मला आलेले पुण्यातील अनुभव

मी प्रथमच पुण्यात आल्या मुले सगला परिसर नवीन होता. बरेच काही ऐकून होतो पुण्या बद्दल. ट्रैफिक, सदाशिव पथ इ.
मला आलेले पुण्यातील अनुभव
१. इथले सगळे लोक हिंदी का बोलतात ते समजले नाही. मला वाटले आता मराठ्याच्या राजधानित आल्यावर तरी मराठी ऐकायला भेटेल. रिक्शा वाले, बस कंडक्टर.सगळे हिन्दिताच बोलतात. हे ऐकून वाईट वाटले. मला समजत नाही ही मानसे, हिंदी का सुरवात करतात?
मी शक्य तितके मराठी बोलतो, जरी मला मराठी बरोबर लिहता येत नसले तरी.
२. बालाजी नगर मद्ये एक डोसा खायला गेलो, पहिला डोसा बार होता. दूसरा जरा कच्चा होता. तय बाई ने माजे पैसे घेतले नाहीत. का तर मी डोसा खाल्ला नाही. मला वाटते इ, तिने पैसे घ्याला हवे होते. कारन मी तिचे हे पीठ वयाला घलावेले. मुम्बई मद्ये एक पैस्सा सोडत नाहीत.
३. आणि इथे दुकान दाराला ग्राहकाची गरज नसते. ग्राहकाला गरज असते दुकान दाराची. दुकान दर मेहरबानी करतो दुकान चालवून गृह्कावारती.

तुम्हालाही असेच वाटते काय?

असाही एक पुणेरी सदाशिव पेठी अनुभव

मी स प कॉलेज जवळ एका मुलीला एक पत्ता विचारला . तिने माहीत आहे / नाही असे काहीही न सांगता माझ्याकडे पाहुन तोंड शक्य तेवढे वाकडे केले आणि हुं: असा उद्गार करुन पुढे निघुन गेली.
( मी मुम्बैला घरी जाउन आरशात पाहीले. मी इतका काही टुकार दिसत नव्हतो)
::::: असाही एक पुणेरी सदाशिव पेठी अनुभव घेतलेला विजुभाऊ

सगळीकडे असेच आहे...

मला स प कॉलेजाजवळच काय , कोठेही , कोणत्याही गावात / शहरात मुली असेच करत असत... :< .
...त्यामुळे आम्ही कोणत्या मुलींना पत्ता कसा विचारावा, याचेही स्पेशल कोर्स काढणार आहोत... आपल्याला जो त्रास भोगावा लागला तो इतर होतकरू , सज्जन लोकांना नको अशी आणि इतकीच प्रामाणिक इच्छा...

( कॉलेजात मुलींशी बोलता न येणारा ) Cool भडकमकर

पुण्यात्ले अनुभव

मला तर पुण्यातला खूप वाईट अनुभव आहे. मी एकदा पेठेत एकाना एक पत्ता विचरला तर त्यानी मला चक्क चुकीचा पत्ता सागितला. मला जायच होत स्वारगेटला आणि त्यानी मला पाठवल डेक्कनला. तेव्हा पासून ठरवल कि पुण्यात कुणाला ही म्हणून पत्ता विचारायचा नाही. फक्त पोलिसाना विचरायचा.

मी एकदा

मी एकदा माझ्या मोठ्या भावाबरोबर चार-चाकी गाडीतून स.पेठेतून चाललो होतो, भाऊ गाडी चालवित होता, मी बाजूला बसलो होतो. पत्ता पटकन सापडला नाही म्हणून एका गृहस्था॑स मी विचारले तर तो माझ्यावर वस्सकन रेकला.. 'गाडीतून उतरा अन मग माझ्याशी बोला..मोठे आलेत गाडीतून फिरणारे..!" माझी वाचाच बसली

मस्त !!

तो माझ्यावर वस्सकन रेकला.. 'गाडीतून उतरा अन मग माझ्याशी बोला..मोठे आलेत गाडीतून फिरणारे..!" माझी वाचाच बसली

Smile अनुभव आवडला !!!!

हा, हा!!

मग दाढेसाहेब, तुम्ही खरंच गाडीतून खाली उतरून पत्ता विचारलांत, की तसेच पुढे गेलांत?
Rolling On The Floor

१. इथले

१. इथले सगळे लोक हिंदी का बोलतात ते समजले नाही. मला वाटले आता मराठ्याच्या राजधानित आल्यावर तरी मराठी ऐकायला भेटेल. रिक्शा वाले, बस कंडक्टर.सगळे हिन्दिताच बोलतात. हे ऐकून वाईट वाटले. मला समजत नाही ही मानसे, हिंदी का सुरवात करतात?
मी शक्य तितके मराठी बोलतो, जरी मला मराठी बरोबर लिहता येत नसले तरी.

