एकलाच (ओवी-गीत-गझल-कविता)

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
14 Apr 2011 - 8:30 pm

१. (ओवी)

प्रश्न प्रश्नांचे उत्तर
दु़:ख सुखाचे आधार
माझ्यासाठी मीच आता
एकलाच दारोदार ||

चांदण्यास चंद्र भार
नेत्रातुनी संथ धार
परका आप्तजनात
एकलाच मुक स्वर ||

भावनांचा कोरा पुर
स्वप्नांचाच स्वैर धुर
मनास अनोळखी मी
एकलाच दूर दूर ||

कोण कोणाचा इश्वर
माणुसकीचा संहार
कुरवाळत दु:खास
एकलाच जातो दूर ||

२. गीत
( राग लक्षात नाहिये, कारण त्यातील मला कळत नाहीच काही.. पण या गाण्याला 'दयाघना' या गाण्यास जो राग आहे तो राग वापरलेला आहे असे मित्राने गाताना सांगितले होते.. हे माझे पहिले आणि सेकंड लास्ट गाणे, चाल सांगता येत नाहिये.. पण दयाघना सारखे स्लो गाउन बघा जमले तर)

अजून मी माझ्यातच जगते
कुठे किनारा धरतीमाते
जाणिव नाही कुणास माझी
प्रवास मी एकटीच करते...

गुलाम जीवन खितपत मळले
नाव माझी धारेत डळमळे
कुठली नाही दिशाच ठावी
गांव कोठले मला न कळले

भाव भावनांचा बाजारी
एकटीच मी दारोदारी
विरक्त जीवन ईश्वर कोठे
भक्त म्हणुन ना कुणी स्विकारी

अजून मी माझ्यातच जगते
कुठे किनारा धरतीमाते
जाणिव नाही कुणास माझी
प्रवास मी एकटीच करते...

३. गझल

असा मी माझा स्वता:तच रमतो
तुझ्या साठी मी एकलाच जगतो

विचारांच्या भोवर्‍यात निर्झर हा
किनारा त्याचा उपराच ठरतो

वसंतात शृंगारुदे निसर्गाला
ग्रिष्मात वृक्ष ओंडकाच दिसतो

पांघरुनी चांद नभात तारका
भास्कर त्याला परकाच ठरतो

नेत्राती तुझ्या प्रतिबिंबित कोणी
ह्रद्याच्या गावी वेगळाच असतो

४. कविता
(पाउस म्हंटल की रोमान्स आठवतो.. विरहातील बरसणे ही आठवते .. ही एक पावसावेळची वेगळी स्थीती घेवुन एकलीच अवस्था)

काळजाची घुसमट
आभाळाची घुटमळ
सर सर नयनी
चित्ताचीच ओघळण

भय दाटले मनी
ह्रदयी कंपणे झेलत
ओठांचीच थरथर, तरी
सरीवर सर नयनी

नाभीपासुन चित्कार
एक आत्म्याचा हुंकार
नभी नाचते वीज
आभास पिलवटून

सरीवर सर .. अन
एकलाच मी कासावीस
एकलाच मी कासावीस

----------------- शब्दमेघ

आठवड्यात जास्तीत जास्त एकच कविता तसे देत असतो येथे.. कविता लिहिण्यापेक्षा ही कविता वाचायला - त्यावर रिप्लाय द्यायला मस्त वाटते ..आवडते.. या वेळेस मात्र या आठवड्यातील दूसरी कविता देत आहे.. आणि ती पण वेगवगळ्या अवस्थ्यातील ४ कवितेंची सिरीज असलेली .. त्यामुळे क्षमस्व...

करुणशांतरसकवितारेखाटन

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

14 Apr 2011 - 8:56 pm | मेघवेडा

एकच भाव वेगवेगळ्या काव्यप्रकारांतून! वा!!

भाव भावनांच्या बाजारी
एकटीच मी दारोदारी
विरक्त जीवन ईश्वर कोठे
भक्त म्हणुन ना कुणी स्विकारी

मस्त! :)

ओवी आणि गीत झकास जमले आहे!

गझल आवडली नाही.

धन्यवाद मनापासुन ...

ही गझल मला पण नाही आवडली खरे तर ..पण एक वेगळी अवस्था प्रियकराची म्हणुन दिली

प्रकाश१११'s picture

15 Apr 2011 - 7:34 am | प्रकाश१११

गणेशा -एकच भाव निरनिराळ्या कवितेतून .खूपच छान.
मस्त लय पकडलीस .अरे येउदेकी ..!!

नगरीनिरंजन's picture

15 Apr 2011 - 7:34 am | नगरीनिरंजन

ओवी छान वाटली!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

15 Apr 2011 - 11:08 am | मिसळलेला काव्यप्रेमी

क्या बात.... क्या बात... राजे मुजरा घ्या आमचा!!

अरे काय लिहीलयस... तुफान.... जियो...

नाभीपासुन चित्कार
एक आत्म्याचा हुंकार
नभी नाचते वीज
आभास पिलवटून

वाह.... खल्लास......

डॉ अशोक कुलकर्णी's picture

16 Apr 2011 - 11:21 am | डॉ अशोक कुलकर्णी

कवितेतला कपिलदेव (अष्ट्पैलू)

मनापासुन धन्यवाद सर्वांचे ..

@ डॉ.
प्रतिसाद आवडला .. अष्टपैलू पणा नाहीये .. पण दर्जेदार लिहिण्याचा प्रयत्न नक्की करीत राहिन..