टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
अक्कल शुन्य उदगार .....
प्रेषक नाना चेंगट ( शनी, ०५/०३/२००८ - १२:३७) .
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

कॉन्डोलिस
कॉन्डोलिसा राइस किंवा जॉर्ज बुश यांच्या म्हणण्यात चूक काही नाही. हे उद्गार "अक्कल शून्य" तर बिलकूलच नाहीत उलट ती वस्तुस्थिती आहे.
आणि ती वस्तुस्थिती आहे याचा भारतीयांना अभिमानच वाटला पाहिजे.
जगातील सर्व उपलब्ध साधन सामग्री ही अमेरीकन लोकांसाठीच देवाने निर्माण केली आहे या त्यांच्या समजाला आता तडे जायला सुरुवात झाली आहेच, ते अधिकाधिक वाढत जातील.
अमेरिकेत एका दिवसात जितके अन्न वाया जाते, त्यात अफ्रिकेतील एखादा गरीब देश आठवडाभर जेवू शकेल. अमेरिकन जेवढे पेट्रोल जाळतात त्याला काही सीमा नाही.
भारत आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक सबळ होत चालला आहे, ही चांगली बाब आहे. साहजिकच जर १०० कोटी लोक जर दोनवेळ पोटभर जेवू लागले (जे इतकी वर्षे अर्धपोटी होते), तर अमेरिकनांना आता आपल्यात एक हिस्सेदार आला अशी भावना निर्माण होणारच.
भारताने अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे (जो गेली काही वर्षे होताच) हाच यावरील उपाय आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
अमेरिकेने
अमेरिकेने गव्हाची २०% जमीन बायो फ्युएल करीता वापरली. मेक्सिकन शेतक्-यांना प्रलोभने देवुन गव्हाएवजी जेट्रोफा लागवड करायला लावली त्यामुळे अन्नधान्य टंचाइ झाली आहे
साहजिकच जर १०० कोटी लोक जर दोनवेळ पोटभर जेवू लागले (जे इतकी वर्षे अर्धपोटी होते),
तुम्हि भारतात रहाता की इंडीयात?
सरकारी आकडेवारी सांगते की केवळ ३५% लोक दोन वेळेस पोटभर जेवु शकतात
जगातील सर्व उपलब्ध साधन सामग्री ही अमेरीकन लोकांसाठीच देवाने निर्माण केली आहे या त्यांच्या समजाला आता तडे जायला सुरुवात झाली आहेच, ते अधिकाधिक वाढत जातील.
हे बरोबर आहे येता काळ अमेरिकेला संपवणार हे निश्चित
भारताने अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे (जो गेली काही वर्षे होताच) हाच यावरील उपाय आहे.
बिनकामाच्या सेझ मुळे पिकावु जमिन तर शिल्लक राहली तरच हे शक्य...
नाना
अक्कल शुन्य आहेच मुळी तो बुश!!!!!
चेंगटराव आपल्या मी १०० % सहमत आहे.....
(बुशच्या बैलाला ढोल )असे म्हणणारा.....
मदनबाण.....
हे वाचा...
http://timesofindia.indiatimes.com/US_eats_5_times_more_than_India_per_c...
दर डोइ उत्पन्न गृहित धरल्यास, सरासरी एक भारतीय माणुस जेवढे धान्य खातो,
त्याच्या चक्क ५ पट (म्हणजे ५००% अधिक!!) हे अमेरिकन खातात.
एवढेच नाही तर आपल्याकडील सरासरी एक भारतीय माणुस जेवढे चिकन खातो त्याच्या जवळपास
वीस पटीहूनही जास्त सरासरी एक अमेरिकन खातो.
मला माहिती दिसली.ती इथे टाकली.
बाकी.
नो कमेंट्स.
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)