मर्ढेकरांची कविता - झोपली ग खुळी बाळे - वैश्विक व दुसऱया महायुध्दकालीन संदर्भ

लांबदेव's picture
लांबदेव in काथ्याकूट
7 Apr 2011 - 6:45 am
गाभा: 

मर्ढेकरांची कविता - झोपली ग खुळी बाळे - वैश्विक व दुसऱया महायुध्दकालीन संदर्भ

मर्ढेकरांची ही कविता दुसऱ्या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर आहे. ह्या कवितेत अणुबाँब आहेत. रॉकेट आहेत. भारतीय , अमेरीकन शास्त्रज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय शस्त्रस्पर्धा आहे. भगवतगीता आहे. जागतीक शांततेचा प्रश्न आहे. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत.
खालील दुव्यावर टिचकी मारा
झोपली ग खुळी बाळे

लांबदेव

प्रतिक्रिया

मी_ओंकार's picture

7 Apr 2011 - 10:17 am | मी_ओंकार

जागा राखून ठेवत आहे.
- ओंकार.

बुच लावुन ठेवत आहे .

- चिकार

मी_ओंकार's picture

7 Apr 2011 - 1:31 pm | मी_ओंकार

डब्बल बूच

- कारझन

वेताळ's picture

7 Apr 2011 - 1:37 pm | वेताळ

अजुन कोणकोणत्या कवितेतुन नवनवे शोध निघतात ते लिहा.

भडकमकर मास्तर's picture

7 Apr 2011 - 1:47 pm | भडकमकर मास्तर

चला....
हीच कविता ईश्वरप्राप्तीसाठी झुरणार्‍या भक्ताने जगन्नियन्त्याला उद्देशून केली आहे असे समजून या कवितेचे रसग्रहण करा...

पिवळा डांबिस's picture

8 Apr 2011 - 10:57 am | पिवळा डांबिस

१० मार्कांसाठी....
हीच कविता प्रेयसीसाठी झुरणार्‍या प्रेमिकाने सखीच्या कुचकलशांना उद्देश्यून केली आहे असे समजून या कवितेचे रसग्रहण ( माशाल्ला!!) करा...

लपले आहे?

नंदू's picture

7 Apr 2011 - 7:58 pm | नंदू

लांबदेव साहेब,
आमच्या शरदिनी ताईंच्या कवितांमध्ये काही वैश्विक संदर्भ लागतात का बघा जरा. भले भले थकलेत इथे. :-)

मी_ओंकार's picture

7 Apr 2011 - 11:36 pm | मी_ओंकार

लांबदेव,

दुवा पाहिला. ब्लॉग तुमचाच आहे अशा समजुतीने पुढे लिहीत आहे. दुव्यावर या आधीच्या पोस्टमध्ये मागच्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांची उत्तरे दिसली. ती उत्तरे इथेही दिली असती तर बरे झाले असते. इथे फक्त एकांगी चर्चा आणि त्याची उत्तरे ब्लॉगवर दिलीत तर चर्चा पुढे सरकरणार नाही.
शिवाय मागल्या लेखात छोटा डॉनने म्हटल्याप्रमाणे या धाग्यावरही ब्लॉगवरचा लेख दिला असता तर बरे झाले असते. असो. आता कवितेकडे वळू.

कविता वाचल्यावर हे एक कथन (मोनोलॉग) वाटते. म्हणजे सांगणारा निवेदक आणि ऐकणारा कोणीतरी. आता निवेदक मर्ढेकर स्वतः असे मानू. ऐकणारा ही स्त्री आहे हे 'झोपली ग' या शब्दांवरून कळते. मग मर्ढेकर एका स्त्रीला अणुबाँब, ऑपेनहायमर, चंद्रशेखर, ट्रुमन, बॅलेस्टीक मिसाईल या गोष्टी सांगत आहेत असा अर्थ आहे का? नाही - सांगू शकतात. नाही असे नाही. पण ते जेंव्हा 'तुझा माझा चंद्र' म्हणतात म्हणजे तो मर्ढेकर आणि ती स्त्री यांचा की सगळ्या देशाचा? का चंद्रशेखर शास्त्रज्ञ त्या स्त्रीचाही होता?

