या अंधश्रद्धेचे काय करू?

विकास's picture
विकास in काथ्याकूट
25 Mar 2011 - 12:41 am
गाभा: 

आज भारत-ऑस्ट्रेलीयाचा "एफ-५" कळ दाबत सतत ताजा होणारा धावफलक एकीकडे बघत असताना दुसरीकडे ज्यांना तो खेळ प्रत्यक्ष बघता येत होता त्यांचा विचार करत इनो घेणे चालू होते. भारतीय संघाचा खेळ बघताना सरासरी आता आटोक्यात आहे, तरी देखील काय होते या भितीने एकीकडे बोटे जुळवून बसलेलो (फिंगर्स क्रॉस्ड) तर दुसरीकडे मनातल्या मनात, "च्यायला यांना बरं बघायला मिळतं" असे म्हणत तीच बोटे मोडत होतो.... :(

तर मग ठरवलचं! की यापुढे "एफ-५" नाही तर ३० मार्चला हातात रिमोटच असेल! असा, भारत-पाक मॅच मी प्रत्यक्ष बघायचा निर्धार करणार, तितक्यात एक किडा डोक्यात आला, जेंव्हा जेंव्हा मी (विशेष करून) भारत-पाक मॅच एकाजागी बसून (म्हणजे मधे मधे उठलो असेनही), बघितली, तेंव्हा तेंव्हा भारत हरला आहे. आता सारे भारतीय माझे बांधव असल्याने, आपले भारतीय खेळाडू पण बांधवच आहेत. त्यामुळे त्यांचे जिंकणे हे मीच जिंकण्यासारखे आहे...

मग मी आता काय करू? मला माहीत आहे, उपलब्ध विदाचा विचार केल्यास, स्टॅटीस्टीकली जरी माझ्या अनुभवात तथ्य असले तरी वैज्ञानिक दृष्टीकोनातून याला काहीच अर्थ नाही, ही केवळ अंधश्रद्धा आहे! आणि मी तर स्वतःला अंधश्रद्धाळू समजतही नाही आणि तसे वागतही नाही. त्यामुळे वाटते, कशाला फुकटचे भ्यायचे? पण मग जर परत माझ्या स्टॅटीस्टिक्स मधे नको ती भर पडली तर? भारत हरला तर?

छ्या! काही समजत नाहीसे झाले आहे... बघितले आणि आपण जिंकलो तर एकदाचे अंधश्रद्धा निर्मूलन होईल. पण जर जिंकलो नाही तर? या अंधश्रद्धेचे काय करू? डोक्यात न ठेवता सरळ भारत-पाक सामना बघू का नुसतीच "कळ एफ-५"?

तुम्हाला देखील भारतीय क्रिकेट संघच जिंकावा असे वाटत असेल अशी आशा करतो. पण मग, इथले क्रिकेटप्रेमी आणि अंधश्रद्धा निर्मूलन करू इच्छीणार्‍या सन्माननीय सदस्य काही तोडगा सांगतील का? ;)

प्रतिक्रिया

अंधश्रद्धा आणि क्रिकेट हातात हात आणि गळयात गळे घालुन चालतात.
आजही सकाळ पासुन सोफ्यावर बसुन होतो. (आईच्या भाषेत अजुन थोडावेळ बसलो असतो तर मुळं रुतली असती सोफ्यात.) पण जाग्यावरुन हललो नाही. पंखा बंद होता तो चालु केला नाही. एसी ही बंदच होता. घामात निथळत मॅच पाहिली शेवट पर्यंत.

सो विकासराव वाटल्यास एक झकास रेशीपी तुमच्या नावे करीन पण पुढाल्याली मॅच नेट वर पाहा पण रिमोटला हात लावु णका.

(एक्स क्रिकेटर) गणा

मेघवेडा's picture

25 Mar 2011 - 3:15 am | मेघवेडा

अंधश्रद्धा आणि क्रिकेट हातात हात आणि गळयात गळे घालुन चालतात.

असंच म्हणतो!

मीही आज एकदा उठून किचनमध्ये जाऊन एक ग्लास पाणी घेऊन आलो तोवर व्हाईट गेलेला होता. मग आपली ब्याटिंग चालू असताना इंचभरही हाललो नाही जागचा! म्हटलं उगाच उठायचो नि विकेट जायची आपली एखादी.. तेंव्हा, वाटल्यास नेट वर पाहा पण रिमोटपासून मैलभर दूरच थांबा. तुम्ही आणि ज्यांना तुमच्यासारखं वाटतं त्यांनी सगळ्यांनीच! :)

अरे मेव्या,
येड्या, अजून चार ग्लास पाणी त्यांच्या इनिंगमध्ये जास्त प्यायला असतात तर काय असा काय दुष्काळ पडणार होता तुझ्याकडे???

त्या म्याचपायी डोकं चालवणारच नाही तर काय बोलणार आता??? ;-)

--असुर

प्रीत-मोहर's picture

25 Mar 2011 - 9:25 pm | प्रीत-मोहर

अगदी अगदी

१००% सहमत!!!!

हा मेव्या अर्धवटच ए !!!(अर्धवट नावाचा मिपासदस्य नव्हे )

सखी's picture

25 Mar 2011 - 5:24 am | सखी

घामात निथळत मॅच पाहिली शेवट पर्यंत.

यावर डोळ्यात पाणी येऊस्तवर हसुन घेतलं, वा! याला म्हणतात क्रिकेटचे खरे भक्त!!

मला हाफिसात असल्याने मॅच बघता नाही आली, फक्त स्कोअरबोर्डावर नजर ठेवुन होते. प्लिज कोणाकडे जर हायलाईट्सची लिंक असेल तर इथे कळवाल का?

गणपा's picture

25 Mar 2011 - 5:29 am | गणपा
आनंदयात्री's picture

25 Mar 2011 - 1:05 am | आनंदयात्री

सेम टु सेम अंधश्रद्धा मी बाळगुन आहे. आज शेवटचे २२ रन राहिले असतांना मी एफ-५ मारणे बंद केले आणि सरळ रामनाम जपत काहीतरी फतरुड मेलला रिप्लाय देत बसलो, अन जिंकलो ना तेजायला. भारत पाक बघु की नको असा आजपासुनच विचार करतोय.

=))
मॅचमुळे अनेकजण जपमार्गाला लागलेले पाहून धन्य झाले. आज जर गोंदवलेकर महाराज असते तर जपाऐवजी त्यांनी मॅचचा पुरस्कार केला असता.

विकास's picture

25 Mar 2011 - 7:48 am | विकास

गणपा, मेघवेडा, आनंदयात्री,

मामला गंभीर दिसतोय... नक्कीच विचार करेन.

टारझन's picture

25 Mar 2011 - 3:30 pm | टारझन

काय लोकं आहेत ? आहो क्रिकइन्फो वर मॅच पाहिल्यास एफ-५ नाही दाबावा लागत . ऑटो रिफ्रेश आहे .
मेंटॉस खाऑ .. दिमाग की बत्ती जलाऑ :)

-( एफ-१ ऍट युवर सर्वीस ) सायकल सुमाकर

(१) कॉम्युटर टी व्ही ला जोडून , रिमोटद्वारा चालवून मॅच पहाणार का?
(२) तसं असेल तर पहा ना मग. रिमोट जोडीदाराकडे द्या. तुम्ही अजीबात स्पर्श करू नका रिमोटला.
(३) तुम्ही त्या दिवशी स्वयंपाक बनवा म्हणजे सारखं उठावं पण लागेल आणि (जर या श्रद्धेत काही तथ्य असेल तर) स्वस्थता न लाभल्याने भारत जिंकेल.

