म्हणी व वाकप्रचार यांचा उगम (२).

म्हणी आणि वाक्प्रचार ही मराठी भाषेतली आभुषणं आहेत. जे कधी कधी १० वाक्यांतूनही मांडता येत नाही ते एका म्हणीने वा वाक्प्रचाराने साधता येतं.काही म्हणींना ग्रामिण भाषेचा डौल आहे . बर्‍याच म्हणींत यमक जुळवलेली आसतात. तर काही इतक्या विनोदी पटकन ओठांवर हसु आणतात.
काही म्हणी अपभ्रंश होत होत बदलल्या गेल्या, आशाच एका बदलल्या म्हणीची कथा मागच्या भागात सांगितलिच आहे, आता ही दुसरी पाहा .....

काना मागून आली नि तिखट झाली. मुळ म्हण आहे पाना मागून आली नि तिखट झाली.

मिरचीच्या रोपाची जरा जास्त निगा राखावी लागेते, जरा पाणी जास्त झाल तर ती मरतात. त्यामुळे जेव्हा शेतकरी जेव्हा मिरचीचा रोप लावतो तेव्हा तो त्या रोपांची खुप काळजी घेतो. नियमित पाना फुलांची पाहणी करतो. त्यांची वाढ नीट होतेयना या कडे बरच लक्ष असतं. वास्तविक रोपाला आधी पानं फुलं नि सगळ्यात शेवटी फळं लागतात पण एकदा का फळं (मिरची) लागली कि मग त्यांचच कवतिक जास्त.... . तिला हातात घेउन तिचा रंग कसा आहे? आकार कसा आहे? तिला काही रोग नाहीना लागला? ईत्यादी......
त्यामुळे मागाहून आलेल्या या मिरची मुळे त्या पाना फुलांचा मात्र रागाने तिळपापड होतो.
मुळातच तिखटपणा हा मिरचीचा गुणधर्म त्यामुळे ही मिरची पाना मागून आली नि तिखट झाली.

घाटपांडे काकांनी मागच्या भागात एक म्हण दिली होती. ज्याच्यासाठी लुगडं त्येच उघडं.

माझ्या आजीच्या तोंडुन ही म्हण बऱ्याच वेळा ऐकली आहे. पुर्वी बायकांत नऊवाऱ्या साड्या नेसायच प्रमाण बरच होतं. नऊवारी म्हटल तर सगळ्यात लांब-लचक वस्त्र. पण बऱ्याच जणी ती नऊवारी आश्या विचित्र पणे घालत की पोटऱ्या सताड उघड्या. (सगळ्याच नऊवारी नेसणाऱ्या काही पोटऱ्या उघड्या टाकत नाही म्हणा उदा. : तमाश्यातल्या 'लावण्य'वती.) त्यामुळे कदाचीत ही म्हण पडली असावी.

कुर्‍हाडीचा दांडा गोतांस काळ. याची काही गोष्ट आहे का माहीत नाही. पण याची व्युत्पत्ती अशी असावी की कुर्‍हाडीचा दांडा हा लाकडाचा असतो. आणि झाड तोडतांना हाच दांडा आपल्याच गोतांवर (गणगोत = नातेवाईक) गदा आणतो.

अगं अगं म्हशी मला कुठ नेशी..
का कुणास ठाउक पण ही म्हण आठवली लाहानपणा पासून एक काल्पनीक चित्र डोळ्या पुढ उभ राहत. मस्त गावातला हिरवागार माळ आहे. माळावर म्हैशी मजेत चरतायत. तेवढ्यात एका उधळलेल्या म्हशीची शेपटी दादा कोंडकेंनी पकडली आहे. आणि ते हे वाक्य त्यांच्या तोंडी आहे.
असो तर या म्हणीची ही कथा.....

एकदा एक माणुस त्याच्या सासुरवाडिला गेला होता. तिकडे त्याचे बायको बरोबर जाम कडाक्याच भांडाण झाल. आख्खं गाव गोळा झालं. रागाच्या भरात नवरोबा बोलले कि मी परत या गावत पाय ठेवणार नाही. चार दिवस गेले, याला बायकोची आठवण यायला लागली. पण आख्या गावा समोर बोलून चुकलेला, त्यामुळे काही बाही कारणं शोधू लागला. मग त्याला एक कल्पनेची आयडिया सुचली. संध्याकाळी जेव्हा गाई गुरं माळावरून गावाकडे परतत होती तेव्हा एका म्हशीची शेपटी घट्ट पकडून तिच्या मागोमाग चालु लागला, जणू काही ती म्हैसच त्याला ओढतेय.. नि हा लागला बोंबलायला अगं अगं म्हशी........

खुप म्हणी झाल्या नै, आता ह्या वाक्प्रचाराची उत्पत्ती पाहू...

तागास तुर लागू न देणं. (लहान असताना मी ताकास तुर म्हणायचो कारण कानावर तसच पडायचं. पण आता कळल कि हे तागास आहे.)

आपला भारत हा शेतीप्रधान देश (होता?). शेतकरी खरिप आणि रब्बी पिकां बरोबरच आंतर-पिकही ध्यायचा (हल्ली हे माहिती तंत्रज्ञांचच पिक निधतय ती गोष्ट वेगळी) आता आंतर पिक म्हणजे जे मुख्य पिका बरोबर घेतल जात पण मुख्य पिकाला त्रास न होउ देता. आशी काही पिक आहेत कि जी जोडी जोडी ने घेतली तर जमिनिचा कस पण वाढतो. तर ताग आणि तुर ही आशीच एक जोडी. जर तागाच्या प्रत्येक २ फुटांच्या सरिंच्या मध्ये तुर नीट पेरली तर ही दोन्ही पिके चांगली येतात. एक कुशल शेतकरी ताकास तुर लागू देत नाही.

या वाक्प्रचाराचा भावार्थ आसा की इतक्या हुशारीने वागणं की बाजुच्याला जराही अंदाज न येउ देणं.

आकांड तांडव करणे.
हा वाक्प्रचार एकदम सरळ आहे . तांडव हे शिव-शंकरच नृत्य हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. बच्चा बच्चा जानता है. क्रोधिष्ट होउन शंकरान तांडवनृत्य केलं नि तिन्ही लोक हादरले हे आपण पुराणात वाचलय. तर आकांड तांडव करणे म्हणजे थैमान घालणे. घर डोक्यावर घेणं.
पण मग ह्या आकांडचा अर्थ काय बर? मला वाटत बहुदा ते अखंड आसाव. (शंकरान अखंड तांडवनृत्य केलं आणि तिन्ही लोक जेरिस आणले) जाणकार मंडळींनी कृपया यावर प्रकाश टाकावा..

ता. क. : लेको ह्ये मुद्दाम काथ्याकुट भागात टाकल है. आमालाबी तुम्च्या कडच्या ष्टोर्‍या सांगा की.....