टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
विडंबन
विडंबनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. संदिप खरेंच्या २ गाण्यांचं विडंबन केलय. विषय अर्थात माझा आवडता दारू हाच आहे. गोड मानून 'घ्या'
अताशा असे हे मला काय होते
अताशा असे हे मला काय होते
कुण्या ब्रँड चे पेय ग्लासात येते
बरा ढोसता ढोसता स्तब्ध होतो
जशी शांतता एका खंब्यात येते
कधी वाटू घेता विड्यांचा पसारा
कसा सावळा रंग होतो धुराचा
असे हालते आत जोरदार काही
असे हालते आत जोरदार काही
जसा नाच गुत्त्यावरी बेवड्यांचा
जसा ऐकू येतो पिण्याचा इशारा
क्षणी धुंध होतो पिऊनी बिचारा
गटारात ज्या रोज जातो बुडोनी
गटारात ज्या रोज जातो बुडोनी
गटारास त्या मागू जातो किनारा
न अंदाज कुठले ना अवधान काही, किती घेतली सांडली भान नाही,
जसा टुन्न निघतो घराच्या प्रवासा, न कुठले नकाशे न अनुमान काही.
कशी ही अवस्था, कशाला धरावे,
कसे सावरावे, कसे उभे राहावे,
किती झोत जातो तरी घेत जातो,
किती झोत जातो तरी घेत जातो,
असे घेत जाता कुणी थांबवावे.
अताशा असे हे मला काय होते
कुण्या ब्रँड चे पेय ग्लासात येते
---------------------------------------------------------
नसतेस घरी तू जेंव्हा
नसतेस घरी तू जेव्हा
पेग मोठा मोठा होतो
शेवेचे भरतो बकाणे
अन सोडा संपत जातो
बुच सुटून बियर उडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन मी ही बरळू लगतो
येतात पेग ओठाशी
संपुनच जाती मागे
सोड्या वीन पेग बिचारा
थोडासा स्ट्राँगच होतो
क्वार्टरीत झिंगवणार्या
मज स्मरती लाघव वेळा
चकण्या वीन पिणे अडावे
मी तसाच अगतीक होतो
तू सांग सखे मज काय
मी सांगू ह्या बर्फाला
व्हिस्कीचा जीव उदास
सोड्या वीन मिण मिण मिटतो
ना अजून चढली झिंग
ना टाईट अजूनी झालो
चकण्या वीन चढतच
चकण्या वीन गॅसही होतो
नसतेस घरी तू जेव्हा
पेग मोठा मोठा होतो
शेवेचे भरतो बकणे
अन सोडा संपत जातो
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

बा
बा ऍडी....
अरे काय हे? सक्काळी सक्काळी वाचून झिंगलो ना मी
=D>
पहिल्याच कडव्याला खुदकन हसु आलं रे...
वा वा वा....स्वयंभूराव...काय वास्तववादी लिहिता हो आपण !
आता, दारु गोड कशी मानायची बॉ? हां सोड्यातून घ्या, ऑन द रॉक्स घ्या म्हणलं तर मान्य...पण गोड????
धन्यवाद
ध. ध. (धन्यवाद धम्या),
आरे गोड मानून घेणे ही भावना आहे. गोड माना, कडू माना, तुरट माना काहीही माना पण "घ्या"
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
:)
अशीच सारखी ऑन द रॉक्स घेतलीत तर
direct दुसर्या दिवशी घरी जाल
पण स्वतःच्या जा नाहीतर फटके खाल
म्हणजे खाण फुकटात होइल
खरच खुप छान केलेय विडंबन
एकदम झक्कास =D>
धन्यवाद
धन्यवाद,
आचमनं झाली की माझ्या हातून कायमच चांगले लिखाण होते.
आपला (धुंद),
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
वा!
न अंदाज कुठले ना अवधान काही, किती घेतली सांडली भान नाही,
जसा टुन्न निघतो घराच्या प्रवासा, न कुठले नकाशे न अनुमान काही.
क्या बात है! सुंदर...!
तात्या.
स्वयंभूशेठ
जबराच बरं का!
अताशा असे हे मला काय होते
कुण्या ब्रँड चे पेय ग्लासात येते
बरा ढोसता ढोसता स्तब्ध होतो
जशी शांतता एका खंब्यात येते
हा हा हा!
न अंदाज कुठले ना अवधान काही, किती घेतली सांडली भान नाही,
जसा टुन्न निघतो घराच्या प्रवासा, न कुठले नकाशे न अनुमान काही.
या ओळी तर खासच...
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
वा वा अदिसाहेब
वा वा अदिसाहेब,
विडंबने झकास झाली आहेत. आवडली.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
आपला,
(मदिराप्रेमी) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
मस्त ! =D> =D>
मस्त !
=D> =D> =D>
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !