अबोल प्रीत, उमलतेय..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
14 Jun 2011 - 9:57 pm

अबोल प्रीत, उमलतेय पाकळी हळू हळू
कि नेत्र सांगती कथाच आपुली हळू हळू??

हृदय भरून वाहती, तुझेच स्पंद अंतरी
भरेल का मनातली हि पोकळी हळू हळू??

सुरेल मारवा तुझाच भारला इथे तिथे
तुझाच पूरिया घुमेल राऊळी हळू हळू

तनूवरी शहारला जसा तुझाच स्पर्श रे
उधाणले उरांत श्वास वादळी हळू हळू

तुझाच गंध घेउनी, खुलेल कंप लाजरा
भिजेल देह कस्तुरीत ...मखमली हळू हळू

कधी सरीत अन कधी तुझ्या उन्हांत नाहते
पहा तुझीच घेरतेय सावली हळू हळू..

- प्राजु

शृंगारगझल

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Jun 2011 - 10:14 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

प्राजु ताई, मस्त मस्त मस्तच झालीये कविता!!
अप्रतीम!!

तुझाच गंध घेउनी, खुलेल कंप लाजरा
भिजेल देह कस्तुरीत ...मखमली हळू हळू

क्या बात!!

शैलेन्द्र's picture

14 Jun 2011 - 10:30 pm | शैलेन्द्र

"तनूवरी शहारला जसा तुझाच स्पर्श रे
उधाणले उरांत श्वास वादळी हळू हळू

तुझाच गंध घेउनी, खुलेल कंप लाजरा
भिजेल देह कस्तुरीत ...मखमली हळू हळू"

मस्त.. मजा आली..

विजुभाऊ's picture

14 Jun 2011 - 10:34 pm | विजुभाऊ

तुझाच गंध घेउनी, खुलेल कंप लाजरा
भिजेल देह कस्तुरीत ...मखमली हळू हळू

क्या बात है.........हळू हळू ....हळू हळू
"सरकती जाये रुखसे नकाब आहीस्ता आहीस्ता" ची आठवण झाली

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jun 2011 - 11:19 pm | अत्रुप्त आत्मा

कविता जशी शेवटाला येत जाते,तशी ती अधिकाधिक खुलत जाते...हे तत्व या रचनेला सर्वाथानं लागु आहे...लाजवाब

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jun 2011 - 10:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अबोल प्रेम भावना शब्दातून सरस उतरल्या आहेत. मला आवडलेल्या ओळी-

तुझाच गंध घेउनी, खुलेल कंप लाजरा
भिजेल देह कस्तुरीत ...मखमली हळू हळू

कधी सरीत अन कधी तुझ्या उन्हांत नाहते
पहा तुझीच घेरतेय सावली हळू हळू..

अजून येऊ द्या अशाच सुंदर कविता.

-दिलीप बिरुटे

ईश आपटे's picture

15 Jun 2011 - 10:55 am | ईश आपटे

अबोल प्रीत बहरली कळी हळूच उमलली
आज लाभले सखे सौख्य जे मला हवे...........असे रमेश देव-सीमा देव ह्यांच्या मराठी चित्रपटातील एक गाणे आहे, त्याची चाल आपल्या डोक्यात होती का कविता लिहीताना ???
बाकी कविता व शब्दरचना उत्तम आहे...

पिवळा डांबिस's picture

17 Jun 2011 - 4:03 am | पिवळा डांबिस

मला वाटतं ते गाणं,
सूर तेच छेडिता, गीत उमलले नवे,
आज लाभले सखे सौख्य जे मला हवे...........
असं आहे...
चूभूद्याघ्या...

बाकी मूळ कविता छान! आवडली!!
मनात एक विडंबनही आकार घेत आहे!!
;)

ईश आपटे's picture

17 Jun 2011 - 10:09 am | ईश आपटे

ह्म्म्म.... ते गाणे सूर तेच छेडिता अस आहे ..............................थोडे कन्फ्युजन झाले... क्षमस्व !!

