वेगळ्या वाटेवरचा त्रिशूल कुलकर्णी

नमस्कार,
आज माझ्या मित्राविषयी सर्वांना सांगावसं वाटलं म्हणून हा लेख. त्रिशूल कुलकर्णी विषयी नुकतीच पुणे सकाळने दखल घेऊन छान बातमी दिली आहे. http://72.78.249.107/Sakal/6May2011/Normal/PuneCity/Pune1Today/page11.htm हा त्रिशूल मला अनिल अवचटांच्या मुक्तांगण मध्ये पहिल्यांदा भेटला. खरं तर तेव्हा मनिष, योगेश ( अजानुकर्ण), अजीत आणि काही मुंबईचे लोक असे आम्ही भेटलो होतो. त्रिशूल पुढेही भेटत राहीला. त्याने एम टेकचा प्रकल्प किर्लोस्कर मध्ये केला. त्याचा प्रकल्प शेवटच्या टप्यावर असतांना तो व मी भेटत असू. बादशाही किंवा मधुरा (अलका समोरचं) जेवतांना त्रिशूल 'काही तरी' करायचं आहे असं बोलायचा. मात्र एवढा उच्चशिक्षीत मुलगा, ज्याच्या समोर एवढ्या बक्कळ पैशाच्या नोकर्‍या उभ्या आहेत तो असं काही करेल यावर विश्वास तरी कसा ठेवावा ना? पुढे पटनीत गेल्यावर सुध्दा त्याच्याशी संपर्क कायम होता. फोनवर कायम कुठल्यातरी सामाजिक कामाच्या किंवा शास्त्रीय संगीताच्या गप्पा मारणारा त्रिशूल, आधी बोलल्या प्रमाणे नोकरी सोडून वाई येथील प्रकल्पात काम करायला गेला सुध्दा. आणि त्याची पत्नी सुध्दा त्याच्या सोबत या कामात पुढे आहे.

अश्या या त्रिशूल आणि जयश्री कुलकर्णी दांपत्यास मिसळपाव परिवारातर्फे भावी आयुष्यासाठी हार्दीक शुभकामना.

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

त्रिशुल आणि जयश्रीचे ह्या निर्णयासाठी अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
स्वाती

त्रिशूल यांना मिपावर आमंत्रण द्या. त्यांच्या कामाची माहीती, प्रसार, मदत यात मिपापरिवार जमेल तसा सहभागी होईल अशी आशा वाटते.

सहजरावांशी सहमत.

(आमच्यासकट) अनेक वाचिवीर असतात जे तावातावाने चर्चा करतात, पण आपले सुरक्षित आयुष्य सोडून अशा कार्याला वाहून घेण्याचे धाडस/हिंमत कुणातच असत नाही. सारे काही बौद्धिक/वैचारिक पातळीवरच निर्माण होते नि संपते. समोर सुखवस्तू आयुष्य असूनही असा निर्णय घेणे याला प्रचंड बांधिलकी लागते. आणि असे एकाला दोघे मिळणे म्हणजे तर जवळजवळ अशक्यच. कुलकर्णी दांपत्याचे हार्दिक अभिनंदन नि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

सहजरावांशी सहमत. आणखी एक स्फूर्तीदायक व्यक्ती आणि काम.

अश्या व्यक्तिमत्वांचे करावे तेव्हडे कौतुक कमीच आहे.
त्रिशूल आणि जयश्री कुलकर्णी दांपत्याला त्यांच्या कार्यात प्रचंड यश येवो हीच प्रार्थना आणि शुभकामना.

व्हेरी फ्यु कॅन डु इट ! त्रिशुल आणि त्यांच्या पत्निस शुभेच्छा .

- डमरु

श्री.त्रिशूल कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीस या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

कार्यासाठी शुभेच्छा.

चांगली माहिती!
कुलकर्णी दांपत्यास पुढील कार्यासाठी शुभेच्छा!

वाह क्या बात है. जिगर आहे बॉस .. मानलं. बाकी आमच्या मराठवाड्यातली लोकं असतातच भारी.

बाकी आमच्या मराठवाड्यातली लोकं असतातच भारी.
अश्याच भारी कामासाठी तुम्हीही वाहून घेताय की काय?;)

त्रिशुल ला भावी कार्यासाठी शुभेच्छा. ......बीड चा रहिवासी

क्रिये विणा वाचाळता व्यर्थ आहे...हे दाखवुन दिले...
त्रिशूल आणि जयश्री कुलकर्णी दांपत्याला त्यांच्या कार्यात प्रचंड यश येवो हीच प्रार्थना आणि शुभकामना.

नीलकान्त अशा व्यक्तीमत्वाची ओळख करून दिलीस धन्यवाद.

