गुर्जिएफचा छोटासा किस्सा

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
19 Aug 2011 - 3:05 am

खरं म्हणजे एवढं छोटं लिहायला नको. मी खूप किस्से टाकणार होतो - पण चपखल आढळले नाहीत. तुमच्याकडेही अशा झक्की लोकांचे किस्से असतील तर या धाग्यावर टाका. अनेक लेख वाचून जे हाती पडेल ते कदाचित एखाद्या छोट्याशा प्रसंगातुनही चमकू शकतं.

गुर्जिएफ : http://en.wikipedia.org/wiki/George_Gurdjieff

गुर्जिएफकडे एक पत्रकार आला. तो त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला आला होता! गुर्जिएफ चहा घेत होता, त्यानं त्या पत्रकारालाही जवळ बसवून घेतलं. अन जवळच बसलेल्या एका शिष्येला गुर्जिएफ म्हणाला की, ‘आज काय वार आहे?’ त्याची शिष्या म्हणाली की, ‘आज रविवार आहे’. गुर्जिएफनं जोरात टेबलावर मूठ आपटली अन म्हणाला, ‘रविवार असणं कसं शक्य आहे? कालच तर शनिवार होता!’ त्या पत्रकारानं ते ऐकलं आणि त्याचे धाबे दणाणले की हा माणूस असा कसा आहे! अन गुर्जिएफ इतका चिडला होता की त्यानं टेबलावर मूठ आपटली अन म्हटलं की, ‘आज रविवार कसा असू शकेल! तू कुणाला फसवते आहेस! तू काय समजलीस! कालच शनिवार होता अन आज रविवारही आला?’
तो पत्रकार उठून उभा राहिला. तो म्हणाला, ‘नमस्कार! मी जातो.’ जेव्हा तो निघून गेला, तेव्हा गुर्जीएफचं हसणं पाहाण्याजोगं होतं! गुर्जीएफ हसला! तो म्हणाला की, ‘या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’

विनोदमौजमजाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

टिळकांचे २ किस्से जालावर सापडले. मिपाच्या नियमात बसत नसेल तर उडविण्यात यावेत. पण किस्से तर सगळीकडेच सारखे असणार.
-
(१) एकदा मास्तरांनी विचारले "आभाळ कोसळले तर काय कराल?" त्यावर नाना मुलांनी नाना प्रकारची उत्तरे दिली मात्र टिळक म्हणाले - मी नवे आभाळ निर्माण करेन.

(२) टिळकांनी आपल्या मुलाला जेव्हा पत्र लिहीले त्यात त्यांला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे - आधीच दोनदा नापास झालायस. त्यात कामाच्या वेळेत टिवल्याबावल्या करायची तुला सवय आहे. पण तुझ्या मॅट्रीकच्या परीक्षेतील गुणांवर तुझे भवितव्य ठरणार आहे.
.
.
इथपर्यंत ठीक आहे म्हणजे सामान्य माणसासारखे आहे पण पुढे लोकमान्य लिहीतात -
.
.
मॅट्रीकनंतर काय करायचं ते तुझं तू ठरव. चर्मकार व्हायचे असेल तर हो पण जोडे असे शीव की सार्‍या जगाने म्हटले पाहीजे की चांगले जोडे हवे असतील तर टिळकांकडे जा.

किसन शिंदे's picture

19 Aug 2011 - 10:39 am | किसन शिंदे

हा छोटासा किस्सा छानच आहे पण त्या झुकती है...च्या पुढच्या भागाचं काय झालं? कधी टाकताय?

योगी९००'s picture

19 Aug 2011 - 1:20 pm | योगी९००

स्पष्ट सांगायचे म्हणजे मला एवढेच मात्र कळले की गुर्जिएफ नावाचा कोणतरी मोठा माणूस होता आणि त्याने (वेळ जात नव्हता) म्हणून) जवळ बसलेल्या शिष्येच्या मदतीने एका पत्रकाराबरोबर उगाचच फालतू Timepass केला..(कदाचित शिष्या अगदीच जवळ बसली असेल म्हणून त्याने विचित्र वागून पत्रकाराला जाण्यास भाग पाडले..)

मोठ्यांच्या छोट्या गोष्टी ...एवढेच म्हणेन..

तो पत्रकार उठून उभा राहिला. तो म्हणाला, ‘नमस्कार! मी जातो.’ जेव्हा तो निघून गेला, तेव्हा गुर्जीएफचं हसणं पाहाण्याजोगं होतं! गुर्जीएफ हसला! तो म्हणाला की, ‘या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’
हे नक्की कोण म्हणाले...माझ्यामते पत्रकार म्हणाला असावा...

गवि's picture

19 Aug 2011 - 1:43 pm | गवि

सॉक्रेटिसचा एक किस्सा कणेकरांच्या पुस्तकात वाचला.

सॉक्रेटिसची महाकजाग बायको झांटिपी हिने भांडणातून सॉक्रेटिसच्या अंगावर उकळते पाणी ओतले. त्यामुळे विव्हळत तो बसलेला असतानाच एक शिष्य कम मनुष्य काही शंका घेऊन तिथे आला होता. सॉक्रेटिसची अवस्था बघून तो परत जायला निघाला. सॉक्रेटिसने त्याला त्याही अवस्थेत विचारलं की तुझी शंका काय आहे, विचार.

