यामुळे देहाने भोगावयाची जी सुखे आत्म ज्ञानाच्या आड येत नाहीत अशी सर्व सुखे प्रमाणशीर पणे भोगतात.जाणीव पूर्वक देहाचे हाल करून घेत नाहीत थोडीशी साधन सामुग्री व बरेचशे नियोजन व थोडस जुळवून(adjustment) य ते टाळता येतात. अनासक्ती, आस्था हे गुण त्यांना प्राप्त असतात.
या प्रवाशांचा उत्साह उतू जात असतो .थोड्याश्या गैरसोई त्यांना चालतात.त्याकरता ते श्याकतो प्रवास टाळत नाहीत.स्वयं नियोजित प्रवास व त्यातले स्वातंत्र्य,मन रमेल त्या ठिकाणी थोड जास्त त्यांना हवे असतें,वाटेतील एखादे अचानक माहित झालेले जवळचे ठिकाण पाहण्याची मोकळीक ते घेतात .ते संधी सोडत नाहीत.कधी खटपट करून ती मिळवतात ,दुसर्यांची जबाबदारी गरज पडल्यास स्वीकारतात.कधी एक्तेपणे तर कधी ईतरांना त्यांच्या तकदी-उमेदी प्रमाणे घेऊन जातात .
त्यामुळेच केवळ म्हातारपणीच प्रवास तीर्थयात्रा करायचा असा चुकीच्या समजुतीत ते नसतात.त्यांचा प्रवास प्रचीती देणारा ,प्रत्ययकारी असतो.अशी प्रचीती आम्ही सतत घेत आलो आहोत
. प्रवासा ची हौस असलेले अनेक प्रकारचे असतात. काहींना प्रवासाच्या शौकाबरोबर दुसरा एखादा शौखी पुरा करायचा असतो व त्याकरिता प्रवास करावा लागतो निसर्ग भ्रमंती, गिर्यारोहण, पक्षी निरीक्षण ,वनस्पती ,दगड ,धोंडे,माती,पुरातत्व अभ्यास,संशोधन म्हणून प्रवास करतात स्कीईंग ,trekking ,चित्रकारी, इत्यादीसाठी पण प्रवासाची हौस असणारे असतात तीर्थयात्रा हापण एक प्रवासाचा शौक असतो .
भारतीय सांस्कृतिक वैभवात प्रवास , तीर्थयात्रा यांना अन्यनसाधारण महत्व आहे तीर्थ क्षेत्रे व प्रवास ही आध्यत्मिक साधनेची उर्जास्त्रोत असतात.
तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि ,सुकर्मी कुर्वन्ति कर्माणि|
सत्च्छात्री कुर्वन्ति शास्त्राणि |
असे नारद आपल्या भक्तीसुत्रात म्हणतात :अष्ट सात्विक भवानी युक्त असे भक्त तीर्थांना सुतीर्थ कर्मांना सुकर्म व शास्त्रांना सत शास्त्र बनवतात. तीर्थयात्रा संचित पापांपासून मानवास मुक्त करून जीवन पावन करतात.म्हणूनच हातपाय चालतात तोंवर तीर्थयात्रा कराव्यात असे जगद्गुरू संत तुकाराम म्हणतात:
जव हे सकळ सिद्ध आहे | हात चालावया पाय ||
तव तू आपुले स्वहित |तीर्थयात्रे जाय चुकू नको ||
खरेतर "ईश्वर सर्व भूतानां हृदेशेर्जुन तिष्ठती |या न्यायाने मानव विश्वाचा घटक असल्याने त्या सर्व भूत विश्वं भराचाच अंश आहे. त्यामुळे मानवी जीवन हाच एक जीवाचा जन्मापासून ते मृत्यू पर्यंतचा प्रवास आहे . आपण सारेंच घडीचे प्रवाशी आहोत. हा घडीचा प्रवास (जीवनाचा) सत्कारणी लावण्यासाठी विश्वं भराच्या विश्वाचा प्रवास करणे हितावह आहे.तसे केल्याने विश्व हा परमेश्वराचा साक्षात आकार ...साक्षातकार आहे हे पटते. व मग या बहिर प्रवासामुळे अंतर प्रवास सुरु होतो आणि विश्वी आहे ते ब्रह्मांडी आहे हे लक्षात येते.शरीर हापण "परमेश्वराचा साक्षात आकार ..... असा साक्षात्कार होतो." ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आहे असे समजते या प्रवासामुळे.शरीर रुपी पिंडीने ब्रह्मांडी फिरण्याचा -पिंडी ते ब्रह्मांडी -हा अनुभव सिद्धी घेण्याचा प्रवास हे साधन आहे. विश्व पासून विश्वं भरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा उत्कृष्ट मार्ग होय. सर्व साधू संत शंकराचार्य ज्ञानेश्वर नामदेव,नानक, बुद्ध, महावीर याच मार्गाने गेलेत व ज्ञानी ,अनुभवसिद्ध झालेत.अगदी स्वामी वेवेकानंद यांना सुद्धा भारतभ्रमण करून कन्याकुमारीला साक्षात्कार झालेला आहे.
महाजनो येन गतो सःपंथ या न्यायाने आपणही आपला उद्धार करण्यासाठी देशाटन ,तीर्थाटन करणे अत्यावश्यक आहे.
असे केले तरच मला वाटते :आपला मरण दिन हा आपल्या शाश्वत व मुक्त जीवनाचा जन्म दिन ठरेल.

