किराना घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित.फिरोज दस्तुर यांना भावपुर्ण श्रद्धांजली.

किराना घराण्याचे जेष्ठ गायक पंडित.फिरोज दस्तुर यांना आज देवाज्ञा झाली.
या ज्येष्ठ गायकाला मिपा परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली.

(*तात्या काही घरगुती कामानिमित्य पुण्याला असल्यामुळे त्यांनी मला हे वृत्त कळवले आहे.)

किराना घराण्याचे

ज्येष्ठ गायक (आणि स्वरभास्कर पं. भीमसेन यांचे गुरुबंधू) पं. फिरोज दस्तूर यांना माझी आदरांजलि.

(एकेक तारा निखळू लागला की मन कंपित होऊन जाते! कालाय तस्मै नमः!)
चतुरंग

+१

हेच म्हणतो.

गोपाला

फिरोज दस्तूर यांचे 'गोपाला' आणि सवाई गंधर्व महोत्सव यांचे एक अतूट नाते होते. वीस एक वर्षांपूर्वी सवाई गंधर्व महोत्सवात पहाटे पहाटे कडाक्याच्या थंडीत ऐकलेले या गानतपस्वीचे 'पिया मिलन की आस' आठवले ही अजूनही अंगावर काटा येतो. त्यानंतरचे भीमसेन जोशींचे जोरदार गायन आणि ते संपले की लक्ष्मी रोडवर नुकत्याच उघडलेल्या एखाद्या अमृततुल्यमध्ये गरमागरम चहा आणि पाकिटातली शेवटची सिगरेट यांच्या जोडीने केलेली पुणेरी चर्चा! अशा दिग्गजांचे जाणे नैसर्गिक असले तरी 'सारेच दीप कसे मंदावले आता' अशी जाणीव करुन देते.
सन्जोप राव

श्रद्धांजली

फिरोज दस्तुर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. दोन वर्षांपूर्वी त्यांना सवाई गंधर्वच्या मंचावर पाहण्याचा योग आला होता.

भावपूर्ण श्रद्धांजली

योगायोग पहा, ३-४ दिवसांपुर्वीच त्यांचा एक सुंदर बिलावल युट्यूब वर पहायचा योग आला होता. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

फिरोज दस्तूर ह्यांचा बिलावल येथे पहा.

मानस

भावपूर्ण श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली

(मानस, दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.)

योगायोग

धनंजय

त्या दिवशी मराठी कला मंडळ वॉशिंग्टनच्या कार्यक्रमात, तू, मी आणि मुक्तसुनीत आपण भेटलो. त्याच वेळेस गप्पांच्या ओघात पं. फिरोज दस्तुर ह्यांचा विषय निघाला आणि यू-ट्यूबच्या दुव्याबद्दल माहिती कोणीतरी दिली होती.

असो .... निव्वळ योगायोग

मानस

माझीही विनम्र आदरांजली!

ह्या जेष्ठ आणि श्रेष्ठ गायकाला माझीही विनम्र श्रद्धांजली.
पं. फिरोज दस्तुर
ह्यांच्याबद्दलची काही माहिती इथे वाचा.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

माझी देखील

भावपूर्ण श्रद्धांजली.

सुधीर कांदळकर.

आदरांजली..

आमचे दस्तूर गुरुजी गेले!

त्यांचं बरंच वय झालं होतं, त्यामुळे आज ना उद्या ते जाणारच होते हे जरी खरं असलं तरी त्यांचं एक्च्युअल जाणं ही भावना पचवणं खूप कठीण जात आहे!

माझ्या मामांची तब्येत अचानक बिघडली व त्यांच्यावर एक तातडीची शस्तक्रिया करावी लागली त्यामुळे मी पुण्यात होतो. आणि इथे मुंबईत दस्तूरगुरुजी गेले. त्यांचं अंत्यदर्शन मिळण्याचा योग नव्हता हेच खरं!

दस्तूरगुरुजींनी मला खूप काही दिलं, खूप काही शिकवलं. त्यांचा मला बराच सहवास लाभला. ते जरी गेले असले तरी त्यांच्या खूप चांगल्या आठवणी माझ्यापाशी आहेत! येत्या दोनचार दिवसात मी मिपावर त्या भरभरून लिहिणार आहे.

तात्या.

भावपुर्णं श्रध्दांजली.....!

किराणा घराण्याच्या या आधार स्तंभवत गायकाला भावपुर्ण श्रध्दांजली. 'सवाई गंधर्व महोत्सवात' ज्यांना आम्ही सतत कैक वर्षें ऐकत आलो ,'गोपाला ... करुणा क्यो न आवे..' चे स्वर कानात घोळवत बाहेर पडायचो.. ते फिरोज दस्तूर अनंतात विलीन झाले. त्यांना आणि त्यांच्या स्वरांना विनम्र अभिवादन.

श्रद्धांजली

भावपुर्ण श्रध्दांजली!!

-नंदा

अवांतर : शिर्षकामध्ये किराना झाले आहे ते संबधितांनी किराणा करावे. तसा आमचा शुद्धलेखनाचा फारसा आग्रह नसतो पण शिर्षकातच शुद्धलेखनाची चूक बरी दिसत नाही.

प्रधानसाहेब,

ते 'किराणा' नसून 'किराना'च आहे. किराना/कैराना ह्या कुरुक्षेत्र्-हरयाना मधल्या गावावरुन हे नाव आलं आहे. विकिमधला दुवा.
(खूप महिन्यांपूर्वी, ह्या नावाच्या उच्चारासंबंधी एका संगीतविषयक लेखात डॉ.मुकुंद संगोराम किंवा डॉ.मारुलकर यांनी लिहिले होते, बहुदा 'सकाळ' मधे.)

चतुरंग

किरानाच..

रंगाशी सहमत आहे, मूळ नांव 'किराना' असेच आहे. फक्त मराठीकरणात त्याचे 'किराणा' केले गेले आहे हेही खरे!

आपला,
(किराणा गायकीचा विद्यार्थी) तात्या.