काही नाही रे सखारामा, साले हल्ली सगळेच गां* झाले आहेत पुण्यात. तरीही सुदैवाने इनोबा सारखे कट्टर मराठीवादी आहेत पुण्यात अजून.
अहो एकच कळीचा मुद्दा आहे, समजा ४ माणसे असतील ३ मराठी आणि १ अमराठी तर साले सगळे हींदीत बोलत सुटतात. माझा याला ठार विरोध आहे. मी तर आमच्या ऑफिसमधे कायम हिंदीमधे बोलणारी मराठी माणसे पाहीली आहेत. लाचार साले.
१ अमराठी आहे ना मग तो मराठी शिकेल त्यासाठी आपण हिंदीत बोलायची काही गरज नाही. आता हेच व्यासपिठावरून बोंबलायची गरज आहे असे वाटते. मी आमच्या ऑफिसच्या ग्रुप मधे असे ठासून सांगितल्यावर मला देशद्रोही असेही हीणवले. त्यावर मी देखील ठासून सांगितले की 'पुण्यात एखाद्याला मराठीत बोल म्हणून सांगणे हा देशद्रोह असेल तर तो मी उघड उघड करतो'.
शेवटी वपूंचे वाक्यच खरे वाटते 'कबुतराला गरुडाचे पंख लावताही येतील पण गगनभरारी मारण्याची इच्छा रक्तातच असावी लागते कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही'. तसे स्वाभिमान, भाषाप्रेम इ. सर्व रक्तातच असावे लागते ते बाहेरून नक्कीच आणता येत नाही.
सध्या पैशासाठी आम्ही हे विकले आहे हेच खरे.

(विषण्ण पुणेकर)
पुण्याचे पेशवे

लाख

लाख बोललात, पेशवे आपण!

'कबुतराला गरुडाचे पंख लावताही येतील पण गगनभरारी मारण्याची इच्छा रक्तातच असावी लागते कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही'. तसे स्वाभिमान, भाषाप्रेम इ. सर्व रक्तातच असावे लागते ते बाहेरून नक्कीच आणता येत नाही.
सध्या पैशासाठी आम्ही हे विकले आहे हेच खरे.

क्या बात है! जळजळीत सत्य!

समजा ४ माणसे असतील ३ मराठी आणि १ अमराठी तर साले सगळे हींदीत बोलत सुटतात. मी तर आमच्या ऑफिसमधे कायम हिंदीमधे बोलणारी मराठी माणसे पाहीली आहेत. लाचार साले.

लाज वाटते कित्येकांना आपण मराठी आहोत हे सांगायची! कुत्तरडे साले!!!!

माझा याला ठार विरोध आहे.
शाब्बास!
मी मुंबईत आल्यावर माझा कलिग मराठी असुनही त्याला समोरच्याशी हिंदीतच बोलायची सवय. म्हणलं भडव्या, मी अस्सल मराठी आहे..आणि तू ही...त्यालाही कळलं..आणि आता...Smile आमच्या हापिसात हिंदीपेक्षा मराठीच जास्त वापरली जाते...आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे ! ज्याला कळत नाही त्याला सरळ पहिला प्रश्न विचारतो मी, 'कबसे हो महाराष्ट्र में?' ६ महिन्यापेक्षा जास्त असं उत्तर आलं की टोचून बोलायला सुरुवात करायची...साम दंड भेद इ.इ. प्रकाराने त्याला मराठीतच बोलायला भाग पाडायचं...आपल्या लक्षातच नाहीय्ये की समोरचा अमराठी आहे असं दाखवून त्याच्याशी मराठीत बोलायचं आणि त्यानं परत 'काय?' असं विचारलं की परत चावायचं...हसत हसत बोलायचं..पण जोड्यानं मारायचं..येतात साले बरोबर लाईनीवर !!!!!

-ध मा ल महाराष्ट्रकर !

आपल्या

आपल्या लक्षातच नाहीय्ये की समोरचा अमराठी आहे असं दाखवून त्याच्याशी मराठीत बोलायचं आणि त्यानं परत 'काय?' असं विचारलं की परत चावायचं...हसत हसत बोलायचं..पण जोड्यानं मारायचं..येतात साले बरोबर लाईनीवर

ही पद्धत अगदी योग्य...
वा...!मस्त
( मॅक्डोनल्ड, पिझा हट मध्ये काउंटरवर आवर्जून अस्खलित मराठीत बोलणारा ) भडकमकर

मराठीतच बोलायला भाग पाडायच -- असेच केले पाहिजे !!!!!

आमच्या हापिसात हिंदीपेक्षा मराठीच जास्त वापरली जाते...आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे !
अरे व्वा !!!!! ,,,पण माझ्या ऑफिस मधे ही स्थिती नाही.....म्हणुनच मी जर नवीन व्यक्ती दिसली आणि माझ्या संपर्कात आली की मी आधी त्याला त्याच नाव विचारतो.....आणि जर तो मराठी आहे हे समजल की लगेच मी त्याच्याशी मराठीतच बोलायला सुरुवात करतो.....