'चैत्र चढे आकाशात' या कडव्यात विश्ववाली हा शब्द आपण वाटेशी जोडला आहे (विश्ववाली वाट) मग त्या ओळीतले क्रियापद 'कापी' हे 'चैत्र' या प्रतिमेशी संलग्न होते. पण पहिल्या ओळीत 'चैत्र चढे' असा उल्लेख आहे. म्हणजे या ओळीतही तो 'कापे' असा यायला हवा. पण तो 'कापी' असा आहे.

कवितेवरील भाष्य वाचल्यावर कवितेचे पूर्णपणे एकसंध आकलन होत नाही.कुठेतरी अणुबाँब अमेरिकेचे , मिसाईल्स जर्मनीची, मध्येच शात्रज्ञ एक अमेरिकी, एक भारतीय. नुसत्या एका ओळीला एक स्पष्टीकरण असा प्रकार वाटतो. त्यातून एकसंध आकृतीबंध निर्माण होत नाही.

शेवटच्या दोन ओळी ह्या जवळजवळ त्या आधीच्या दोन ओळींची पुनरावृत्ती आहे. त्यातून 'का गं' या शब्दातून मर्ढेकरांची अगतिकता, असहायता, तडफड स्पष्ट दिसते. ती सगळी कोण कुठल्या चंद्रशेखरसाठी?

या सगळ्या प्रकारामुळे आधीच दुर्बोध असलेल्या कवितांकडे नव्या कविताप्रेमींनी पाठ फिरवली नाही म्हणजे मिळवले.

- ओंकार.

जाता जाता: चर्चा इथेच केली तर उत्तम.

धनंजय's picture

7 Apr 2011 - 11:55 pm | धनंजय

बापरे. कवितेतल्या "धमन्या" (इंग्रजी अर्थ arteries) शब्दाचा अर्थ लावण्यासाठी आधी "veins" असा इंग्रजीत प्रामादिक अनुवाद करायचा, मग ध्वनिसाधर्म्याने "vanes" या शब्दाची आठवण करून घ्यायची, "vanes" चा एक दुय्यम तांत्रिक अर्थ (टेक्निकल जार्गन) म्हणजे रॉकेटमधला कुठलासा बारीकसारीक भाग असतो, त्यावरून धमन्यांचा अर्थ "रॉकेट" असा लावायचा... कठिण आहे बुवा.

("ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी" हा मराठी वाक्प्रचार कशाबद्दल आहे? १९६१ साली गोवा सोडताना ज्या पोर्तुगिजांनी जाताजाता बोरीचा पूल उध्वस्त केला, त्याच पोर्तुगिजांची युद्धनौका बांभोळीच्या किनार्‍यावर आडकून शरण आली, या घटनेबद्दल आहे, अशी कल्पना मनात चमकून गेली.)

राजेश घासकडवी's picture

8 Apr 2011 - 8:48 am | राजेश घासकडवी

अर्थ या शब्दाच्या अर्थालाच आव्हान देणारं रसग्रहण. रूपक प्रतिमा उपमांचा च्युइंगगम ताणून पॄथ्वीला वेढा घालण्याची वेडी आशा बाळगणारं. मर्ढेकरांच्या कवितेत एका अर्थाचं सूत्र शोधण्याऐवजी तीतल्या शब्दांवर ओळींवर विविधरंगी अर्थांचं आरोपण करून एक कोलाज दाखवणारं.

या रसग्रहणाचं रसग्रहण करावं अशी मी लंबूटांग यांना विनंती करतो.

कवितेचा ओढून ताणून लावलेला अर्थ आवडला नाही.
विश्ववाली - चंद्र - ओपेनहायमर हे सर्वच पटण्याच्या पलिकडले वाटले.
पिपात मेले.. चा अर्थही आपण हिटलर आणि ज्यूंचे शिरकाण याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मर्ढेकरांना वैश्विक जाणिवा असतीलही. (नव्हे, असतीलच.) पण म्हणून त्यांच्या प्रत्येक कवितेच वैश्विक अर्थ लावणे हे फारच जास्त होते असे वाटले.
मर्ढेकरांना वैश्विक कवी करण्याचा अट्टाहास का?