dr.sanjay honkalse.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2011 - 1:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> तीर्थाटन, शिक्षण ,व निरीक्षण हे तीन महागुर होत. <<
म्हणजे काय?

सामान्य लिखाणाचे काही संकेत पाळलेत तर वाचणं सुसह्य होईल. 'बोल्ड'नेस कमी करून, व्यवस्थित परिच्छेद पाडून विरामचिन्हांचा यथायोग्य उपयोग केल्यास लिखाण वाचणं सोपं होतं. शिवाय बाळकडू, आत्मज्ञान, स्वयंनियोजित वगैरे शब्द मराठीत एकत्र लिहीतात. विभक्ती प्रत्यय शब्दांना जोडून, म्हणजे एकाच शब्दात लिहीतात. असे व्याकरणाचे सोपे नियम पाळले तर लिखाण आणखी जास्त वाचनीय होईल. त्यानंतर त्यातल्या विचारांचं पाहू.

असो.

नावाप्रमाणेच विक्षिप्त हो बै तुम्ही... अहो माणूस केव्हढा, त्यांचा व्यासंग केव्हढा. आणि तुम्ही त्यांना चक्क उपदेश करताय? तेव्हढा तुमचा "अधिकार" आहे का?

डॉक्टरसाहेब सहज म्हणून विचारतो, तुम्ही मराठीतून एमे केलंय का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2011 - 9:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नावाप्रमाणेच विक्षिप्त हो बै तुम्ही

थ्यॅंक्यू हां! विक्षिप्तपणा हाच खरा दागिना. (सुंदर अक्षर गमभनमुळे येतंच की!)

तेव्हढा तुमचा "अधिकार" आहे का?

उगाच अँग्री, यंग, मॅन अमिताभचे ड्वायलाक आठवले.

असो. वाकडेबुवा, तुम्ही वाचलात का वरचा लेख?

वाकडेबुवा, तुम्ही वाचलात का वरचा लेख?

नाही. तेव्हढं सामर्थ्य आमच्यात नाही. प्रतिसादांचा अंदाज घेत लेखावर वरवर नजर फीरवून आम्ही उपप्रतिसाद देत आहोत. ;)

प्रवासाचा व्यावहारीक दृष्टीकोन पटला. लेख आवडत होताच की दाताखाली खडा आला. शेवटी ते शंकराचार्य वगैरेंचे उदाहरण देऊन जे उदो उदो केले आहे आणि अध्यात्माची जी डूब दिली आहे ती आवडली नाही. ओढून ताणून आणल्यासारखे वाटले.

ढब्बू पैसा's picture

1 Sep 2011 - 2:18 am | ढब्बू पैसा

पहिल्या दोन ओळींनंतर वाचवलं नाही.
प्लीज निदान ते बोल्ड तरी काढा.