(अवांतरः-- ऑफिस मधल्या मल्लु,तमिळ लोकांचे जर निरिक्षण केलेत तर ते एकमेकांशी त्यांच्याच भाषेत बोलतात हे तुम्हाला कळुन येईल..यांना हिंदी पण धड येत नाही.....)
मराठी असुन मराठी बोलायला लाज वाटणारा माणुस माझ्यालेखी षंढ आहे !!!!!

मदनबाण>>>>>

मदन दा,

मी आधी त्याला त्याच नाव विचारतो.....आणि जर तो मराठी आहे हे समजल की लगेच मी त्याच्याशी मराठीतच बोलायला सुरुवात करतो.....

येडा आहेस....सरळ मराठीतून सुरुवात करायची! समोरचा 'मराठी नहीं आता!" म्हणाला की विचारायच "नही आता?" आणि काहीतरी जगाच्या पलीकडचं पाहिल्यासारखं तोंड करायचं...पुढचा बॉम्ब टाकायचा 'कबसे हो महाराष्ट्र मे?' उत्तर आलं की 'फिर भी नही आता?' असं विचारायचं! वर आणि 'दक्षिणेत गेलास तर त्यांच्या भाषेत बोलल्याशिवाय कोण गिळायला तरी देतं कारे' असं सौम्य भाषेत विचारायचं...
समोरच्याला बरोबर आपली जातकुळी कळते आणि तो नीट रहायला लागतो.

:)

सही रे भिडु आपण तर शिष्यत्व घेउ तुझं.........
लै भारी ष्टायिल हाये.......
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

वा!

धमाल्या,
आपली (जहाल?) विचारसरणी आवडली!!

अगदी बरोबर

मला तर हिंदी येतच नाही बोलता Smile

मराठीतुन बोलायच समोरचा बरोब्बर बोलतो आणि नाही आलं बोलता तर गेला उडत
गरज त्याला असते Smile

कमाल आहे.

१. इथले सगळे लोक हिंदी का बोलतात ते समजले नाही. मला वाटले आता मराठ्याच्या राजधानित आल्यावर तरी मराठी ऐकायला भेटेल. रिक्शा वाले, बस कंडक्टर.सगळे हिन्दिताच बोलतात. हे ऐकून वाईट वाटले. मला समजत नाही ही मानसे, हिंदी का सुरवात करतात?
मी शक्य तितके मराठी बोलतो, जरी मला मराठी बरोबर लिहता येत नसले तरी.

च्याइला,आमच्या वेळी हे असले नखरे नव्हते.!

मी मुंबईत आल्यावर माझा कलिग मराठी असुनही त्याला समोरच्याशी हिंदीतच बोलायची सवय. म्हणलं भडव्या, मी अस्सल मराठी आहे..आणि तू ही...त्यालाही कळलं..आणि आता... आमच्या हापिसात हिंदीपेक्षा मराठीच जास्त वापरली जाते...आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे ! ज्याला कळत नाही त्याला सरळ पहिला प्रश्न विचारतो मी, 'कबसे हो महाराष्ट्र में?' ६ महिन्यापेक्षा जास्त असं उत्तर आलं की टोचून बोलायला सुरुवात करायची...साम दंड भेद इ.इ. प्रकाराने त्याला मराठीतच बोलायला भाग पाडायचं...आपल्या लक्षातच नाहीय्ये की समोरचा अमराठी आहे असं दाखवून त्याच्याशी मराठीत बोलायचं आणि त्यानं परत 'काय?' असं विचारलं की परत चावायचं...हसत हसत बोलायचं..पण जोड्यानं मारायचं..येतात साले बरोबर लाईनीवर !!!!!
मस्त रे. असेच फोडले पाहिजे साल्यांना.
हुबळी-धारवाडला असताना, मी आणि माझा मित्र कुठल्याहि दुकानात गेलो कि मुद्दामून मराठीतून सुरु करायचो.
तिथल्या ब-याच दुकानदारांना मराठी येते असा माझा अनुभव आहे.त्यातल्या एखाद्याने जर "काहि समजले" नाहि असा आव आणला
तर आम्ही दोघेहि त्याच्याकडे एकदम हीन द्रुष्टीने पहायचो.काय हे? तुला साधे मराठी कळत नाही.!?अरेरे.
तो बिचारा ओशाळायचा.मग आम्हीच आपले हिंदि इंग्रजी सुरु करायचो.
आपण मराठी आहोत हे लोकांना समजल्याशी कारण.
बाहेर आल्यावर आम्ही दोघेहि जाम हसायचो.