अरेरे.. इकासराव काय हे! (तरी बरं उपक्रमावर असता तुम्ही, यनावालासर थकले तुम्हाला समजावुन! ;-) )

येक उपाय सांगतो, पण तेव्हढं चित्राकाकुंना उपाय दिसणार नाही याची काळजी घ्या, नायतर आहेच दंडुका आमच्या पाठीत. ;-)

तसंही मॅच रातच्याला सुरु होते बघा (रोजच्यासारखं एखादा पेग वाईन घेण्यापेक्षा) अंमळ थोडीशी जास्तच व्हिस्की घ्या.. फार जास्त नको.. आणि मग बघा मॅच.. नाय सगळ्या अंधश्रद्धा हाय (म्हणजे वर हो) झाल्या तर सांगा.

चित्रा's picture

25 Mar 2011 - 4:49 am | चित्रा

चित्राकाकुंना म्हणतोस काय रे?

येच आता इकडे, दंडुका घालते पाठीत.

आता हे मधुशालेत 'बसणार'च असतील तर मीही बसेन म्हणते बाजूला. एकास दोन बरें, कांय?

आता हे मधुशालेत 'बसणार'च असतील तर मीही बसेन म्हणते बाजूला

हो, भारत जिंकायला लागला तर एखादा पेग जास्तच जाउन, किंवा हरायला लागला तर दोन पेग जास्त घ्यायला लागुन, कदाचित 'डीडी' लागेल त्यांना. ;-)

विकास's picture

25 Mar 2011 - 7:52 am | विकास

यनावालासर थकले तुम्हाला समजावुन!

फक्त यनावालाच? ;)

बाकी पाणी वाचवा म्हणत असताना अशाच्याने इतरांना "पालथ्या घड्यावर पाणी" असाच अनुभव येत असणार. :(

बाकी नशा काय दारूनेच चढते? मॅच बघूनपण चढू शकते ना!

आत्मशून्य's picture

25 Mar 2011 - 3:58 am | आत्मशून्य

नाऊ आयम काँटींग ओन यूव फो शूअर,

पूढील मॅचला (व मॅचपर्यंत)
तेंडूलकरची सेंचूरी
भारतीय संघाची बॅटींग चालू असताना तेंडूलकरचे ड्रेसींगरूमधे वीना पॅड्स/ग्लोव्ज बसणे
तूमचे टीवी बघणे व श्रध्दा व अनूभवाला चक्क अंधश्रध्दा संबोधणे
प्रूथ्वी गोल आहे असा अर्धसत्य वैज्ञानीक द्रुश्टीकोन बाळगणे
तर्काने काल्पनिक गणितवादाचे व पर्यायाने वैज्ञानिक दृष्टीकोनाचे खण्डन करणे
आणी इतर सर्व श्रध्दाळू लोकांच्या धृड श्रध्दा व अनूभव सीध्द गोष्टी यांच्या वीपरीत वर्तन व वीशेषतः लेखन करणे
हे टाळलेच पाहीजे.

तरीही सांगू जस्ट चीलं... सगळ काही फीक्स आहे... पण कोणीतरी नूकतच लीहल आहे की जो जींकेल अथवा हारेल हा फक्त एक अपघात असेल आणी आपल्या हातात फक्त दैवी उपायांच्या मागे न लागता आलेल्या प्रसंगाला तोंड देत योग्य तो मार्ग शोधला पाहिजे.... म्हणून जरा भीती वाटती आहे.... कारण जर तूम्ही टीवी बघून मॅच जींकली अथवा न बघता हारली तर मग तूमचे रीवर्सल ओफ फोरच्यून सूरू झाले म्हणावे लागेल आनी त्याचे परीणाम भारतीय टीम मधील बांधवांपेक्शा तूमच्यावरच जास्त वाइट होतील सावधान..

विकास's picture

25 Mar 2011 - 7:54 am | विकास

सगळ काही फीक्स आहे...

कसं बोललात! कर्ताकरवीता आपण थोडेच? आपण फक्त बघे अथवा न-बघे!

वपाडाव's picture

25 Mar 2011 - 10:48 am | वपाडाव

तेंडूलकरची सेंचूरी ?...

तेंडूलकर काल जेव्हा ५३ रनांवर औट झाला तेव्हाच म्हणालो आज म्याच जिंकणार ?
लै मोटा फ्यान आहे राव.. पुन साला त्येचं ब्याड लक लय घान.. म्हुन मन्ल शेन्चुरी नाय तर नाय.. वल्ड कप फायजे...

राजेश घासकडवी's picture

25 Mar 2011 - 5:18 am | राजेश घासकडवी

मी जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष मॅच बघितली आहे तेव्हा भारत हमखास पाकिस्तानविरुद्ध जिंकलेला आहे. त्यामुळे असं करा, येत्या मॅच बघण्यासाठी मला तुमच्या घरी बोलवा. आपण दोघांनी बघितली तर त्यावरून तुमची पनवती जास्त स्ट्रांग की माझा गुडलक चार्म जास्त पावरफुल हे ठरवता येईल. क्काय?

हं कळलं..आता फक्त ब्रँड सांगा.. ;-)

तुमच्या दोघांचे लक/चार्म एकमेकांवर आदळुन टाय झाली तर. ;)
नक्को बॉ हार्ट लै कमजोर झालय हल्ली आमचं. :p

झाली यांची पनवती सुरु..टाय झाली तर सुपर ओवरमध्ये घाण करतील आपले लोक.. गपा!! ;-)

गेले ३ सामणे आमच्या लावलेल्या पणवटीमुळे जिंकलेत. अभ्यास वाढवा. ;)

विकास's picture

25 Mar 2011 - 7:56 am | विकास

आपण दोघांनी बघितली तर त्यावरून तुमची पनवती जास्त स्ट्रांग की माझा गुडलक चार्म जास्त पावरफुल हे ठरवता येईल.

कल्पनेची आयडीआ एकदम आवडली! पण अहो, लोक काय म्हणतील? दोघे आपापल्या अंधश्रद्धांची स्पर्धा करत आहेत! ;)

रमताराम's picture

25 Mar 2011 - 12:32 pm | रमताराम

त्या रामानंद सागरच्या रामायणात जसे रामाचे नि रावणाचे बाण जसे बरोब्बर टोकापाशी भिडून कसलेसे फटाके फोडून विरून जात ते डोळ्यासमोर आले. शेवटी काय, फटाके फुटल्याशी मतलब, कसं?

रेवती's picture

25 Mar 2011 - 5:25 am | रेवती

हॅ हॅ हॅ...
हे असेच प्रश्न डोकं वर काढतात म्हणून मी कधी म्याच पहात नाही. कोणी अनोळखी बारा पंध्राजण मोठ्या मैदानावर खेळत असतात आणि आमच्या घरात "अरे मुर्खाऽऽ कॅच सोडलास (किंवा दिलास) की!" "आऽऽऽऊट" अजून असलेच शब्द ऐकायला मिळतात. मी आतापर्यंत कधीही म्याच संपूर्ण अशी पाहिली नाहिये. माझ्या कॉलेजला जाण्याच्या बसस्टॉपच्या मागे पोस्टरं विकणारा बुवा सगळ्या आकाशी निळ्या कपड्यातल्या माणसांची चित्रं लावून ठेवायचा. त्यातला अनिल कुंबळे हा माणूस 'त्या वयाप्रमाणे' आवडत असे. मला कोणावरही 'मरणे' जमलेले नाही हे ही लगेच सांगते. माझे लग्न झाल्यावर सासरी सगळेजण म्याच बघत होते म्हणून मीही बघत होते. आणि तो पोस्टरवरचा मनुष्य इथे मैदानावर काय करतोय हा प्रश्न मनात आल्याआल्या बावळटासारखा विचारला. नवरा हसून हसून दोन खुर्च्यांमध्ये पडला.
तर सांगायचा मुद्दा असा कि आपण म्याच कशीही, कुठुनही, अक्षांश, रेखांश लक्षात ठेवून, पंचांग बघून ठरवली, पाहिली किंवा पाहिली नाही तरी (आपल्याला तरी) फरक पडत नाही. हा प्रतिसाद हलके घेणे.

राजेश घासकडवी's picture

25 Mar 2011 - 5:35 am | राजेश घासकडवी

मी आतापर्यंत कधीही म्याच संपूर्ण अशी पाहिली नाहिये.

