तुला काय व्हायला आवडेल?

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
12 May 2011 - 12:45 am

"तुला काय व्हायला अवडेल?"हा प्रश्न आपल्याला बालवाडीपासुन अनेकदा विचारला जातो.फक्त जे आपल्याला व्हायला अवडेल,तसं आपण होणं ईतरांना कधिच रुचत नाहि,हे नंतरहुन दिसुन येत.म्हणजे वरपांगि या प्रश्नाचं स्वरुप,हे आपलि आवड जाणवुन घेणारं वाटलं,तरी अंर्तयामि कारभार निराळाचा असतो.कसा?..तर हा संवाद पहा--पात्र क्रमांक-१)बालाक.पात्र क्रमांक-२)पालक...
पालाक:- बबन्या,खरं खरं संग हं,तुला काय व्हायला अवडेल?
बालकः-खरच सांगु?(हा प्रश्न अंमळ संशयाने)
पा:-हो सांग रे,तुला शिबिरात घालायचय ना,उन्हा़ळी सुट्टीतल्या बिनधास्तं सांग...
बा:-मला चित्रं काढायला अवडतात,मला ना तुम्ही चित्रकलेच्या क्लासला घाला.पलिकडच्या वाड्यातल्या बापटकाकांनि त्यांच्या राजुला...(संवाद मधेच तुटतो)
पा:-अरे आता चित्रकार गल्लोगल्ली पडलेत,त्या पेक्षा तु शिबिरात नविन काहीतरी शिक.
बा:-पाणा माझि अवड चित्र काढणं 'हि' आहे,चित्रकार होणं हि नाहि...
पा:-गाढवा तुला अजुन ****खायची तरी अक्कल आलि आहे का?...अशी वाक्य पडुन डायलॉग संपतो...

प्रत्येकाला उपजत असे आंगचे काहि गुण असतात.पण ते गुण अंगी लागु न देण्याची खबरदारी,भोवतालची मंडळि घेताना अढळत,एखादा मुलगा गाऊ लागला,कि "अहो बालगंधर्व" ही हाक.किंवा एखादा हतानि मातिचे शिवाजी/मावळे करायला लागला कि,"दिवाळीला अजुन वेळ आहे बराच"ही पुर्वसुचना.नंतर त्या मुलानि दिवाळि आल्यावर पईसे मागितले,कि"फटाके आणुन आमचं दिवाळ काढलं ते पुरलं नाहि वाटतं?"हा प्रश्न कम टोमणा.तोच मुलगा पुढे स्वकर्त्रुत्वावर नाटका/सिनेमात गेला,कि मग लोकांसमोर,'लहानपणी नकाला काय करायचा आमचा राजु,तुम्हाला कल्पना नाहि,पण आंम्हि कधी अडवल नाहि त्याला"अशी राजुच्या लहानपणाची,काहिच कल्पना नसल्याचि खात्री करत अईकणाय्राला अईकवलेलि आत्मस्तुती.तात्पर्य काय्?लहानपणि हाड/हाड,आणि मोठेपणी-लोकांसमोर'लहानपणि आमचा हा भलताच द्वाड',अशी कायम स्वतःकडे मोठेपणा राखुन ठेवणारी वाक्य.हे असले मोठेपणा छाप आई बाप मला कधि आवडलेच नाहित.मुलांच्या चॉकलेट,खेळणि,किल्ले,फटाके,पतंग असल्या बाल सुलभ गरजांना महागाईच्या नावाखाली फाटा मारायचा...दात किडतील म्हणुन चॉकलेट खायला बंदी.दुधाचे दात ही ,चॉकलेट खाऊन किडवण्यासाठी देवानी आंदण दिलेली देणगी आहे...हे या "उत्तम पालक कसे व्हाल?" छाप पालकांना कधी कळणार?वास्तवीक तुला काय व्हायला अवडेल? हा प्रश्न वरच्या म्युन्सीपाल्टच्या जज्ज श्री.चित्रगुप्त साहेब माणसांना नविन जन्म देताना विचारत असणार.(ह्या साहेबांचे नाव चित्रगुप्त का ठेवले?माहित आहे?आपण ईहलोकातुन गुप्त झाल्याशिवाय ह्यांचे चित्र पाहायची सुप्त ईच्छा पुर्ण होत नाही म्हणुन)तिथुन येताना सगळिच माणसे मोठ मोठ्या महत्वाकांक्षा घेऊनच उतरत असणार,आणि उतरल्यावर जन्म झाल्यानंतर याच प्रकारची वागणुक मिळाल्यावर,त्या लहानग्याच्या निरागसपणा भोवतीची नि आणि सा हि कवचकुंडल गळुन 'राग' हा एकच गुण त्याला आयुष्यभर पुरत असणार.यात शंका नाहि.

