टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
पाटेश्वर
पाटेश्वर
सातारा शहरापसुन केवळ १०किमी असलेले ठिकाण.
पुण्यातुन सकाळी सकाळी बाहेर पडल्यास संध्याकाळच्या चहाला परत येता येईल अश्या या ठिकाणाला १ तारखेला भेट दिली. मिपा वरच्याच विजुभाऊंचे आभार मानतो त्यांनी ह्या जागेची भरपूर माहिती दिल्याबद्दल.
पाटेश्वरच्या या भेटीचा फोटोरुपी वृतांत
सकाळी सकाळी खंबाटकी घाटातुन मस्त सुर्योदय बघीतला.

सुर्योदय बघीतल्यानंतर थेट पाटेश्वर गाठले. पाटेश्वरला जाण्यासाठी सातार्यापासुन ४ किमी असलेल्या देंगावला जाणे. येथुन कोणालाही विचारले पाटेश्वर कुठे की आपल्याला रस्ता मिळेल. गाडी लावल्यानंतर साधारण १५-२० मि. चालल्यावर आपलयाला दगडी पायर्या लागतात. येथेच गणेशाचे रिद्धी - सिद्धी बरोबरचे एक शिल्प आहे.
असेच थोडे पुढे गेल्यावर आपण पाटेश्वर मंदिराच्या आवारात पोचतो.
मंदिराच्या बाहेरच एक गोविंद स्वामींचा मठ आहे. या आवारतच एक सुंदर फुललेला गुलमोहर या मोसमात लालेलाल दिसतो.

येथुन वरच्या बाजुला गेल्यास पाटेश्वराचे मुख्य मंदिर व खाली नंदीचे मंदिर आहे. आम्ही आधी वरच्या बाजुला असलेल्या पाटेश्वराच्या मुख्य मंदिराकडे गेलो. वाटेत जागोजागी अनेक वेगवेगळी शिवलिंगे दिसतात.

गर्द झाडीतुन सुरेख दगडी पायर्यांवरून वर गेल्यावर मुख्य मंदिराची दगडी भिंत लागते. या भिंतीत बाहेर दोन कोनाडे आहेत. एका कोनाड्यात एक मोठे शिवलिंग तर दुसर्या कोनाड्यात मारुतीची मुर्ती आहे. शेजारीच एक उभी मनुष्य अवतारातील गरुडाचे शिल्प आपले लक्ष नक्की वेधणार.

दोन कोनाड्यांच्या मधल्या भागातुन एक दरवाजा आत जातो व आपल्याला पाटेश्वरापुढील नंदी व त्याच्यावरील सुरेख मंडप दिसतो. या नंदीवरची नक्षी सुरेख आहे. मुख्य म्हणजे पाटेश्वर हे तसे आतापर्यंत दुर्लक्षीत राहील्याने मंदिरामधील सर्व मुर्ती, शिल्पे सुस्थितीत आहेत. नंदीच्या पायांजवळच शंकराच्या विवाहसोहळ्याचे एक छोटे शिल्प कोरलेले आहे.


पाटेश्वर मांदिराच्या आवारातच दोन बाजुंना दोन मंदिरे आहेत. एक १८ हाताच्या महिषासुरमर्दिनीचे

तर दुसरे मला ओळखता आलेले नाही (कोणाला माहित असल्यास जरूर सांगा).
पाटेश्वराच्या मुख्य शिवलिंगाचे फोटो मला काढता नाही आले. याच मुख्य मंदिरात स्त्री रुपातील गणपती, शेषधारी विष्णू यांच्याही मुर्ती आहेत. मुख्य मंदिराच्या आवाराजवळच कार्तिक स्वामींचे देखील मंदिर आहे. थोडे वर गेल्यावर मंदिराचा पुर्ण परिसरही दिसतो.

आल्या रस्त्याने परत खाली जाऊन मगासच्या मठाजवळून डावीकडे गेल्यावर काही गुहा लागतात. एका गुहेत भलेमोठे शिवलिंग व विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. दशावतार सोडुन अजून दोन अवतार आहेत. कुठले ते मला कळले नाही जाणकारांनी मदत करावी.




याच गुहांजवळ नंदिचे मंदीर आहे. या मंदिराचे विशेष म्हणजे, मनुष्यरुपातला नंदी मी प्रथमच बघीतला. या नंदीच्या मनुष्य रुपाला ७ हात आहेत. का ते मला अजिबात कळले नाही.