हाय कंबख्त तुने तो पीईच नही...

चित्रा's picture

25 Mar 2011 - 7:35 am | चित्रा

त्यातला अनिल कुंबळे हा माणूस 'त्या वयाप्रमाणे' आवडत असे. मला कोणावरही 'मरणे' जमलेले नाही हे ही लगेच सांगते.

हसून हसून लोळले. मी मात्र इंडियन क्रिकेट टीममधील अनेकांवर आळीपाळीने मरत असे हेही सांगून टाकते. :)
त्यातही कुंबळे आवडत असे, श्रीकांत, दिलीप वेंगसरकर आवडत. हिंदू कॉलनीतले वेंगसरकरचे घर बसमधून जाताना मैत्रिणीने दाखवले होते, तिकडे हमखास लक्ष जायचे :) आणि तिकडे संदीप पाटीलच्या शिवाजी पार्कच्या इथल्या गल्लीजवळ एका सायकलवाल्याचे दुकान होते तेथे सायकल घेऊन फिरत असू. उगाच तो गॅलरीत दिसतो का हे पहाण्याची उत्सुकता असे. (अर्थात तेव्हा मी बरीच लहान होते!)

सचिन लहान, आपल्यातला वाटायचा, त्यामुळे त्याच्यावर मरण्याचे फीलींग येत नसे. हाहाहा.

विकास's picture

25 Mar 2011 - 7:57 am | विकास

conflict of interest...

चित्रा's picture

25 Mar 2011 - 8:27 am | चित्रा

इंडियन क्रिकेट टीममध्ये असता तर तुमच्यावर तेव्हाच मेले असते.
हाहाहा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Mar 2011 - 8:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरेरे, अंधश्रद्धेसारख्या महत्त्वाच्या विषयावरून हा असला जारण-मरण्याचा प्रकार पाहून खेद वाटला, शरम वाटली. उगाच, काहीही घेणं-देणं, गरज नसताना मिपाकरांची जाहीर माफी मागावी काय?

बाकी पाशवी शक्तींनी मरण्यापेक्षा मारण्याच्या गोष्टी कराव्यात हा फुकाचा सल्ला देऊन मी माझे दोन शब्द संपवते.

पिवळा डांबिस's picture

25 Mar 2011 - 9:03 am | पिवळा डांबिस

विकासचे धागे आम्ही तसे नेहमीच वाचतो....
पण क्वचितच ते इतके रोचक आणि वाचनीय असतात!!!!:)
क्रिकेट फीवर जवरदस्त चढलेला दिसतोय!!!
आम्ही फक्त "सौ"जन्यभयास्तव इतकंच म्हणतो,
चालू द्या!!!
:)

चित्रा's picture

25 Mar 2011 - 9:36 am | चित्रा

कुणाच्या सौजन्यभयास्तव गप्प बसायची वेळ आली आहे?

पिवळा डांबिस's picture

25 Mar 2011 - 9:40 am | पिवळा डांबिस

आमच्या स्वतःच्या!
आणिक दुसर्‍या कुणाच्या?
या धाग्याचा जोडीने एकत्र आस्वाद घेत होतो ना!!!!
:)

चित्रा's picture

25 Mar 2011 - 9:45 am | चित्रा

होऊन जाऊ देत.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Mar 2011 - 9:33 am | विश्वनाथ मेहेंदळे

काकू लोकांना एक सूचना. आपण कालिजात असताना कुठल्या क्रिकेटपटूवर मरत होतो हे असे उघड सांगण्यापूर्वी विचार करा. वयं कळतात. ;-)

चित्रा's picture

25 Mar 2011 - 9:41 am | चित्रा

टाकलंत विरझण?!! तरी म्हटले अजून कोण कसे बोलले नाही?

मला स्टेफी ग्राफ आवडायची ... :) आता सांगा वय ? :) उगा आपलं कैच्याकै :)

- लासे वेगासी

पुष्करिणी's picture

25 Mar 2011 - 3:53 pm | पुष्करिणी

तुम्ही काकू आहात? हे कधी झालं

वय फक्त काकु लोकांना असतं असा जावई शोध लावणार्‍या पुष्करीणी काकुंचा विजय असो .. :)

- पुष करुनी

अरे वय दोघांच असतं, पण बायका या बाबतीत* जरा चोरटयाच.
(आता येतय पाशवी मंडळ मोर्चा घिऊन. ;) घ्या विकासराव आम्ही तुमच्यासाठी कुर्बान होतोय. शेंचुरीच्या अभिनंदनासाठी जिवंत असु नसु. तेव्हा आत्ताच आमच्या शुभेच्छा कबुल करा. )

लागोपाठ दुसर्‍या संपादकाच्या शतकी भागीदरीत खारीचा वाटा उचलतोय याची संमं ने दखल घ्यावी अस जाता जाता नमुद करतो.
*अपवाद पाकी खेळाडु.

पुष्करिणी's picture

25 Mar 2011 - 4:27 pm | पुष्करिणी

क्रिकेटसारख्या पवित्र विषयावरच्या धाग्यावरही महिलांचा अपमान !!
शेवटी काय कंपू आणि कंपूबाज ...:) ह्.घ्या हो :)

"कंपूबाजी जेंडर बायास्ड नसते" एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

हे तर चार शब्द झाले मेवेराव!! हिशोबात चुकायला लागलात तुम्ही!!! क्रिकेटच्या साथीच्या ज्वराचा परिणाम, दुसरं काय!!!
३० तारखेला सूतशेखराची मात्रा ठेवा बरोबर, नाहीतर अगदीच वात आणाल दुसर्‍यांना!! =)) =))

--असुर

अभ्यास कमी पडतोय का मेवे??

स्त्री कंपु (वि.) पुरुष कंपु नसतात असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? मग युयुत्सु कुठल्या कंपुत आहेत?

शिल्पा ब कुठल्या कंपुत आहेत असेही विचारणार होतो, पण जीवाच्या भीतीने नाही विचारत. :-?

पुष्करिणी's picture

25 Mar 2011 - 4:21 pm | पुष्करिणी

वय दोघांनाही असतच पण त्याचं काय आहे वर फक्त काकू लोकांना सांगितलय ना वय कळतं म्हणून ...
लगेच पळत पळत येउन स्टेफी काकू आवडतात म्हटला म्हणून विचारलं...

काकु, तुम्हाला चिखलात दगडफेक करायला सांगितले हो कोण?
शिंतोडे उडणारंच...
पुन्हा असं म्हणु नका 'सर्फ एक्सेल है तो दाग अच्छे है !'

रेवती's picture

25 Mar 2011 - 6:23 pm | रेवती

तुम्ही काकू आहात? हे कधी झालं
अगं बाई पुष्करिणी, हसून हसून मेले की!

गेंडा's picture

5 Apr 2011 - 11:53 am | गेंडा

कंच सागायच?

म्हंजी..................

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Mar 2011 - 9:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो मेंहेंदळे काका, अनेक काका लोकांप्रमाणे काकूंना आपली माहिती दडवण्याची गरज वाटत नाही.

मला एकेकाळी रिकी पाँटींग आवडायचा, पण माजोर्डेपणा दिसल्यावर आवडेनासा झाला. अलिकडे क्रिकेट पहाणं कमी झालेलं आहे, पण ब्रेट ली एकदम हँडसम आहे. ही आपली सहजच माहितीची देवाणघेवाण.

वपाडाव's picture

25 Mar 2011 - 11:02 am | वपाडाव

काकु, जरा
स्टुअर्ट ब्रॉड, कोहली, ल्युक राईट, KP, Michael Clarke....
अजुनही आहेत देखणी मुले.. गुगलुन बघा एकेकाला..
आणी हो काका लोकांसाठी... ही लिंक
Ellyse Perry, Laura Marsh

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Mar 2011 - 11:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाय रे व.डा.बाळा, मला "छपरी" दिसणारे क्रिकेटपटू आवडत नाहीत. आमची आवड वेगळी आहे. ;-)
आधीच्या प्रतिसादातल्या यादीत राहुल द्रविड, डॅनिएल व्हीटोरी, जाँटी र्‍होड्स आणि मार्क बाऊचर राहिलेच.

