जागतीक मराठी भाषा दिन -२७ फेब्रु. २०११

धमाल मुलगा's picture
धमाल मुलगा in जनातलं, मनातलं
18 Feb 2011 - 7:01 pm

राम राम गावकरीहों!

काय? कसं काय चाललंय? बैजवार हाय न्हवं? :)
आता तुम्ही म्हणाल, हा धम्या अस एकदम हाळ्या देत का आलाय बा!

तर त्याचं असंय मंडळी, पुढचा आईतवार म्हणजे २७ फेब्रुवारी; म्हणजे आपल्या लाडक्या कुसुमाग्रजांचा जन्मदिन. हाच दिवस 'जागतिक मराठी दिन' म्हणून साजरा केला जातो. तुम्ही-आम्ही मराठीच, आपलं मौजे मिपागाव पक्कं मराठमोळं! म्हणजे जगतिक मराठी दिनाचा सण आपल्या मिपावर साजरा होणारच. :)

आपण मिसळपाव.कॉमवर २७ फेब्रु.२८ फेब्रु.,आणि १ मार्च असे तीन दिवस मराठी भाषा दिन सोहळा साजरा करणार आहोत.
ह्यामध्ये आपण मराठीसंदर्भात निरनिराळे लेख, कविता लिहूया. मग त्यामध्ये तुम्हाला आवडेल ते लिहावं.
जसं ,
तुमचं आवडतं पुस्तक किंवा आवडता लेखक कोणता? मग लिहा ना त्याबद्दल! आम्हालाही आवडेल की वाचायला.

मराठी साहित्यप्रवासाबद्दल लिहा, कवितांबद्दल लिहा,

मिपाकरांमध्ये कित्येक सुंदर रचना करणारे कवि-कवयत्री आहेत. मायमराठीच्या सन्मानार्थ कविता येऊ द्या हो मराठी सारस्वतहो!

तुमचं आवडतं नाटक कोणतं हो? सांगाल काय आम्हा गावकर्‍यांना त्याबद्दल काही?

मराठी रंगभूमीच्या प्रवासाबद्दल माहितगारांनी इतरांना माहिती दिली तर ह्या उत्तुंग नाट्यपरंपरेची महती सर्वांना कळावी.

तुमची बोलीभाषा - मराठीच्या निरनिराळ्या बोलीभाषांची सुंदर रेलचेल आहे. आपले मिपाकरही महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातले आहेत. कुणी अहिराणी बोलीतलं सौंदर्य दाखवा, कुणाले खान्देशी झटका लिव्हायचा तं लिव्हा ना बाप्पा :)
कुणाक मालवणी येतलो तां भोतुर कित्या ठेवतांन? आमका मालवणीतलो रश्श्याचा खमंगपणा दाखवा, कुणी नटलेली कोकणीबोली दाखवा, कुणी गोयेंकरांनी गोव्यातली लडिवाळ कोकणी-मराठी आम्हा घाटावरच्यांना उलगडुन दाखवा. :)
कुणी आगरीतलं रांगडं पिरेम कशे असतान सांगाचा ना बोल!
पुणेकरांनी पुणेरी मराठीचा प्रेमळ(!) खाक्या दाखवा,
महाराष्ट्राबाहेर असलेल्यांनी त्या त्या ठिकाणच्या मराठी लहेज्यावर बोला,
देशाबाहेरच्या मराठी मंडळींनी आपल्या मराठी भाषेच्या जपणुकीचे अनुभव आमच्यासोबत वाटावे,

ज्यांना ज्यांना, जेथे जेथे शक्य आहे, त्यांनी आपापल्या ठिकाणी रविवार दिनांक २७ फेब्रु.२०११ रोजी कट्टा करावा, मराठी माणूस अन माणूस जोडावा, आणि इथे आपल्या मिपाकरांसोबत कट्ट्याचा आनंद वृत्तांत देऊन वाटावा!

ह्याउप्पर आणखी कोणाच्या काही कल्पना असतील तर त्याही जरुर मांडाव्या ही विनंती.