अबब

लै भारी

वरती सगळ्यानी सुचवलेले उपाय लै भारी आहेत...
( मॅक्डोनल्ड, पिझा हट मध्ये काउंटरवर आवर्जून अस्खलित मराठीत बोलणारा ) भडकमकर
..हे आपल्याला आवडलं....मी पण करतो असं बरेच वेळा..एक छोटा किस्सा सांगतो..मी आणि बायको एकदा जंगली महाराज रोडच्या पिझ्झा हट मधे गेलो आणि मी मराठीतुन ओर्डॅर दिली. त्या बंड्याच्या तोंडावर "कुठनं येतात गाववाले" असा भाव होता.
खाउन झाल्यावर तो परत आला "और कुछ सर?" मी म्हणालो "नाही...get me the check please" आणि hsbc चं card टेबल वर आपटलं.. हा भाऊ एकदम थंड्..मग मी जरा मोठ्या आवाजात म्हणालो, "अरे दादा, बील घेवुन ये "...थोतरीत मारल्यासारखा तोंड करुन गेला..(है शाबाश !)
(by the way, हे अमेरिकन जरा येडेच असतात्..बिल ला चेक काय म्हणतात, पेट्रोल्/डीझल ला गॅस काय म्हणतात्..असो)

महाराष्ट्र धर्म सोडू नये हेच खरं

मस्तच

Laughing

मस्तच आण्याबा...

त्या बंड्याच्या तोंडावर

बंड्या....खी खी खी!!!

हे अमेरिकन जरा येडेच असतात्..

येडे? डोक्यात पांगळे असतात म्हणा राव!

वा वा !!!

मराठी ला दिलेला मान पाहून धन्य झालो. राव.

माझी एक मैत्रिण तर तिच्या मराठी मैत्रिणीशी फक्त दोघींच संभाषण असताना देखील हिंदीत बोलते. म्हणे हिंदीवर आम्ही प्रेम करतो !!! काय म्हणावं या मुर्खपणाला?

जिथे आपण आपल्या आईला "आई" म्हणायचं सोडून दिलं, बापाला "बाप" म्हाणायचं सोडून दिलं तिथं संभाषणासाठी मराठी काय वापरणार? आज मायबोलीची लाज वाटते उद्या मायबापाची देखील वाटेल!!
स्वतः च्या आईची तर जिवंत पणे "ममी" बनवून टाकली आपण. बापाला पॉप म्हणतात! नशीब "पाप" म्हंणत नाहीत.
आणि आईबाप तरी कसे आहेत बघा. त्याना स्वतःला ही आवडत नाही आई, बाबा, आबा म्हटलेलं. माझी काकी तिच्या नातीला म्हणते मला आजी म्हाणायचं नाही. आजी म्हणायला मि काय म्हातारी आहे का? मग तिची नात तिला आईच म्हणते. मग गोंधळ टाळण्यासाठी स्वतःच्या आईची ममी बनवून टाकली.
माझ्या शेजारचा ४ वर्षाचा भावेश मला विचारत होता.
"तुझी आई कुठे आहे?"
मी माझ्या आईकडे बोट दाखवलं तर म्हणला,
"हि तर तुझी ममी, मी आई कूठे आहे विचारतोय" !!!!

दानशूर

बर्‍याचदा घरी साईबाबांची सेवा करा / देवीच्या नावावर धान्य आणि तेल द्या / मी ५ घरी मागून खायचा संकल्प सोडला आहे तर मला १ किलो गहू किंवा तांदूळ द्या / भविष्य जाणून घ्या (पायजमा, सदरा, जॅकेट आणि केशरी टिळा लावलेले तरुण) / अनाथ मुलांच्या संस्थेसाठी देणगी द्या (कमीत कमी १० रुपये).. असे अनेकानेक नमुने येत असतात. (बघुनच कळते की किती बनावट अन् खोटारडी मंडळी आहेत.)
आम्ही नाही असे सांगून पिटाळतो. तर आमच्या वरच्या मजल्यावर रहाणारे काका "एऽऽ चलऽऽ.. आधी खाली हो .. पोलिसांच्या ताब्यात देतो तुला चल.." असे अख्या बिल्डिंगला ऐकू येईल असे सुनावतात..
ते ऐकून ती मंडळी जी धूम ठोकतात ती परत येत नाहीत.
असा कोणी भामटा / भामटी आमच्याकडे आला तर आम्ही त्यांना वर पाठवतो - वर जा, ते काका खूप दानशूर आहेत म्हणून.

असा कोणी

असा कोणी भामटा / भामटी आमच्याकडे आला तर आम्ही त्यांना वर पाठवतो - वर जा, ते काका खूप दानशूर आहेत म्हणून.
लै बेष्ट.... आवडलेच.. Rolling On The Floor Rolling On The Floor

मस्तच

आमच्या हापिसात हिंदीपेक्षा मराठीच जास्त वापरली जाते...आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे ! ज्याला कळत नाही त्याला सरळ पहिला प्रश्न विचारतो मी, 'कबसे हो महाराष्ट्र में?' ६ महिन्यापेक्षा जास्त असं उत्तर आलं की टोचून बोलायला सुरुवात करायची...साम दंड भेद इ.इ. प्रकाराने त्याला मराठीतच बोलायला भाग पाडायचं...आपल्या लक्षातच नाहीय्ये की समोरचा अमराठी आहे असं दाखवून त्याच्याशी मराठीत बोलायचं आणि त्यानं परत 'काय?' असं विचारलं की परत चावायचं...हसत हसत बोलायचं..पण जोड्यानं मारायचं..येतात साले बरोबर लाईनीवर !!!!!