"मी लग्न करावं की नाही?" असा प्रश्न विचारायला आलो होतो. मला तुमची अवस्था पाहून त्याचं उत्तर मिळालंय..

सॉक्रेटिस तशाही अवस्थेत म्हणाला," मी तुला लग्न कर असाच सल्ला देईन.."

शिष्याची प्रश्नार्थक आणि आश्चर्यचकित अवस्था पाहून सॉक्रेटिसने स्पष्टीकरण दिलं," म्हणजे असं बघ, तू लग्न कर.... तुला चांगली बायको मिळाली तर सुखी होशील.. अन वाईट मिळाली तर सॉक्रेटिस होशील.."

Nile's picture

19 Aug 2011 - 1:46 pm | Nile

वरील किस्सा एका कजाग बायकोच्या तावडीत सापडलेल्या विवाहीताने बनवला आहे असे आमचा एक अविवाहीत मित्र सांगतो होतो. खरे खोटे सॉक्रेटीसच जाणो.

आदिजोशी's picture

19 Aug 2011 - 2:27 pm | आदिजोशी

एकाच वाक्यात २ समानार्थी शब्द वापल्याबद्दल नाईल्याच्या णिषेध ! णिषेध !! णिषेध !!!

किस्सा कुणी बनवला याचा थोडा थोडा अंदाज येतोय बर. ;)

किस्सा कुणी बनवला याचा थोडा थोडा अंदाज येतोय बर.

=)) =))

आत्मशून्य's picture

19 Aug 2011 - 2:38 pm | आत्मशून्य

नक्कि कोण कोणाला व सर्वात महत्वाचं म्हणजे का म्हणालं की ‘या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’ ?

योगी९००'s picture

19 Aug 2011 - 2:42 pm | योगी९००

नक्कि कोण कोणाला व सर्वात महत्वाचं म्हणजे का म्हणालं की ‘या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’ ?

मी पण हेच वरती म्हणलेय...फक्त का म्हणालं ते कळते..

किसन शिंदे's picture

19 Aug 2011 - 2:57 pm | किसन शिंदे

‘या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’ ? हे विधान अर्थातच गुर्जिएफ म्हणाले असतील कारण पत्रकाराला हे वाक्य जर उच्चारायचं असतं तर त्याने मुर्खा एवजी मुर्खांबरोबर हा शब्द वापरला असता कारण त्या वेळी त्यांच्याबरोबर त्यांची शिष्या सुध्दा होती. ;)

योगी९००'s picture

19 Aug 2011 - 3:15 pm | योगी९००

त्या शिष्येचा यात काही दोष दिसत नाही...तिने फक्त गुर्जिएफ च्या प्रश्नांना उत्तरे दिली...त्यामुळे तिला मुर्ख म्हणण्यात काही point नाही..

अर्थात ती अशा माणसाची शिष्या झाली म्हणजे निश्चितच शहाणी नसणार...

किसन "‘या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’ ? हे वाक्य गुर्जीएफ साठीही असू शकते.
पत्रकाराला जर गुर्जीएफ्च्या शिष्येसोबत वेळ घालवायचा असेल तर ? मग गुर्जीएफ एकटा उरतो ना ? (म्हणून मुर्खाबरोबर , मुर्खांबरोबर नाही) :X :-X :oups:

बाकी गविन्प्रमाणेच. गुर्जीएफ कोण ? मला वाटले कि मिपावरील कोणा गुर्जीन्विषयी लिहिलेय.

आत्मशून्य's picture

21 Aug 2011 - 1:17 am | आत्मशून्य

अशा शिष्या आम्हाला का मिळत नाहीत की आम्हालाही समोरील पत्रकाराबद्दल या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’ असे विचार मनात यायला प्रवृत्त व्हावे ? थोडक्यात हा किस्सा ती शीष्या कसली सॉलीड असली पाहीजे हे सांगण्या करताच टंकाल गेला असावा. असो हा एक पकाऊ विनोद होता खर तरं गूरू शिष्याचं नातं फार पवित्र असल्याने मी म्हणेन.....

......समजा आपण असा विचार केला तर ? ‘रविवार असणं कसं शक्य आहे? कालच तर शनिवार होता!’ म्हणजेच त्याला त्याच्या विद्यार्थी शिष्येला शनिवार नंतर रविवार येतो हे बहूतेक समजावायचे असेल अथवा हे जर आधीच समजावले असेल तर ते तिला खरच समजले आहे के नाही हे तो क्रॉस चेक करत असेल. म्हणजेच शनिवार नंतर रवीवार येतो ही गोश्ट तो शिष्येला शिकवत/वदवत असतानाचा नेमका प्रसंग पत्रकारा समोर घडला, पत्रकाराने विनाकरण पळ काढल्यावर सदरील प्रकार समोरील पत्रकाराच्या ध्यानात येऊ नये याचं त्याला आश्चर्य व हसू येत असेल म्हणूनच तो बोलला असेल की ‘या मूर्खाबरोबर वेळ घालवण्यात काय अर्थ!’ काय म्हंता मित्र हो , थिअरी बराबर हाय ना ?

