दिर्घकथा : जलजीवा (भाग- १६) -शेवटचा भाग!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
19 Feb 2011 - 12:14 pm

जल-प्राणी उदयास आले होते. जार्वार पर्वतावरच्या त्या हिरव्या मातीने त्यांना जन्म दिला असावा. तळ्यात चुकून पडून मरण पावलेले ते प्राणी असावेत आणि नंतर जलजीवा बनले असावेत. किंवा त्यांची कुणी शिकार केली असेल आणि ते तडपून मरण पावले असावेत. पाण्यात पडले असावेत. जल प्राणी म्हणजे ते टणक बर्फाने बनलेले होते. ते जंगलातल्या अंधूक अंधारात पांढरे दिसत होते. जसा किसलेला बफ जमा करून त्याचा प्राणी बनवला तर तो जसा दिसेल तसेच हे दिसत होते. अतिशय भयानक. त्यांचे अणकुचीदार गोठलेले दात, पायाची नखे हे सर्व भकोल्हे, लांडगे, रानमांजरी गुरगुर करू लागले. मागच्या बाजूने अंगभर ज्वाळांनी भरलेले अग्नी-दानव उभे होते. मागून गुहेतून आलेले अग्नी-प्राणी आणि समोर अचानक उभे ठाकलेले जल-प्राणी. अशा दोन दानवांच्या आत ते सर्वजण उभे होते. आता काय घडणार असे वाटत असतांनाच त्या अग्नी दानवांनी त्या जल प्राण्यांवर हल्ला चढवला......

अचानक झालेल्या त्या हल्ल्याने जल-दानव दचकले, बावरले आणि आणखी हिंस्त्र बनले. आणि मोठमोठ्याने आवाज करू लागले. त्यात भर म्हणून नामातुआ पक्षी आले. तेही तुआआ तुआआ असा आवाज करू लागले. सगळे जंगल भितीदायक आवाजांनी घुमू लागले. तोपर्यंत सगळेजण यातून सुटून जीपमध्ये बसण्याचा प्रयत्न करू लागले....

जीपमध्ये बसल्यानंतर दोन्ही जीप जंगलातून बाहेर नेण्यासाठी धडपड सुरू झाली. काही जल-दानव जीपच्या मागे मागे पळू लागलेत. त्यांच्यावर त्या पानांची भुकटी टाकावी लागली. तसे ते गरम बर्फामध्ये रुपांतरीत होवू लागले. पण ते तात्पुरते असणार होते. पुन्हा हिरवी माती त्यांच्यावर टाकल्यास ते कधीतरी जीवंत होणारच होते.... कारण इथे त्यांचे जवळ ते केमिकल्स नव्हते.....

तिकडे गुहेसमोर अग्नी आणी जल यांचा संघर्ष सुरू होता. तो इतक्यात संपणारा नव्हता. अग्नी पाण्यामुळे विझतो. पण, येथे मात्र अग्नी दानव हे जल दानवांवर भारी पडत होते. त्या भयानक जल दानवांवर ते हल्ल करत ओते. त्यामुळे ते प्राणी तुकडे तुकडे होवून कोळसा जळतो त्याप्रमाणे अनेक तुकड्या तुकड्यात रूपांतरीत होवून जळत होते. म्हणजे हवेत असंख्य बर्फाचे जळणारे तुकडे दिसत होते. तरीही ते तुकडे हल्ला करतच होते.त्यांच्या तुंबळ जुंपली होती. जीपमध्ये अ‍ॅनाला गॉडमनचा कॉल आला.

गॉडमनने या आधीच सांगितले होते की,

"पाण्याला म्हणजे त्या जलजीवांना आधी चौथ्या रूपात आणायचे.मग त्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये तोडायचे आणि त्यापैकी हायड्रोजनला लगेचच रूपांतरीत करून त्याचे रुपांतर ओझोन मध्ये करायचे. पाण्याच्या इतर तिन्ही रूपात हा माझा फॉर्म्युला काम करत नाही. तर मी सांगत होतो की, तसे करण्यासाठी मी एक केमीकल बनवले आहे. ते पाण्यावर मारल्यास त्याचे रूपांतर हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये होते आणि आणखी दुसरे केमीकल वापरल्यास ओझोनमध्ये. मला नक्की खात्री आहे की ते सर्व आणि जेनिफर हे अमेयसह अ‍ॅनिस्टन ला मारण्यासाठीच गेले असतील. मी तपास करतो की अ‍ॅनिस्टन नेमके कोणत्या देशात गेलेत, त्यावरून आपल्याला दुवा (कलू) मिळेल...