- (मॅक्डोनल्ड, पिझा हट मध्ये काउंटरवर आवर्जून अस्खलित मराठीत बोलणारा ) भडकमकर

हुबळी-धारवाडला असताना, मी आणि माझा मित्र कुठल्याहि दुकानात गेलो कि मुद्दामून मराठीतून सुरु करायचो.
तिथल्या ब-याच दुकानदारांना मराठी येते असा माझा अनुभव आहे.त्यातल्या एखाद्याने जर "काहि समजले" नाहि असा आव आणला
तर आम्ही दोघेहि त्याच्याकडे एकदम हीन द्रुष्टीने पहायचो.काय हे? तुला साधे मराठी कळत नाही.!?अरेरे.
तो बिचारा ओशाळायचा.मग आम्हीच आपले हिंदि इंग्रजी सुरु करायचो.
आपण मराठी आहोत हे लोकांना समजल्याशी कारण.
बाहेर आल्यावर आम्ही दोघेहि जाम हसायचो.

खुपच जबरी अनुभव आहेत. मी ही इथे अमेरिकेत मी माझ्या मैत्रिणी॑ना मराठीत बोलण्यात पस॑ती देते, जिथे समजत नसेल तिथे इ॑ग्रजी वापरावी लागतेच, पण इ॑डियन असेल तर सुरूवात मराठीत, ४ ते ५ जण साऊथ इ॑डियन एकत्र असतील तर ते त्या॑चीच भाषा बोलतात, पण त्या॑ना मराठी ही कळते, पण आपण महाराष्ट्रीयन आहोते हे आपण त्या॑ना दाखवुन दिले पाहिजे हा माझा अट्टाहास.

वा..

धमाल मुला.. तुझी पद्धत मला एकदम पटते, आणि मी पण तसेच करते.. माझी एक पंजाबी मैत्रीण होती..तिचा , तिच्या मोठ्या बहीणीचा जन्म पुण्याचाच. तरी मला भेटायच्या अगोदर हिंदी आणि ईंग्लिश च.. पण मला भेटल्यापासून मैत्रीण जमेल तसं मराठी बोलायला लागली.. ( यात माझं हिंदी कच्चं होतं हा पण भाग होता म्हणा.. Smile ) पण आता ती , बहीण, तिची आई सगळ्या इतक्या सुंदर मराठी बोलतात. काकांनी मात्र हिंदी सोडलं नाही कधी.. अगदी आप्-हम वालं हिंदी.. माझ्या तूम्-तू ला खूप चिडायचे म्हणे ते.. पण अरे, तुम्ही आयुष्यभर इथे राहताय, तुम्हाला मराठी येत नाही?? मग बाकीचे कसे शिकले घरातले! काहीही... माझे गुजराती मित्र मैत्रिण, एक ख्रिस्चन मैत्रिण सगळे सुंदर मराठी बोलतात... अवघड काहीच नाहीय.. आणि आपण ज्या भाषेत बोलू त्या भाषेत ते बोलतात.. त्यामुळे आपणच मराठी बोलले पाहीजे.. !
मी तर पुण्यात कुणाशीही हिंदी बोलले नाही.. जिथे जमेल तिथे मराठी बोललेच पाहीजे..

बाय द वे,

पुण्यातल्या अनुभवांबद्दल मी काही बोलणार नाही.. कारण मी पुण्याचीच आहे.. Smile त्यामुळे काहीही असलं, कसही असलं तरी पुणेकर म्हणून मला जाज्वल्य अभिमान आहे! Smile :)

तरी पुणेकर

तरी पुणेकर म्हणून मला जाज्वल्य अभिमान आहे! Smile Smile

असायलाच हवा...
पुलंनी सांगितलंच आहे...'तुम्हाला पुणेकर व्हायचंय? मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा जाज्वल्य अभिमान असायला हवा...साधा अभिमान असुन चालणार नाही...जाज्वल्यच हवा' Laughing

पंजाबी घराची हकिगत ही बोधपरच आहे!

अवांतरः आमचा मित्र राजवीरसिंग अस्खलीत मराठी बोलतो....आम्ही त्याला पंजाबी मावळा म्हणतो.

कारण मी

कारण मी पुण्याचीच आहे..

ते वरती बाय द वे लिहिले त्यावरुन कळले

पुण्यातल्या अनुभवांबद्दल मी काही बोलणार नाही..

पादतो तो कधी सांगतो का .. हो तोच मी म्हणुन

त्यामुळे काहीही असलं, कसही असलं तरी पुणेकर म्हणून मला जाज्वल्य अभिमान आहे! Smile

बसा डबक्यातच ....