शाहिर's picture

1 Sep 2011 - 10:50 am | शाहिर

प्रोफ. डॉ.संजय होनकळसे M.A. M.Com.M.Phil,M.D.(A.M.),LL.B.
तुमच्या पदव्यांची आगगाडी कशाला हवी ओ दर वेळेस ? हवे तर तुमच्या वैयक्तीक माहिती मधे लिहा कि ..कशाला दर लेखा बरोबर जाहिरात करत बसता

तुम्ही फक्त पहिल्या एक दोन ओळीच वाचलेल्या आहेत असं दिसतंय. जर पुर्ण किंवा निदान अर्धा लेख वाचला असता तर

खरेतर प्रवासाच्या आमच्या अनुभवांवर आधारीत आमच्या एका विद्यार्थी मित्राने श्री नारायण शेटकर(M.Com,C.A.,C.F.A.जे आज Delloite या प्रसिद्ध संस्थे मध्ये मोठया हुद्द्यावर प्रवासाच्या अनुभवा आधारे यशस्वी रीत्या सेवा रुजू करीत आहेत)

ही त्यांच्या मित्राची जाहीरातही दिसली असती ;)

अम्ही उगाच तिच्यायला चार वर्षे इंजिनीयरींगच्या डीग्रीत घालवली. त्यापेक्षा गोरेगांव - माणगांव, गोरेगांव - श्रीवर्धन, गोरेगांव - महाड असा प्रवास केला असता तर आम्हीही कुठल्यातरी प्रसिद्ध संस्थे मध्ये मोठया हुद्द्यावर त्या प्रवासाच्या अनुभवा आधारे यशस्वी रीत्या सेवा रुजू करीत असतो :)

छोटा डॉन's picture

1 Sep 2011 - 9:56 pm | छोटा डॉन

तुम्ही फक्त पहिल्या एक दोन ओळीच वाचलेल्या आहेत असं दिसतंय. जर लेख वाचला असता तर

खरेतर प्रवासाच्या आमच्या अनुभवांवर आधारीत आमच्या एका विद्यार्थी मित्राने श्री नारायण शेटकर(M.Com,C.A.,C.F.A.जे आज Delloite या प्रसिद्ध संस्थे मध्ये मोठया हुद्द्यावर प्रवासाच्या अनुभवा आधारे यशस्वी रीत्या सेवा रुजू करीत आहेत)

ही त्यांच्या मित्राची जाहीरातही दिसली असती

=)) =)) =)) =)) =)) =))
आग्गायायाया, मेलो रे धन्या अगदी खाप्पकन मेलो.

संपुर्ण लेख वाचल्याबद्दक तुला साष्टांग दंडवत _/\_
आम्ही वाचत आहोतच :)

- छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2011 - 10:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डॉन्या, या धनाजीचं काय करणार रे? लैच वाचतो आणि त्याहून जास्स बोलतो हा!!

छोटा डॉन's picture

1 Sep 2011 - 10:05 pm | छोटा डॉन

>>या धनाजीचं काय करणार रे? लैच वाचतो आणि त्याहून जास्स बोलतो हा!!
+१, हेच निरिक्षण नोंदावतो.

हा धनाजी दाट आणि खुप शिकला असेल असा आमचा संशय आहे.
तो निदान चौथी, दहावी,बारावी आणि इंजिनियरिंगची ४ वर्षे एवढे शिकला असावा, अ‍ॅक्च्युअली माझा हा फक्त अंदाज आहे, त्याने प्रोफाईलमध्ये तसे काही लिहल्याचे आढळले नाही.
पण तो लै लै शिकला असावा असे वाटते.

धनाजीराव, आमचा पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार स्विकारा :)
_/\_

- छोटा डॉन

शाहिर's picture

3 Sep 2011 - 2:21 pm | शाहिर

दांडगा स्टॅमिना तुमचा ...अम्ही २ ओळीं मधेच खपलो ..

तिमा's picture

1 Sep 2011 - 2:38 pm | तिमा

आम्ही इतका गहन विचार करुन प्रवास नाही करत बुवा! आज साठीला देखील ,आम्ही केवळ लहान मुलाच्या कुतुहलानेच प्रवास करतो.