मग आपण तेथे जावून कमीत कमी त्या जलजीवांना नष्ट करू आणी तेथे लाल मातीच्या आधारे अमेयला परत आणू."

आता अ‍ॅनाने कॉल उचलल्यावर ते म्हणाले, "अ‍ॅना, जगात इतरत्र ती झाडे असलेली ठीकाणे सापडली आहेत. काही ठरावीक महत्त्वाच्या व्यक्तींना आणि शास्त्रज्ञांना सांङून आम्ही एक मोहीम हाती घेतली आहे. लवकरच आम्ही अ‍ॅनिस्टन जात असलेले विमान शोधून काढण्यात यश मिळवले आहे. ते विमान सध्या साऊथ जॉर्जिया या बेटाच्या वरूनच उडत आहे असे आम्हाला कळाले आहे. आम्ही आखलेल्या मोहीमेत आम्।इ काही हेलीकॉपटर्स घेवून ता विमानाचा पाठलाग करतो आहोत. आमचि शंका खरी ठरली आहे. आम्हाला त्या विमानाच्या मागे अनेक ढग पाठलाग करतांना दिसले आहेत.

काही अघटीत होण्या आधी त्या विमानातल्या प्रवाशांना आणि अ‍ॅनिस्टनला वाचवायलाच हवे आहे. आम्ही ते जरूर करू. आनि त्या ढगांत कुठेतरी अमेय आनी जेनिफरही असावेत, त्यापैकी अमेयला लाल माती टाकून मूळ रुपात आणायचे काम आम्हाला करायचे आहे. मेल्यानंतर जेनिफर जेव्हा जलजीवा झाली तेव्हा तीने या आधीच तीच्या प्रियकराला म्हणजे रेमो रॅमसनला जलजीवा बनवून आपल्या सोबत यायला भाग पाडले होते. तो मात्र दुसर्‍या महायुद्धात जलजीवांना स्थानबद्ध करण्याच्या मोहीमेतून सूटला होता. त्याचे सोबत अनेक सुद्धा त्यातून सुटले होते. त्यांनीच समुद्रावर दहशत पसरवली होती. जलजीवा मरत नाहीत फक्त त्यांना पाण्ञाच्या चौथ्या रुपात गोठवून ठेवता येत होते.....

जेनिफरला मात्र अंटार्टीकावर गाडण्यात त्या मोहिमेत यश आले होते.

मग, अंटार्टीका मोहीमेत संशोधन करण्याच्या निमित्ताने अथक परिश्रमांनंतर त्याने जेनिफरला शोधून काढले आणि हिरवी माती टाकून पुन्हा जीवंत केले. इतर जलजीवांनाही त्याने जीवंत केले.

पण, त्याचे भाग्य चांगले नव्हते कदाचीत!

कारण तीने यालाच मारून टाकले. ती आता पूर्णपणे सैतानी शक्तींच्या अधिपत्या खाली आहे. तसेच तीचे इतर जलजीवा सुद्धा....

तुमचे तिकडे काय चालू आहे? तुम्ही जंगलातून त्या बीया घेवून पोहोचलात का? त्या सगळ्या बीया आता कुठेतरी गुप्त जागी तुम्ही सांभाळून हेवा. त्याबद्दलची माहिती योग्य व्यकींजवळ असू द्या. मी मोहीम फत्ते झाल्यावर संगतोच.

