मुलगी वाचवा !!!

काल पंधरा ऑगस्ट. सूट्टीच्या दिवशी कूठला सुशिक्षित निवांत उठतो तसाच उठलो. घडयाळात पाहीलं. नऊ वाजले होते. लवकर का उठवलं नाही म्हणून आईला विचारलं. "मी तुला उठवायला गेलेय आणि तू लवकर उठला आहेस असं कधी झालंय का?". मी ओशाळं हसलो. "ठीकंय ठीकंय" म्हणत कामाला लागलो...

"अरे काय करतो आहेस घरी. ये लवकर. गुरुजी आणि मुलं वाट पाहत आहेत." ईति फोनमधून बाबा.
""हो हो. आवरलंच. येतो पंधरा मिनिटांत शाळेत."

... बरीचशी उलथापालथ करत शेवटी एकदाचा वह्यांचा आणि कंपास पेटयांचा खोका शोधून काढला. गाडीच्या डीकीत टाकला. चार पाच मिनिटे रीव्हर्स फॉरवर्ड करत एकदाची गाडी वळवली... मोजून पाचव्या मिनिटाला शाळेत...

... माझी अवघडलेली अवस्था गुरुजींनी ओळखली. गुरुजी त्यांच्या खुर्चीवरुन उठले. "अरे बस इकडे..." मला हायसं वाटलं. त्या गंज लागलेल्या पत्र्याच्या मोडक्या खुर्चीवर कसं बसायचं हा माझा गहन प्रश्न गुरुजींनी माझ्या चेहर्‍यावरील भाव पाहून चुटकीसरशी सोडवला...

..."मी ईंजिनीयरींग कॉलेजला लेक्चरर असताना खुप बडबड करत असे. अभ्यासाचा विषय कमी आणि बाकी भंकस जास्त करत असे. पण ती मुलं मोठी असायची. जवळपास माझ्याच वयाची. फार फार तर माझ्यापेक्षा एक दोन वर्षांनी लहान. तुमच्यासारख्या चिमुरडयांसमोर काय बोलायचं हा तसा प्रश्नच आहे. तरीही मी प्रयत्न करतो. स्वराज्य मिळालं आम्ही खुश झालो. पण आज साठ पासष्ट वर्ष होउनही स्वराज्याचं सुराज्य झालं का हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो...."

... मी माझ्या भाषणाच्या सुसाट सुटलेल्या कोकणकन्या एक्स्प्रेसला ब्रेक लावला. खुर्चीवर बसायला आलो. पुन्हा गुरुजी चांगल्या खुर्चीत. ती मघाचीच पत्र्याची गंजलेली मोडकी खुर्ची रिकामी. आता मात्र माझी मलाच शरम वाटून मी मुकाटयाने त्या पत्र्याच्या खुर्चीवर बसलो.

... पाच दहा मिनिटे गेली. ती खुर्ची इतकी म्हातारी झाली होती की तिला माझं साठ किलो वजनही सहन न होऊन तिनं दम तोडला. आम्ही धाडकन जमिनीवर. भाषणे ऐकताना आणि देताना आलेला ताण विसरून ती सारी चिमुरडी अगदी खळखळून हसली. आमची अवस्था आता धरतीमाता दुभंगून पोटात घेईल तर बरे अशी...

"अरे गोरेगांवला का जातोय आता?" ईति बाबा.
"शाळेसाठी खुर्च्या घ्यायच्या आहेत." अस्मादिक.

... "एक्स्क्युज मी. तुम्ही गाडी पुढे स्टँडवर नेऊन लावला का?"
गोरेगावात आणि "एक्स्क्युज मी"? रोटरी क्लबवाला असणार. मी त्याच्याकडे न पाहताच ओळखले.
"का बरे?"
"इकडून आता मॅरेथॉन जाणार आहे."
"हरकत नाही. मी गाडी दाबून लावतो." मीही त्याच गावचा होतो.

मॅरेथॉन सुरु झाली. मुलांची झुंडी रस्त्यावर धावू लागल्या. पांढरा विना कॉलर टीशर्ट त्यावर पाठीवर रोटरी क्लबचं चिन्ह. पोटाकडे "मुलगी वाचवा. भविष्य घडवा" ही घोषणा.

हा विषय तसा माझ्याही डोक्यात आधीपासून घुमत होता. मागे एकादशीला पंढरपूरला गेलो असता एका एसटी बसवर स्लोगन वाचली होती, "मुलगी नको मुलगी नको, मग मुलाला नवरी मिळेल का? पाचांत एक द्रौपदी कलीयुगात चालेल का?"...