बहुत काय लिहिणे? मायमराठी माथी धरावी, अवघा कल्लोळ घडवावा! :)

तर बोला मंडळी, कोण कोण कोणत्या विषयावर काय काय देणार? ह्या विषयी अधिक चर्चा करायची असल्यास, काही सुचना असल्यास नि:संकोच इथे मला व्यनि करा.

उधे गं अंबे उधे!!!!
मायमराठीचा हा भुत्या तुमच्यादारी आला आहे. त्याच्या परडीत हे पीठ-मीठ घालावे, आनंदाचे तेल ह्या दिवटीवर घालावे....मायमराठीच्या प्रेमाची कणभराची का होईना परतफेड करुया! अवघे मिपागाव दारी लेख-कवितांची गुढ्या तोरणे बांधून मराठी दिनासाठी सजवुया!

काय मग? करायची ना सुरुवात?

धोरणमांडणीसंस्कृतीभाषासमाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

सूर्यपुत्र's picture

18 Feb 2011 - 8:03 pm | सूर्यपुत्र

मला खूप लिहायचे आहे, पण विषयच सापडत नाहीये.... :(
एखादा मस्त २००/३०० प्रतिसाद येइल असा विषय सांगू शकाल काय? ;)

आणि मराठी भाषा दिन २९ आणि ३० तारखेला का नाही साजरा करत? मधे असा खंड का?

-सूर्यपुत्र.

आधी माझा नंबर आहे रे!
गेले कित्येक महिने सगळ्यांना प्रतिसाद देत, गूळ लावत फिरतिये ती उगीच नाही.;)
कोणतातरी श्लील अश्लीतेच्या सीमारेषेवरून जाणारा विषय, नाहीतर स्त्रीमुक्ती वगैरे.......;)

स्वाती दिनेश's picture

18 Feb 2011 - 8:07 pm | स्वाती दिनेश

कल्पना आवडली,
वेगवेगळ्या लेखांच्या मेजवानीची वाट पाहत आहे.
स्वाती

विकास's picture

21 Feb 2011 - 8:19 am | विकास

कल्पना आवडली,

मला पण आवडली!

वेगवेगळ्या लेखांच्या मेजवानीची वाट पाहत आहे.

वेगवेगळ्या मेजवानीच्या लेखांची वाट पहात आहे. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Feb 2011 - 8:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कल्पना झकास आहे. लिहिण्यास प्रोत्साहान देणारी आहे. प्रत्येकाने जमेल तसं लेखन केले तर
खर्‍या अर्थाने मराठी भाषा दिन साजरा केला असे होईल. जमलं तर यानिमित्ताने काहीबाही खरडण्याचा प्रयत्न करतो....!

-दिलीप बिरुटे

इन्द्र्राज पवार's picture

18 Feb 2011 - 8:56 pm | इन्द्र्राज पवार

अगदी स्वागतार्ह अशीच सूचना आहे....[आणि ती मांडलीही आहे एकदम फर्मास भाषेत, त्यामुळे मराठीचा अस्सल बाजच नजरेसमोर आला आहे...!]

जरूर या संदर्भात सर्वांनी "लेझीम" च्या तालात.....दिवस सुगीचे सुरू जाहले....म्हणावे असे वाटते. या दिवटीवर आपापल्या मतीने तेल घालून भुत्याला खूष करून टाकू.

इन्द्रा

छान कल्पना धमालराव.. बघूया या निमित्ताने का होईना काही लिखाण तरी होईल..

- (धमाल फॅन क्लब प्रिमीयम मेंबर) पिंगू

लिवायचं त हैच, अगदी नक्की, जरा सोचून सांगतो.
पन खरा संगतो, इकडल्या देशी पन इतके सवंगडी भ्येटून र्‍हायले द्येवा, वाटाय लागलं की आपली मर्‍हाटी भाशा आता गल्ली मोहल्ल्यांचे, गाव शहरांचे बंध तोडून पार जगापत्तूर, आनि जगाच्या पार विस्तारली है!!! आता कै कालजी नै! आनि कधीही, कुटेही, मराठी मानुश भेटला नै असा होनार नै!
जगाच्या पाठीवर असे मर्‍हाटीची दिंडी खांद्यावर घेऊन वाजतगाजत मिरवणार्‍या सगळ्या वारकर्‍यांना आपला मानाचा मुजरा!!!