स्वामी वेवेकानंद यांना सुद्धा भारतभ्रमण करून कन्याकुमारीला साक्षात्कार झालेला आहे.

आपला मरण दिन हा आपल्या शाश्वत व मुक्त जीवनाचा जन्म दिन ठरेल.

या व तत्सम वाक्यांनी डोळे क्षणभर पाणावले आणि नंतर डोळ्यांसमोर अंधारीही आली.

पल्लवी's picture

1 Sep 2011 - 9:05 pm | पल्लवी

ऐसेइच्च बोलने का हय !
एवढे बोजड विचार करत प्रवास ? छे बुवा !

स्पंदना's picture

2 Sep 2011 - 6:56 am | स्पंदना

लगेज चार्ज लावायला हवा या विचारांना पण

'या व तत्सम वाक्यांनी डोळे क्षणभर पाणावले आणि नंतर डोळ्यांसमोर अंधारीही आली.' भलताच दांडगा संयम आहे हो तुमचा तिमा, मला तर लेख वरपासुन खालपर्यंत नुसता स्क्रोल करताना पण अंधारल्यासारखं होत होतं.

एक आंतरजालीय अलिखित नियम - एखादी गोष्ट बोल्ड करुन लिहिणे, विशेषतः इमेल मध्ये वगैरे, याचा अर्थ आपण समोरच्याला शिव्या घालत होतो असा होतो.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Sep 2011 - 9:09 pm | बिपिन कार्यकर्ते

अहो शिव्याच घालत आहेत ते... तुम्हाला काय वाटलं! ;)

माझीही शॅम्पेन's picture

1 Sep 2011 - 9:26 pm | माझीही शॅम्पेन

एक्दम बोल्द्ड्द्बोबोलबोल्द्ड्द्बोबबोल्द्ड्द्बोबोल्दलबोल्द्ड्द्बोब

एक आंतरजालीय अलिखित नियम - एखादी गोष्ट बोल्ड करुन लिहिणे, विशेषतः इमेल मध्ये वगैरे, याचा अर्थ आपण समोरच्याला शिव्या घालत होतो असा होतो.

ओ पन्नासराव, कायपन बोलू नका.

संत शंकराचार्य ज्ञानेश्वर नामदेव आणि स्वामी वेवेकानंद अशा थोरामोठयांची चरीत्रे वाचा. असले फालतू प्रश्न पडायचे बंद होतील.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Sep 2011 - 9:10 pm | बिपिन कार्यकर्ते
मृत्युन्जय's picture

2 Sep 2011 - 10:54 am | मृत्युन्जय

माफ करा पण लेख अगदीच सुमार होता (मी पुर्ण वाचुन लिहितो आहे)

हौस म्हणुन प्रवास करणारे

हे आराम म्हणून प्रवासास जातात व आल्यावर पार थकून गेलेले, काळवंडलेले , असतात व मग त्यांना आणखीन काही दिवस घरीच राहून परत आराम करावा लागतो

हे विधान पुरेश्या अभ्यासाअंती केले आहे असे मला वाटते.

ही परावलंबी, व प्रवासाची खरी आवड असलेली मंडळी नसतात .

या विधानाला तर माझा जोरदार आक्षेप आहे.

हौस म्हणून प्रवास करणारे अत्म्यला व आत्मोन्नतीला विसरून केवळ देह्सुखासाठीच प्रवास करतात

अत्मोन्नती प्रवासातुन साधता येते या गोष्टीलाच माझा आक्षेप आहे. आत्मोन्नती साधण्यासाठी वेगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे पण तो लेखाचा अथवा प्रतिसादाचा विषय नसल्यामुळे तुर्तास त्यावर भाष्य करत नाही.

प्रवासाची हौस असणारे

-)"प्रवासाची हौस" असलेले प्रवासी प्रवास स्व कष्टार्जित म्हणजे ज्याचे आयोजन स्वतः केलेले असतें असे असतात.ते चांगले पण व्यवहारी असतात.

म्हणजे हौस म्हणुन प्रवास करणारे चांगले आणि व्यवहारी नसतात असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?