प्रशांतकडून हार्ड डीस्क घेतली. घरी आलो. त्याने काही मुव्ही टाकले होते हार्ड डीस्क मध्ये. एक रँडमली सुरु केला. मुव्ही होता, मातृभूमी, अ नेशन विदाऊट वुमेन. शेवटपर्यंत पाहत राहीलो. बराचसा विनोदाच्या अंगाने जाणारा मुव्ही. परंतू त्यातून मिळणारा संदेश झोप उडवणारा होता...

संध्याकाळी पुण्याला आलो. येत असताना मनात तेच विचार. काहीतरी करायला हवं. अगदी काही भव्यदिव्य नाही करता आलं तरी खारीचा वाटा उचलायला हवा...

पेंट डॉट नेट सुरु केलं... जालावर चित्रे शोधली, आणि काही पोस्टर्स बनवले...

(वापरलेली सारी चित्रे जालावरुन साभार)

लेखनविषय:: 

प्रतिक्रिया

तुमचे पोस्टर्स चांगले आहेत...संदेशही उत्तम आहेत आणि आशा आहे की लोकांना हळुहळु का होईना पण अक्कल येईल.

***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/

+१.

नडला त्याला फोडला आणि नंतरची देवाक काळजी...!!!

+२

मला स्वत:ला एक मुलगी आहे आणि मला त्याचे अजिबात दू:ख नाही. उलट कधी कधी (काही लोक आत्तापासून तिचा भावी सून म्हणून विचार करतात तेव्हा) मनोमन सुखावायलाच होते.पण समाजाचा मुलीबद्दल असलेला दृष्टीकोन लक्षात घेताना काही गोष्टी लक्षात येतात.

० मुलगी ही परक्यांच धन हा समज - त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्‍या खर्चाचा मुलगी वाढविणार्‍या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही. जो मुलाच्या बाबतीत थोडाफार मिळु शकतो.
० मुलगी नवर्‍याचा वंश वाढवते - एकुलती एक मुलगी असेल तर प्रॉपर्टी परक्या घरी घेऊन जाते, हा दृष्टीकोन

या दोनही समस्याना "समाधानकारक" उत्तरे समाजाला मिळत नाहीत तो पर्यंत मुलींबद्दल समाजात आकस राहणार.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

सहमत आहे.

नुकताच एक लेख वाचनात आला होता की वन-चाईल्ड पॉलीसी चायनीय मुलींना कशी फायदेशीर ठरली आहे.
अर्थात जर ती मुलगी जन्मली तर.. तिथेही भ्रुण हत्यचे व बालमृत्युचे प्रमाण मोठे.

लेख व पोस्टर्स छान!

युयुत्सुरावांनी मांडलेल्या मुद्दयांशी सहमत...

लेख व पोस्टर्स छान!

धन्यवाद सहजदादा smiley

स्लोगन्स खरच छान आहेत! चित्रही पूरक!

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

नेमका संदेश देत आहात. कार्य आवडले आहे.
ही चित्रे प्रताधिकार मुक्त करावीत अशी विनंती करतो!
म्हणजे कुणीही आपल्या ब्लॉग ते खरडवही सर्वत्र लावू शकेल. तसेच याची छोटी व्हर्जन्स बनवून ती सहीत लावता येतील.

-निनाद

ही चित्रे प्रताधिकार मुक्त करावीत अशी विनंती करतो!

निनाद, मुळ चित्रांवर माझा हक्क नाही. खरं तर मीही ही चित्रे कुणाची परवानगी न घेता वापरली आहेत. अर्थात चित्रे चांगल्या कामासाठी वापरली असल्यामुळे तसेच केला जाणारा वापर हा चित्राच्या मुळ हेतूला दुजोरा देत असल्यामुळे कुणी हरकत घेणार नाही असे वाटते.

जोपर्यंत चित्रांचे मुळ हक्कदार कुठल्याही प्रकारची हरकत घेत नाहीत, तोपर्यंत ही चित्रे वापरण्यास माझ्याकडून कुठलीही हरकत नाही.

या चित्रांवर प्रताधिकार लागू आहे. कृपया प्रताधिकार भंग टाळावा असे वाटते. चित्रे परिणामकारक आहेत आणि सामाजिक कारणासाठी वापरली असली तरी त्याविरुद्ध कारवाई होऊ शकते. त्यामुळे असे टाळले तर बरे, किंवा ते टाळावेच!