विजुभाऊ's picture

25 Mar 2011 - 3:16 pm | विजुभाऊ

नाय रे व.डा.बाळा, मला "छपरी" दिसणारे क्रिकेटपटू आवडत नाहीत.
लसीत मलिंगा , मखाया एन्टीनी , हे सुपरहिट्ट देखणे लोक्स राहीले की तै.

पैसा's picture

26 Mar 2011 - 10:32 am | पैसा

वगैरे झिंबाब्वे वाल्यानी काय घोडं मारलं तर?

प्राजु's picture

26 Mar 2011 - 3:56 am | प्राजु

होना..! मला वॉ ब्रदर्स आवडयचे. त्यातल्या त्यात मार्क वॉ तर जास्तच. :)
वासिम आक्रमही आवडायचा.. :)

टारझन's picture

26 Mar 2011 - 9:28 am | टारझन

वसिम आक्रमचे गाल थोड्या प्रमाणात ओम पुरी च्या गालांसारखे होते म्हणे ? रांजणखळगे का काय ते :)

बाकी प्राजु चे ही वय कळले असे मी म्हणनार नाही :)
कोणत्या पोरींना स्टिव्ह टीकोलो , हेन्री ओलोंगा , मॉरिस ऑडुंबे , प्युमाई म्बांग्वा , मखाया एन्टिनी , अ‍ॅबी कुरुविला , व्यंकटेश प्रसाद , लक्ष्मीपथी बालाजी , आशिश नेहरा , इत्यादी हँडसम गाईज का नाही आवडत ? का आवडतात पण सांगण्यास संकोच वाटतो ? =))

-

गेंडा's picture

5 Apr 2011 - 12:04 pm | गेंडा

Full name Ricky Thomas Ponting

Born December 19, 1974, Launceston, Tasmania

Current age 36 years 107 days

(अवांतर- Education Mowbray Primary; Brooks Senior High School, Launceston)

Full name Brett Lee

Born November 8, 1976, Wollongong, New South Wales

Current age 34 years 148 days

त्रैराशीक मांडा. ;)

मी मात्र इंडियन क्रिकेट टीममधील अनेकांवर आळीपाळीने मरत असे हेही सांगून टाकते.

आता कुठे खरं कारण कळलं, का विकासराव मॅच बघत नाहीत ते. मॅच सुरु असताना असं सारखं सांगून टाकल्यामुळे अंमळ इनो कमी पडत असेल विकासरावांना. ;-)

पळा आता, काका आणि काकू दोघे एकदम दंडूका घालताहेत पाठीत...

चित्रा's picture

25 Mar 2011 - 4:48 pm | चित्रा

दहापंधरा वर्षांनी लहान पोरे म्हणजे आमच्या भावांसारखी, कधीकधी पुतण्यांसारखी. :)
त्यांना बघून फार तर बंधुप्रेमाचे, पुत्रप्रेमाचे भरते येईल. अर्थात त्याने जळजळ होत असली तर माहिती नाही बॉ.

हा हा हा _/\_,, कुठ्येत तुमचे पाय?? पाया पडतो. ;-)

@वडापाव,

गाण्यातली एक ओळ आवडली. :-)

वपाडाव's picture

25 Mar 2011 - 5:16 pm | वपाडाव

Nile,
मला त्या 'HATTRICK !' पिच्चर मधील गाण्यातील एक कडवं आठवलं...
मेरे दिलविच वो रेंदिये, उसके दिलविच धोणी , टुक टुक देखे मैच लगाके कैच गया बेकार,
रब्बा खैर करे...
गाणं इथं पहायला मिळेल...

विकास's picture

25 Mar 2011 - 8:06 am | विकास

हा प्रतिसाद हलके घेणे.

हलके वगैरे आम्ही काही घेत नाही.. इतरांकडून प्रतिसादाची अपेक्षा न करता, आम्हीच प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देतो. ;) (आता हा प्रतिसाद मात्र हलकेच घ्या!)

आधी तो अमळ बारीक होता तेव्हाची गोष्ट असेल ही !!!!

काकांनी नेहमी प्रमाणे एकच मार्‍या पण काय शोल्लेट मार्‍या. =))

एका बॉलात(वाक्यात) शेंचुरी कशी मारावी ते काकांकडुन शिकावे. ;)

माझ्या नवर्‍याला असं म्हणतोस? गण्या, तू भेट मेल्या.....

रामदास, तुम्ही का हो माझ्या नवर्‍याला जाड म्हणत असता? एवढ्यात त्याने पूर्ण एक किलो आणि २०० ग्रॅम वजन कमी केले आहे. आणि वेळ आलीच तर आम्ही खुर्च्यांमधले अंतर वाढवू म्हणजे सहजपणे पडता येइल.;)

असुर's picture

25 Mar 2011 - 7:42 pm | असुर

आज्जी,

रामदासकाका कुंबळेला बारीक म्हणाले असतील गं! तू उगाच स्वत:वर ओढवून घेतलंस बघ!! =)) =))

--असुर

नेत्रेश's picture

25 Mar 2011 - 6:51 am | नेत्रेश

आज नेमकी मिटींग मॅचच्या शेवटच्या १० ओव्हर्सच्या वेळी होती. मिटींग मध्ये फोनवर मॅच पहात बसलो होतो. बाजुचे दोघेही नजर तीरकी करुन पहात होते. रैनाचा फटका (षट् कार) बाउंडरीच्या बाहेर पडल्यावर तीघेही ओरडलो. सगळे आमच्याकडे पहात होते, पण निगरगट्टपणे सर्व मॅच पाहीली . आता भारत-पाक मॅचच्या दिवशी मॅच संपल्यावरच ऑफिसला जाणार.

विकास's picture

25 Mar 2011 - 8:00 am | विकास

आता भारत-पाक मॅचच्या दिवशी मॅच संपल्यावरच ऑफिसला जाणार.

तुमच्या हापिसाचे नाव शेअर मार्केटमध्ये असेल तर कळवा. त्या दिवशी शेअर घेतो. (दुसर्‍या दिवशी भाव नक्की वाढलेला असणार!) ;)

असो गंमतीचा भाग सोडून द्या आणि ह.घ्या. पण फोनवर मॅच कशी पाहीली ते सांगावेत ही विनंती. फोनला रिमोट नसतो तेंव्हा मला कदाचीत चालेल... :-)

इंटरनेटवर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग चालु असते. तेव्हा ३जी/४जी फोन किंवा वायफाय सपोर्ट असलेल्या फोनवर मॅच दिसते.
ऑफिसचा फोन असल्यास उत्तम :)

मी वरील एकही प्रतिसाद न वाचता सांगते, गप एफ ५ वरच बघा!!
भरीत भर म्हणुन एफ ५ ला लिंबु मिरच्या बांधा पण भारत v/s पाकचा वांदा झाला ना तर बघा! सुप्पारी काढीन मी तुमच्या नावाची.

सो ऽ बोट मोडुन हातात आली तरी चालतील पण बोट मोडतच बघा!

मी स्वतः भारत v/s पाक कधीही बघु शकत नाही, प्रचंड धडधडत मला, एक एक बॉल म्हण्जे बाँब वाटतो मला. एव्हढ हायपर व्हायला होत की सहन नाही होत्.पहिल्या दहा ओव्हर मध्ये भारताच्या ३०० व्हाव्यात अस माझ प्रामाणिक मत असत.
उगिच बोलायला लावलत विकास दा . माझा नवरा जाम वैतागतो या मॅचच्या वेळी माझ्यावर. 'अग जरा थंड घे! थंड घे!'म्हणुन म्हणुन वैतागतो.