सुधरा हो अजुन तरी सुधरा

अहो पक्या

अहो पक्या डेंजर भाऊ! इतकी का जळजळ?? नाही म्हणजे मी तुम्हाला सांगायला आले नव्हते की तुमचा फुकट सल्ला मागायला.. आम्ही जे करायचं ते करतोच हो.. दुसर्यांना नाही विचारायला जात... किंवा काडीचाही संबंध नसताना दुसर्याना सुधरायचे सल्ले देत नाही..! त्यामुळे तुम्ही मला नसते सल्ले देण्याची काहीच गरज नाहीय.. पुणेकरांना पुण्याबद्दल अभिमान आहे, मग तुम्ही पण ठेवा ना तुमच्या गावाबद्दल.. जळताय काय असे !! काहीही!!

>

>Smile >Smile
फुस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स

चल चल हवा येवु दे Silly Silly

मध्य प्रदेशातील मराठी

हे सगळं वाचल्यावर विषण्ण वाटतं. महाराष्ट्रात- ज्याची राजभाषाच-मराठी आहे. तिथे काय काय करावं लागतं. त्या तुलनेत मग इथे मध्य प्रदेशात बरं आहे. राज आणि राष्ट्रभाषा हिंदी असूनही इथे मराठी लोक मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतात. भलेही त्यांच्या मराठी शब्दांच्या कडेवर हिंदी शब्द बसू देत. पण ते मराठी बोलण्याचा आणि टिकवण्याचा प्रयत्न तरी करतात. युवा पिढीत मराठी बोलणं कमी आहे. पण मराठी असल्याची आणि ते मराठीपण टिकवण्याची जाणीव त्यांच्यात आहे. इथे एक समाजचिंतन नावाचे साप्ताहिक निघते. त्याच्या शीर्षस्थानी 'मराठी माणसाने एकमेकांशी मराठीच बोलले पाहिजे' असे लिहिले आहे. मध्यंतरी एकदा मांडूहून परतत असताना गाडीत एक मुलगी भेटली. ती बायकोशी बोलत होती. त्यांचे कुटुंबिय तीन-चार पिढ्यांपूर्वी या भागात आले. ती इंदूरजवळच एका खेड्यात रहाते. तिथे मूळचे बीड-परभणी परिसरातील असणारी बरीच मंडळी आहेत. ही मंडळी आजही तिकडच्यासारखीच भाषा बोलत असतात. आम्हाला भेटलेली मुलगी चुकूनही मध्य प्रदेशातली आहे असे वाटत नव्हते. मध्य प्रदेशातल्या छोट्या छोट्या गावातही मराठी मंडळी आहेत. तिथे त्यांची मंडळे आहेत. आणि त्यांचे मराठी कार्यक्रमही होत असतात. या लोकांच्या मराठीचे आपल्याला हसू येईलही. पण ज्या परिस्थितीत ( आणि ज्या जाणीवेने) त्यांनी मराठी टिकवली. त्याला दाद द्यायलाच पाहिजे. माझ्या बरोबर एक हरिद्वारची मराठी मुलगी आहे. तिचे मराठी ऐकून कुणी तिचे शिक्षण पूर्ण हिंदी व इंग्रजीतून हरिद्वारला झाल्याचे ओळखून दाखविल्यास पाहिजे ते हरायला तयार आहे.

अवांतर- मी इथे विविध भाषकांत रहात असूनही माझा मराठी बाणा दाखवून देतो. अमराठी बॉसला अजिबात दाद देत नाही. आक्रमकपणा कुठेही सोडलेला नाही. भाषा आणि त्यासंदर्भातील सगळ्या बाबींसाठी अत्यंत आग्रही असतो. मराठी भाषकांचे आणखी एक वैशिष्ट्य. आमच्याकडे विविध भाषांचं काम चालतं. त्यात गुजराती भाषेची प्रमुख मराठी आहे. बंगाली भाषेतही मराठी रिसोर्स काम करतोय. आणि सगळ्या भाषांचं काम पहाणारा बॉसही मराठी आहे.

लय भारी....

लगे रहो ....

लगे रहो

मला म्.प्र. मधल्या लोकांचे कौतुक वाटते. "लगे रहो..." चा गीतकार पण शुध्द आणि अस्खलित मराठी बोलतो.
मध्ये टी. व्ही. वर एक सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला होता, त्यात राहुल द्रविडची मुलाखत घेतली होती, बहुतेक इंदूरला. ती तास-अर्धातासाची पूर्ण मुलाखत मराठीत होती. त्यात राहुल द्रविडही काय सहज मराठी बोलत होता! की वाटावे हा महाराष्ट्रातलाच.

अहो पिकतं

अहो पिकतं तिथे विकत नसतं , अन खपतं तिथे पिकत नसतं...काय करणार?
बाकी 'मराठी माणसाने एकमेकांशी मराठीच बोलले पाहिजे' ह्याला आपलाही जबरद्स्त पाठीम्बा.
-- पक्या

अहो पिकतं

अहो पिकतं तिथे विकत नसतं , अन खपतं तिथे पिकत नसतं...काय करणार?
बाकी 'मराठी माणसाने एकमेकांशी मराठीच बोलले पाहिजे' ह्याला आपलाही जबरद्स्त पाठीम्बा.
-- पक्या

मला काय म्हणाल मग?