--(मर्‍हाटी) असुर

पाषाणभेद's picture

19 Feb 2011 - 9:43 am | पाषाणभेद

धमु, लागोपाठ तिन दिवस लिहीले तर चालेल ना रे?

अमित देवधर's picture

19 Feb 2011 - 10:59 am | अमित देवधर

चांगला लेख आणि चांगली कल्पना आहे.

कलंत्री's picture

19 Feb 2011 - 11:29 am | कलंत्री

सोप्या आणि मनाला भिडणार्‍या भाषेत धमालयांची प्रस्तावना मनाला भावली.

सध्याचा काळखंड हा वैश्विकीकरणाचा आहे. या सर्व उपक्रमामध्ये फक्त मिपाकर अथवा मराठी भाषकांचा सहभाग घेण्याऐवजी इतरही भाषकांचा ही सहभाग घ्यायला प्रयत्न करावयाला हवा.

माझ्या मनात अशी कल्पना आलेली आहे की आपल्या सभोवतालच्या सर्व मंडलीना बोलवावे आणि कवितावाचनाचा कार्यक्रम करावा. यात मराठी कवितातर असाव्यात आणि इतरही कविता वाचाव्यात. माझ्यामनात मधूशाला याचे वाचन करावे असे धाटत आहे.

त्याचबरोबर हा दिवस का साजरा करतो किंवा करावा यावर मनोगत व्यक्त करावे असे वाटत आहे.

जय महाराष्ट्र....

चिगो's picture

19 Feb 2011 - 7:17 pm | चिगो

वोक्के मालक, लिवायचा प्रयत्न करु..

अवलिया's picture

19 Feb 2011 - 7:25 pm | अवलिया

येस्सार !

मुलूखावेगळी's picture

19 Feb 2011 - 9:30 pm | मुलूखावेगळी

थिण्क टँक सुरु केला ;)
बघु आता लिहु कायतरी.

गंगाधर मुटे's picture

19 Feb 2011 - 10:50 pm | गंगाधर मुटे

मेहेरबान, कद्रदान धमालपंत
क्षमा असावी.
आपुन काय बी लिवणार नाय. गपचाप बसणार.
म्हंजे आसं बघा की, सोताचाच जन्मदिवस नाचत-कुदत कसाकाय साजरा करायचा हो. :)

भडकमकर मास्तर's picture

19 Feb 2011 - 11:43 pm | भडकमकर मास्तर

खरंतर या दिवशी सर्वांनीच पायजे ते न लिहिता , न लिहिणार्‍या भारी लोकांनी लिहिलं पाहिजे...

"आणि बर्‍याच जणांनी लिहिलं नाही तर बरं.." ;)

मुलूखावेगळी's picture

20 Feb 2011 - 10:37 am | मुलूखावेगळी

ओ मग तुम्ही कोनी लिहावे आनि कोनी लिहु नये ह्याचा धागा काढा ना
बाकि दिवटेनी ह्या दिवशी लिहावे कि नाही?

सहज's picture

20 Feb 2011 - 2:05 pm | सहज

मास्तरांशी सहमत आहे. जागतीक मराठी साहीत्य संमेलनाला, जो तो व्यासपीठावर जाउन कला सादर करतो का?

खरे तर ह्या तीन दिवसात आयोजकांनी (धमू व सहकारी) उत्तमोत्तम लेख, काव्य अजुन जे काही त्यातल्या त्यात 'छान' असेल ते साहीत्य लोकांपुढे आणावे. इतर दिवशीही लोक लिहीत असतातच की.

भावना पोहोचल्या. आनंद आहे. पण फ्री फॉर ऑल किंवा तीन दिवस जास्तीत जास्त लिहा याने नक्की मायमराठीची सेवा कशी होणार कळले नाही.

धमाल मुलगा's picture

20 Feb 2011 - 5:04 pm | धमाल मुलगा

खरे तर ह्या तीन दिवसात आयोजकांनी (धमू व सहकारी) उत्तमोत्तम लेख, काव्य अजुन जे काही त्यातल्या त्यात 'छान' असेल ते साहीत्य लोकांपुढे आणावे.

