आमचे पहिले प्रेम..

परवा इनोबानी त्यांनी काढलेले रेखाटण मिपावर दिले आणि आमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. १९८९ साली काढलेले हे चित्र आभियांत्रिकी माहाविद्यालयातून बाहेर पडताना आम्ही आमच्या मित्राला आठवण म्हणून दिले होते. पुढे तो मित्र अमेरीकेत स्थायीक झाला.. मधल्या १५ वर्षात मी ते विसरून ही गेलो.. २ वर्षापूर्वी माझ्या माझ्या वाढदिवसाला त्या मित्राची शुभेच्छा इ.मेल आली त्यात हे चित्र त्याने मला स्कॅन करून पाठवले.. कितीतरी वेळ काय बेलावे तेच कळलं नाही.. तेच हे चित्र..हे चित्र ०.५ च्या काळ्या पेनाने काढलं आहे.

लै भारी....

वाह...
केशवपंत, आपल हे कलेच अंग नविनच.
आर.के. हुबेहुब उतरवलायत. कपाळावरच्या त्या आठ्या नि त्यांना साथ देणार्‍या त्या कमानी सारख्या वाकलेल्या भुवया छान रेखाटलयं +१
बहुदा आर.के. साहेब मेरा नाम जोकरचं जिना यहाँ ऐकत आसावेत...
-गणपा

क्या बात है केसु!

सुंदर आलंय चित्र! गजला, विडंबने आणि रेखाटने. वा! तू तर कलाकार आहेस रे.
अजून चित्रे येऊदेत.

चतुरंग

वा

सुंदर आलंय चित्र! गजला, विडंबने आणि रेखाटने. वा! तू तर कलाकार आहेस रे.

अगदी हेच म्हणते...

ह्म्म

मी कुठेतरी वाचले आहे की बरीच मंडळी ज्यांना गणित उत्तम येते ती कविता आणि रेखाटने सुद्धा करू शकतात... मला या विधानाकरता अनेक पुरावे मिळत आहेत.
( जरा चित्रांकडे वळलात जर कमी विडंबने पडतील, कमी कवी रडतीलः))

ह्म्म

( जरा चित्रांकडे वळलात जर कमी विडंबने पडतील, कमी कवी रडतीलः))
सुवणमयीताई तुमचे हे गणित काही बरोबर नाही...
केशवसुमार

सुरेख

छान रेखाटन, प्रत्यक्ष १५ वर्षा पुर्वीचे पेनाने काढलेले अजुनच छान असेल.
अजुन रेखाटन पहायला आवडतील.

देवाचा मुड

केशव सुमार,तुम्हाला बनवताना देव एकदम मुडात होता का हो?
किती किती गुण दिले आहेत तुम्हाला?

जाने कहा गये वो दिन.....

व्वा केशवजी मस्तच.....
आणि हो तुमच्या आणि त्या अमेरीकन मित्राच्या मैत्रीला माझा सलाम..........

मदनबाण

जबरी

वाह!! उस्तादो के उस्ताद, केशवपंत!!

भगवान देता है

....तो छप्पर फाड के !

केशवभौ , तुम्ही ज्या पीठावर वावरता तिथे आम्हालाही यायला मिळते हे आम्हाला भाग्याचे आहे.

असेच..

..म्हणतो! बाकीची चित्रे पण टाका.

सुरेख..

केशवा,

रेखाटन केवळ सुरेख...! क्या बात है...

आपला,
(आरकेप्रेमी) तात्या.

रेखाटन

रेखाटन केवळ सुरेख...!

झकास......

केशुभौ मला अगोदर वाटले की हे विडंबन आहे . पण धक्काच दिलात तुम्ही राव.
झकास......

असेच म्हणतो

अत्यंत सुंदर रेखाटन .. खुप खुप आवडले !

पंचेचाळीसावा वाढदिवस

वा, वा... छान चित्र. आम्ही आपल्या पंचेचाळीसाव्या वाढदिवसाच्या प्रतिक्षेत आहोत...
सन्जोप राव

ह्म्म

रावसाहेब..
माझ्या म्हातारा होण्याची वाट बघा..
केशवसुमार
स्वगतः हा माणूस माझा मित्र की शत्रू??

कलाकार

सुंदर आलंय चित्र! गजला, विडंबने आणि रेखाटने. वा! तू तर कलाकार आहेस रे.

अजून येउद्यात...

बहोत

बहोत खुब......

केशुशेठ....
अहो काय हे?
विडंबनं काय, गज़ला काय, आता रेखाटनं सुध्दा? सगळंच फर्मास...

स्वगतः ह्या इसमाच्या अंगी अजुन काय काय कळा असाव्यात बरं?

आर.के. एकदम झकास Smile विशेषतः भुवयांच्या कमानी मस्तच.

सुंदर..

सुंदर चित्र केसु! फार छान,आवडले..

पहिले....

पहिले प्रेम छान आहे....
चेहर्‍यावरचे भाव अप्रतिम आले आहेत....

सुंदर


सुंदर आलंय चित्र! गजला, विडंबने आणि रेखाटने. वा! तू तर कलाकार आहेस रे.

१००% सहमत.

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मना पासून आभार.
(आभारी)केशवसुमार