यापेक्षा चित्रगुप्त यांना विनंती केली तर उत्तम चित्रे काढून देतील. आपल्यातल्या अनेक छायाचित्रकारांना विनंति केली तर अशी चित्रे मिळू शकतील.

या शिवाय विकिवर अनेक प्रताधिकार रहीत चित्रे मिळतात. (लायसन्स पाहून घेणे!) विकिमिडिया पाहा. शोध कसा घ्यावा याची इंग्रजी भाषेत असलेली माहिती येथे आहे.

-निनाद

प्रताधिकार हा व्यावसायिक उपयोगासाठी लागू असतो की सर्व?

...अनलेस स्पेसिफिकली स्टेटेड अदरवाइज़, समीक्षणे वगैरेंमध्ये लागू शकणार्‍या फुटकळ ('मर्यादित' अशा अर्थी) उद्धरणांव्यतिरिक्त बहुधा सर्वत्र लागू असावा. (खात्री करून घ्यावी लागेल.)

केलेला उपयोग हा व्यावसायिक नाही, केवळ या कारणास्तव प्रताधिकार आणि पूर्वपरवानगीची बंधने बहुधा ऑपॉप शिथिल होत नसावीत. (प्रताधिकारधारक फुटकळ केसिसमध्ये कारवाई करण्याच्या भानगडीत पडेलच असे नाही, हा भाग वेगळा. करायची झाल्यास करण्याचा अधिकार बहुधा राखून ठेवत असावा.)

- पंडित गागाभट्ट.


"I don't owe the world an explanation. (I may, however, at my own discretion, choose to offer my opinion, for free or for a consideration, on my terms and at my price.)

Take it, or leave it."

लेखकाची कळकळ समजली. समाज जागृत होईल तेव्हाच खरे.


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

पोस्टर/चित्रे दिसत नसल्याने वरील रिप्लायमधुनच त्याचा आनंद घेतला.
मुलगी वाचवा .. हे बरोबर आहेच..
उलट माझ्या ओळखीचे जे जे लोक आहेत त्यां सर्वांना आपल्याला मुलगीच व्हावी अशीच इच्छा आहे..
आणि जे जुने लोक आहेत, त्यांच्या मुली सासरी गेल्यानंतर त्यांचे अनुभव खरेच काळजाला भेद देतात..
मुलगी म्हणजे काय असते हे तेंव्हा त्यांना कळालेले असते आणि आपल्याला समजत असते.

-
शब्दमेघ .. एक मुक्त.. स्वैर.. स्वछंदी जीवन
"पारिजातकाचे आयुष्य लाभले तरी चालेल , पण लयलुट करायची ती सुगंधाचीच "

माझ्या ओळखीचे जे जे लोक आहेत त्यां सर्वांना आपल्याला मुलगीच व्हावी अशीच इच्छा आहे..

चला, माझ्या मुलाच्या लग्नाचा प्रश्न मिटलेला आहे....
गणेशा, आपणांस योग्य वेळी संपर्क करण्यात येइल....

= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो =

गणेशा व वडापाव यांच्याशी सहमत.
मीही मुली असणार्‍यांवर जरा लक्ष ठेवून असते.smiley
पुढं मुलानी न जाणो माझ्यावरच मुलगी शोधायची जबाबदारी टाकली तर स्थळं माहीत नकोत का?smiley
आता हुंड्याची तयारी ठेवावी लागतिये की काय अशी शंका मुलींच्या घटलेल्या प्रमाणावरून वाटतिये,
आमच्याकडे माझ्या धाकट्या भावाला मुलगीच व्हावी म्हणून आम्ही फक्त नवसच बोलायचा बाकी ठेवला होता......पण देव पावला आणि मुलगी झाली. आम्ही सगळीकडं पेढेच वाटले त्याबद्दल किती ते टोमणे!

आता हुंड्याची तयारी ठेवावी लागतिये की काय अशी शंका मुलींच्या घटलेल्या प्रमाणावरून वाटतिये,

समाज वेळीच जागा झाला नाही तर असा दिवस फार दूर असेल असं वाटत नाही.

पण देव पावला आणि मुलगी झाली. आम्ही सगळीकडं पेढेच वाटले त्याबद्दल किती ते टोमणे!