पिवळा डांबिस's picture

17 Jun 2011 - 11:13 am | पिवळा डांबिस

अहो क्षमस्व ची आवश्यकता नाही...
नो वरीज!!

नगरीनिरंजन's picture

15 Jun 2011 - 11:01 am | नगरीनिरंजन

व्वा! अप्रतिम उतरलीये!

मूकवाचक's picture

17 Jun 2011 - 4:17 pm | मूकवाचक

असेच म्हणतो.

चेतन's picture

15 Jun 2011 - 11:16 am | चेतन

हळू हळू कळेल असं वाटतं ;)

प्राजुताई कविता/गझल मस्तच झालेय.

चेतन

विसोबा खेचर's picture

15 Jun 2011 - 12:19 pm | विसोबा खेचर

व्वा..!

प्राजक्ता पवार's picture

15 Jun 2011 - 4:45 pm | प्राजक्ता पवार

अप्रतिम ! कविता आवडली .

दत्ता काळे's picture

15 Jun 2011 - 4:55 pm | दत्ता काळे

शब्दांच्या नाजूक विणीची भावपूर्ण कविता.

सुरेल मारवा तुझाच भारला इथे तिथे
तुझाच पूरिया घुमेल राऊळी हळू हळू

फार सुंदर. कल्पना आवडली

प्राजु's picture

15 Jun 2011 - 7:19 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार! :)

सुधीर काळे's picture

15 Jun 2011 - 9:09 pm | सुधीर काळे

प्राजक्ता,
कविता हा माझा प्रांत नव्हे, पण तुझ्या कविता मी आवर्जून वाचतो.
मला त्यातले शब्द खूप आवडतात, पण जुन्या पठडीतला असल्यमुळे 'वृत्ता'त गडबड झाल्यामुळे (ज्याला हल्ली meter म्हणतात) मला मधेच थोडेसे 'ठेच लागल्या'सारखे वाटते.
तू 'वृत्ता'कडेही लक्ष द्यावेस असे मला वाटते.
रागावणार नाहींस याची खात्री आहे!

सुरेल मारवा तुझाच भारला इथे तिथे
तुझाच पूरिया घुमेल राऊळी हळू हळू

सुंदर ..!

स्वानन्द's picture

17 Jun 2011 - 4:21 pm | स्वानन्द

सुंदर..

शानबा५१२'s picture

17 Jun 2011 - 5:33 pm | शानबा५१२

संध्याकाळी वाचली म्हणुन बरी वाटली,सकाळी वाचली असती तरी आवडली नसती.
हळु हळु काय नी जोरजोरात काय.

चन्द्रशेखर गोखले's picture

18 Jun 2011 - 6:46 pm | चन्द्रशेखर गोखले

हळूवार उमलत जाणारी भावपूर्ण कविता

कविता आवडली ,
सूर तेच छेडिता ! हे गाणेच आठवले (प्रथम)

हृदय भरून वाहती, तुझेच स्पंद अंतरी
भरेल का मनातली हि पोकळी हळू हळू??.......मला भावलेल्या ओळी.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jun 2011 - 1:04 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त कविता गो प्राजुतै.

गवि's picture

27 Jun 2011 - 1:07 pm | गवि

फार सुंदर...

कवितानागेश's picture

27 Jun 2011 - 1:14 pm | कवितानागेश

मस्त.
खूप आवडली.

जागु's picture

28 Jun 2011 - 3:31 pm | जागु

नेहमीप्रमाणेच सुंदर.

राघव's picture

29 Jun 2011 - 1:28 am | राघव

असेच म्हणतो. :)

राघव

पैसा's picture

28 Jun 2011 - 9:11 pm | पैसा

छान कविता प्राजु, शब्दयोजना मस्तच झालीय!

सत्यजित...'s picture

7 Jul 2017 - 1:45 am | सत्यजित...

क्या बात है!