आता मागणे एकची

माझे मागणे एकची, ठेव ताठ उभा सूखी
खोल रुतवले पाय, जरी माती रुखी सुखी

अंगाखांद्यावर खेळे, पिलावळ चिमण्यांची
धरी पानांचा पखवाज, धून अंगाई गीताची

राघू पोपटी, मी तृप्त, बाकदार लाल चोची
श्वास रोखूनी साहतो, पक्व फ़ळावर टोची

कधी ढगही धरती, वेड्या कंजुषीचा हट्ट
तहानला व्याकूळ मी, बंद खजिने ते घट्ट

ओल्या वाऱ्यातून बाहू, शोषी अपुऱ्या जलाते
दवबिंदू चार घेऊन, रस भरतो फ़ळाते

येता मागणी कुठूनी, दांडे कुऱ्हाडींचे काळ
भुंडे करूनीया अंगा, कुणी पेटविती जाळ

आता मागणे एकची, राहो अंतरंगी श्वास
जरी तोडले बाहुंना, वाढो कबंधी विश्वास
जरी तोडले बाहुंना, वाढो कबंधी विश्वास

लेखनविषय:: 

प्रतिक्रिया

__/\__

शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥

अप्रतिम ...

!! ब्रम्ह देवे आपुल्या शीरे , लिहिली अस्तील दुष्टाक्षरे !!
!! श्रीसदगुरु चरण संपर्क शीरे , दुष्टाक्षरे शुभ होती !!

पुर्वी धातु बराच पातळ होता ... पण आता घट्ट होतोय ... जियो मनोहर जी ... smiley अजुन प्रोडक्सन वाढवा पण हे मागने फार अननॅचरल आहे , कधीतरी ठिके .. पुढच्या वेळी कल्जी घ्या smiley

- तरुण लंबोदर
दिस जातील दिस येतील || भोग सरल ||
सुख येईल || टार्‍या म्हणे ||

बेबंद वृक्ष कटाई, आणि पर्यावरणाचा नाश होतांना त्या तोडलेल्या वृक्षाच्या मनात अजूनही जगासाठी जगायची उम्मीद आहे. ह्या आशयाची ही कविता.

वावा!! अप्रतिम कविता!!

ओल्या वाऱ्यातून बाहू, शोषी अपुऱ्या जलाते
दवबिंदू चार घेऊन, रस भरतो फ़ळाते

सुंदर!!

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

आवडली...

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नामा म्हणे मज विट्ठल सापडला|म्हणोनी कळिकाळा पाड नाही||

छान कविता!

आता मागणे एकची, राहो अंतरंगी श्वास
जरी तोडले बाहुंना, वाढो कबंधी विश्वास
जरी तोडले बाहुंना, वाढो कबंधी विश्वास

अप्रतीम! सुंदर झालीये कविता खूपच!

अप्रतिम काव्य .. मनापासुन आवडले

--

अंगाखांद्यावर खेळे, पिलावळ चिमण्यांची
धरी पानांचा पखवाज, धून अंगाई गीताची

कधी ढगही धरती, वेड्या कंजुषीचा हट्ट
तहानला व्याकूळ मी, बंद खजिने ते घट्ट

एकदम छान

-
शब्दमेघ .. एक मुक्त.. स्वैर.. स्वछंदी जीवन
"पारिजातकाचे आयुष्य लाभले तरी चालेल , पण लयलुट करायची ती सुगंधाचीच "