चालायचंच. प्रवाहाविरुद्ध पोहायचं म्हटलं की असा त्रास व्हायचाच. खुप छान वाटलं मुलीच्या जन्मानंतर पेढे वाटले हे वाचून smiley

प्रवाहाविरुद्ध पोहायचं म्हटलं की असा त्रास व्हायचाच.

यात 'प्रवाहाविरुद्ध पोहणे' नेमके काय आहे? एक फुटकळ कन्वेंशन मोडले, एवढेच. जमीन हादरवणारा मूलभूत फरक असा नेमका काय पडला?

- पंडित गागाभट्ट.


"I don't owe the world an explanation. (I may, however, at my own discretion, choose to offer my opinion, for free or for a consideration, on my terms and at my price.)

Take it, or leave it."

यात 'प्रवाहाविरुद्ध पोहणे' नेमके काय आहे?

खेडयाकडे चला. या गोष्टी शहरात राहून नाही कळणार. smiley

मुलगी झाली. आम्ही सगळीकडं पेढेच वाटले त्याबद्दल किती ते टोमणे!

पेढ्यांऐवजी केक वाटला असता, तर टोमणे मिळाले असते का? साशंक आहे.

मला वाटते हे पेढे/बर्फी आणि मुलगा/मुलगी यांचे जे काही असोशिएशन आपल्या समाजमनात फिट्ट बसून राहिलेले आहे, त्याचा हा दुष्परिणाम आहे. हे असोशिएशन जर मोडून काढायचे असेल, तर उपाय एकच: मुलगी होवो की मुलगा, केक वाटा!

(बाकी ही काहीकाही असोशिएशने फार विचित्र असतात, नि त्रासदायक ठरू शकतात. अमेरिकेत असलेल्या ठराविक वयोगटातल्या विवाहित मुलाकडे किंवा मुलीकडे आई किंवा वडील यांपैकी कोणी भेटावयास येणार असेल, तर बाय डीफॉल्ट काहीतरी "गुड न्यूज़" आहे या गृहीतकानिशीच पुढील चौकशा सुरू होतात, त्या का, कोण जाणे. आईवडिलांपैकी कोणाच्या येण्याने शुभवर्तमान कसे प्रसवते, कळत नाही. आणि या दराने मला आजवर किमान अर्धा डझन मुले असायला हवी होती. एकच आहे. आई किंवा सासूसासरे यांपैकी कोणाचाच पायगुण एवढा प्रबळ नव्हता, एवढाच निष्कर्ष यावरून मी काढू शकतो. असो.)

- पंडित गागाभट्ट.


"I don't owe the world an explanation. (I may, however, at my own discretion, choose to offer my opinion, for free or for a consideration, on my terms and at my price.)

Take it, or leave it."

हे असोशिएशन जर मोडून काढायचे असेल, तर उपाय एकच: मुलगी होवो की मुलगा, केक वाटा!

माझ्या माहितीप्रमाणे मुलगा झाला हे सुचवण्यासाठी "पेढे मिळणार/वाटणार" अशे शब्द तर मुलगी झाली हे सुचवण्यासाठी "बर्फी वाटणार्/मिळणार" असे सुचक शब्द वापरले जातात. मुलगा झाल्यावर पेढे वाटलेही जातात. परंतू मुलगी झाल्यावर मात्र कुणी सहसा बर्फी वाटण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे पंगाशेठ, जरा इकॉनॉमिकली फिजिबल अल्टरनेटीव सुचवा की. smiley

उलट माझ्या ओळखीचे जे जे लोक आहेत त्यां सर्वांना आपल्याला मुलगीच व्हावी अशीच इच्छा आहे..

शहरांमध्ये असं घडतंय खरं. परंतू खेडयांमधील परिस्थिती खुपच चिंताजनक आहे. आणि ही परिस्थिती टाळण्यासाठी "वंशाचा दिवा" सारख्या संकल्पनांवर जनजागृती अतिशय आवश्यक आहे.

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

उत्तम उपक्रम आहे smiley

चित्रे आणि त्याखालील संदेश दोन्ही अत्यंत आवडल्या गेले आहेत. चित्रांची निवड आणि संदेशांची रचना नेमका परिणाम साधणारी.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

पराशी सहमत.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली

असेच म्हणते

सहमत आहे.

धन्यवाद मंडळी !!!

उत्तम उपक्रम आहे.