विकास's picture

25 Mar 2011 - 8:02 am | विकास

भारत v/s पाकचा वांदा झाला ना तर बघा! सुप्पारी काढीन मी तुमच्या नावाची.

सचीन-युवराजला सांगून ठेवले आहे की त्यांनी गडबड केली तर सुपारी काढेन म्हणून! सचीनने शब्द दिला आहे की तो सेंच्युरी काढणार नाही म्हणून.

रमताराम's picture

25 Mar 2011 - 12:39 pm | रमताराम

कॉलिंग डॉन्राव (व्यावसायिक कॉल बर्का, नायतर याल 'हॅ कसला भिक्कारडा खेळ' असे म्हणत), कॉ़ळिंग टार्‍या, सुपारी घ्यायला या. ये रे मेव्या, ये रे प्रभो, विकासरावांची सुपारी देतोय देवावर शतक करू नये म्हणून दबाव टाकल्याबद्दल, जरा मदत करा.

ओ विकासराव, तुम्हीही गोर्‍या लोकांच्या प्रॉपगंडाचे बळी वाटतं. अभ्यास करा अभ्यास. नि गोर्‍या लोकांचे शब्द प्रमाण मानणे पुरे आता. त्या एका सुधारकाला फटका देताना आम्ही हिशोब दिला होता तो तुम्हालाही देतो, ४८ शतके ३३ विजय, आवाज नाय पायजे.

Nile's picture

25 Mar 2011 - 12:43 pm | Nile

आत्ताच डॉन्रावांना फोन केला तर "डान्राव गुलुगुलु बोलने मे बिजि है, क्रियपा थोडी देर बाद ट्राय कीजीए" असा मेसेज येतो आहे. दोन तीन तास तरी फोन एंगेज्ड राहील असे कळते. :-(

रमताराम's picture

25 Mar 2011 - 1:33 pm | रमताराम

ती शक्यता गृहित धरूनच टार्‍याला पण बोलावणे धाडले होते. तोही गुलूगुलू बोलत बसला असण्याची शक्यता आहेच. पण आम्ही संख्याशास्त्री असल्याने 'विमानात एकाच वेळी दोन बॉम्ब असण्याची शक्यता शून्य असते' यावर आमचा भरवसा आहे.

आपल्या अंधश्रद्धा काय घेउन बसलात, काल युवराज-रैनाची भागीदारी १५ च्या वर गेली, त्यानंतर आपल्या संघापैकी कोणिही बसल्या ठिकाणावरुन हलला नाही.

गावसकर सांगत होते, ही श्रद्धा / अंधश्रद्धा / परंपरा आपल्याकडे गेली २० वर्षे चालु आहे. अझरुद्दीनच्या काळात चालु झाली. अर्थात त्यामागे मानसिक कारणं ही असतील.

बाकी, जेंव्हा जेंव्हा मी मॅचकडं दुर्लक्ष करतो तेंव्हा तेंव्हा अगदी प्रत्येक वेळी मला हायलाईट बघावे लागतात, आणि ही अंधश्रद्धा नाही अनुभव आहे.

विकास's picture

25 Mar 2011 - 8:03 am | विकास

गावसकर सांगत होते, ही श्रद्धा / अंधश्रद्धा / परंपरा आपल्याकडे गेली २० वर्षे चालु आहे. अझरुद्दीनच्या काळात चालु झाली.

ही माहीती खरेच रोचक आहे.

बाकी आता सुरवात नाही हो, वर्ल्डकपचा शेवट जवळ आला आहे. :-)

प्रशांत's picture

25 Mar 2011 - 11:03 am | प्रशांत

>>>>>> जेंव्हा जेंव्हा मी मॅचकडं दुर्लक्ष करतो तेंव्हा तेंव्हा अगदी प्रत्येक वेळी मला हायलाईट बघावे लागतात

मग ३१ ला थोडा वेळ काढुन ठेवा हायलाईट पाहण्यासाठी... :)

सहज's picture

25 Mar 2011 - 8:05 am | सहज

हा हा हा!

फिक्सींग नसल्यास, त्या दिवशी जी टीम चांगली/कमी वाईट खेळेल ती जिंकणार.

बाकी असे वाटते की भारताने हा वर्ल्ड कप जिंकावा, सचिनला चांगला सेंड ऑफ द्यावा. मग भले पुढची दोन वर्ष जी खेळाल ती मॅच हरा लेको, पर्वा नाय. :-)

(अंधश्रद्धाविरोधक) सहज

आत्मशून्य's picture

25 Mar 2011 - 3:46 pm | आत्मशून्य

पण सचिनला चांगला सेंड ऑफ कशापाय ? आपला मास्टर ब्लास्टर अजून एक वर्ल्ड कप खेळणार आहे.... सच्चू नसेल तर नंतर ऊरलंच काय आहे क्रीकेटमंदी.

नगरीनिरंजन's picture

25 Mar 2011 - 8:09 am | नगरीनिरंजन

भारताचा संघ जिंकावा वाटत असेल अशा सगळ्यांनी पाकिस्तानी संघाच्या विजयावर असतील नसतील तेवढे पैसे लावा. मग अंधश्रद्धा पाळा किंवा पाळू नका, भारत जिंकणार.

छोटा डॉन's picture

25 Mar 2011 - 10:32 am | छोटा डॉन

मी जनरली ज्या टिमवर लिहतो ती टिम पटकन मॅच हारुन बसते अशी आकडेवारी आहे, अर्थात त्यालाही उगाच आप्ले शास्त्रापुरते अपवाद आहेत, बाकी आम्ही लिहणार आणि मॅच हारणार हे फिक्स असते ( अर्थात ह्या फिक्सिंगचा मॅच फिक्सिंगशी संबंध नाही ).

मग हाच मुहुर्त गाठुन आमच्या 'धोबीघाट' चा पुढचा भाग 'पाकीस्तान' वर लिहावा का असा विचार चालु आहे.

- छोटा डॉन

सुधीर१३७'s picture

25 Mar 2011 - 11:14 am | सुधीर१३७

मॅच पाहू नका आणि आपल्या संघाला परा (भवा) च्या छायेत लोटू नका....................

मन१'s picture

25 Mar 2011 - 12:13 pm | मन१

ह्यात काय आहे.
असं होतय कारण तुमच्या दृष्टीवर शनीची दृष्टी वक्री आहे!
एखाद्या सज्जन, गरिब व सदाचरणी ब्राह्मणास सलग दोनेक महिने रोज अभिषेक करुन भोजन दिल्यास तुमच्या दृष्टीवरची शनीची दृष्टी नक्कीच जाइल.

काय म्हणता? असा कोण मिळणारे? अहो मी आहे की. आता अशा अडीअडाचणीच्या वेळेस आम्ही नाय तर कोण कामाला येणार हो.
कधीही हाक द्या, मस्त भरपॅत भोजन करुन तुम्हाला उपकृत करु! ;-)

--मनोबा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Mar 2011 - 12:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुझ्या आयडीचं नाव बदलून अभिषेक असं केलं तर भारत जिंकेल काय?

ब्राह्मणास सलग दोनेक महिने रोज अभिषेक
अहो सर्दी होइल त्याचं काय? नाहीतर डोक्यावर छत्री धरावी लागेल.;)

sagarparadkar's picture

25 Mar 2011 - 12:36 pm | sagarparadkar

विश्वास ठेवा अगर ठेवू नका. पण माझा असा ठाम समज आहे की सचिन जर खूप खेळला, म्हणजे शतकी खेळी वगैरे केली तर आपण हारणार हे नक्की. त्याला कारण सचिन मुळीच नाही पण होतं काय की त्याची अशी जबरदस्त खेळी झाली, की त्याच्यानंतर येणारे का कुणास ठाऊक, पण भराभर आऊट होत जातात.