बहुतेक कवितांना वैश्विक अर्थ देता येतो.

पण वर दिलेल्या रसग्रहणात होते उलटेच आहे. अर्थाला इतिहासातील एका घटनेच्या तपशिलांत बांधून अर्थ अधिक संकुचित होतो आहे. :-(

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Apr 2011 - 12:55 pm | llपुण्याचे पेशवेll

सदर रसग्रहण ज्याना पटले नसेल त्यांनी त्याना जर कविता समजली असेल तर आमच्यासाठी त्याचे रसग्रहण करावे. कविता तर काही समजली नाहीये बिलकुल. :(

मी_ओंकार's picture

8 Apr 2011 - 1:48 pm | मी_ओंकार

पुपे,
आधीच्या धाग्यावर म्हटल्याप्रमाणे माझ्या संग्रही म. वा. धोंड यांचे मर्ढेकरांच्या कवितांच्या समीक्षालेखांचे पुस्तक आहे. त्यातील स्पष्टीकरण वाचून मर्ढेकरांच्या बर्‍याच कवितांचे आकलन होते. याकवितेवरील लेखाचा सारांश नक्कीच मी इथे देईन. श्रेय अर्थातच धोंडांना. आपली तेवढी लायकी नाही.

- ओंकार.

परिकथेतील राजकुमार's picture

8 Apr 2011 - 1:06 pm | परिकथेतील राजकुमार

मर्ढेकरांची ही कविता दुसऱ्या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर आहे.

बर मग आम्हाला काय कौतुक आहे का ?

च्यायला मी पण आता इथे रोज चार ओळी लिहिणार आणि खाली अधिक वाचनासाठी मचाकचा दुवा देणार आहे.

मी_ओंकार's picture

9 Apr 2011 - 12:41 am | मी_ओंकार

ही कविता मर्ढेकरांच्या आयुष्यातील घटनांशी संबंधीत आहे. एका प्रतिभाशाली कवीचे आयुष्य कशी एक शोकांतिका असू शकते हे मर्ढेकरांच्या आयुष्यावरून कळते. अवघ्या ४७ व्या वर्षी ते गेले १९५६ मध्ये. कविता ब्लॉगवर जशी दिली आहे तशीच प्रसिद्ध झाली. त्यात पहिले, तिसरे अशा विषम कडव्यांचा एक गट आणि दुसरे, चौथे अशा सम कडव्यांचा दुसरा गट अशी विभागणी दिसते. विशेष म्हणजे सम कडव्याची सुरवात 'चैत्र' या शब्दापासून होते. कवितेचे निवेदक हे स्वतः मर्ढेकर आहेत. वेळ रात्रीची आहे. सम कडव्यात येणार्‍या पहिल्या दोन ओळी या कविता रचतानाच्या वेळेचे वर्णन करतात. उदा. चैत्र बघतो वाकून. इथे चैत्र हा महिना नसून नक्षत्र आहे.