हे मंदिर व येथील आगळी वेगळी शिल्पे बघताना खरोखरच नवल वाटते. सातारा, पुणे अश्या जवळ राहाणार्या लोकांनी आवर्जून जावे असे अत्यंत कमी गर्दीचे ठिकाण जरूर बघा.
-
ध्रुव
टीपः वरील सर्व माहिती अत्यंत त्रोटक असून काही चूका आढळल्यास जरूर सांगा व माहितीत भर घाला.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


सुंदर चित्रलेख
सुंदर चित्रलेख धृवा .. धन्यवाद
व्वा !!!!!
सर्वच फोटो एकदम मस्त आहेत....
गरुडाचे शिल्प,१८ हाताची महिषासुरमर्दिनी,मनुष्यरुपातला नंदी हे सर्व अगदी सुरेख टिपले आहेत......
मुळ स्थानाला भेट दिलीच पाहिजे.....
(शिल्पकला प्रेमी)
मदनबाण.....
धृव, पहिला
धृव, पहिला फोटू एकदम खास रे!
काय घेतलाय फोटो...जियो!
बाकी, पाटेश्वराची सचित्र माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
छानच रे धृवा!
+१
सुरेख फोटो
फोटो खूपच आवडले.
कोकणात सावंतवाडीलाही पाटेश्वराचे मंदिर आहे. अर्थात, अशी शिल्पकला मात्र नाही, आणि या व त्या मंदिराचा काही संबंध आहे किंवा कसे हेही ठाऊ़क नाही.
सुंदर..
सर्व फोटो आणि वृत्तांत अतिशय सुंदर आहे. अभिनंदन.
पाठीवरिल ईश्वर
हे मन्दीर पाटेश्वर म्हणजे पाठीवरिल ईश्वर या अर्थाने आहे. नन्दिचे मनुश्य अवतारातील मूर्ती ही नन्दीची नसुन अग्निची आहे.
दशावतारातील अवतारांखेरीज दोन अवतार आहेत बलराम आणि महावीर यांचे.तुम्हाला ऑळखु न आलेले शिल्प हे ब्रम्ह्याचे आहे.
पण तुम्ही येथिल मुख्य मन्दीरातील नाग तसेच अनगळ सावकार यांचे फोटो घेतले नाहीत. तसेच येथिल भुयारात / गुहेत गेलेला दिसत नाही.
येथे पिंडीवर अनेक पिडी अशा पिंडी आहेत. अत्साहाच्या भरात स्थळाची नीट माहीते ने घेता गेल्यामुळे माहीती अर्धवट दिली गेली आहे किंवा ती तुम्हाला नीट मिळाली नाही.
पाठीवरिल ईश्वर ही मूर्ती आलीच नाही. ही एक मरगळलेल्या म्हशीच्या पाठीवर शिवलिंग अशी मूर्ती आहे
ध्रूव,
छायाचित्रे आणि लेख मस्तच.
पहिले आणि तिसरे छायाचित्र विशेष आवडले.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
मन्दिर
फोतो मस्त लेख पन मस्त भेत द्यवि असे वात्ते असे चित्र दोल्यआसमोर उभे केले
छानच !
सर्वच फोटो मस्त आहेत, स्वतः जाण्या आधी असे फोटोत पाहिले की, आपण स्वतः ते ठिकाण पहायला गेल्यावर काही राहिले तर आठवते काय पहायचे राहिले ते.
अतिशय सुरेख..
ध्रुवशेठ,
अतिशय सुरेख चित्रं काढली आहेस.. या चित्रांमुळे मिपाची शोभा वाढली आहे! पहिलं, तिसरं आणि चवथं चित्रं मला सर्वधिक आवडलं!
आजपासून तू समस्त मिपा परिवाराचा पर्यटनमंत्री!
तात्या.
सुंदर
सुंदर सचित्र पाटेश्वर वृतांत!
स्वाती
अप्रतिम प्रकाशचित्रे
वा! एका नव्या स्थळाची ओळख - आवडली.
पाटेश्वराची अधिक माहिती : http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/SATARA/places_Pateshvar.... येथे.
तुमचा काही बघायचा भाग राहिला असे दिसते.
तसेच मनुष्याकृती नंदी हा मुळात 'अग्नी'आहे. अग्नीची मूर्ती प्रथमच पाहिली.
अप्रतीम आप
अप्रतीम
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
मस्त!
हे फोटो पाहुन पाटेश्वराला नक्कि भेट द्यायची असं ठरवलय.
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
अप्रतीम...
वाह धृवा,
छान चित्रालेख. पहिला फोटो केवळ अप्रतीम . (डेस्कटॉपवर टाकावा म्हणतो,) बहरलेला गुलमोहर मस्तच (फोटोत का होइना, खुप वर्षांनी पाहिला) .
याच मुख्य मंदिरात स्त्री रुपातील गणपती..........
स्त्री रुपी गणपती बद्दल कधी ऐकल न्हवत पुर्वी.
-गणपा.
सुरेख
सुरेख चित्र आहेत.आजकालच माझा आणि विसुनानांचा अग्नीबद्दल संवाद झाला होता आणि आज अग्नीची मूर्ती पाहण्यास मिळाली. अनेक धन्यवाद.
