!! आशाढी एकादशी नीमित्त सर्व भक्तांना हार्दीक शुभेछा..!!

महेश काळे's picture
महेश काळे in काथ्याकूट
11 Jul 2011 - 10:26 am
गाभा: 

!! आशाढी एकादशी नीमित्त सर्व भक्तांना हार्दीक शुभेछा..!!

प्रतिक्रिया

रामदास's picture

11 Jul 2011 - 12:11 pm | रामदास

एक तरी ओवी लिहावी अशी नम्र विनंती.

महेश काळे's picture

11 Jul 2011 - 12:43 pm | महेश काळे

"कोणाचे हे घर । हा देह कोणाचा ।आत्माराम त्याचा । तोचि जाणे ।।'

ज्ञानेश्वरीचा ६ वा अध्याय अद्भुत रसाने परीपूर्ण आहे. यातील अक्षरक्षः अंगावर रोमांच उभे करणारा, माझा आवडता श्लोक आहे. -

ते कुंडलिनी जगदंबा| जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा|
जया विश्वबीजाचिया कोंभा|साऊली केली||
जे शून्यलिंगाची पिंडी|जे परमत्मया शिवाची करंडी|
जे प्रणवाची उघडी|जन्मभूमी||
.
..
.
पिंडे पिंडाचा ग्रासु|तो हा नाथसंकेतीचा दंशु|
परि दाऊनि गेला उद्देशु|श्रीमहाविष्णु||

_________________________________________________________________

संदर्भ - "नाथसंकेतीचा दंशु"
एक शंका आहे - (१) निवृत्तीनाथ हे नाथ संप्रदायाचे. हे ज्ञानेश्वरांचे गुरु. तेव्हा निवृत्तीनाथांकडून नाथसंप्रदायाचे गूढज्ञान ज्ञानेश्वरांना झाले की
(२) प्रत्यक्ष शंकर-पार्वती संवाद करीत असताना क्षीरसागरात मत्स्यरूपाने विहार करत असते वेळी स्वतः विष्णूंनी हे गुप्तज्ञान प्राप्त केले?

मूकवाचक's picture

11 Jul 2011 - 11:19 pm | मूकवाचक

http://atmaprabha.com/index.htm

(या दुव्यावरून पीडीएफ फोरमॅट मधली बायोग्राफी डाउनलोड करा. या पुस्तकात वरील प्रश्नान्ची सविस्तर उत्तरे आहेत)

शुचि's picture

14 Jul 2011 - 1:18 am | शुचि

बघते. अनेक धन्यवाद.

धन्या's picture

11 Jul 2011 - 10:52 pm | धन्या

एकादशीला सुद्धा हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात हे नव्याने कळतंय...

देव करो आणि भविष्यात फोटोशॉपमधून एडीट केलेले "जालीय फ्लेक्स" पाहायला न मिळो हीच पंढरीच्या पांडुरंगचरणी प्रार्थना !!!

आपलाच,
(पंढरपुरात आलेल्या वारकर्‍यांनी चंद्रभागेच्या वाळवंटाची केलेली हागणदारी पाहून व्यथित झालेला)
धनाजीराव वाकडे

गायनाचे रंगी शक्ती अद्भूत हे अंगी
हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडीत सेवा
अंगी प्रेमाचे भरते ने घे उतार सरते
तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी

बाबा महाराज सातारकर यांच्या आवाजातील हरिपाठ

महेश काळे's picture

12 Jul 2011 - 3:19 pm | महेश काळे

फारच छान...