पहिल्या गटातील कडव्यांचा अर्थ लागण्यासाठी आणि कवितेतली 'ग' कोण हे कळायला मर्ढेकरांचे खासगी आयुष्य कसे गेले हे पाहिले पाहिजे. कवितेचा रचनाकाल अंदाजे एप्रिल १९५० असा आहे. मर्ढेकर मुंबईत कॉलेजमध्ये शिकवत असताना त्यांची ओळख होमाय नल्लासेट या पारशी तरूणीशी झाली. ओळखीतून प्रेम जुळले आणि दोघांचा विवाह झाला.(१९४०) ही मर्ढेकरांची प्रथम पत्नी. लग्नानंतरच्या दहा वर्षात होमाय त्यांच्या योग्यतेनुसार मुंबई, दिल्ली आणि लंडन येथे कामासाठी गेल्या. दिल्लीला त्या प्रिन्सीपॉल होत्या. या काळात मर्ढेकर रेडिओ मध्ये नोकरीला होते. त्यांची बदली पाटण्याला झाली होती. होमाय लंडनला गेल्यावर मर्ढेकरांनी त्यांना घटस्फोटाचा अर्ज पाठवला व ५० साली त्यांनी घटस्फोट घेतला. याच काळात (४८) मर्ढेकरांवर कवितांमधील अश्लीलतेबद्दल खटला सुरू झाला व तो बराच लांबला(४८-५२). खटल्यामुळे त्यांच्या नोकरीवरही परिणाम होत होता. कामात चुका काढणे, लिखाणाचे ज्यादा काम देणे, तक्रारी असे प्रकार चालू होते. याचे काही वर्णन मर्ढेकरांच्या व समकालीन सहकार्‍यांच्या पत्रात आहे. खटल्याचा निकाल मर्ढेकरांच्या विरूद्ध लागला असता तर नोकरीही गेली असती आणि तुरुंगवास ही भोगावा लागला असता. याच काळात त्यांची पाटण्यात असताना रेडिओतीलच अंजना सयाल या पंजाबी स्त्रीशी मैत्री झाली. ही गोष्टही कामावरच्या बर्‍याच लोकांच्या नजरेत खुपत होती. (याला धोंड बर्‍याच पत्रांचा आणि घटनांचा संदर्भ देतात.) तसेच या सगळ्याचा मर्ढेकरांच्या प्रतिभेवर प्रतिकूल परिणाम होत गेला. दिवसेंदिवस त्यांची प्रतिभा आटत जात होती. (श्री.पू. भागवतांकडे पत्रातून याचा ते उल्लेख करतात.)

या सगळ्या उद्विग्नतेतून एका रात्री आजूबाजूचे सगळे खुळे सहकारी (पाटण्याला मर्ढेकर सरकारी वसतिगृहात रहात) झोपी गेल्यावर शांततेत कवीला आपल्या पहिल्या पत्नीची आठवण येते. आजुबाजूचे जग, आकाश आणि दूरवर पसरलेले अंतराळ कवी शब्दात लिहितो. स्वतःच्या प्रतिभेबद्दल तो 'इश्वराचे देणे' असे म्हणतो . पण ऑफिसचे खर्डेघाशी काम करताना त्यात प्रतिभेपेक्षा प्रयास ज्यास्त आहेत. उशीर झाल्याने त्या प्रयासांना पण पेंग आली आहे पण संसारासाठी ते करणे गरजेचे आहे.
कामात चुका काढतील, त्रास देतील म्हणून भ्यायचे तरी किती. त्याचे काय भले व्हायचे ते होवो. आजुबाजूची सगळी वेडीवाकडी मने. माझ्या कामांना चाळण्या लावून, चौकशा करून विचारांतली मातीच दाखवत आहेत. प्रतिभा आटत चालल्याने माझा खुजा तारा झाला आहे. अशात जर खटल्यामुळे बदनामी झाली तर तो काळाही होईल. पण या सगळ्याशी अलिप्त अशी विश्वाची शक्ती निळ्यावायूतून आपली वाट संथपणे कापत आहे.
या अशा वेळी तू तुझ्या करिअरसाठी (आंबोण) आपल्या दोघांच्या सुखांना (चंद्र) मागे ठेवून का गेलीस? तुझी सगळ्यात ज्यास्त गरज असताना अशी अवेळी का गेलीस?
होमाय यांच्यावरचे मर्ढेकरांचे हे उत्कट प्रेम त्यांच्या 'दवात आलीस', आणि 'रहा तिथे तू' या कवितेंमध्येही दिसते.

- ओंकार.

मृत्युन्जय's picture

9 Apr 2011 - 10:12 am | मृत्युन्जय

लांबदेव साहेब या कवितेतला सुद्धा वैश्विक अर्थ शोधुन दाखवा. तेवढेच आम्हाला पण लई भारी वाटेल.

http://www.misalpav.com/node/12757