पण सर्व प्रवास संपवून परत आल्यावर त्यांना असे वाटत नसते की ते दमून आलेले आहेत व येताना उदंड थकवा घेऊन आलोत ,बडा मजा आया अशा समाधानात त्यांचा प्रवास संपतो.

दुर्गभ्रमण करुन न दमलेला माणूस मी पाहिलेला नाही. हा आनंद प्रचंड मिळतो. पण तो तसा सर्वच प्रवास करणार्‍यांना मिळतो. हौस म्हणुन प्रवास करणार्‍यांनादेखील.

आमच सगळ बघून झालाय असे उद्गार सहसा ते काढत नाहीत, पाहून झालेल्या ठीकान्नन पेक्षा न पाहिलेल्या ठिकाणांची यादी ठेवतात

असे उद्गार सहसा प्रवासाचा तिटकारा असणारे लोक काढतात. हौस म्हणुन प्रवास क्रणारे नाही आणि प्रवासाची हौस असणारेही नाही.

हौस म्हणून प्रवास करणारे अत्म्यला व आत्मोन्नतीला विसरून केवळ देह्सुखासाठीच प्रवास करतात (म्हणून निंद्य असतात),

विधान पटले नाही (खासकरुन अधोरेखित वाक्ये)

अजुन बरीच विधाने पटली नाहीत. पण सगळीच अधोरेखित करीत बसलो तर सगळाच लेख परत लिहावा लागेल. त्यामुळे इथेच थांबतो.

सारांश / इतर:

१. लेख आवडला नाही
२. लेख पुरेश्या विचाराअभावी आणि अपुर्‍या माहितीनिशी लिहिला आहे.
३. लेखाचे वळण फारच बाळबोध वाटले.
४. इतर बर्‍याच जणांनी म्हटल्याप्रमाणे तो बॉल्ड फॉण्ट काढावा.

बाकी पुलेशु. आपल्यासारख्या ज्ञानी आणि विद्वान माणसासमोर मी काही बोलावे इतकी माझी लायकी नाही. पण जे वाटले ते स्पष्टपणे सांगितले.

इतक्या लोकांनी लेख वाचला आणि म्रुत्युंजय यांनी तर त्यातल्या विचारांची चिरफाडपण केली हे वाचुन माझे चिमुकले डोके गरगरले. मी लेखकाचे नाव वाचुनच लेख न वाचता लोकांनी काय एवढे प्रतिसाद दिलेत ते पहायला आले होते. मेली आमची कुवतच सामान्य.

शैलेन्द्र's picture

3 Sep 2011 - 2:52 pm | शैलेन्द्र

एक्झॅक्चुअली...

मीही त्याच कारणासाठी आलेलो.. बदनाम हुए तो क्या नाम तो हुवा.. अस्सा एकंदर प्रकार दिसतोय.

अप्पा जोगळेकर's picture

4 Sep 2011 - 5:42 pm | अप्पा जोगळेकर

चार पेग डाउन असताना लिखाण करणे ही वाईट सवय आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Sep 2011 - 1:24 pm | परिकथेतील राजकुमार

गेले १ वर्ष आणि ३ आठवड्यात आपण मिपाचा वापर फक्त स्वतःचे लेखनच प्रसवायला केलेला दिसतो :) इतर कुठल्याही धाग्यांवर आपला सहभाग शून्य आहे. अशा सदस्याचे लिखाण वाचावे तरी का आणि प्रतिक्रिया का द्यावी असे प्रश्न पडतात.

मागच्या ४ धाग्यांचे शीर्षक पाहता आपण या वेळी धाग्यात आपले नाव टंकायला विसरलात की काय ही शंका आली....

आपण प्रवाशांचा एक वर्ग करावयाला विसरलात असे वाट्टे....
३) झकमारुन प्रवास करावा लागणारे...
या वर्गात अशा लोकांचा समावेश होतो ज्यांना inevitable कारणांमुळे प्रवास करावा लागतो....
मग त्यासाठी ते काहीही करतात....रेल्वेमध्ये संडासाला चिकटून उभे-आडवे गुव-मुताचा वास घेत झोपतात....कळकटलेल्या कपड्यांसहित तेथेच बसुन असतात....
किंवा झेपत असले तरीही तिकिट मिळत नाही म्हणुन अशा परिस्थितीत प्रवास करतात..