पत्रकारासोबत वेळ वाया घालवायचा नव्हता इतपत ठीक, पण तो (पक्षी पत्रकार) मूर्ख आहे हे म्हणण्यासाठी काहीतरी पार्श्वभूमी हवी होती... असं सर्वांचं म्हणणं आहे असं माझं निरिक्षण आहे.
आपण मूर्खासारखे वागण्याचं नाटक करुन समोरच्याला मूर्ख म्हणायचं यातला गर्भितार्थ नाही कळला.. नॉट समझींग्ड.. पण असेल काहीतरी म्हणून काही मतप्रदर्शन केले नाही...

आणखी एक मूलभूत मुद्दा..

कोण गुर्जीएफ?
(तिथे एक विकिधागा दिलेला दिसतोय. पण उघडायचा आळस केलाय. पटकन कोणी सांगेल तर जास्त बरे.)

धन्यवाद..

-गविएफ.

गुर्जीएफ नावाचा एक थोर माणूस होऊन गेला. हा माणूस फारच थोर होता. अनेक लोकं त्याला भेटायला आणि मुलाखत घ्यायला येत ह्यावरून तो बर्‍यापैकी प्रसिद्धही होता असं समजण्यास वाव आहे.

अवांतर - आपल्या कडले अनेक गुर्जी आणि हा गुर्जीएफ ह्यांचा काही संबंध आहे का?

योगी९००'s picture

19 Aug 2011 - 3:19 pm | योगी९००

मी सुद्धा हेच म्हणणार होतो..तुम्ही आधी नंबर लावला..

बाकी गुर्जीएफ की एफगुर्जी अशी ही एक शंका मनात आली..

इरसाल's picture

19 Aug 2011 - 3:31 pm | इरसाल

अतिशय भयानक !!!!
ओ जरा कंट्रोल , हसून हसून चहाचा फवारा उडाला ना .

किसन शिंदे's picture

19 Aug 2011 - 3:44 pm | किसन शिंदे

हॅहॅहॅ... हे बाकी जबराय हा.

आता खरा काय तो उलगडा यशवंतच करू शकेल त्यामुळे... जस्ट वेट अँड वॉच :)

मराठे's picture

20 Aug 2011 - 12:32 am | मराठे

>> कोण गुर्जीएफ?

फार मोठा माणूस होता. लहानपणीच वारला बिचारा

(लक्ष्या - शांतेचं कार्टं चालू आहे.)

किस्सा आवड्ला नाही हे नमूद करू इच्छिते.

किस्स्यामध्ये आवडण्यासारखं काय होतं हे कळालं नाही हे नमुद करु इच्छितो.

रमताराम's picture

20 Aug 2011 - 3:00 pm | रमताराम

आम्ही भाषांतरित केलेले मुल्ला नसरुद्दिनचे काही किस्से. स्वतंत्र धागा टाकला असता पण ती ब्लॉगपोस्ट जुनी आहे, त्यामुळे परा लगेच डायरी ठेवण्याचा सल्ला देईल अशी भीती वाटली. अर्थात आपल्या ब्लॉगची - ते ही अर्धमृतावस्थेत असलेल्या - जाहिरात केलेली आहे असा आक्षेप दुसरा कोणी घेईलच. पण ता जांव.

ररा.. सगळे किस्से आवडले!!!!

गुर्जीएफ नावाचा एक थोर माणूस होऊन गेला.....

गुर्जीएफ बद्दल इथे वाचा:
http://en.wikipedia.org/wiki/George_Gurdjieff
http://www.messagefrommasters.com/Life_of_Masters/Gurdjieff/Gurdjieff.htm
http://www.gurdjieff-legacy.org/
http://www.gurdjieff.com/about.htm

वगैरे.

pramanik's picture

26 Aug 2011 - 9:17 pm | pramanik

आता हा कीस्सा ऐकुन आमचे सर कीती मोठ्या मनाचे ह्याचा अंदाज यावा.
एकदा वर्ग सुरु असताना मागच्या बाकांकडुन 'प्वॉsssssक' असा आवाज आला व एकच हस्यकल्लोळ माजला.आमचे सर काय झाले म्हणुन बघायला गेले.तर तिथे गेल्यावर तिथल्या वातावरणावरुन त्यांना काय झाले असावे ह्याचा अंदाज आला.

सर दुर्लक्ष करुन जायला निघाले तेव्हा 'कोण रे कोण?' असा संवाद त्यांना ऐकु आला,तेव्हा सरांनी स्वःताच तोंडाने 'प्वॉsssक' असा आवाज काढला.सर्व खदाखदा हसायला लागले.

सर म्हणाले 'माझ्या विद्यार्थ्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले,बस्स अजुन काय हवे'

विद्यार्थ्यासाठी निंदानालस्की झाली तरी चालेल पण विद्यार्थांना उत्तरे मिळायला हवी हे त्यांचे प्रामाणिक मत होते.