अप्रतिम कल्पना. मिपाचे जुने जाणते सदस्य माननिय सहजराव ह्यांच्या सुचनेचे मनापासून स्वागत करीत आहे.
ह्याचसोबत, सहजरावांना अशी जाहीर विनंती करत आहे की अशा उत्तमोत्तम लेख, काव्य इत्यादी जे काही त्यातल्या त्यात 'छान' असेल त्याचे संकलनाची गोड जबाबदारी घ्यावी आणि मंडळाला उपकृत करावे. :) सहजरावांच्या अनुभवी नजरेतून आणि नीरक्षीरविवेकबुध्दीतून चाळून आलेले साहित्य हे केवळ दर्जेदार मेजवानीच ठरेल.

>>इतर दिवशीही लोक लिहीत असतातच की.
अलबत! लिहू द्या की ओ. इतर दिवशीही लिहू द्या, तेव्हाही लिहू द्या. त्यानं काय आपला सर्व्हर झोपत नाय बगा. :) जे जे उत्तम ते ते प्रशंसेस नक्कीच पात्र होईल, नसेल ते मागे जाईल. काय? :)

>>भावना पोहोचल्या. आनंद आहे.
:) धन्यवाद! आपल्या माणसाकडून आलेल्या कौतुकाच्या दोन शब्दांनी देखील हुरुप वाढतो तो असा. तर मग तुम्ही कधी सामिल होताय? कधीपासून संकलन देताय? वाट पाहतो शेठ. :)

>>पण फ्री फॉर ऑल किंवा तीन दिवस जास्तीत जास्त लिहा याने नक्की मायमराठीची सेवा कशी होणार कळले नाही.
फ्री फॉर ऑल मधील 'डिसऑर्डर' ह्यात कुठे आहे ते थोडं समजाऊन सांगाल तर आपण शक्य ती दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करुया की.

बाकी, सेवा हा शब्द तुमचा.
आमचं म्हणणं फक्त इतकंच, की हा सण साजरा करुया.
सणावारी घरोघरी गोडाधोडाचं करतात, नवे कपडे, घराचे सुशोभन करतात. ते संकेतस्थळावर कसं करावं? तर ह्या तीन दिवसात येणारे लेख/कविता/स्फुट/ललित हे मराठी भाषा विषयावर असावं असा केवळ प्रयत्न. ह्या व्यतिरिक्त आणखी काही सुंदर कल्पना असतील तर त्याबद्दल हक्कानं सांगा ना. तुमचा अधिकारच आहे की हो.

काय म्हणता? :)

सहज's picture

20 Feb 2011 - 6:44 pm | सहज

बाब्बौ!! जोरदार तयारी केलेली दिसतेय!! :-)

झिंदाबाद झिंदाबाद!

धमाल मुलगा's picture

20 Feb 2011 - 5:28 pm | धमाल मुलगा

@ सुर्यपुत्र / रेवती: 'मराठी भाषेची कॉर्पोरेट जगतात गळचेपी' किंवा 'मराठी भाषेवर इतर भाषांचे आक्रमण' हे विषय कसे वाटतायत? ;)

@ बिरुटे गुर्जी: तुम्ही आणि 'जमेल तसं'? तेही मराठीच्या बाबतीत? काय राव, ल्हान हौत म्हणून अशी चेष्टा करायची का? आँ? :)

@ इंद्रा: खरंच, येऊदे काही झक्कास तुझ्या पेश्शल ष्टाईलीत. मजा येईल.

@पिंगू: राईट्ट साऽर्र :)

@असुरः खरंय! हे असेच वाढता वाढता वाढे, भेदिले सुर्यमंडळा घडावे ऐसि प्रार्थना :)

@पाषाणभेदः नेकी और पुछ पुछ? :)

@अमित देवधरः धन्यवाद मित्रवर्य.

@कलंत्री: जागतीक मराठी भाषादिनाबद्दलचे मनोगत वाचायला आवडेल आम्हाला. जरुर येऊ द्या.

@चिगो: नागपूर...नागपूर... काय हाय का न्हाई नागपूरी खाक्या? ;)

@नानु: येस्सार!