आम्ही आधी सगळीकडे लाल मातीचा फवारा सोडणार म्हणजे त्यात जे मानव जलजीवा असतील म्हणजेच अमेय पुन्हा मानवात रुपांतरीत होतील. आम्ही सगळे मास्क घालून तेथे जाणार आहोत कारण आमच्या असे लक्षात आले की जलजीवाम्चे कोणतेही रूप श्वासाद्वारे आत गेले की त्या माणसाचे किंवा प्राण्याचे जलजीवात रूपांतर होते. त्या मोहीमेत पुढे आम्ही मग त्या झाडांच्या पानांची भुकटी फवारणार. त्यामु़ळे ते पाण्याच्या चौथ्या रुपात येतील. मग आम्ही ती केमीकल्स असलेले स्प्रे मारणार आहोत म्हणजे ते हायड्रोजन आणि ऑक्सि़जन मध्ये रूपांतरीत होतील आनी पुढे दुसरे केमिकल ज्याद्वारे ते ओझोनमध्ये रुपांतरीत होतील. आपल्या आवाक्यातले जलजीवाच फक्त असे कायमचे नष केले जातील.

पण, त्यांना सगळीकडून जगभरातून शोधून नष्ट करणे अवघड काम आहे. आता एक होईल की जेनिफर आता नष्ट झाल्यास त्यांची टीम क्षीण (वीक) होईल. पण जेव्हा जेव्हा ते येतील, तेव्हा तेव्हा त्यांना आपण नष्ट करू शकतो. कायमचे!

कारण आता आपल्या जवळ सगळे उपाय आहेत. त्यांना नष्ट करण्याचे! मोहीम फत्ते झाली की मी पुन्हा कॉल करतो!"

असे म्हणून गॉडमन नी कॉल डिसकनेक्ट केला. अ‍ॅना मात्र आता अमेयची भेट होणार या आनंदात होती. जंगलातला तो संघर्ष सुरूच होता. ते सगळे त्या जीपस मधून निघून अखेर त्या जंगलाच्या बाहेर आले होते. पानांच्या भुकटी द्वारे अनेक जल दानवांना त्यांनी नष्ट केले होते.

आता सर्वजण घरी फक्त गॉडमनचा कॉल येण्याचीच वाट बघत होते.

तीन हेलीकॉप्टर्स त्या विमानाच्या मागावर निघाले. एकात स्वतः गॉडमन होते.

प्रत्येकाने तोंडावर मास्क लावला होता. कारण, ते जलजीवा नाकाद्वारे शरीराच्या आत जायला नको होते.

विमानाच्या पायलटला पुढे येणार्‍या धोक्याचा अगाऊ अंदाज दिला गेलेला होता. ब्रिटीश सरकारला या मोहीमेबाबत अंदाज होता. बरीच कोडी उलगडली होती.या मोहीमेद्वारे बरीच संकते टळणार होती.

हीच मोहीम पुढे विमानाला वाचवल्यानंतर डेव्हील्स स्केअरवर राबवण्यात येणार होती.

शक्य तेवढ्या जलजीवांना नष्ट करण्यात येणार होते. निदान जलजीवांचे निवासस्थान म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या त्या डेव्हिल्स स्क्वेअर वरचे जलजीवा जरी नष्ट झाले तरी बास होते. मग जगात इतरत्र जेही जलजीवा सापडतील त्यांना हळू हळू नष्ट करता येणार होते.

.....ते तीन हेलीकॉप्टर्स त्या विमानाचा पाठलाग करत होते. आधी केलेल्या लाल मातीच्या फवार्‍यातून काहीही हाती लागले नाही.

बराच वेळ विमान आणि आसपासच्या परिसरात त्यांनी लाल मातीचा फवारा केला. पण, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. म्हणजे अमेय तेथे नव्हता आणि जेनिफरही नक्कीच तेथून निघून गेली असेल. इतर जलजीवांना कामाला लावून. आता अमेयला शोधण्यात जास्त वेळ दडवून चालणार नव्हते.

.......कारण आता त्या ढगांनी हेलीकॉप्टर्स वर सुद्धा हला केला होता. शेवटी विमानाभोवती गराडा घातलेल्या ढगांना म्हणजे जलजीवांना एका तुंबळ युद्धानंतर गॉडमन ने सांगीतल्याप्रमाणे कायमचे नष्ट करून ओझोन वायूत रूपांतरीत करण्यात यश आले.मग हेलीकॉप्टर्स डेव्हिल्स स्क्वेअर च्या भागार असणार्‍या बेटांवर उतरवण्यात आले. तेथे सुद्दा काही जलजीवांनी तर काही चाच्यांनी (मानव्-जलजीवांनी) हला केला. बर्‍याचश्या अथक प्रयत्नांनंतर अनेक मानव जलजीवांना मूळ मानव रुपात आणण्यात तसेच इतर जलजीवांना कायमचे नष्ट करण्यात यश आले. विमान आणि अ‍ॅनिस्टन सुख्रूप होते. विमान पुढे आपल्या ठरलेल्या ठिकाणि निघून गेले. विमानाला काही नुकसान झाले नाही.