त्यामुळे काल सचिन अर्धशतकानंतर आऊट झाल्यावर मी मनोमन खूष झालो की आता आपण जिंकण्याची शक्यता वाढली. आणि खरोखरच आपण जिंकलो आणि माझ्या समजूतीवर परत एकदा शिकामोर्तब झालं :) :)

अवांतरः ऑस्ट्रेलियाची चांगलीच जिरली ह्याचा आनंद अवर्णनीय होता, ते स्वतःला फार म्हणजे फारच महान समजत होते. गर्वाचे घर असे कधी ना कधीतरी खाली झालेले पाहायचेच होते. :)

रमताराम's picture

25 Mar 2011 - 12:46 pm | रमताराम

(कंटाळा आला पुन्हा पुन्हा टंकून, इतके अडाणी आहेत आजूबाजूला) अरे बाळांनो देवाची ४८ शतके नि त्यातले ३३ विजय रे राजांनो. जरा कष्ट घेऊन क्रिक-इन्फोच्या स्थळावर आकडेवारी नि फॅक्ट्स पहा की, किती दिवस बाबा वाक्यम् प्रमाणम् चालणार, आं? (अर्थात अज्ञान कवटाळून बसणारे पुरावा शोधायला जात नाहीतच. हातचे गेले तर कवटाळायला नवे पूर्वग्रह निवडायला चार आणे का होईना कष्ट पडतात ना.) विश्वासावरच भरवसा ठेवायचा तर पृथ्वी त्रिकोणी आहे यावरही विश्वास ठेवता येतो (हा शोध आम्हाला नुकताच जालावर लागला) नि पुरावे नि खंडनमंडन वर्ज्य म्हटल्यावर ते स्वयंसिद्ध असतेच.

sagarparadkar's picture

25 Mar 2011 - 12:55 pm | sagarparadkar

रमताराम , तुम्ही म्हणता तसंच असेल. पण मी नेमके त्या ४८ पैकी ३३ सोडून उर्वरीत १५ सामनेच नेमके बघितले असतील.
तर मग मी माझ्या अंधश्रद्धेचे पॉस्चुलेट्स असे मांडतो:

१. मी सामना बघत आहे , आणि
२. सचिनने जबरदस्त शतकी/द्विशतकी खेळी केली

तर आपण सामना हारण्याची शक्यता वाढते.

आता खूष ? :) :) :)

असं आहे काय? आता सचिन जेव्हा शतकी खेळतो तेव्हा जिंकायची शक्यता जास्त असल्याने, तुमचे पॉस्ट्युलेट चुकु नये म्हणुन, तुम्ही अजिबातच बघत जाउ नका. म्हणजे कसं.. मी एकदाही पाहिलेला सामना भारताने जिंकलेला नाही म्हणायला तुम्ही मोकळे. कशी वाटली आयडिया?

:|

sagarparadkar's picture

25 Mar 2011 - 1:12 pm | sagarparadkar

मी सामना पाहाणं, सचिनने दणकून शतक ठोकणं आणि आपण सामना हारणं हे आजतागायत जेव्हा कधी घडलं ते त्या त्या वेळेला 'यनावालां'च्या यदृच्छेने घडलं ... आता पुढे काय काय आणि कसं कसं घडणार असेल ते केवळ ती यदृच्छाच (किंवा ते 'यनावाला'च) जाणे ... मी पामर काय सांगणार .... :)

रमताराम's picture

25 Mar 2011 - 1:30 pm | रमताराम

आकडे खरे सांगत नाही हे नेहमी येणारे उत्तर न दिल्याबद्दल आभार.

आता तुमचे उत्तर पटले. तुम्ही स्वत:लाच स्टेक्-होल्डर बनवल्याने कार्यकारणभाव बदलला आहे. आणि हो त्यामुळे वपुंची स्टॅटिस्टिक्स मराठे म्हणून एक कथा आहे ती आठवली. ;) मिळाल्यास वाचून पहा.

कृपया ह.घ्या हे वे. सां. न. ल.

sagarparadkar's picture

25 Mar 2011 - 1:42 pm | sagarparadkar

कारण शेवटी आम्ही पेशवे नसलो तरी 'पेठेतले पुणेकर'च .... :)

आणि हो, नेमका इलेक्ट्रॉनिक्सच्या पहिल्या वर्षाला असताना व. पुं. ची 'प्रिंटेड सर्किट बोर्ड' ही कथा वाचली आणि जाम भडकलो होतो. परत कधीही त्यांचे पुस्तक खरेदी करून वाचणार नाही असा पणच करून टाकला होता ... :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Mar 2011 - 7:03 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>परत कधीही त्यांचे पुस्तक खरेदी करून वाचणार नाही असा पणच करून टाकला होता
तो मोडू नका हो. पुस्तक मित्राकडून उधार घेऊन वाचा. किंवा वाचनालयातून आणा. म्हणजे पुस्तकही वाचून होईल आणि प्रतिज्ञा पण अबाधित.

नन्दादीप's picture

25 Mar 2011 - 1:06 pm | नन्दादीप

@रमताराम...
तुमच्या प्रत्येक शब्दाशी सहमत.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Mar 2011 - 1:08 pm | llपुण्याचे पेशवेll

देवाची ४८ शतके नि त्यातले ३३ विजय रे राजांनो. जरा कष्ट घेऊन क्रिक-इन्फोच्या स्थळावर आकडेवारी नि फॅक्ट्स पहा की
आम्ही बाबा वाक्य प्रमाण मानत नाही त्यामुळे कोणत्याची क्रिकिन्फो वगैरे बाबाच्या भेटीला जाणार नाही. आम्ही देवाची जी जी शतके अनुभवली त्या त्या वेळेस भारताने हार अनुभवली. त्यामुळे अशा स्वानुभवाने सिद्ध झालेल्या गोष्टीवर विश्वास न ठेवण्यासाठी आम्हाला कोणत्याही क्रिकिन्फोबाबाची गरज नाही. असो.
(पळा नायतर हा रमता धुवेल उगाच)

रमताराम's picture

25 Mar 2011 - 1:20 pm | रमताराम

(पळा नायतर हा रमता धुवेल उगाच)
च्यायला मला काय येड लागलंय काय? तुमचे तुम्हीच नीट निस्तरा म्हणजे झालं. पाणी आहे ना पुरेसे?

अवांतरः पुप्याला देवावर टीका करताना पाहून ड्वाले पानावले.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Mar 2011 - 3:46 pm | llपुण्याचे पेशवेll

आरारा ... अरे धुवेल म्हणजे मारहाण करेल अशा अर्थी म्हटले होते. असो.

गणपा's picture

25 Mar 2011 - 1:18 pm | गणपा

रराशी बाडिस.

अनंत वेळा सांगुनही आणि पुर्‍याव्याने शाबित करुनही जे सचिनच्या सेंचुरीच्या नावाने बोटे मोडतात आणि/तसेच त्या गांधीच्या राहुलला 'युवराज' (?) म्हणुन संबोणारे म्हणजे मिडियामागे धावणारी मेंढर.

एक बोलला की लावलीच माळ बाकिच्यांनी.

सचिन जर खूप खेळला, म्हणजे शतकी खेळी वगैरे केली तर
ते रिकीच्या बाबतीत काल खरे ठरले. शेवटी तो रडवेला झाल्यावर नाही म्हटले तरी दया आलीच.

रमताराम's picture

25 Mar 2011 - 7:11 pm | रमताराम

ते रिकीच्या बाबतीत काल खरे ठरले. शेवटी तो रडवेला झाल्यावर नाही म्हटले तरी दया आलीच.
तुम्हाला काकू म्हटले ते योग्यच म्हणायचे, नाही म्हंजे 'मरणान्तानि वैराणी' वगैरे म्हणायला लागलात म्हणजे काकू असणारच तुम्ही. आमचे बघा स्सालं तो यम एक्स्टेंशन देऊन देऊन कंटाळला, पण अजून खुन्नस ठेवणे काही सोडत नाही आम्ही.

आणि माजोरडया रिकीला दया...? अशी वेळ आमच्यावर कधीही येऊ नये, आमच्या 'आम्ही' असण्याबद्दलच शंका घेऊ खुद्द आम्हीच.

