टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
जिवनाची कींमत फक्त दोन रुपये ?
अत्ताच एक बातमी वाचली येथे
भुवनेश्वर येथे एका बस कंडेक्टर ने बाप-मुली (वय वर्ष ४) चालत्या गाडीतून बाहेर फेकले व ते दोघे जागच्या जागी मरण पावले कारण काय तर त्यांच्याकडे बस भाड्यामध्ये दोन रुपये कमी पडले ह्यासाठी , आजकाल मानव जीवनाची कींमत दोन रुपयापेक्षा कमी झाली आहे, असे का व्हावे ?
त्या कंडेक्टर कडे कसलीच जाणीव नसावी ? समाजिक / पोलिसांचे भय ? काहीच नाही... असे कसे व का व्हावे ह्याचे उत्तर शक्यतो ते राजकारणीच देऊ शकतात जे तेथे राज्यकरत आहेत.
भुवनेश्वर तथा ओडीसा हे राज्य ईतिहासामध्ये एक संपन्न से राज्य होते पण आजकाल तेथे सर्वात जास्त भुकबळी, रोजचे दरोडे, खुन असले प्रकार वाढलेले आहेत एके जागी वाचले होते की राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे डरडोई कमाई २२ रुपयापेक्षा कमी आहे काही गावामध्ये ! असे का व्हावे ?
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

क॑डेक्टरलाही गाडी खाली चिरडले पाहिजे.
बाप रे,
बातमी वाचुन मन सुन्न झाले, त्या क॑डेक्टर ला देखिल असेच चालत्या गाडीतुन खाली फेकुन द्यावे हीच त्याची शिक्षा.
त्याला १० वर्षाचा कारावास ही शिक्षा फार शुल्लक आहे.
मला तर लहान मुला॑च्या बाततीत असे काही वाचायला मिळाले तर डोकेच फिरते.
सहमत आहे..
बातमी वाचुन मन सुन्न झाले, त्या क॑डेक्टर ला देखिल असेच चालत्या गाडीतुन खाली फेकुन द्यावे हीच त्याची शिक्षा.
सहमत आहे...!
तात्या.
जिवनाची कींमत फक्त दोन रुपये ?
हा प्रकार वाईट तर आहेच, पण कंडक्टर ने असं का केलं त्याचं हि मंथन व्हावं. कंडक्टरला शिक्षा व्हायलाच हवी. मी आजीबात त्याच्या बाजुने बोलत नाही, पण मला वाटतं कि त्याला शिक्षा करुन अशा प्रकारच्या घटनांना आवर घालता येईल परंतु २ रुपयांसाठि २ जणांचे प्राण जातात, अगदि ४ वर्षांच्या मुलीचे हि, हे चित्र आपल्या तथाकथित सुसंस्करुत समाजगाड्या मध्ये किती राक्षसी दोष आहे हे दाखविण्यासाठि पुरेसं बोलकं आहे.
राग येणं हे काही नविन नाहि. त्यावर आवर घालता येत नाहि हे हि समजु शकतं, पण ईतकाहि ताबा नसणं हे जनावराचंच लक्षण आहे.
माझ्या मते एक तर त्याला जबरदस्त शिक्षा व्हायला हवी, पण जोडीला अशा घटनांची कारणं ही शोधली जावीत. विचारांना अध्यात्मिक बाजु असेल तर अशी अमानवी गोष्ट होणार नाही. समाजयंत्रणे मध्ये असलेले राक्षसी दोष दुर करण्याची खरी गरज आहे.
कायदा अतिशय कडक आणि पळवाटा नसलेला असावा, जेणेकरुन पुढच्यास ठेच मागचा शहाणा होईल .
माझ्या मते
माझ्या मते एक तर त्याला जबरदस्त शिक्षा व्हायला हवी, पण जोडीला अशा घटनांची कारणं ही शोधली जावीत. विचारांना अध्यात्मिक बाजु असेल तर अशी अमानवी गोष्ट होणार नाही. समाजयंत्रणे मध्ये असलेले राक्षसी दोष दुर करण्याची खरी गरज आहे.
१००% सहमत.
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
माणुसकीला काळीमा फासणारी घटना
खरोखरच मती सुन्न करणारी घटना आहे. वडीलांचा आणि ४ वर्षाच्या मुलीचा आत्मा किती तळमळला असेल.
माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे.
त्याला १० वर्षाचा कारावास ही शिक्षा फार शुल्लक आहे.
--सहमत
ईश्वरी
अशा.....
अशा लोकांना आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली पाहिजे.....शिक्षा ही कडक असेल तरच असे गुन्हे करायला कोणी पुढे धजावणार नाही.
मदनबाण.....
बरोबर
शिक्षा ही कडक असेल तरच असे गुन्हे करायला कोणी पुढे धजावणार नाही.
दुर्दैवाने कडक शिक्षा आणि ती ही तत्काळ होत नाही , त्यामुळे कोणाला कायद्याचा वचक रहात नाही
२ रुपयांसाठी??
सहमत.
अशावेळी कोणीतरी मिस्टर इंडिया यावा.. आणि अशांना सगळ्यांसमोर अद्दल घडवावी असे वाटते.
दुर्दैवान
दुर्दैवाने कडक शिक्षा आणि ती ही तत्काळ होत नाही , त्यामुळे कोणाला कायद्याचा वचक रहात नाही
सहमत...
अशा लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे.
अशा
अशा लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे.
चालत्या गाडीतुन ढकलुन दिले की रे त्यांना आणखी किती कडक शिक्षा करायची आता?
स्वगत : विनातिकिट प्रवास करणार्यांवर दत्तुचा भलताच राग दिसतोय
चालत्या
चालत्या गाडीतुन ढकलुन दिले की रे त्यांना आणखी किती कडक शिक्षा करायची आता?
)
)
झंप्या लेका लोकांची मारण्यासाठीच राखून ठेवलायस का काय हा ID
तो कंडक्टर
तो कंडक्टर बिहारी होता का