+१

त्रिशूल आणि जयश्री या दोघांना अनेक शुभेच्छा!

@नीलकांत, ही ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
लेखात आनंद करंदीकर यांच्या मेट्रिक कंसल्टंसी या संस्थेबद्दल माहिती आहे ज्याद्वारे त्रिशूल काम करतो आहे. त्या संस्थेचे कार्य नक्की कसे चालते याबद्दल सविस्तर माहिती वाचायला आवडेल. त्रिशूलला मिपाचे सदस्यत्व देता आले तर उत्तमच अन्यथा त्याच्याकडून लेखन तरी येऊ देत असे मनापासून वाटते.

-चतुरंग

त्रिशूल आणि जयश्री या दोघांना अनेक शुभेच्छा!

@नीलकांत, ही ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
लेखात आनंद करंदीकर यांच्या मेट्रिक कंसल्टंसी या संस्थेबद्दल माहिती आहे ज्याद्वारे त्रिशूल काम करतो आहे. त्या संस्थेचे कार्य नक्की कसे चालते याबद्दल सविस्तर माहिती वाचायला आवडेल.

असेच म्हणतो!

त्रिशूलला मिपाचे सदस्यत्व देता आले तर उत्तमच

ऑ? म्हणजे अशा व्यक्तीला लाईनीत उभे राहून वाट बघायला लावता का काय राव? ;) या संदर्भात सहजरावांशी सहमत.: त्रिशूल यांना मिपावर आमंत्रण द्या.

त्रिशूल कुलकर्णी सारख्या व्यक्तीला सदस्यत्व मिळायला काहीच अडचण नसावी - माझ्या म्हणण्याचा उद्देश त्याला इथे लिहिण्याइतपत फुरसत असेल का? सवड मिळेल का? अशा दृष्टिकोनातून होता. तसे नसेल तर सदस्यत्व घेऊनही आपल्याला त्याचे लिखाण वाचायला मिळणे अवघड ठरेल...(जसे अनिकेत आमटे यांचे झाले आहे - त्यांचा एक्-दोन लेखांपुढे प्रवास होऊ शकला नाही - अणि ते सहाजिक आहे - इतक्या व्यग्र व्यक्तीला वेळ ही सगळ्यात न मिळती गोष्ट ठरते.)

-रंगा

क्लास..!

छान...........

मनापासुन शुभेछा.

ख्वाबोंको हकिकत में बदल कर तो देखो..
पिंजरे की सलाखोंमें हैं, उडने की राह भी ,
गुलामी को बगावत में बदल कर तो देखो !

खुद-ब-खुद हल हो जायेंगी जिंदगी की मुश्किलें,
साथ मिलकर खामोशियोंको सवालात में बदलकर तो देखो !

चट्टाने भी टुटॆगी इन्ही हाथोंके भरोसे...
अपनी आरजूओंको इरादोंमें बदल कर तो देखो !

अंधेरी राहोंमें चमकेगी सुरज की रोशनी..
अंगुठे को दस्तखत में बदल कर तो देखो !

हौसला कम ना होगा तेरा तुफ़ान के सामने,
मेहनत को इबादत में बदलकर तो देखो !

आमचे राजकारणी या दांपत्याकडून काही बोध घेणार का ? कुलकर्णी दांपत्यांचे मनापासून कौतुक !! पण ते मराठवाडा सोडून वाईला जाण्याचे प्रयोजन काय ?
अन हो लेखात सांगितल्या प्रमाणे आमचे वाई इवलेसे असले तरी वाईची किर्ती फार थोर आहे .

पण ते मराठवाडा सोडून वाईला जाण्याचे प्रयोजन काय ?

ते जिथे आहेत तिथे काहीतरी चांगलं सत्कार्य करत आहेत. मग ?
(तसेही कुलकर्णी तिथे वाइला प्रकल्पासाठी आहेत हे नीलकांतनी आनि लेखात मेन्शन केलेले आहेच.)
हाच प्रश्न मग मदर टेरेसा ला ही लागु पडतो का? त्या तर भारताची किर्ती फार थोर नसताना इथे आल्या.
सत्कर्म हे कर्मभूमी ला irrespective असावे नाही का?.

कुलकर्णी दांपत्याचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा!
त्यांना त्यांचे अनुभव मिपावर लिहायला सांगावेत.

आणि शुभेच्छा...

हिम्मतवान आहेत दोघंही.. मनःपुर्वक शुभेच्छा..

त्रिशूल हा माझाही जुना मित्र आहे. त्याच्या ह्या कामात मनापासून शुभेच्छा आहेतच.
त्याच्याशी बोलतो. तो इथे येईल का विचारतो. ह्या लेखाची लिंक त्याला दिली आहे.

त्रिशूल कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नींना हार्दिक शुभेच्छा.