टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
माझा सगळ्यात मोठा वाह्यात विनोद
आपण आयुष्यात खुप वेळा इतरान्ची खेचतो. बरयाच वेळा तो वाह्यात विनोद असतो.
हा मी आता पर्यत केलेला सगळ्यात वाह्यात विनोद आहे.
२००६ मध्ये फ्रान्स ला जावे लागले, काही कार्यलयीन कामा साठी. आता फ्रान्स मध्ये गेलो म्हट्ल्यावर Eiffel मनोरा बघितलाच पाहिजे. आणी फोटो पण पाहीजेत, नाही तर लोकान्ना शन्का वाटते, हा फ्रान्स ला गेला होता कि नाही.
आमचा सहकारी पण आमच्या साऱखाच होता. त्या मुळे काय, मजाच मजा.
Eiffel मनोरा बघायला गेल्यावर थोडेशी मजा करावी असे मनात आले. तेच सहकारी ला सन्गितले.
ऐक फ्रान्स वाला बघिताला. उगाच च त्याचा मित्र परीवार नको, नाही तर मार पडायचा.
आम्ही सरळ त्या फ्रान्स वाल्या कडे गेलो. मनोरा कडे बोट दा़खवले आणि म्हणालो,
'is it for sell?
त्याला सुरवातिला काही समजले नाही, पुन्हा विचारले. 'is it for sell?
'We are scrap merchant from India. We can give good price for it.
त्याचा चेहरा बघाण्या सारखा झाला होता.
तुम्ही कधि असे विनोद केले आहेत काय?
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

तद माताय!
हा भलताच वाह्यातपणा झाला की गटणे साहेब!
नेपोलियनच्या देशातल्या त्या फ्रेंचाने तुम्हाला Eiffel वरुन खाली टाकले नाही हे नशीब! नाहीतर "I Fell" टॉवर बघितला असं सांगायची वेळ आली असती!!
(अवांतर - एखाद्या देशाच्या मानबिंदूंबाबत असा विनोद करताना अंगाशी येऊ शकते!)
चतुरंग
मस्त रे ...
>>नेपोलियनच्या देशातल्या त्या फ्रेंचाने तुम्हाला Eiffel वरुन खाली टाकले नाही हे नशीब! नाहीतर "I Fell" टॉवर बघितला असं सांगायची वेळ आली असती!!
खरच, रंगाशेठ शब्दाच्या कोट्याकरण्यात तुमचा हात कोण पकडणार ?
>>एखाद्या देशाच्या मानबिंदूंबाबत असा विनोद करताना अंगाशी येऊ शकते.
सहमत .... सहमत .... सहमत !!!
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
+१
नेपोलियनच्या देशातल्या त्या फ्रेंचाने तुम्हाला Eiffel वरुन खाली टाकले नाही हे नशीब! नाहीतर "I Fell" टॉवर बघितला असं सांगायची वेळ आली असती!!
+१
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
ताजमहल
नशीब त्या फ्रान्स वाल्याच्या लक्षात नाही आले, नाही तर तुमच्या सारखाच जर तो असता तर त्याने ताजमहल एक्सचे॑जला मागितला असता.
हा हा हा
एक्चेंज ऑफर चा टोला भारी !
डॉन्या...
खरच, रंगाशेठ शब्दाच्या कोट्याकरण्यात तुमचा हात कोण पकडणार ?
(ह्.घ्या.)
डावा हात का?मग कोण पकडेल.
एखाद्या देशाच्या मानबिंदूंबाबत असा विनोद करताना अंगाशी येऊ शकते.
सहमत .... सहमत .... सहमत !!!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
गटस्
नुसते नावातच नाही तर तुझ्यातही गटस् आहेत हे समजले. पण जरा जपून. कधीतरी अन्गाशी पण येऊ शकते.
बाकी टंकलेखन चांगले जमले आहे. मनावर घेऊन प्रयत्न केलेला दिसतोय. Keep it up.
-- पक्या
हा हा हा
गटण्या तुझ्या सारख्या महान माणसाला (कंपनी तर्फे का होईना) पॅरीस बघायला मिळत असेल तर.. आता हिंदूस्तान का बच्चा बच्चा फोरेन जा सकता है हेच खरे.
सखाराम गटणे मानल तुम्हला!!!!!! पण
पण
एखाद्या देशाच्या मानबिंदूंबाबत असा विनोद करताना अंगाशी येऊ शकते.
सहमत .... सहमत .... सहमत !!!
माझा पण वाह्यातपणा.....!
कॉलेज लाईफ मधली गोष्ट. मुंबईत फिरताना एका टॅक्सीवाल्याला हात केला.[दादर मधे] विचारले, " ये टॅक्सी चेंबूर जाएगी क्या?"
तो "हॉ " म्हणाला. " जाने दो." असे म्हणून आम्ही सुसाट पळून गेलो.
च्यामारी, व
च्यामारी,
वाह्यातपणा म्हणायचा का गंमत??
आयला, डायरेक्ट आयफेल टावर भंगारात काढला? धन्य आहात (जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती)
केशवराव,
हे टॅक्सी-रिक्षावाले नेहमी आपल्यासारख्यांचं गिर्हाईक का असतात बॉ?
आम्ही एकदा १२-१४ जण रात्री १-१:३० च्या सुमारास भटकत होतो, एक रिक्षावाला सुसाट चालला होता त्याला जोरात हाक मारली, तो बिचारा गिर्हाईक मिळाल्याच्या अपेक्षेने कच्चकन ब्रेक मारुन थांबला, त्याला आमच्यातल्या एकाने माचिस मागितली, दुसर्याने 'काका किती वाजले हो?' असं विचारलं....
जे काय पिसाळलं ना ते....लागलं शिव्या द्यायला...मग एका सुरात १२-१४ आवाज : "ए...."
...बिचारा स्टार्टर मारुन निमुट गेला....
(गरिबाला कशाला त्रास द्यावा असाही विचार नंतर आला होता..पण हे साले रिक्षावाले आपल्याला छळतात तेव्हा? ह्या विचाराने सुविचारावर मात केली
)
>>एकाने
>>एकाने माचिस मागितली, दुसर्याने 'काका किती वाजले हो?' असं विचारलं....
>>जे काय पिसाळलं ना ते....लागलं शिव्या द्यायला...
-
(याट्लिष्ट पुण्यात तरी गरिब किंवा सज्जन रिक्षावाला न पाहिलेला) -- आंद्या प्यासिंजर
१३ मेरा ७
महाराष्ट्र ब्यांकेच्या सौजन्याने
पिंकी - चिंकी - बिट्टु
आईचा आशिर्वाद
आप कुछ भुले तो नही
इत्यादी इत्यादी वाचणारा - आंद्या कलेक्टर
हा उद्योग
हा उद्योग पुण्यनगरीच्या स.प. महाविद्यालयाच्या मुख्य फाटकासमोर करणेत आला होता !
स.प.
पुणे - ३० मध्ये येतं का
गटणे
गटण्या तुझ्या सारख्या महान माणसाला (कंपनी तर्फे का होईना) पॅरीस बघायला मिळत असेल तर.. आता हिंदूस्तान का बच्चा बच्चा फोरेन जा सकता है हेच खरे.
गटण्या सारख्या म्हणजे काय हो? टंक लेखनच्या चुका सोडल्या तर काय प्रॉब्लेम आहे हो गटणे साहेबात.