या भितीपोटी काल रात्री एका दुकानासमोर उभा राहून शेवटच्या ओव्हर बघीतल्या. वयाकडे बघून दुकानवाल्यानी आत बसायची विनंती केली पण मी नाही आत गेलो. मग सायबर कॅफेत जाऊन स्कोर बघत होतो पण घरी नाही गेलो. शेवटच्या पाच ओव्हर तर चुळबुळत बघीतल्या. (आधी दोन बीर झाल्या होत्या) मग आपण जिंकलो .. आणि हा ... हा .. व्हॉट अ रिलीफ....

मृत्युन्जय's picture

25 Mar 2011 - 1:57 pm | मृत्युन्जय

खरे आहे खरे. आहे. माझाही अनुभव आहे की मी ज्यावेळेस मॅच पुर्ण बघतो तेव्हा भारत हारते. त्यामुळे मी किमान १०-२० ओव्हर्स तरी बघायचे टाळतो (तसे करुनही भारत कैकदा हारतो ही गोष्ट वेगळी).

माझ्या बाबांच्या बाबतीत पण हेच होतं आता त्यांनी यावर उपाय शोधलाय.
ते मॅच म्युट करुन पहातात ;)

लवंगी's picture

26 Mar 2011 - 8:14 am | लवंगी

आठवून ज्याम हसले... =))

नितिन थत्ते's picture

25 Mar 2011 - 2:53 pm | नितिन थत्ते

विकास यांना सल्ला...

पुढची मॅच जरूर पहा.

टेन्शन आले की मिपा मंत्राचा (बा*** भा**) तीन वेळा उच्चार करावा. आणि एक चमचाभर 'तीर्थ' घ्यावे.

तीर्थ घेण्यासाठी इतरांना बोलावले तर पुण्यसंचय होऊन सर्व संकटे दूर होतील असे भाकीत करतो.

उगाच नाय आम्ही म्हणत ...

गली गली मे शोर है ... थत्ते चाचा पॉल है ..

अवांतर : कोणाला आकडा लावायचा असल्यास थत्ते चाचांचा सल्ला जरुर घेणे ;)

रमताराम's picture

25 Mar 2011 - 4:28 pm | रमताराम

थत्तेचाचा कल्जी घेने. फुटबॉल वर्ल्डकप नंतर लवकरच पॉलसाहेब वैकुंठवासी झाले होते. (यात काही चेल्सीप्रेमींचा हात होता असे नंदन मेव्याला सांगत असताना प्रभोने ऐकले असे पराने पुप्याला केलेल्या खरडीत वाचल्याचे अदितीबैंनी डान्रावांना व्य. नि. तून लिहिले अशी वदंता आहे असे प्रीमोने प्रभोला सांगितल्याचे मेव्याने नंदनला कळवले असे आमच्या कानावर आले आहे.)

नितिन थत्ते's picture

25 Mar 2011 - 4:46 pm | नितिन थत्ते

माझ्या जिवावर एवढे लोक उठलेले पाहून डॉळे पाणावले.

ररा यांच्याकडून डलु समजावून घेतला की डोळे मिटेन. :)

-लुईस डकवर्थवी

प्रीत-मोहर's picture

25 Mar 2011 - 4:49 pm | प्रीत-मोहर

एय्य्य्य्य हम कु
छ नहीं किया
..
; कंपु त माझास मावेश्क
-रुन काय सिद्ध
करायचे आहे
?

-
विनाकारण आम्हाला ह्यात गुंतवल्याची कारणे द्या आज्जोबा!!!

रमताराम's picture

25 Mar 2011 - 7:15 pm | रमताराम

ज्याचं करायला जाव भलं...
लोक कंपूत जायला धडपडतात, नाना क्लृप्त्या करतात नि इथे आम्ही तुम्हाला आयतेच 'लिफ्ट करा दिया' तरी तुमची तक्रार आहेच.

(रमनान रामी)

विजुभाऊ's picture

25 Mar 2011 - 3:23 pm | विजुभाऊ

तीर्थ घेण्यासाठी इतरांना बोलावले तर पुण्यसंचय होऊन सर्व संकटे दूर होतील असे भाकीत करतो
नितीन थत्ते चाचा तुम्ही गुजरात मध्ये असल्याने कोणी तुमच्या तीर्थ घेण्यासाठी येईल याची सूतराम शक्यता नाही.
चला मी देतो तुम्हाला आवातण. ओये आज्जावो साड्ढी दिल्ली वीच टश्शण मनाणे वासते इथ्थे

नितिन थत्ते's picture

25 Mar 2011 - 4:37 pm | नितिन थत्ते

माझं तीर्थ नाय वो....
मला कोण तीर्थ (प्रसाद मी घेत नाही म्हणून) घ्यायला बोलावतोय का पहात होतो.

विकास's picture

25 Mar 2011 - 4:56 pm | विकास

अहो या ना कधीही! गुजराथ मधील प्रत्येक व्यक्तीस व्हिसा मिळत नाही असे थोडेच आहे आणि दिला नाही तरी गोरे (आडनाव नाही) बोलत नाहीत असे थोडेच आहे? ;)

फक्त मॅच राहील दूर आणि आपण दोघे एकमेकांशी कॅच-कॅच खेळत बसू अशी शंका येते :-)

कॅचकॅच???

तुम्ही दोघे आबाधोबी खेळाल अशी मला खात्री आहे! विचारा कुणालाही. ;-)

आत्मशून्य's picture

25 Mar 2011 - 3:51 pm | आत्मशून्य

कॉलींग यानावाला सर.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Mar 2011 - 7:27 pm | विश्वनाथ मेहेंदळे

यनावाला मिपावर यदृच्छेने (randomness चे तत्व) प्रकट होतात, त्यामुळे ते हा धागा बघतील याची गारंटी नाही.

सुधीर काळे's picture

25 Mar 2011 - 4:09 pm | सुधीर काळे

हे "शब्दांच्या पलिकडले" चित्र आमच्या कॉलनीत रहाणार्‍या एका सभासदाने पाठविले आहे!

रमताराम's picture

25 Mar 2011 - 4:18 pm | रमताराम

'वन पिक्चर इज बेटर दॅन थाउजंड वर्डस्' हे पुरेपूर पटले.

विकास's picture

25 Mar 2011 - 4:34 pm | विकास

'वन पिक्चर इज बेटर दॅन थाउजंड वर्डस्' हे पुरेपूर पटले.

अगदी १०००% पटले!

सुधीर१३७'s picture

26 Mar 2011 - 12:30 pm | सुधीर१३७

लय भारी............................................. १ नं............... :)

काळे साहेब मला फोटू दिसू नाय ऱ्हायला

मुख्य म्हणजे मी नारयाच्या कॅटेगरीतला आहे........शुभ बोल नाऱ्या.

णारझन

कच्ची कैरी's picture

25 Mar 2011 - 4:37 pm | कच्ची कैरी

@ इरसाल-इतला मजाना फोटो कस काय दिशी नई र्‍हायना तुले ?गैरच गांडु नशीब शे भो मंग तुन :)
बाकी एकदा माझ्या दिराला मी मॅचच बघु दिली नव्हती या अंधश्रद्धेपायी ,काय करणार आखिर दिल है हिंदुस्थानी :)

sagarparadkar's picture

25 Mar 2011 - 4:57 pm | sagarparadkar

>> इतला मजाना फोटो कस काय दिशी नई र्‍हायना तुले ?गैरच गांडु नशीब शे भो मंग तुन

अहिराणी, मराठी, कोंकणी आणि हिंदी ह्या सर्वच बोलींमधे ह्या शिव्यांचं समरूप असण्यामुळे आमचे डोळे मात्र विस्फारले ....

ह्या बाबतीत मात्र स्त्रीमुक्ती बरीच पुढे गेलेली दिसतेय .... :)

१०० प्रतिसादांबद्दल हाबिंणंडण विकास काका!!