अवांतरः आमचा मित्र राजवीरसिंग अस्खलीत मराठी बोलतो....आम्ही त्याला पंजाबी मावळा म्हणतो.

माझ्या बरोबर एक हरिद्वारची मराठी मुलगी आहे. तिचे मराठी ऐकून कुणी तिचे शिक्षण पूर्ण हिंदी व इंग्रजीतून हरिद्वारला झाल्याचे ओळखून दाखविल्यास पाहिजे ते हरायला तयार आहे.

मला काय म्हणाल मग? मराठी आकाशात उगवलेला मावळा?
::::::::कधीतरी गुजुभाऊ असलेला मराठमोळा विजुभाऊ

तो पंजाबी मावळा

तर विजुभाऊ तुम्ही 'खमण ढोकळा'! Laughing

चतुरंग

ह्म्म....

गुज्जु विज्जुपंत कसे वाटते?
नाहीतरी कलमदाने बखरनवीस आहातच Smile

१. फक्त

१. फक्त पुणेच नाही इतर ठिकाणीही असेच दिसते आता. बंगळुरला ही हिंदी बोलणे चालत होते.
इथे माझे भरपूर मित्र हिंदी भाषिक आहेत. अर्थात त्यांना मराठी येत नाही असे नाही. त्यांना मराठी समजते, बोलता येते. त्यांच्यासोबत इतके वर्ष हिंदी बोलून आता मराठीसाठी बोलणे जमत नाही.
बाहेर मी आपला जमेल तेव्हा मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो. पण नेहमी साध्य होत नाही.

बंगलोर ला होतो तेव्हा मी ही कन्नड भाषा शिकण्याचा प्रयत्न केला होता. पण तिकडे हिंदी/इंग्रजी चालत होते म्हणून संधी हुकली. पण बहुतेक वेळा बसचे फलक स्वतःलाच समजल्याने फायदा झाला होता.

२. त्यांनी पैसे घेतले नाहीत हा त्यांचा चांगुलपणा व तुम्ही देऊ केलेत हा तुमचा.

३. वरील मुद्याशी विसंगत वाटले. असो. माझाही तसाच अनुभव होता की ग्राहकाला गरज असते दुकान दाराची. अहो, फार पुर्वीपासून पुण्याबद्दल हे लिहून/सांगून ठेवले आहे कित्येक थोर पुरुषांनी Smile
पण हे सर्व आता सगळीकडेच होत चालले आहे असे दिसते.

मला

तर अजुन असा अनुभव आला नाही की कोणी वस्सकन ओरडलय पण पुण्यातल्या खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट परिधान करणार्‍या बगळ्या मामाचे अनुभव आहेत राव.
महिनाअखेरीची बोंबाबोंब असते पाकिट हलक असत आणि आपण कधी नव्हे ते मोहात पडुन नो एन्ट्रीत घुसाव तर हा मामा हाजीर.
मग तो आपल पाकिट अजुन हलक करण्याच पवित्र काम करतो. ह्याच कामात "मामी" देखील कमी नाहीत हा. एकदा कोथरुडमधुन "आई..ग" ह्या चाटच्या दुकासमोरच्या गल्लीत घुसलो तर समोर मामी हाजीर. तिच्यासोबत एक खलीची (थोडीशीच) ज्युनिअर आवृत्ती. हे दोघे खाकीत. आणि एक बगळ्याच्या वेशात. मग काय त्याला पाकिट उघडून दाखवल तर त्याने एका १०० ची नोट घेतली आणि परत ५० दिले. (न देवुन करतोय काय ते सोडून पाकिटात १०च्या ३ च नोटा आणि माझा गरीब चेहरा बघुन दिले ब्वॉ त्याने.
महिनाअखेरीस बहुतेक कोटा पुरा करायच काम चालत असेल की काय न कळे.
कारण एकदा अलंकार पोलिस चौकीच्या जवळ एका खाकी वर्दीने मला अडवुन लायसन, प्युशी (पी यु सी) हे पाहुन मगच सोडल होत.

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

"आई..ग"

आई..ग...काय आठ्वण करून दिलीस तू झकास.. कॉलेजमधे असताना आम्ही तिथे(पण) वाईट पडीक असायचो.. दही-पुरी-चाट(दपुचा) सही मिळायचं तेव्हा.. वा... Drooling
बाकी, आई ग च्या गल्लीचं खूप कन्फ्युजन आहे.. तिथे वन वे आहे हे कळायचंच नाही पटकन!

ए.........

अरे काय हे?????

आपण कधीच कसे नाही भेटलो मग?