पण जेनिफर कुठे असेल? त्या अनेक जलजीवाम्च्या पाणी रुपात एकही स्त्री रूप नव्हते. म्हणजे ती यातूनही सुट्ली. आणि अमेयला ही घेवून गेली? कुठे गेली असेल ती? कुठे गेला असेल अमेय?

हेलीकॉप्टर्स पाठलाग करत आहेत हे कळल्यावर जेनीफर ने अमेयला वेढा घातला आणि दोघांच्या ढगरूपाचे पाण्यात रूपांतर झाले आणि ते उंचावरून पृथ्वीवर एके ठीकाणी पडत होते.

अमेयचे पाणी रूप एका लाल माती असलेल्या साऊथ जॉर्जीया बेटावरच्या एका पर्वतावर पड्ले आणि तो माणूस बनण्यास सुरूवात झाली.

जेनीफरला हे अनपेक्षीत होते. त्या पर्वतावरून अमेय घरंगळत खाली पडू लागला. त्यामागे जेनिफर पाणी रूपात त्याचे मागे लागली होती. आता तीने पुन्हा त्याला वेढा घातला तर पुन्हा तो मानव बनणार होता......

इतक्या दिवसांच्या तिच्या अधिपत्याखालून सुटून आनंद झालेला अमेय आता पुन्हा ती आपल्याला वेढा घालाणार या कल्पनेने हादरला होता. तो उठून अतिशय वेगाने खाल पडू लागला. ते एव्हाना त्या पर्वता खाली आले होते. तीही त्याचा पाणी रूपात पाठलाग करत करत त्याचे समोर उभी ठाकली. ती पाणी सदृश्य मानव रुपात त्याचे समर उभी होती. तीचे ते मादक रूप बघून तो क्षणभर हबकला. आनी पुन्हा पुढे येणार्‍या भीतीची जाणीव झाल्याने पळायला लागला.

त्या तीनही हेलीकॉप्टर्स पैकी एक साऊथ जॉर्जीयाच्या बेटावर घिरट्या घालू लागले. ते अगदी जमीनीच्या जवळ उडत होते. तेव्हा त्यात आलेल्या गॉडमनला अमेय पळतांना दिसला. त्यांनी ओळखले की आता अमेय पुन्हा मानव रुपात आला आहे. आणि बर्फ रुप्पात जेनिफर त्याचा आठलाग करत आहे.

ते हेलीकॉप्टर खाली घेण्यास गॉडमन नी पायलटला विनंती केली. आजूबाजूला जंगल होते. विविध प्रकारची झाडे होती. हेलीकॉप्टर येतांना बघून अमेयने मदतीची याचना करत आरोळी ठोकली. तोच जेनिफर पानी होवून वाफ बनली आणि वेगाने अमेयच्या दिशेने जावू लागली.
जेनिफरच्या वाफेचा फक्त थोडा अंश जरी अमेयच्या श्वासावाटे आत गेला तरी तो पुन्हा जलजीवा बनणार होता. अर्थात हेलीकॉप्टर मध्ये त्यांचे जवळ लाल माती होतीच. त्यामुळे तशी चिंता नव्हती. वाफ अमेयला वेढा घालणार तेवढ्यातच जेनिफरलाही शेवटी केमीकल्स च्या मदतीने कायमचे नष्ट काण्यात यश आले. सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला.
जलजीवांचा धोका आतापुरता तरी संपला होता.
अमेय सुखरुप असल्याचे अ‍ॅनाला कळवण्यात आले.
अ‍ॅनाने आईची आठवण येवून आकाशाकडे बघितले. अमेय मिळाल्याचा आनंद आणि आईल गेल्याचे दु:ख याचे मिश्रण तीच्या डोळ्यातून अश्रूंच्या रुपात बाहेर पडत होते. डाव्या डोळ्यातल्या त्या अश्रूमध्ये बारीक नजरेने बघितले तर लक्षात येत होते की त्यात जेनिफर ची प्रतीमा करुणपणे रडत होती. उजव्या डोळ्यातल्या अश्रूमध्ये अमेय ची हसरी प्रतीमा अ‍ॅनाच्या भेटीने व्याकूळ झालेली दिसत होती.