हेच म्हणतो. अभिनंदन.

काका आणि काकु दोघांनी जोडीने हे कार्य सिद्धीस नेलेलं आहे त्याबद्दल दोघांचे अभिनंदन!

=)) =))

चित्रा's picture

26 Mar 2011 - 12:33 am | चित्रा

कसचं?

क्रिकेट फीवर असाच राहू दे, आणि भारत जिंकू दे म्हणजे सत्यनारायण घालीन, थत्ते येतील तेव्हा तीर्थाबरोबर त्यांना प्रसादही मिळेल. ;).

प्रीत-मोहर's picture

25 Mar 2011 - 5:38 pm | प्रीत-मोहर

आम्ही जेव्हा एकत्र मॅच बघतो तेव्हा भारत मॅच हमखास जिंकतोच ;)

रमताराम's picture

25 Mar 2011 - 7:26 pm | रमताराम

'आम्ही' कोण या खुलासा करण्यात येईल काय? ('आम्ही कोण म्हणुनी काय पुसता दाताड वेंगाडुनी' हे आत्रेय उत्तर आगाऊच फाट्यावर मारण्यात आलेले आहे)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Mar 2011 - 7:49 pm | विश्वनाथ मेहेंदळे

वर्जीनल कवितेपेक्षा विडंबनच लक्षात राहावे हा मिपा ईफेक्ट का हो? ;-)

प्रीत-मोहर's picture

25 Mar 2011 - 9:23 pm | प्रीत-मोहर

आम्ही स्वतःबद्दल बोल्त होतो ...आदरार्थी वापरल होत हो आज्जोबा!!

मुलूखावेगळी's picture

25 Mar 2011 - 5:50 pm | मुलूखावेगळी

सध्याच्या मॅच बघुन त्या आलरेडी सेट वाटतात.
तेव्हा अंधश्रद्धांना खत-पानी घालु नका.

मी पाहीलेल्या याआधीच्या दोन्ही म्याचेस भारताने जिंकल्या आहेत, पाकड्यांच्या नाकावर टिच्चून!!!

आयच्यान, यावेळेला पण पाहणार, सुट्टी काढून पाहणार, नाय तर हापिसात क्रिकटाईम चालू करुन पाहणार नायतर डायरेक डोक्यात च्यानल लावून घेईन, पण जाईन तिथं म्याच पाहीन!!!!

१९९६ आणि २००३ च्या दोन वेळच्या वर्ल्डकपवारीच्या भारत-पाकडे म्याचचं पुण्य लागलंय नावामागे, आता उगाच नस्तं पाप नको व्हायला हातून! वाचव रे देवा महाराजा!!!!

-- असुर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Mar 2011 - 8:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद वाचून हहपुवा झाली. :)

बाकी, सुशिक्षित लोक अधिक अं. श्रद्धाळू असतात त्याचा विदा उपलब्ध करुन दिल्याबद्दल विकासराव यांचे आभार. अशा क्रिकेटच्या निमित्ताने अजूनही खूप अंधश्रद्धा बाळगल्या जातात हे वाचून आज सुशिक्षित आणि विज्ञानवादी म्हणून माझी मान खूप खाली गेली. ;)

आता कालच्या म्याचचा किस्सा. मोठ्या हॉलमधे मारे सर्व म्याचची मजा मोठ्या टीव्हीवर घेत होते. मलाही सर्वांबरोबर भारताची फलंदाजी बघायची होती. पण जरा नेटावर भटकंती करत बसलो. सोबत टीव्हीट्युनरच्या माध्यमातून सामनाही पाहात होतो. सर्वांबरोबर सामना पाहावा म्हणून मी हॉलमधे जायला आणि सेहवागने झेल द्यायला एकच वेळ झाली. सर्व मला म्हणायला लागले तुम्ही तिकडेच म्याच पाहा. नाविलाजाने संगणकावर येऊन बसलो. मी समजावले असे काही नसते वगैरे पण कोणी ऐकले नाही. गंभीर धावबाद होता होता वाचला. आणि ते सांगायला गेलो आणि दुस-या चेंडुवर गंभीर धावबाद झाला. असा अजून एक प्रसंग झाला पण तो आता काही सांगत नाही. काल मी सर्वांसोबत सामना पाहिला नाही म्हणून भारत सामना जिंकला. ही गोष्ट यानिमित्ताने काल सिद्ध झाली. :)

-दिलीप बिरुटे

वेदनयन's picture

26 Mar 2011 - 3:33 am | वेदनयन

भारताने पाकिस्तानला विश्वकपात नेहेमीच धोबिपछाड दिला आहे, पण मोहालीच्या आकडेवारीनुसार,

एकुण वन डे सामने - ९ (भारत - ५ विजयी, ४ - पराभुत)
अलिकडील ३ सामने भारत सलग पराभुत (ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया)
पाकिस्तानशी खेळलेले दोन्ही सामने पराभुत (२००७, १९९९).

लेकिन इस बार स्टॅटिस्टीक्स को फिक्स कर देंगे...

मी तो फोटो खरडफळ्यावरही टाकला आहे. तेथे पहावा!

सुधीर काळे's picture

26 Mar 2011 - 9:01 am | सुधीर काळे

डुप्लिकेट झाल्याने काढला!

पैसा's picture

27 Mar 2011 - 10:49 am | पैसा

सोपा उपाय आहे. तुम्ही रिमोटला हात लावू नका म्हणजे झालं. चित्राला टीव्ही ऑन करायला सांगा आणि चॅनेल बदलू नका! मग काही झालं तरी म्हणता येईल, "टीव्ही काय मी नाही ब्वॉ लावला!"

सुधीर१३७'s picture

29 Mar 2011 - 1:02 pm | सुधीर१३७

लोणचे घाला..........................दुसरे काय करणार ??? .....

क्रु. ह. घ्या.

पैसा's picture

30 Mar 2011 - 11:30 pm | पैसा

शेवटी मॅच कशी बघितली विकासभाऊ?

विकास's picture

30 Mar 2011 - 11:39 pm | विकास

हापिसात असल्याने संगणकावर पाहीली. पण आमचे नशिबच असले की शेवटच्या दोन ओव्हरच्या वेळेस ते संस्थ़ळ अडकले. मग काय शेवटी एफ-५ करत मनातल्या मनातील दिव्य दृष्टीने बघितली. :(

गणपा's picture

30 Mar 2011 - 11:44 pm | गणपा

समस्त मिपाकरांतर्फे विकासरावांचा सत्कार व्हावा असा प्रस्ताव मांडतो. :)

विकास's picture

30 Mar 2011 - 11:45 pm | विकास

खी खी!

सत्काराप्रित्यर्थ एक दिवस संपादकांना शिव्या देऊ नका. कसे? ;)

प्रीत-मोहर's picture

30 Mar 2011 - 11:32 pm | प्रीत-मोहर

आम्ही एकत्र पाहिली ब्वा म्याच व जिंकलो :)

आत्ताच म.टा. मधे पाहील्याप्रमाणे, "भारत वर्ल्डकप जिंकणार!" अशी कुंडली मांडली गेली आहे!

(आणि म्हणे आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन करतो! प्रकाशराव कुठे आहात? ;) )

पुष्करिणी's picture

31 Mar 2011 - 12:20 am | पुष्करिणी

दारूवाला साहेब टाइम्स ऑफ इंडियात म्हणतायत की भारताला कप जिंकायची ५१% संधी आहे :) :)

वपाडाव's picture

31 Mar 2011 - 10:54 am | वपाडाव

चला मग एक्-एक पेग होउन जौ द्या...

नगरीनिरंजन's picture

31 Mar 2011 - 11:08 am | नगरीनिरंजन

हा दारूवाला बेजन आहे की बेजान आहे याबाबत मला अजूनही शंका आहे. माझ्या मते भारताला कप जिंकण्याची १००% संधी आहे. भारत कप जिंकण्याच्या शक्यतेबाबत बोलायचं तर मात्र गोष्ट वेगळी.