सन २००१ चा जुलै ते सन २००३ चा आगष्ट आम्ही आई...ग ! ला रोज्ज सायंकाळी पडिक असायचो........

हुक्की आली की तिथून निघायचं आणि झेस्ट कॉफी-बार ला मस्त एस्प्रेसो मारायची....खुप वेळ झाला असेल तर दुर्गाला कोल्ड-कॉफी....चाऊ-म्याऊ (चायनिज) हादडायचं असेल तर तिथंच थोडं पुढं (एम.आय.टी.च्या रस्त्यासमोर) असेइंग ला...

ए...कोण कोण आहेत रे तिथले कट्टेबाज?

हे मात्र अति झालं हा ....

>> अरे काय हे?????
>>आपण कधीच कसे नाही भेटलो मग?
आत्त मात्र खरचं अति झालं रे धम्या ....
च्यायला तु "आई ... गं" ला असतोस, "झेस्ट" होतास , वर अजून "दुर्गावर" पण कट्टा जमवायचास, त्यात अजून भर म्हणून "आपाचीमध्ये" पण बैठक बसवायसास ....

मग एवढे कॉमन दुवे असताना आपण भेटलो कसे नाही ?
आपण एकमेकांना बघितले नसणे शक्यच नाही ....

मला तर राहून राहून आश्चर्य वाटते आहे, खरच "दुनीया बहोत छोटी है " म्हणतात तेच खरे ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मी सुद्धा

मी पण असायचो ना अपाची च्या बाहेर दोस्तांची वाट पहात.......
कुणीच कसं भेटलं नाही...
बहुतेक इकडे तिकडे "बघण्यात" मी जास्तच गुंग असायचो.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

काय सांगता ?

कुठे वर का खाली ?
आत का बाहेर ?
नविन का जुने ?

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

डान्या,

डान्या, लेका दुर्गाच्या बाहेर कोल्ड कॉफी पिताना शिगरेट पेटवायला जवळ लायटर/काडेपेटी नाही म्हणून आपण एकमेकांच्या शिग्रेटीवर शिग्रेट पेटवलेली असु शकते की रे!

तेव्हा कुठं माहिती होतं, की पुढे जाऊन आपली अशी दोस्ती होणार आहे! नायतर तेव्हाच नसती का भरतानं रामाला मारली तशी मिठी मारुन घेतली?

Smile

हेहे..

हेहे.. Smile दुर्गा,झेस्ट(काय मस्त सँडविच मिळायचं तिथे! आठवत नाही नाव आता..), आई..ग, आणि बिस्त्रो... बिस्त्रोत सगळ्यात पडीक.. Smile आणि नंतर नंतर बालाजी!(मॅंगो मिल्क्शेक!!! )
भेटलो नाही खरं कधी.. आम्ही अमच्या (गहन) गप्पांमधे बिझी असायचो ! त्यामुळे इकडे तिकडे पाहीलंच नाही... Smile

आणि हो.....

आइ ग्,दुर्गा कॅफे.
मस्तच.(मगल्य५-७ महिन्यात तिथे च चितळे पण उघडलय.)
कधी मधी आणखी वेळ असेल तर "एका लग्नाची गोष्ट","माकडाच्या हाती शॅम्पेन" बघायला जवळच्याच "यशवंत राव चव्हाण" ला जायचं.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

वाईट्टच अनुभव

सगळ्यांना पुण्यात वाईट्टच अनुभव येतात का हो??? ज्यांना चांगले अनुभव आलेत त्यांनी ते पण लिहावेत.

माझा पुण्यातील अनुभव

मुंबईहून कोल्हापुरला यश्टीतून जाताना गाडी पुण्यात थांबते. त्यावेळी अवघडलेलं अंग मोकळ करण्यासाठी गाडीखाली उतरतो. काय छान वाटतं त्या वेळी!! पुण्यात अंग मोकळ करण्याचा फार छान अनुभव येतो!! Big Grin

रम्याने

रम्याने मला वाटते चुकुन येथे प्रतिसाद दीला ,
अरे बाबा 'माझा सगळ्यात मोठा वाह्यात विनोद' येथे टाक हा प्रतिसाद Wave

काय राव

काय राव तुम्ही सगळे त्याच ठिकाणी होतात जिथे मी पण होतो त्याच काळात त्याच वेळीही कदाचीत.
आपण सगळ्यांनी ऐक मेकांना नक्की बधीतयल पण हाच तो / ती म्हणून ओळखत नसु.

आमचा ऐकच नारा होता - जाऊ तिथे खाऊ

पुण्यनगरीतील हि ती आमची तीर्थ क्षेत्रे होत:
बालगंधर्वचा कट्टा, बोट क्लब (सीओईपी), दुर्गा- कॅफे, चैतन्य, अपाची, अप आणि अबाऊ, किनारा (पुर्वी तिथे अननसाचा शिरा मिळे), जोशी वडा (कर्वे रस्ता/बालगंधर्व), पुना बोर्डींग (झकास जेवण), जनसेवा (खरवस)