अग्नीला सात जिभा असतात (सप्तजिव्हा) त्याने तो सर्वभक्षण करतो परंतु सात हात का ते मलाही कळले नाही.
गरूड पुराणानुसार विष्णूचे १० अवतार असले तरी भागवत पुराणात ते वाढलेले दिसतात. त्यात व्यास, बलराम, दत्तात्रेय इ. चा समावेशही होतो.
चित्रातील मत्स्य, कूर्म, वराह, परशुराम, बुद्ध सहज कळले. राम, कृष्ण आणि कल्की असावेत असे सांगता येईल. बटुवामन आणि नरसिंह नेमके कोणते ते मात्र चित्रातून कळले नाहीत. एक बसलेली मूर्ती महावीराची असावी.
अप्रतिम
फारच छान आले आहेत सर्व फोटोज. गुलमोहर तर मस्तच . ईथे घर बसल्या पाटेश्वरची चित्र सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद. तुमचे भुलेश्वर चे फोटोज ही अप्रतिम होते.
ईश्वरी
चांगली
चांगली माहिती दिलीस रे धृवा.
फोटो सगळेच चांगले आहेत. पहिला फोटो खल्लास.
मुख्य मंदिरातले फोटो का नाही काढले?? खुप अंधार होता काय?
सुरेख
फोटोज आणि वर्णन.
मुख्य म्हणजे पाटेश्वर हे तसे आतापर्यंत दुर्लक्षीत राहील्याने मंदिरामधील सर्व मुर्ती, शिल्पे सुस्थितीत आहेत
-- भेदक वाक्य. वाचनाच्या ओघात पटकन कुठेतरी हलवून जाणारे.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
भेदक वाक्य.
असेच म्हणतो ... आमच्या वेरूळच्या लेण्या पहायला गेल्यावर तर ती तोडफोड पाहुन मन विषण्ण होते.
तिथले कैलास लेणे फोडायला औरंगझेबाने हजार हजार माणसे लावली होती, बरे झाले त्या हलकट औरंग्याच्या काळात मोठ मोठे बॉम्ब नव्हते नाहीतर वेरुळचे बामियान केले असते कुत्र्याने.
-
(संतप्त)
आंद्या
सुरेख फोटो
फोटो फारच चा॑गले आले आहेत्..विशेषतः सूर्योदयाचा.. (एक ग॑मत- स्क्रॉल डाऊन करता॑ना त्या फोटोच्या सुरूवातीला फक्त ढग दिसतात ते मला अ॑डरवॉटर पोहोणारी स्त्री वाटली होती एव्हढेच
अ॑डरवॉटर पोहोणारी स्त्री
अरे वा!! तुमच नशीब चांगल आहे म्हणायचं
. मल फोटो काढतानासुद्धा नाही दिसली... 
--
ध्रुव
अ॑डरवॉटर
बॅकस्ट्रोक मारतेय ती काहो?
धन्यवाद
प्रथम सर्वांना धन्यवाद.
@ बकुळफुले,
))
तुमचे म्हणणे खरे आहे. मीच घाई मध्ये निट माहिती न घेता गेलो त्यामुळे मुख्य शिवलिंबघव ते भुयार बघायचे हे कळलेच नाही. तिकडच्या आश्रमकाहीचविचारले तरी काहीच सांगीतले नाही. (आश्रमातले लोक आधीच माझा कॅमेरा बघुन कावले होते, त्यांना सारखी भिती वाटत होती की मी फोटो काढेन (त्यांची भिती योग्य होती
पुढच्या वेळेला परत जाणार आहे तेव्हा सगळी चित्रे व सर्व मंदिर निट बघीन.
@शितल,
खरे आहे. फोटो बघीतले असले आधी तर कळते काय बघीतले व काय राहीले. मला जालावर कुठेच फोटो नाही मिळाले बघायला.
@तात्या,
धन्यवाद
@विसुनाना,
धन्यवाद. ही लिंक मी आधी बघीतली नव्हती. परत जाईन तेव्हा नक्की न चुकता सर्व बघेन.
@ गणपा,
मी पण पहिल्यांदा भुलेश्वरला बघीतला व आत्ता पाटेश्वरला असा गणपती बघीतला.
@प्रियाली,
धन्यवाद. विकीपिडीया म्हणतो की अग्नीला २/७ हात असू शकतात. मला एक नाही कळले की ही अग्नीची मुर्ती नंदीसारखी का आहे. की ही नंदीसारखी नसुन कुठल्या दुसर्या प्राण्यासारखी आहे?
@झकासराव,
अरे मुख्य मंदिरामध्ये पुजारी बसले होते त्यामुळे नाही काढले. तिथल्या स्थानीक लोकांचा फोटो काढण्याबद्दल फारच राग होता. (का कुणास ठाऊक?)
@नंदन,
बरोबर आहे. खरच वाईट वाटतं. नुसते औरंगझेबानेच नव्हे तर इंग्रजांनी पण त्यांच्या १५० वर्षांच्या काळात आपल्या संस्कॄतीचे बरेच नुकसान केलेले आपल्याला दिसते.
बाकी सर्वांना परत एकदा धन्यवाद.
--
ध्रुव
सुंदर
पाटेश्वर दर्शन जरा उशीराच झाले.
सुंदर छायाचित्रे !!!