>>>>राहण्याची रूम, बाथरूम जिथे आपण पांच मिनिटांच्या वर नसतो तेच महत्वाचे....>>>>
आपण घरी असता तेव्हा उघड्यावर बसता का? मग पाहिली जराशी सोय तर काय गेलं?
आधीच प्रवासात आय-भैण झालेली असते अन जर आराम/शौच करण्याची सुविधा असेल तर इथे येउनही तेच का करावे ? त्यापेक्षा थोडासा आराम केला तर काय बिघडलं?

>>>>१) हौस म्हणून प्रवास करणारे फक्त विरंगुळा व हौस म्हणूनच प्रवास करणे स्वीकारतात ते सहसा प्रवासी संस्था अथवा प्रवास व्यवस्थापक यांच्या माध्यमातूनच प्रवास करणे उचित समजतात. यांना आराम वा मजा म्हणून प्रवास करणे आवडते.
२) सर्व प्रवास संपवून परत आल्यावर त्यांना असे वाटत नसते की ते दमून आलेले आहेत व येताना उदंड थकवा घेऊन आलोत, बडा मजा आया अशा समाधानात त्यांचा प्रवास संपतो. >>>>
प्रवासाचे हौस असलेले प्रवासी अन हौस म्हणुन प्रवास करणारे प्रवासी यांची डेफिनिशनच क्लियर होत नाहीये.... तुमचं शास्त्र थोडं गंडलंय असं वाटतंय.... कारण जर आम्ही मजा म्हणुन प्रवास करत असु तर आणी तरच बडा मजा आया असं वाटत प्रवास संपतो... पण शीण हा येतोच.... आपण काय विवेकानंद नाय... प्रवास करुनही शीण न यायला...

एकदम **ल लेख आहे.....
देशाटन करुन थोडासा श्रमपरिहार केला असता.... इतके घाण काही आलं नसते असे वाट्टे.....

-- प्रवासात लेख प्रसवु नये या विचारांचा मिपाकर

कुंदन's picture

5 Sep 2011 - 3:23 pm | कुंदन

आमच्या प्रा डॉ कडुन जरा लेख कसे लिहावेत ते शिका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Sep 2011 - 4:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>आमच्या प्रा डॉ कडुन जरा लेख कसे लिहावेत ते शिका.
मराठी संकेतस्थळावर लिहितांना अजूनही माझ्याकडून भरपूर चुका होतात. काळजीपूर्वक लिहिण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे माझ्याकडून शिकण्यासारखं काही नाही. पण, मिपाकरांनी काही सुचना केल्या आहेत. लेखकाने सूचनांकडे लक्ष दिले तर वाचन सुसह्य होईल असे वाटते.

''प्रवास करणाऱ्या व्यक्ती दोन प्रकारात विभागता येतील'' इथपर्यंत आलोय.
पुढे काही वाचायचा मूड लागेना. :(

-दिलीप बिरुटे

मिपाकर मंडळी प्रतिसादांमध्ये एव्ह्ढं भरभरुन लिहत आहेत तरीही प्रोफ. डॉ.संजय होनकळसे M.A. M.Com.M.Phil,M.D.(A.M.),LL.B मात्र त्याला प्रत्त्युत्तर म्हणून एक अक्षरही लिहायला तयार नाहीत.

पराशेठने मागे एकदा संदर्भ दिलेलं "एकदा लेख लिहिला की तो गंगार्पण झाला असा समजायचा. पुन्हा त्याच्याकडे मागे वळून पाहायचं नाही" हे नानावाक्य फारच मनावर घेतलेलं दिसतंय :)

अन्या दातार's picture

5 Sep 2011 - 10:03 pm | अन्या दातार

.................मात्र त्याला प्रत्त्युत्तर म्हणून एक अक्षरही लिहायला तयार नाहीत.

कशाला विचार करतोस धन्या? आपणही डॉक्टरसाहेबांच्या लेखावर एकदा(जरी) प्रतिक्रिया लिहिली की ती गंगार्पण झाली असे समजायचे पुन्हा त्याच्याकडे मागे वळून पाहायचं नाही ;)