@मुलखावेगळी: बढिया..प्रोसेसर्स आकडेमोडीला लागले की नाही? :)

@मुटे:आँ? तुमचापण 'ह्याप्पी बड्डे' का? वा वा!

@भडकमकर मास्तरः लै वेळा सहमत. तुम्ही कधी घेताय मनावर?

बरं का मंडळी, हे भडकमकर मास्तर म्हणजे बगा येक नंबर लिहिणार...पुन्ना ते नाटक फिटक क्षेत्रातलंसुद्दा.. आता आश्या मान्सानं आपल्याला काय चार चांगलं शबुद लिव्हून दाखवायला होवं का न्हाई? :) मास्तुरे....मराठी रंगभूमीबद्दल आम्हा आडाण्यांना जरा काहीतरी सांगा की ओ. :)

रमताराम's picture

20 Feb 2011 - 7:01 pm | रमताराम

पहिला 'जालावरील सुद्धलेखनाची सद्यस्थिती: एक आकलन' हा विषय चालेल का? आणि दुसरा 'यावर कोण लिहिणार आहे?'

अवलिया's picture

21 Feb 2011 - 8:15 am | अवलिया

पहिला प्रश्न - चालेल
दुसरा प्रश्न - रमताराम. सदस्य क्र ६००८

प्रीत-मोहर's picture

22 Feb 2011 - 10:41 pm | प्रीत-मोहर

चुचु हे नाव नाही का सुच्ल नान्या?

पैसा's picture

22 Feb 2011 - 10:55 pm | पैसा

चुचु मराठीत लिहिते काय ती? म्ला आप्ल वात्ल ती चुचुवाणी नावाची नवी भाशा आहे!

(चुचु, ह.घे. मी पळते आता नायतर मी मार खातेय आज!)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Feb 2011 - 10:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॉस...! उद्या सकाळपर्यंत व्य.नि.ने लेखन पाठवतो.
जसे असेल तसे गोड मानून घ्यावे.

-दिलीप बिरुटे

स्पंदना's picture

21 Feb 2011 - 8:59 pm | स्पंदना

व्वा धमाल राव!! आवाहन लिहाव (की कराव?) तर अस. शब्द शब्द मनात उतरला .

मराठी भाषेवर मराठीतुनच कस काय लिहाय्च बाइ? नाही म्हणजे पेनावर पेनाने लिहिणे तस मराठीवर मराठीत लिहिणे. एकुण लिहिणे तर? बघु काही जमल तर नजरे खालुन घालाय्ला पाठ्वुन देइन, आवडल तर प्रकाशीत करा.

jaydip.kulkarni's picture

23 Feb 2011 - 12:52 am | jaydip.kulkarni

कल्पना उत्तम आहे .........
फक्त अती उत्साहात काहीतरी बोअर लिहू नका ..........

नरेशकुमार's picture

25 Feb 2011 - 6:44 am | नरेशकुमार

काय राव,
राग नका मानू पन सगळा मुडंच घालवायच काम करताय तुमी.
हा अस्सा कीबोर्ड हातात घेतला, आनी तुमची परतिकिरिया वाचली.....

नीलकांत's picture

25 Feb 2011 - 12:50 am | नीलकांत

मराठी दिनानिमीत्तं मिसळपाववर काहीतरी विशेष व्हावं अशी अपेक्षा होतीच. धमालरावांनी पुढाकार घेऊन महत्वाचं काम केलं. आता सहसा न लिहीणार्‍या लोकांनी लिहीतं व्हायला हवं. खूप दिवसात संपर्कात नसलेल्या मित्राशी संवाद सुरू करायला त्याच्या वाढदिवसाचा मुहूर्त उत्तम असतो तसं म्हणा हवं तर ! मात्र या दिवशी मराठी विषयाच्या संदर्भात लेख येऊ दया.

- नीलकांत

सचिन भालेकर's picture

25 Feb 2011 - 6:51 am | सचिन भालेकर

माझ्या साठि प्रत्येक दिवस हा मराठि दिन हाय. दररोज लिहित चला.

पून्हा एकदा सर्वांना आठवण !!

(दवंडीवाला) नाना