तेलाचा उठला बाजार

इराक झाला, पाठोपाठ इराण, मग इजीप्त, बाहरीन, आता लिबीया.... हे सगळे तेलाचे राजकारण चालू आहे का?
काही देशातले काही राज्यकर्ते हुकुमशहा असतील, अगदी कृरकर्मा देखील असतील. पुर्वीसारखी युद्धे खेळून जग जिंकणे आता कालबाह्य झाले. सध्याचे तंत्र म्हणजे लोकशाहीचा खून होत आहे असा ओरडा करून आपले दूरचे लक्ष्य साधायचे.

तुमचे काय मत आहे?

बाकी आपल्या हातात फक्त हलक्याने घ्या येवढेच असते. आहे त्या परिस्थितीत विनोद शोधायचा. म्हणून हे विडंबन-
http://www.misalpav.com/node/17092

लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

परतिकिरिया इकडं मांडायच्या कि तिकडं ?

-
ॐ द्यौ: शान्तिरन्तरिक्षँ शान्ति:
पृथिवी शान्तिराप: शान्तिरोषधय: शान्ति: ।
वनस्पतय: शान्तिर्विश्वे देवा: शान्तिर्ब्रह्म शान्ति:
सर्वँ शान्ति: शान्तिरेव शान्ति: सा मा शान्तिरेधि ॥
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ॥

दोन्हीकडे मांडल्या तरी आमची कायबी तक्रार नाय!

  • परतिकिरिया इकडं मांडायच्या कि तिकडं?

हीकडच तिकड नाय

।। हिन्दु तितुका मेळवावा । आपुला हिन्दुधर्म वाढवावा ।। सर्वत्र विजयी करावा । सनातन हिन्दुधर्म ।।

ह्यमॅनीटेरियन्स आहेत ते. त्यांच्या स्वर्था पायी कितीक मेले तरी चालतील पण ह्युमॅनीटीचा विजय झालाच पाहिजे. आता विचारा ह्युमन्स कुठ रहातात? सोप्प. फकत अमेरिकेत. ते ही एकाच वंशाचे, उगीच दुसर्‍या वंशाचा प्रेसीडेंट बघुन भुलु नका.

शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥

लोकशाहिच्या मार्गाने..घटनेचा आदर राखत हि अब्जा वधिचे घोटाळे करता येतात व सुलताना सारखे जिवन कसे जगायचे याचे धडे भार ता कडुन घ्यावेत

मानले! पण....
दुसरयाची चूक दाखविली, की पहिल्याची बरोबर ठरीत नाही!

अमेरिकन डॉलरचे जागतिक विनिमय चलन म्हणून असलेले स्थान हळू हळू धोक्यात येत आहे अशा वेळेस जगाचा इंधनपुरवठादार असलेल्या भागात उठाव करवून कोसळू शकणार्‍या जागतिक अर्थव्यवस्थेला वाचवत आहे असे भासवून त्या भागात नियंत्रण प्रस्थापित करणे आणि पर्यायाने पुन्हा एकदा अमेरिकन डॉलरचे वर्चस्व वाढवणे ही अमेरीकन थिंकटँकची भुमिका स्पष्ट होत आहे.

--
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..

का बात है...का बात है...

नानाजी..सादर प्रणाम करत हुं हम....बहुत अच्छा बोलत है..

- (बाबु) वाटी

पटेश!
अवांतर- रुपयासाठी भारताला असे काही करायची गरज नाही. फक्त चोरून स्वीस बॅन्केत ठेवलेला आपला अवाढव्य पैसा भारतात आणा. बघा रुपया रॉक्स असे म्हणतील सगळे!