.....जेनिफर ची प्रतिमा दिसत असलेला तो अश्रू गालावरून घरंगळत अ‍ॅनाच्या हनुवटीवर आला आणी जमीनीवर पडला. जमिनीवर तो अश्रू पुढे पुढे सरकत जावू लागला. त्याला ठरावीक असा आकार नव्हता. तो अमीबा या प्राण्यासारखे वेडे वाकडे आकार करत करत भिंतीवर चढला. बरेच वर भंतीवर जावून तो चढला. अश्रूमध्ये बंदिस्त असलेल्या जेनिफरचे रडणे चालूच होते.
.....ते रडणे साधे नव्हते. ते भेसूर होते. बेसूर सुद्धा होते. कुठल्यातरी सूडाचे होते. त्या अश्रूतल्या जेनिफरच्या गालावरून सुद्धा रडण्यामुळे एक अश्रू ओघळत होता. त्या अश्रूत अमेय होता. तो अश्रू त्या मुख्य अश्रू मधून वेगळा झाला आणि आता भिंतीवर दोन अश्रू होते. एकात अमेय आणि दुसर्‍यात जेनिफर. अ‍ॅना मात्र त्या भिंतीवरच्या त्या दोन्ही अश्रू-जीवां पासून अनभिज्ञ होती.....
(समाप्त)

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

19 Feb 2011 - 1:16 pm | आत्मशून्य

क्रूपया पी.डी.एफ. लींकवता येइल काय? म्हणजे इबुक रीडर वर ही कथा सहजपणे वाचता येइल.

धनुअमिता's picture

19 Feb 2011 - 3:10 pm | धनुअमिता

हा भाग सुध्दा नेहमीप्रमाणे मस्त झाला आहे.पण एक समझलं नाही अ‍ॅना व अमेय यांची भेट झाली का?

आत्मशून्य's picture

19 Feb 2011 - 9:50 pm | आत्मशून्य

.

हायड्रोजनला लगेचच रूपांतरीत करून त्याचे रुपांतर ओझोन मध्ये करायचे
हायड्रोजन की ओक्सीजन ?

निमिष सोनार's picture

21 Feb 2011 - 8:54 pm | निमिष सोनार

हायड्रोजन!!!

विचित्रा's picture

9 May 2017 - 4:30 pm | विचित्रा

पण ओझोन म्हणजे ट्रायऑक्सीजन ना?

मी सगळे भाग एकत्र करून टाकायचा प्रयत्न केला पण, वेबसाईट परवानगी देत नाही आहे.
म्हणून सोयीसाठी सगळ्या लिंक्स एकत्र देतो आहे:
तसेच माझ्या ब्लॉगवरही पूर्ण कथा एकत्र करून मी टाकली आहे: http://nimishlit.blogspot.com

मिसळपाव वरच्या जलजीवा या कादंबरीच्या आतापर्यंतच्या सगळ्या भागांच्या लिंक्स :
http://www.misalpav.com/node/16118 part 1
http://www.misalpav.com/node/16147 part 2
http://www.misalpav.com/node/16163 part 3
http://www.misalpav.com/node/16189 part 4
http://www.misalpav.com/node/16200 part 5
http://www.misalpav.com/node/16228 part 6
http://www.misalpav.com/node/16265 part 7
http://www.misalpav.com/node/16313 part 8
http://www.misalpav.com/node/16420 part 9, 10, 11
http://www.misalpav.com/node/16566 part 12
http://www.misalpav.com/node/16667 part 13
http://www.misalpav.com/node/16747 part 14
http://www.misalpav.com/node/16751 part 15
http://www.misalpav.com/node/16862 part 16 final