मला हा प्रश्न विचारला गेला,तर मी प्रथम काय मागाव? हा विचार केला,पण माणसात राहिल्यामुळे मला माणसा शिवाय ईतर प्राण्याचा जन्मा घ्यायचि ईच्छा व्यक्त करावि असं वाटलं.प्रथम वाटल मासा व्हाव,पण लगेच तो विचार ईहलोकिची परीस्थिती पाहुन सोडला.माणसे माश्यांवर जिवापाड प्रेम करतात आजकाल.मग वाटले हत्ती व्हावे.कारण दात कापुन घेण्या पलिकडे कोणताच त्रास सहन करावा लागत नाही.आणि हत्तीला खायचे आणि दाखवायचे,अशी वेगळि विभागणि असली तरी,माणसांचा एकाच प्रकारचे दात असुन वेगवेगळ्या प्रकारे दाखवायचा गुण,त्याच्यात ते करण्याची स्वतंत्र व्यवस्था असतानाहि नाही...भलताच निर्बुद्ध प्राणि हा...दाखवायचे दात कापले जाताना,त्याला वेदना होत नाहित.त्या अईवजि तो हसतो,म्हणुनच त्या दाताला हस्तिदंत म्हणतात.(का हस्ती-दंत म्हणतात?कळत नाहि.माणसांच्या जगात,जेवढी हस्ती मोठि तेवढा(त्याचा)दंत मोठा,अशी एक दंतकथा कालपर्वाच वाचनात आल्याचे अठवते)शिवाय आपल्याकडे नाकं मुरडणे हा अधिकार स्त्रीरर्वगाकडे राखलेला.पण ह्त्तीमधे नाक नुसतेच मुरडणे काय?पण खाणे,पाणि उडवणे,एखाद्याला उचलुन फेकुन दणे,अश्या अनेक क्रिया करताना,नाक नुसतेच मुरडावे न लागता दिशा उपदिशा असे सर्वांगानी दाहि दिशा फिरवुन त्याची दुर्दशा करवुन घ्यावी लागते.

लहानपणि मि सोंडेलाच हत्तीचे तोंड समजत असे.कारण माहुत हत्तीला घेउन गल्लित आला,कि आम्हि त्याच्या सोंडेत "धा" पैशे ठेवायचो.आणि ते पैसे तो माहुताला द्यायचा.(त्यावरुन जनतेचा पैसा तोंडानी खाउन वरच्या खुर्ची पर्यंत पोहोचविण्याचा कायदा,माणसात आल्यावर त्यालाहि लागु होतो.असे समजायला हरकत नाही.)त्यामुळे मी सोंडेलाच हत्तीचे तोंड समजायचो.पण उस मात्र त्यानी स्वतःच्या घश्यात घातल्यावर,ते तोंड नसुन नाक आहे व कोणतीही वस्तु खाण्याआधि नाकानी हुंगुन त्या पिकात किति पैसा आहे,,,हे पाहुनच खाण्याची प्रव्रुत्ती हत्तीच्यातही आहे,हे पाहुन"हत्तीच्या"एवढेच म्हणालो.त्यामुळे प्राणिसंग्रहालय,सर्कस,माहुत यांच्या अधिपत्या खालचा ह्त्ती न होता,फक्त जंगलातला हत्ती व्हावे असे वाटले.तिथे काय्,फार तर एखादा लाकडे गोळा करायला लाऊन चंदन लावेल.पण बाकिचा वेळ पाण्यात मनसोक्त डुंबणे,चिखलात लोळणे,तोच चिखल चिलखतासारखा होईपर्यंत अंगावर वाळवणे.दिवसभर वाट्टेल तसे,वाट्टेल तेवढे आणि वाट्टेल ते चरणे.हे माणसात न मिळालेले आनंद आहेतच.त्या आनंदापुढे लाकडची ओझी फारशि जड नाहित.शिवाय हत्तीणींच्याही मागे मागे फारसे फिरावे लागत नाही.अधी ह्त्ती आणि ह्त्तीण वरवर पाहता(म्हणजे त्या अर्थानी नव्हे)कळतात तरी कुठे?तो फरक पडताळायला तोच जन्म घ्यायला हवा."हत्ती झाल्याशिवाय हत्तीण दिसत नाहि"असं कुणिसं म्हटलय ते खोटं नाहि.

असो...आपण हत्ती होउन जंगलात रहाणे,सुरक्षित आहे का?याचा विचार केला, तेंव्हा असे लक्षात आले कि,भरपुर सुरक्षितता आहे.कारण हल्लि माणसांना एकमेकालाही गोळ्या घालायला वेळ पुरत नाही तेंव्हा यापुढे ती हत्तीना मारयला येतिल हि शक्यता कमी.आणि हल्ली वाघ/बिबट्यांना माणसांच्या रक्ताची चटक लागली आहे,तेंव्हा त्यांचाही जंगलातला ससेमिरा कमी.फारतर माणसांच्या जंगलाला कंटाळुन जंगलातल्या प्राण्यांची माणुसकी बघायला येणाय्रा मनुष्य प्राण्यांना पाठिवर घेऊन फिरावे लागेल.थोडक्यात काय?तर पुर्वी आपण जंगलातुन माणसात आलो,अता ईथुन पुढे आपले माणसातुन जंगलात जायचे दिवस सुरु झालेत.

पराग दिवेकर...

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

When we were five, they asked us what we wanted to be when we grew up. Our things were answers like astronaut, president, or in my case, princess… When we were ten, they asked us again. We answered - rock star, cowboy, or in my case, gold medalist… But now that we’ve grown up, they want a more serious answer. Well, how about this… Who the hell knows? This isn’t a time to make hard and fast decisions. This is the time to make mistakes. Take the wrong train and get stuck somewhere chill. Fall in love - a lot. Major in philosophy because there’s no way to make a career out of that. Change your mind. Then change it again because nothing is permanent. So make as many mistakes as you can. That way, someday, when they ask again what we want to be… We won’t have to guess. We’ll know.”

:)

इंटरनेटस्नेही's picture

12 May 2011 - 1:58 am | इंटरनेटस्नेही

पॅरा आवडला.. लेखही छान.

-

(ट्रायल अ‍ॅन्ड एरर मधुन स्वताचे करीअर चॉईस केलेला) इंटेश्वर.

नरेशकुमार's picture

12 May 2011 - 6:06 am | नरेशकुमार

लेख व प्रतिसाद दोनिहि आवडले.