मी एव्हढयावरच थांबणार नाही. आमच्या गावच्या गृप ग्रामपंचायतीमधील चार गावे, आजुबाजूची चार सहा गावे अशा एकुण आठ दहा गावात माझी "फारीन रीटन इंजिनेर" म्हणून ओळख आहे. त्यामुळे या आठ दहा गावांमधील भींतीवर हे पोस्टर्स मी स्वतः लावू शकेन.

उरली आजुबाजूची शहरवजा तालुक्यांची गावं. तिथल्या रोटरी क्लबवाल्यांना सहभागी करुन घेईन... smiley

धनाजिराव या तुमच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात मी सहभागी होतोय, बाकी व्यनित बोलुच.

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

लेख आवडला. चित्रेही पूरक आहेत.

याच विषयावर म्.टा.त आलेली परळीकांड नावाची लेखमाला आठवली

पुरी जाईचिया फुल फाकणे| त्याचि नाम जैसे सुकणे|
तैसे कर्मनिषे न करणे| केले जिद्दी|

सगळी चित्रं छान आहेत बालशिवाजी फारच गोड आहे.

धन्यवाद रेवतीताई.

पहिलं चित्र सोडलं तर फक्त चित्रांवरील शब्दरचना माझी आहे. चित्रे माझी नाहीत. ती मी गुड कॉजसाठी जालावरून ढापली आहेत. smiley

द्रौपदीच्या चित्रामधील घोषणा मी एसटी बसच्या सरकारी जाहीरातीवरुन उचलली आहे.

मागची कळकळ कळून येते.

बघ आई आकाशांत सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला
केशराचे घातले हे सडे भूवरीं, त्यावरून डौलानें ये त्याची ही स्वारी

लेखामागची कळकळ जाणवली,
पोस्टर्स चांगली झाली आहेत.
(जरी जालावरुन चित्रे घेतली असली तरी नेमकी,चपखल चित्रे आणि मजकूर अशी जोडी छान जमली आहे.)
स्वाती

स्वातीसारखंच म्हणते.

लेखामागची कळकळ जाणवली,
पोस्टर्स चांगली झाली आहेत.
(जरी जालावरुन चित्रे घेतली असली तरी नेमकी,चपखल चित्रे आणि मजकूर अशी जोडी छान जमली आहे.)

--- अगदी असेच म्हणतो.

मल हे सर्व पोस्तेर्स मैल करु शकाल का high quality images

तुमचा ईमेल आयडी व्यनि करा. मी इमेजेस पाठवतो.

कल्पक,रंजक आणि उपयुक्त लेख्,विओचार आणि पोस्टर्स

--मनोबा
"The last Christian died on the cross".

तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा!

एक किंचित सूचना - मेणबत्तीच्या पोस्टरमधे "थकलेल्या आयुष्याला उतारवयात मुलगीच" ह्या ओळीत उतारवयात हा एकच शब्द हवा, दोन वेगवेगळे शब्द नकोत.

उत्तम उपक्रम आणि सुरुवात तर अत्युत्तम झाली आहे. या उपक्रमात खारीचा वाटा उचलायला आम्हीपण तयार आहोत.

- पिंगू

- पिंगू

ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ | क्योंकि वक्त नहीं लगता, वक्त बदलने में |

Submitted by युयुत्सु on Tue, 16/08/2011 - 11:21.
मला स्वत:ला एक मुलगी आहे आणि मला त्याचे अजिबात दू:ख नाही. उलट कधी कधी (काही लोक आत्तापासून तिचा भावी सून म्हणून विचार करतात तेव्हा) मनोमन सुखावायलाच होते

मुलगी आहे म्हणून तिचा विचार कोणाची तरी सून ( चूल आणि मूल)असा करणे ही मध्ययुगीन मनोवृत्ती आहे. ती मुलगी एक उत्तम नागरीक / शास्त्रज्ञ / आर्टिस्ट वगैरे होईल समाजाचा एक जबाबदार( पॉझीटीव्ह) ,अभिमानास्पद घटक होईल असा विचार करायला हवा तर तो निकोप दृष्टीकोन होईल.

टंकण्याचे कष्ट वाचवल्याबद्दल, इ. इ.

- पंडित गागाभट्ट.


"I don't owe the world an explanation. (I may, however, at my own discretion, choose to offer my opinion, for free or for a consideration, on my terms and at my price.)

Take it, or leave it."

+२

आपल्य प्रतिसाद चि वात पहात आहे व पोस्तेरचि

धन्यवाद