Accepted (2006)

आत्मशून्य's picture
आत्मशून्य in जनातलं, मनातलं
19 Jan 2011 - 6:11 am

कथेचा नायक बार्टलबी (Bartleby Gaines) हा एक टीनेज मूलगा तूमच्या माझ्या सारखा एक सामान्य व्यक्तीमत्वाचा, थोडासा धडपड्या . जो त्याच्या मीत्रांसोबत हाय स्कूल मधून (मराठीत आफ्टर ट्वेल्थ) कोलेजला जाण्याचे मनसूबे रचत आहे. व्यक्तीमत्व सामान्यच परंतू पोरगा एकदम करामती आहे, म्हणूनच कूठे फेक आयडी (वोटर आयडी , लायसंन्स इ...) बनव अथवा आवडत्या मैत्रीणीच्या पार्टीसाठी (भलेही त्याला आमंत्रण नसेल) तीच्या घराच्या हीरवळीला पाणी घाल असे समाज ऊपयोगी उद्योग करणारा (कभी हा कभी ना चा शाहरूख म्हणाना) गूणी बाळ अभ्यासात थोsssssडा कच्चा पण व्यवहारात तसा हूश्शार. म्हणूनच त्याचे आयूश्य हे त्याच्या जाड्या जीवलग बालमीत्र शर्मन (Sherman Schrader) सोबत तसे मजेत चालू आहे पण.......

खरे प्रोब्लेम सूरू होतात जेव्हां तो ढकलला जातो चांगले मार्क्स मीळवून चांगल्या कोलेजात प्रवेश मीळवायच्या रॅट रेसमधे. एथूनच त्याच्या अयूश्याला कलाटणी (?) मीळणार्‍या प्रसंगाना त्याला सामोरे जाणे भाग पडते कारण त्याचा मीत्र शर्मन अर्थातच चांगले मार्क्स घेऊन Harmon College या अत्यंत प्रतीष्ठेच्या कॉलेजला सहज प्रवेश मीळवतो आणी मावळणार्‍या प्रत्येक दीवसागणीक बार्टलबीच्या कॉलेजला जाण्याच्या स्वप्नांना सूरूंग लागू लागतो कारण त्याचे मार्क्स बघून अर्थातच त्याला सर्व कॉलेजातून rejection letters येऊ लागतात. सोबतच घरातील लोकांचे कॉलेजला गेलेच पाहीजे हा दबाव हा अत्यंत गंभीर वळण घेतो.

त्यातून तातपूरता मार्ग नीघावा म्हणून बार्टलबी शर्मनच्या मदतीने South Harmon Institute of Technology या (फेक) कॉलेजची स्थापना करून fully functional वेबसाइट बनवतो आणी घरात सांगून मोकळा होतो की शेवटी त्याला कॉलेजला प्रवेश मीळालाय.... घरी अर्थातच आनंदी आनंद होतो पण त्याचे वडील वेबसाइट बघून इतके इंप्रेस होतात की चक्क $१०,००० फी त्याच्या हातात ठेवतात आणी स्वतः त्याला कॉलेजात सोडायला येऊन प्रीन्सीपॉलला भेटायचा हट्ट धरतात. आणी खरी धमाल सूरू होते...

ती धमाल अर्थातच चीत्रपट बघण्यात आहे, बार्टलबी फेक कॉलेजसाठी जागा, स्टूडंट्स इ. मीळवून शर्मनच्या काकांना प्रीन्सीपॉल म्हणून त्याच्या घरच्यांची कशी यशस्वी भेट घालून देतो. ते होते ना होते तोच अजून एक मोठा प्रश्न आ वासून ऊभा राहतो ... त्याच्या वेबसाइटला खर्‍या कॉलेजची समजून अजून ३०० लोकानी तेथे प्रवेश मीळवलेला असतो आणी ते सर्व दारात दत्त म्हणून ऊभे राहतात, त्यांचे पूढे काय होते, तसेच Harmon College च्या प्रीन्सीपॉल ला नेमकी ती फेक कोलेज म्हणून दाखवलेली जागा केवळ हीरवळीचे मैदान वाढवण्यासाठी हवी असते त्यासाठी तो बार्टलबीच्या मैत्रीणीच्या बॉयफ्रेंडला बोलणी करायला तेथे पाठवतो त्याला बार्टलबी कसे तोंड देतो तसेच पूढे तो आपल्या मैत्रीणेचे ह्रूदय जींकू शकतो का ?त्याच्या फेक कॉलेजचे पूढे काय होते त्याची बींग फूटते काय ? पूढे Harmon College चा प्रीन्सीपॉल जागा मीळवण्यासाठी काय अ‍ॅक्शन घेतो ?, ह्या तशाच अनेक प्रश्नांच्या रोचक आणी धमाल वीनोदी ऊलगड्याची कहाणी आहे Accepted.

एकूणच शीक्षणाच्या बाजारीकरणावर टीका, चालू शीक्षणपध्दतीमूळे मूलांवर असलेले अभ्यासाचे ओझे व स्पर्धेचा दबाव ह्या व इतर अनेक वीशयांवर चीत्रपट मस्त भाष्य करतो. चीत्रपट विनोदी असून अर्थातच पूर्ण्पणे कॉलेज लाइफवर बेतलेला आहे म्हणून सहकूटूंम्ब पहाण्याचा ह्ट्ट धरू नये तसेच मीत्रांसोबत अथवा एकट्याने एकदातरी पहाण्याचा हेका सोडू नये.

चित्रपटविरंगुळा

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

19 Jan 2011 - 6:50 am | नरेशकुमार

छान आहे परिक्षण,
सिनेमा पहिला पाहिजे.